लेखन उपक्रम २ - 'इकडे-तिकडे'- कविन

Submitted by कविन on 23 September, 2023 - 05:54

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले. तिकडे बाल्कनीत बसून चहा पीत ती त्याच्या स्टॉपकडेच बघत होती.

त्याला मात्र वाटून गेले,"स्साला! सकाळ हवी तर अशी. नाहीतर इकडे, पंधरा मिनिटाच्या स्लॉटमधे पाणी भरा आणि पाच मिनिटात आंघोळ उरका. शांत बसून चहा प्यायचं स्वातंत्र्य नाही टाईमटेबलमधे. पगाराची ऊब इतकी महाग असावी?

बस आली आणि गेली.

आता रिकामा स्टॉप आणि रिकामी 'ती' दोघेच उरले.

पायपुसण्यावरचा प्राईस टॅग काढून तिकडे ती आत वळली तेव्हा नव्याने जाणवलं तिला तिने सोडून दिलेल्या 'पगाराचं मोल'.

इकडे पगार जमा झाल्याचा मेसेज वाचताना गर्दीतल्या धक्क्यांनी त्यालाही जाणवून दिलं 'Nothing is free'.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नोकरी सोडल्यावर सगळ्यात जास्त काय miss केलं तर महिन्याच्या शेवटी येणारी payroll chi email आणि कॅन्टीन मध्ये आरामात (स्वतः न बनवता) मिळणारा चहा. त्यामुळे खूप relate झाले. Bw

काही नाही हो ममो, everything comes with a price tag, nothing is free या वाक्यावर सगळा डोलारा आहे Lol >> कळल ग सामो ने सांगितल्यावर .. no lunch is free ही माझी ही आवडती फिलॉसॉफी आहे.