Sacking of unacademy teacher

Submitted by mrunali.samad on 19 August, 2023 - 03:37

का एका अनएकेडमी शिक्षिकाला जॉबवरून काढण्यात आलं?
कुठे चालला आहे आपला भारत देश?
आजकाल शिक्षित लोकांना निवडून द्या म्हणणं गुन्हा झाला आहे..
२०२३ मधे जेव्हा आपण विकसित देशांबरोबर तुलना करतो तेव्हा अशा मानसिकतेमुळे आपण मागे तर नाही जात आहोत असं नाही वाटत का..अशाने भारत विकसित देश कसा बनणार?
फक्त निवडक लोकांना काहीही बोलायचं स्वातंत्र्य, त्यांनाच उज्वल भविष्य.. बाकिच्यांना बेसिक गोष्टी बोलायचा पण हक्क नाही?
असं वाटत नाही तुम्हाला भारतात शिक्षित अडाणी लोक जास्त झाले आहेत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात शिक्षणाला फार महत्व दिले जाते... शिक्षित कॅन्डीडेट म्हणजे चांगला असे काही नसते...> >>> बरोबर, फक्त शिक्षीत असेल तर, नालायक निघाल्यास, तो बिचारा अडाणी तो आणखी काय करणार? अशी सबब मिळून केलेल्या कृत्यांच्या जबाबदारीतून निसटता येणार नाही याची हमी असते....शिक्षण कमी असल्यास त्यांच्या मुर्खपणाच्या, असभ्य पणाच्या कित्येक कृत्यांकडे सर्रास डोळेझाक केली जाते. किमानपक्षी तशी अपेक्षा तरी असते.

शिक्षित व्यक्तीला निवडून द्या असं म्हटल्यामुळे मला काढून टाकला असा त्याचा कांगावा आहे. त्याचं पूर्ण स्टेटमेंट असं होतं-
Sangwan was discussing the latest bill tabled in Lok Sabha by the central government to replace British-era criminal laws. He said that all the notes he had prepared on criminal law became worthless with the name change. don't know whether to laugh or cry because I have a lot of notes, bare acts and caseloads that I had prepared, he said. But remember one thing, the next time you vote, choose an educated candidate so that you do not have to suffer all this again in life...do not vote for someone who only knows how to change names, he added.

सो इथे तो स्पेसिफिकली या सरकारला मत देऊ नका असं म्हणतोय कारण सरकार करत असलेल्या बदलांमुळे त्याचं काम वाढतंय ज्याचा त्याला राग येतोय. शिक्षित वगैरे मुद्दे नंतर जोडले आहेत त्याचा मूख्य राग त्याला स्वतःला चेंजेसचा अभ्यास करावा लागेल याचा दिसतोय. (नुसतं नाव बदललं तर वर्ड मध्ये फाइण्ड अँड रिप्लेस करता येतं. याला माहीत नाही का? एनिवेज.) आता हे ओपिनियन मायबोलीवर दिलं तर ठीक पण क्लासमध्ये एखाद्या राजकीय पक्षाच्या बाजूने अथवा विरुद्ध प्रचार करत विद्यार्थ्यांना इन्फ्लुइन्स करणं हे नियमात बसत नसावं.

आणि हो, काँग्रेसला तर क्लासरूमच्या बाहेर शिक्षकाने राजकीय मत व्यक्त केलेलं पण चालत नाही.

Govt teacher suspended for Facebook post critical of Karnataka CM Siddaramaiah’s freebies
https://m.timesofindia.com/city/bengaluru/karnataka-govt-teacher-critici...

या धाग्याची पार्श्वभूमी. (जी मूळ धाग्यात द्यायला हवी होती, असे माझे मत आहे.)

Online learning platform Unacademy sacked a teacher, Karan Sangwan, who appealed to students to vote for educated candidates. A video of his remarks was widely shared on social media leading to a controversy.

हा तोच करण सांगवान आहे का? या यु ट्युब लेक्चरमध्ये तो म्हणतोय की "नवा कायदा हा जुन्या कायद्यातून बहुतांशी कॉपी पेस्ट केला आहे. कायद्यातले कन्सेप्ट्स बदलत नाहीत. इंग्रजांनी फार सुंदर पद्धतीने कायदा लिहिलाय. त्याचं फक्त नाव बदललंय. सेक्शन्सचे क्रमांक बदललेत, तेवढे तुम्हांला लक्षात घ्यावे लागतील. तुमच्या नोट्स, पुस्तकं वाया जाणार नाहीत, हे तो किमान दहा वेळा म्हणालाय. तुम्हांला झालेले बदल समजून घ्यायला फार तर महिनाभर लागेल आणि त्यात मी तुम्हांला मदत करेन असं .

मोदी शहा यांनी कितीही सांगितलं की आम्ही जुना कायदा मोडीत काढून नवा कायदा आणला तरी तसं झालेलं नाही. तसं करणं शक्य नाही" (स्वैर अनुवाद).

हा व्हिडियो त्याच्या स्वतःच्या यु ट्युब चॅनेलवरचा आहे असं दिसतं. त्यात त्याने मी अनअ‍ॅकेडमी वर क्लास घेतो, त्याला तुम्ही सबस्क्राइब करा , (माझ्या चॅनेलचं नाव) लिगल पाठशाला हा कोड टाकून डिस्काउंट मिळवा असंही म्हणतोय.

ट्विटरवर व्हायरल झालेले पढे लिखे लोगों बद्दलचं मत मला इथे दिसलं नाही. अर्थात सुरुवातीचा १/३ आणि शेवटची ३-४ मिनिटे सोडली तर मी तो व्हिडियो सलग संपूर्ण पाहिला नाही. पण दोन्हीतलं टी शर्ट तरी सेमच आहे, म्हणजे यातलाच असावा.

हाच व्हिडियो अन अ‍ॅकॅडमीवरही वापरला गेला का याची कल्पना नाही. तिथे त्याचे ऑगस्टमधले व्हिडियो फुकटात तरी दिसत नाहीएत.

बापरे भरत! याचं पण समर्थन करताय!
इथे माबोवरच सरकारी नोकर आहेत बीजेपी सरकारवर टीका करणारे. फेसबुकवर पण आहेत.
आता त्यांना सस्पेंड केलं तर तुम्हीच इथे इतका थयथयाट कराल. अर्थात शिंदे फडणवीस वगैरे असं काही करणार नाहीत म्हणा.
But point to be noted. उद्या भरत यांच्या समविचारी लोकांचं सरकार आलं तर नोकरी जायची तयारी असल्यासच सोशल मीडियावर राहुल गांधीची चेष्टा करावी.

https://twitter.com/Gagan4344/status/1692157655777685961?s=20

आणि हा त्या 'टीचर' चा व्हिडियो. मला नोट्स परत काढाव्या लागतील व तुमचंही काम वाढेल म्हणून या सरकारला मत देऊ नका असं विद्यार्थ्यांना बजावतोय.

मोदीशहा इतके सगळे कायदे बदलताहेत तर सरकारी नोकरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आणि ज्याचा भाजप समर्थकांच्या मते गैरवापर भाजपेतर सरकारे करतात, तो नियम मोदीशहा नक्कीच बदलणार असतील ना?

मी वर दिलेल्या संपूर्ण लेक्चरच्या व्हिडियोत तर तो म्हणतोय की नाव आणि सेक्शनस बदलण्यापलीकडे फार काही बदललेले नाही. त्यामुळे त्याचे शब्द ट्विस्ट करून हेच ऑर्ग्युमेम्ट पुढचा इश्यु येईपर्यंत रिपीट केलं जाईल हे निश्चित.

महाराष्ट्रात फडणवीसने कधी त्याच्यावर टीका करणाऱ्या सरकारी नोकरावर काही कारवाई केल्याचं पाहिलेलं नाही. नियम असला तरी वापरायचा का याचं discretion असतं.
आणि काँग्रेसला व तुम्हाला हा नियम वापरायला आवडतो व नैतिकदृष्ट्या योग्य वाटतो त्यामुळे काढून टाकला तरी तुमचं सरकार आल्यावर तो नियम परत आणणारच की तुम्हि.

तो टीचर सध्याच्या सरकार विरोधात प्रचार क्लासरूममध्ये करत होता हे मी दिलेल्या व्हिडियोत स्पष्ट दिसत आहे. क्लासरूममध्ये सरकार वर टीका करणं- मुलांनी मतदान पुढच्या वेळी याना करू नये असं स्पष्ट बजावणे- as part of 'teaching' - हे नियमात बसत नसावं. तुमचं काम वाढलं असं तो म्हणतोय की विदयार्थ्यांना.
बाकी नुसतं शिक्षणाचं महत्व, शिक्षित लोकप्ररिनिधी निवडा- असं जनरल स्टेटमेंट केलं म्हणून नोकरी गेली असा खोटा कांगावा तो व पुरोगामी करत आहेत यात काहीच आश्चर्य नाही.

बाकी नुसतं शिक्षणाचं महत्व, शिक्षित लोकप्ररिनिधी निवडा- असं जनरल स्टेटमेंट केलं म्हणून नोकरी गेली असा खोटा कांगावा तो व पुरोगामी करत आहेत यात काहीच आश्चर्य नाही. >>>>@WHITEHAT त्याच जाउदेत, मी या देशाचं हित पहाणारा एक नागरीक म्हणून म्हणतो, अशिक्षित किंवा अर्धशिक्षित उमेदवारांना/नेत्यांना निवडून देण्या ऐवजी सुशिक्षित उमेदवारांना निवडून आणा... तुम्ही सहमत आहात की नाही? व्हॉटअबाउटरी करण्याआधी याचं सहमत किंवा असहमत यात उत्तर द्या आणि नंतर पुढे चालूद्यात..

काही प्रश्न पडले आहेत.

१. व्हाईटहॅट - कायद्यातले बदल म्हणजे फक्त नावं बदलली इतके सोपे प्रकरण आहे का ?
२. उपाशी बोका - पार्श्वभूमी सांगायची तर कायद्यात बदल काय काय झालेत हे सांगणार का ?
३. पीडीत सरकारी नोकर आहे का ? अनअ‍ॅकेडमी ही सरकारी संस्था आहे का ?
४. अनअ‍ॅकेडमीच्या संचालकांचे मोदी शाह यांच्या सोबत फोटो आहेत का ?

लॅपटॉप दुरूस्तीला गेल्याने लिंका डकवण्या / चोप्य पास्ते वरच काम भागवावे लागणार आहे.

राजद्रोहाचा वादग्रस्त कायदा हटवला अशी जाहिरातबाजी होतेय. प्रत्यक्षात १२४ च्या ऐवजी १५० कलम आले आहे. त्यात सेडीशन हा शब्द गाळला आहे. पण कायदा जास्त व्यापक बनला आहे.
इंटरप्रिटेशन कसे होईल हे सूज्ञांस सांगणे न लगे.
https://www.livemint.com/news/india/what-is-section-150-all-you-need-to-...
What does Section 150 say?
“Whoever, purposely or knowingly, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or by electronic communication or by use of financial mean, or otherwise, excites or attempts to excite, secession or armed rebellion or subversive activities, or encourages feelings of separatist activities or endangers sovereignty or unity and integrity of India; or indulges in or commits any such act shall be punished with imprisonment for life or with imprisonment which may extend to seven years and shall also be liable to fine."

Section 150 is followed by an aditional segment (Section 151) which seeks to punish people who ‘wage war against the Government of any foreign State at peace with the Government of India’ or abet any such efforts.

हे मी ट्विटरवर वाचलं होतं. पडताळून पाहता येत नव्हतं, म्हणून इथे स्पष्ट लिहिलं नाही. द प्रिंटने म्हटलंय की तो व्हिडियो करण सांगवानच्या स्वतःच्या यु ट्यूब चॅनेल लिगल पाठशाला वर होता. अनअ‍ॅकॅडमीवर नव्हे. त्याची चूक ही की तो व्हिडियो शूट करताना त्याने अनअ‍ॅकॅडमीचा टी शर्ट घातला होता.
Don’t elect someone who only knows changing names. Choose well.
हे बरंच झोंबलं असणार.

आता शिक्षणाशी संबंधित प्लॅटफॉर्मला शिक्षित लोकांना मतं द्या हे मत खटकणं, भाजप समर्थकांना हे आपल्याच नेत्याला उद्देशून आहे असं वाटणं ( काजोलच्या बाबतही हेच झालं होतं) यात बर्‍याच आयर्नी आहेत.

मालकाच्या धंद्याला बाधा येईल असे वर्तन नोकराने करणं आणि त्याबद्दल मालकाने नोकराला कामावरून काढून टाकणं यापलीकडे या बातमीत काही दम नाही.
पण या धाग्यावर कुठलीही बातमी मोदीविरोध किंवा मोदी समर्थन या दोनच मसाल्यात परतून त्या वाटायचे काम जोरात दिसतंय.
असो. मी जरा नवीन आहे. सांभाळून घ्या.

काँग्रेसच्या लोकांनी आपल्या सोशल मीडिया influencers ना चांगले टीशर्ट तरी द्यावे. म्हणजे मग हा इश्यू होणार नाही. आता करण ने उघडपणे आपलं निवडणूक प्रचाराचं काम करावं. क्लासेस घेतो, मुलांना शिकवतो अशी नाटकं करून त्याआडून गुपचूप प्रचार करण्याची लबाडी तर पकडली गेलीच आहे.
माबोवरच त्या एका काकांनी तो पोरं दुसऱ्या बाजूनं टीशर्ट बदलून आली टाइप धमाल परिच्छेद लिहिला होता ना Proud
ते सरकारी नोकर होते का? भाजप सरकारवर टीका करायचे पण तरी त्यांच्यावर काही कारवाई झाली नव्हती. लोल्स.

आता शिक्षणाशी संबंधित प्लॅटफॉर्मला शिक्षित लोकांना मतं द्या हे मत खटकणं, भाजप समर्थकांना हे आपल्याच नेत्याला उद्देशून आहे असं वाटणं ( काजोलच्या बाबतही हेच झालं होतं) यात बर्‍याच आयर्नी आहेत.///

किती थापा मारतोय हा आयडी! ते काय म्हणतात तसं पापाचा घडा फुगून फुटेल हां आता!
सरकारने कायदे बदलले, आता तुमचं काम वाढलं, माझ्या नोट्स, हसावं का रडावं- म्हणून या सरकारला पुन्हा मत देऊ नका असं शिकवण्याच्या नावाखाली influencing करतोय त्यामुळे कारवाई झाली आहे
बाकी तो इतर १०० वाक्ये बोलला असेल- शिक्षित लोकांना मत द्या, एकाच घराण्यात वंशपरंपरागत सत्ता ठेवा- त्याचा इथे संबंध नाही.
धागाकर्त्या ताई एक misleading थाप असलेला धागा काढुन गायब झाल्या.

माझा धागा पळवला.

Submitted by ढंपस टंपू on 19 August, 2023 - 04: >>>>>>>
तुम्ही पायलीचे पन्नास धागे टाकता , पण चर्चेत भाग घेत नाही असे का ?

अपेक्षेप्रमाणे प्रश्न फाट्यावर मारले आहेत.
१. व्हाईटहॅट - कायद्यातले बदल म्हणजे फक्त नावं बदलली इतके सोपे प्रकरण आहे का ?
२. उपाशी बोका - पार्श्वभूमी सांगायची तर कायद्यात बदल काय काय झालेत हे सांगणार का ?
३. पीडीत सरकारी नोकर आहे का ? अनअ‍ॅकेडमी ही सरकारी संस्था आहे का ?
४. अनअ‍ॅकेडमीच्या संचालकांचे मोदी शाह यांच्या सोबत फोटो आहेत का ?

या प्रश्नांना उत्तर न देता भरमसाठ पोस्टी टाकल्या जातील. मग हे प्रश्न कोणत्या प्रतिसादासाठी होते हे विसरले जाते.
व्हाईटहॅट यांनी असे म्हटले आहे कि कायद्यात बदल झाल्याने त्याला आता पाठांतर करावे लागेल. पण वर्ड मधे फाईण्ड अ‍ॅण्ड रिप्लेस असते. म्हणजे फक्त इतकाच बदल झाला आहे का हा प्रश्न होता.
हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे हा मनुष्य लॉ ग्रॅज्युएट आहे. कायद्यातल्या बदलाने काय परिणाम होतील याची त्याला अजिबात कल्पना नाही. फक्त फाईण्ड अ‍ॅण्ड रिप्लेस ही कमांड त्याला माहिती नसल्याने तो कांगावा करतोय असा व्हाईटहॅट यांच्या प्रतिसादाचा सूर आहे.

हा जो सूर आहे तो योग्य आहे का यासाठी हे प्रश्न विचारले आहेत.
कायदे बदलल्यने काही दूरगामी परिणाम होत नाहीत का ?

हा प्रतिसाद मूळच्या प्रतिसादावर जे प्रश्न होते त्याला अनुसरून रिमाईंडर आणि अजून स्पष्ट व सोपे करण्यासाठी.
नवीन प्रतिसादांसाठी पुन्हा पुढच्या पोस्टीत ताट वाढून ठेवलेले आहे .

मालकाच्या धंद्याला बाधा येईल असे वर्तन नोकराने करणं आणि त्याबद्दल मालकाने नोकराला कामावरून काढून टाकणं यापलीकडे या बातमीत काही दम नाही. >> त्याने मालकाच्या धंद्याला बाधा येईल असे काय वर्तन केले आहे ? हाच प्रश्न बदलून घ्या पाहिजे तर.
त्याच्या वर्तनाने मालकाच्या धंद्याला बाधा का आली आहे ?
त्याने गुंडांना आमंत्रण दिलेय का ?

पण या धाग्यावर कुठलीही बातमी मोदीविरोध किंवा मोदी समर्थन या दोनच मसाल्यात परतून त्या वाटायचे काम जोरात दिसतंय. >> कायद्यातले बदल पुतिन, बायडेन, हसीना शेख यांनी केले आहेत का ? भारतातल्या कायद्यातल्या बदलाविषयी नायजेरियाच्या राजकारण्यांना बोलायचे का ? कि भाजपचे नेते सत्तेत आले कि ते टीकेच्या पलिकडे जातात ? त्यांना अमरपट्टा मिळतोय कि ते गाईपेक्षा पवित्र असल्याने त्यांच्यावर टीका करायची नाही ?

अक्षयकुमार, अमिताभ बच्चन आणि काही कलाकार पेट्रोलचे दर वाढले म्हणून सायकल चालवा म्हणत होते, मग फिल्म इंडस्ट्रीने त्यांच्या धंद्याला बाधा येईल म्हणून त्यांना काढून टाकले का ?

पुन्हा एकदा अनअ‍ॅकेडमी ही सरकारी संस्था आहे का ? तिचे मालक सरकार आहे का ?
तसे असे तर मालकाविषयी टीका केल्याने काढून टाकले हे योग्य. इथे अनअ‍ॅकेडमीच्या धोरणांवर टीका नाही, मग खसगी संस्था या सरकरला भिऊन आहेत का ? ही लोकशाही आहे का ?

हे प्रतिसाद फाट्यावर मारून पुढे जाणार यात डाऊट नाही. हरकत नाही.
पुन्हा रिमाईंडर्स दिले जातील. धागा पळेल हा धागाकर्तीचा लाभ.

@सामना,
मी तुम्हाला उत्तर देण्यास बांधील नाही, पण तरी देतो.
या धाग्याची पार्श्वभूमी काय हे इतरांना कळावे (जे मला स्वतःलाही माहीत न्हवते), म्हणून फक्त बातमीची लिंक डकवली इतकेच.

मी तुम्हाला उत्तर देण्यास बांधील नाही, >> तसे म्हटलेले आहे का मी ? तुम्ही इथे लिहायला सुद्धा बांधील नाही.
अर्धवट पार्श्वभूमी द्यायलाही बांधील नाही.

धन्यवाद. पुढील प्रश्न धागा लेखिकेला विचारू शकता. पुढच्या वेळी रीमाइंडर देताना माझे नाव त्यातून काढून टाकू शकता. बाकी चालू द्या.

पब्लीक डोमेने मधे अर्धवट पार्श्वभूमी द्यायला तुम्हाला कुणी सक्ती केलेली नाही. ज्याने पार्श्वभूमी दिलेली नाही म्हणून बातमी दिली आहे त्याने अधिक मेहनत घेऊन तपशिलात पार्श्वभूमी दिली पाहिजे. पब्लीक फोरम मधे तुम्हाला प्रश्न केलेले चालत नसतील तर तुम्हाला लेखिकेने माहिती दिली नाही असे गळे काढण्याचा अधिकार नाही.

थापा मारणं हे भाजप समर्थकांचं पहिलं व्यवच्छेदक लक्षण. पंतप्रधानापासून ते फेसलेस ट्रोलपर्यंत सगळे हेच करतात. एकच खोटं वेगवेगळ्या किंवा त्याच शब्दांत वेगवेगळ्या किंवा त्याच तोंडांनी पुन्हा पुन्हा सांगणं हाही त्याचाच भाग.
आपण ज्या चुकीच्या गोष्टी करतो तो दुसरा करतो हे बेधडकपणे सांगणं हे यांचं दुसरं व्यवच्छेदक लक्षण.
या लोकांनी सत्तेसाठी पाप पुण्य या संकल्पना कधीच गुंडाळून ठेवल्यात.

करण सांगवानने ,हे सरकार फक्त नावं बदलतं, असं म्हटलं, त्याने व्यवस्थित पी पी टी बनवून दाखवलं आहे की कायद्यातले बदल हे सुपरफिशल आहेत. आम्ही इंग्रजी काळातील खुणा मिटवतोय या महान राष्ट्रवादी दाव्याच्या फुग्याला त्याने पिन मारली. राजापेक्षा राजनिष्ठ असलेल्या अनअ‍ॅकॅडमीच्या मालकाला मिरच्या झोंबल्या . आणि कोणी शिक्षणाबद्दल बोलले की साहजिकच चोराच्या मनात चांदणे चमकू लागते.
गोविंदाचं गाणं आहे, मेरी पँट भी सेक्सी मेरी शर्ट भी सेक्सी तसं मोदीचं डोक्यापासून पायापर्यंत सगळं फेक आहे. हे सोंग किती दिवस टिकवता येणार?

संसदेत विरोधी पक्षाचेच काय, एन.डी.ए.च्या सहयोगी पक्षाचे खासदारही बोलत असताना त्यांचे माइक बंद केले जात नाहीत. त्यांचा एकही शब्द कामकाजातून वगळला जात नाही. त्या सरकारी कर्मचार्‍यांसंबंधीच्या नियमात मोदी सरकारने इलेक्ट्रॉनिक मीडिया अ‍ॅड केला तो पुढे कधीतरी येणार्‍या काँग्रेस सरकारच्या सोयीसाठी. पेन्शनसंबंधी नियमात अशीच दुरुस्ती केली तीही काही निवृत्त कर्मचारी काँग्रेसवर टीका करतात म्हणून.
मोदी, बिश्ट, फडणवीस, शिंदे इ.वर टीका केली म्हणून कोणालाही अटक झालेली नाही. दोनच दिवसांपूर्वी गुजरातमधील एका व्यक्तीला संघावर टीका केली म्हणून अटक झालेली नाही.

Pages