मनमोहक ते रूप || अर्पितो तुज मनोभावे नैवैद्य ||

Submitted by संयोजक on 19 September, 2023 - 05:06

भक्तगणांनो, गणेशोत्सव तर सुरु झालाय. मन प्रसन्न करणाऱ्या गणेशमूर्ती घराघरात आणि सार्वजनिक मंडपात स्थानापन्न झाल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीकडे बघूनच मन आनंदित होते आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच बाप्पाला अर्पण करणारा प्रसाद आणि नैवैद्य यामुळे वातावरणातील गोडवा द्विगुणित झाला आहे. इतर मायबोलीकरांनासुद्धा तुमच्या घरातील बाप्पाचे दर्शन व्हावे आणि त्यांनासुद्धा नैवैद्याचा गोडवा अनुभवता यावा म्हणून या धाग्यावर तुम्ही तुमच्या घरातील बाप्पाचे फोटो तसेच बाप्पाला अर्पण करणाऱ्या प्रसादाचे आणि नैवैद्याचे फोटो द्यायचे आहेत. लवकरात लवकर फोटो टाका. आम्ही सर्वजण बाप्पाच्या मुखदर्शनाची आणि नैवैद्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख
त्या लाल background ने अजून छान दिसत आहे.

IMG_20230919_115930451_0.jpg

घरातील साड्या वापरून पर्यावरण पूरक आरास अन बाप्पा

धन्यवाद Happy
लाल बॅकग्राऊंडची कल्पना दिरांची .

तेजो , सुरेख आरास

गणपती बाप्पा मोरया .....
झुल्यावरील गणपती >>>>>>>>>
झाडे छाटल्या नंतर काही फांद्या कुंपणातच पूर्णपणे वाळलेल्या होत्या .
त्यातील दोन फांद्या बायडिंग तारेने बांधले आणि दुकानातून आणलेली रंगीत पाने लाऊन झाड तयार केले .
त्याला एक झोपाळा दोरीच्या साह्याने बांधला आणि त्यावर गणपती बाप्पांना विराजमान केले Happy

देवीका तुम्ही केलेले मोदक कातिल आहेत. वरती केशरकाड्यांची सजावट वगैरे - मन लावून Happy बाप्पा पावणार तुम्हाला.

884433c0-8c55-4ef1-bcc0-261e5263debb.jpeg
हा आमच्या घरचा गणपती

फोनवरून अ‍ॅक्च्युअल साइजच वापरला आहे. पण इथे वरच्या इतर फोटोंपेक्षा लहान दिसतोय.

Pages