डेट म्हणजे डेट म्हणजे डेट असते

Submitted by चुन्नाड on 5 July, 2023 - 06:10

डेट म्हणजे डेट म्हणजे डेट असते
जमलीच तर ग्रेट असते
नाहीतर चेकमेट असते

डेट म्हणजे डेट म्हणजे डेट असते
कधी नुसतीच भेट असते
आणि कुणीतरी हमखास लेट असते

डेट म्हणजे डेट म्हणजे डेट असते
एक चुकार भांबावलेलं पेट असते
त्याच्या cute फोटोंचे इंटरनेट असते
बोलायला विषय नीट आणि
हवाहवासा एक प्रेमळ मेट असते
डेट म्हणजे डेट म्हणजे डेट असते

डेट म्हणजे डेट म्हणजे डेट असते
एका मित्राशी लावलेली बेट असते
बावीसच्या वर गेलेला required रनरेट असते
जिंकलो तर सगळं सेट असते
हरलो तर कडवी हेट असते

डेट म्हणजे डेट म्हणजे डेट असते
कुणा बंद मनाचे गेट असते
ज्याला खूप खूप वेट असते
उघडलेच तर फेट असते
नाहीतर गुलाबाचे देठ असते

डेट म्हणजे डेट म्हणजे डेट असते
एखादी अघळपघळ अन एखादी थेट असते
एखादी भित्री आणि एक मात्र धीट असते
कशीही असली तरीही शोधक मनाचे अपडेट असते
डेट म्हणजे डेट म्हणजे डेट असते

© चुन्नाड

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक वर्षांपूर्वी संदीप (खरे) ने लिहिलेली "love letter" अशी कविता केली होती... त्याहून अनेक पटींनी आवडली!
आणि पाडगावकरांच्या मूळ पालूपदास समर्पक दृष्ट्या पुढे घेऊन जाणारी!