Marriage म्हणजे marriage असतं

Submitted by चुन्नाड on 19 September, 2023 - 08:24

मंगेश पाडगावकर यांच्या "प्रेम म्हणजे प्रेम असतं" यावरून प्रेरित...

Marriage म्हणजे Marriage म्हणजे marriage असतं
Love असो की arranged, दोन्हीमध्ये courage असतं

साजरा झालेला असतो लग्ना आधीच honeymoon
त्यासाठी चालून जाते लॉज मधली afternoon
नाविन्य संपून जाते, नाते उमलते फारच soon
पुन्हा कोंब फुटायला यावाच लागतो monsoon
June मधल्या शरीराला जून होत जाणारं एज असतं
Marriage म्हणजे Marriage म्हणजे marriage असतं

boyfriend चा नवरा झाला की घेतोच की तुम्हाला granted
girlfriend ची बायको झाली की तो होतो wanted
राजा तोच असतो खरा जरी राणी तुम्ही anointed
सारं सारं तुझ्या साठी असलं म्हणतो काहीतरी scented
घरात करते मनमानी ती आणि बाहेर दाखवते चित्र सुखी आयुष्याचे painted
थोडं connection आणि थोडं cross connection असं
wrong नंबर लागणारं हेराफेरी चं garage असतं

ती सहज रमते सगळ्यांत जशी काही भातुकली
तो मात्र धुमसत राहतो weakly आणि weekly
तिचा सगळा जीव लावते बनवते home sweet home
त्याचं मात्र बघायचं राहून गेलेलं असतं Rome
झेपावू पाहणाऱ्या पक्षाचा golden golden cage असतं
Marriage म्हणजे Marriage म्हणजे marriage असतं

क्युटी पाय आणि शोना बाबू होतात Mister आणि Misses
क्यूट बेबी आणि द्वाड सोनू join करतात after school classes
आयुष्याच्या शाळेतून घ्यावीच लागते पालकांना सुद्धा recess
हफ्ता बिल भरून दमलेली आई आणि मुलं बिल सांभाळून
भागलेला बाबा दोघेही असतात करत संसारासाठी Excess
अशा संसाराच्या गाड्याचंच high high mileage असतं
Marriage म्हणजे Marriage म्हणजे marriage असतं

पवित्र वगैरे असेल मना बिना चं union
रोजच्या स्वयंपाकासाठी चिरावाच लागतो onion
तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा किंवा Newton
तूर डाळ कुठली आणि हरभरा डाळ कुठली
यातला फरक कळण हेच knowledge असतं
Marriage म्हणजे Marriage म्हणजे marriage असतं

फारच क्वचित होते दोस्तांची friday late night
आई बाबांची भेट सुद्धा वाटू लागते fright
दोघांमध्ये तिसरा कशाला, असे दोघांना वाटते right
तोलून मापून होऊ लागते आता प्रत्येक डेट night
बरोब्बर वजनात बसवलेलं flight चं check-in luggage असतं
Marriage म्हणजे Marriage म्हणजे marriage असतं

कुठल्या नात्यात नसतो problem
कुणाकुणाला द्यायचा blame
जबाबदारीचा कुणी तरी घ्यायचाच असतो claim
विझली जरी प्रेमाची ज्योत तरी परत फुलवता येतेच flame
अशी principles सांगणारं शहाणं शहाणं sage असतं
Marriage म्हणजे Marriage म्हणजे marriage असतं

© चुन्नाड

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विलक्षण सुंदर Happy
>>>>>पवित्र वगैरे असेल मना बिना चं union
रोजच्या स्वयंपाकासाठी चिरावाच लागतो onion
खी: खी: