चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-२- मेहंदी डिझाईन्स(रेखाटने)

Submitted by संयोजक on 20 September, 2023 - 01:53

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू..

आजचा विषय - मेहंदी डिझाईन्स(रेखाटने)

स्त्रीचा शृंगार हा मेहंदी शिवाय अपूर्णच..सण कोणताही असो, महिलांना मेहंदी काढण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. मेहंदीचा सुंदर ओला सुगंध, मेहंदी लालचुटुक रंगल्यावर होणारा आनंद हा सगळ्यांनीच अनुभवला असेल..
मग चला..पाठवा मेहंदी डिझाईन्स (रेखाटने)ची सुंदर छायाचित्र...

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हातभरून हि दुल्हन मेंदीच आवडते म्हणून नेहमी तीच काढते मी... डाव्या हातावर मी रेखाटलेली मेंदी आणि उजव्या हातावर छान मेंदी जमणारी मैत्रीण, शेजारीण पकडते Happy

अप्रतिम मेंदी Diyu..
पुढल्या वेळी मेंदी काढताना या धाग्यावरचे डिझाईन्स ढापणारे मी ..

अप्रतिम मेंदी Diyu..
पुढल्या वेळी मेंदी काढताना या धाग्यावरचे डिझाईन्स ढापणारे मी .....<<<मी सुद्धा .

वॉव दियु मस्त मेंदी आहे.<<< धन्यवाद सामो.

Pages