रेशन आपल्या दारी - शिंदे फडणवीस सरकारचा उपक्रम

Submitted by ढंपस टंपू on 18 June, 2023 - 02:24

महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी योजनेप्रमाणे रेशन आपल्या दारी ही योजना सादर केली आहे.
आरा रेशनसाठी रेशनच्या दुकानात जाण्याची गरज राहणार नाही. फिरत्या रेशनगाडीतून घरो घरी रेशनचे वाटप अशी ही योजना आहे. या योजनेबद्दल काय वाटतं ?
रेशन दुकानदार, रेशन खाते यांचा भ्रष्टाचार यामुळे कमी होईल का ? रेशनचे रॉकेल गायब होण्याचे प्रमाण बंद होईल का ?

बातमी :
https://lokmat.news18.com/maharashtra/now-beneficiaries-will-get-ration-...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दारू आपल्या दारी ही योजना पण पहिल्या टर्म मधे आणली होती. नळाने दारू घरपोच येणार होती. तिचं काय झालं ?
कित्येक जण ग्लास घेऊन वाट बघत बसलेत. कोविडच्या काळात सोय झाली असती.

ह्या सरकारच्या साऱ्याच योजना फसव्या आहेत.
विकासाच्या नावाखाली केवळ हजारो लिटर ऑईलपेंटचे भिंतीवर चितारकाम आणि लग्नघरासारखे LEDचे डेकोरेशन रस्त्यांवर विनाकारण केलेलं आहे.

बाकी काहीही विकास नाहीये !

रेशन दुकानदार, रेशन खाते यांचा भ्रष्टाचार यामुळे कमी होईल का ? रेशनचे रॉकेल गायब होण्याचे प्रमाण बंद होईल का ?>>>>>>>>>>>

तुमच्या रेशनकार्ड वरील धान्य , डाळी,गहू आणि रॉकेल तुम्ही घेता का ?
अगोदर उत्तर द्या , मग पुढे बोलू !

का विचारू नये ?
त्यांच्याकडे रेशन धान्याचा भ्रष्ट्राचार झाल्याची सरकारी आकडेवारी आहे का ?
( इथे बरेचसे जण सोईस्करपणे सरकारी आकड्यवरच विश्वास ठेवतात )
माझ्या ओळखीचे चांगली आर्थिक सुबत्ता असलेले , दोन एकर जमीन , स्वताच्या मालकीची स्विफ्ट कार असलेला आहे .
तो त्याच्याकडे असलेल्या पिवळ्या रेशन कार्ड वर मिळणारे धान्य गरीबांना दर थोडा वाढवून विकतो , वर देशातील भ्रष्ट्राचार वरून सरकार ला शिव्या घालाय्ला सतत तयार असतो.
गरिबापर्यंत फायदे पोहचू न देणारे असे भरपूर असतात , मग प्रत्येक गोष्टीत सरकारला दोष देण्यात काय अर्थ ?
मी माझे रेशन कार्ड १०/१२ वर्षापूर्वीच बंद केले आहे .

तुमच्याच ओळखीचे आहेत ना ? सांगा कि सरकारला अटक करायला.
तुम्हाला त्यांना अटक व्हावी असे का वाटत नाही ?

सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलणारे स्वतः भ्रष्टाचारी असतात हे कधीपासून व्हायला लागले ? २०१४ च्या आधीपासून कि कसे ?

त्याने आत्ता पर्यंत दोघांवर विनाकारण केस ठोकल्या आहेत .
ती वेगळीच केस आहे , गरज नसताना का रेशन घेतो विचारले असता नेत्यांच्या भ्रष्ट्राचार बद्दल श्टोऱ्या सांगत बसतो.
>>>>>>>>
सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलणारे स्वतः भ्रष्टाचारी असतात हे कधीपासून व्हायला लागले ? २०१४ च्या आधीपासून कि कसे ?>>>>>>>>>>
बाय द वे ! धागा रेशनमधील भ्रष्ट्राचार बद्दल आहे ना ?
२०१४ पासून रेशन मध्ये किती कोटींचा भ्रष्ट्राचार झालाय ? काही आकडेवारी आहे की नेहमीप्रमाणे ढगात गोळया ?

२०१४ च्या आधी रेशनमधल्या भ्रष्टाचारावर कुणी बोलत नव्हते का ? Lol
रेशनकार्डावर सिलींडर धारक असा शिक्का असलेले, दोन दोन सिलिंडर्स स्वस्तात घेणारे, सिलीडरच्या किंमती वाढल्या म्हणून सिलींडरच्या आकाराचे कुणी सिलींडर घेऊन बसले नव्हते काय ? Lol

दिल्ली राज्याच्या आप सरकारने रेशन आपल्या दारी अशी योजना आणली होती. त्याविरोधात तिथल्या रेशन दुकानदारांच्या संघटनेने न्यायालयाकडे दाद मागितली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान संघ (केंद्र) सरकारने या योजनेला विरोध केला.
The Centre, represented by Central government standing counsel Monika Arora, had opposed the Delhi government's doorstep ration delivery scheme, saying that the State could mitigate the architecture of the National Food Security Act (NFSA) while implementing it.

It had earlier said the court should not allow any state government to interfere with the structure of NFSA and destroy its architecture and that FPS is an integral part of the Act.

The Centre had explained that as per the NFSA, it gave food grains to states which have to take it from the godown of the Food Corporation of India to deliver it to the doorsteps of fair price shops for distributing it to the beneficiaries
दिल्ली उच्च न्यायालयाने ही योजना बंद करायला लावली.

केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्याला शिंदे गटाचा पाठिंबा आहे. दिल्लीत ज्या योजनेला या पक्षांनी विरोध केला, तशीच योजना हे पक्ष महाराष्ट्रात राबवत आहेत. यात नवल वाटण्यासारखं अर्थातच काही नाही.

जसा फुरोगामी या आयडीचा एका प्रतिसाद (माझा शेजारी भ्रष्टाचार करतोय) काही मिनिटांनी लिहिलेल्या दुसर्‍या प्रतिसादाच्या (कुठे आहे भ्रष्टाचार?) विरोधात असतो, तसंच भाजपची एका ठिकाणची , एका वेळची भूमिका दुसर्‍या ठिकाणच्या / दुसर्‍या वेळच्या भूमिकेच्या विरोधात असते.

रंग बदलण्यात भरत इतके पटाईत कोणी सापडणार नाही . त्या त्या धाग्यावर १५/१६ वर्षांचे आयुष्यमान असलेले सिनियर आय डी भरत शेठ रंग बदलताना खूप वेळा उघडे पडले आहेत , पुन्हा त्या त्या धाग्यांवर निदर्शनास आणून देवू !
बाय द वे मी माझ्या ओळखीचा म्हणालो होतो शेजारी नाही .
आणि २०१४ च्या अगोदर आणि नंतरच्या भ्रष्ट्राचार ची तुलना झाली पाहिजे हे माझे ठाम मत .
कारण २०१४ चा उल्लेख रघु ने केलाय मी नाही , पुन्हा वर जावून वाचा !

अगोदर उत्तर द्या , मग पुढे बोलू !## गम्मत आहे नै? इतरांना सांगायचं की तुम्ही स्वानुभव सांगा, पण बाकी वेळी ह्यांचे शेजारी, ओळखिचे, ट्विटर वगैरेचा दाखला चालतो

बरं. ओळखीचा तर ओळखीचा. पण त्याची तक्रार न करून भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं ना?

बरं. भाजप दिल्लीत या योजनेला विरोध करतो आणि महाराष्ट्रात तीच योजना आणतो, यांचं उत्तर विचारून या हं.

मला अट्रोसिटी चा त्रास नकोय रे बाबा ! >>> नको तर काल्पनिक खोट्या कथांवर रडण्यापेक्षा खर्‍या घटनांवर बोला कि !
https://www.maayboli.com/node/83494 या धाग्यावर तर तुम्ही फिरकायला तयार नाहीत.

अ‍ॅट्रोसिटीचा उल्लेख करून तो माणूस कुठल्या जातीचा आहे हे तुला सांगायचेय. आधी तुझ्या फक्त ओळखीचा होता. तो भ्रष्टाचार करत होता. तुमचे सरकार असताना रेशन मधे भ्रष्टाचार होत होता. तरी तुला पुरावे पाहिजेत. त्याची तक्रार का करत नाही म्हटल्यावर म्हणाला कि शेजारी नाही ओळखीचा आहे. इथे तो शेजारी आहे असे एकानेही म्हटलेले नाही. जे तू बोललास त्यावरच म्हटलेय.

तू खरा कि खोटा, काळा कि गोरा, विकृत की मुडदेफरास हे काहीही माहिती नाही. तर तुझ्या ओळखीचा माणूस खरा कि खोटा हे कसे ठरवणार रे विकृत माणसा ?

तु कशाला कडमाडतो ? ते उत्तर भरत साठी होते !
जरा वाक्यांचा संदर्भ शोधून प्रतिसाद देत जा !
माझ्या वर वयक्तिक टीका केली तरच जातीत किंमत वाढते असा तुझा समज आहे का ?

भाजपचं सरकार आहे. त्याला शिंदे गटाचा पाठिंबा आहे. दिल्लीत ज्या योजनेला या पक्षांनी विरोध केला, तशीच योजना
तो शेजारी आहे असे एकानेही म्हटलेले नाही. जे तू बोललास त्यावरच म्हटलेय.>>>>>>>>>>>>

जसा फुरोगामी या आयडीचा एका प्रतिसाद (माझा शेजारी भ्रष्टाचार करतोय) काही मिनिटांनी लिहिलेल्या दुसर्‍या प्रतिसादाच्या (कुठे आहे भ्रष्टाचार?) विरोधात असतो, तसंच भाजपची एका ठिकाणची , एका वेळची भूमिका दुसर्‍या ठिकाणच्या / दुसर्‍या वेळच्या भूमिकेच्या विरोधात असते.

Submitted by भरत. on 19 June, 2023 - 11:12
>>>>>>>>>>>>
वाचाळ सटवेगिरी करण्या अगोदर प्रतिसाद चेक करत जा !

फुरोगामीचं वागणं बोलणं अ‍ॅट्रॉसिटी लागावा असंच असणार. मागे मी एका धाग्यावर महागाई की अशाच गोष्टीबद्दल लिहिलं होतं तर फुरोगामी म्हणे की आरक्षणातून नोकरी मिळालेल्यांना सुद्धा त्रास होतो का?

मला अट्रोसिटी चा त्रास नकोय रे बाबा ! ## म्हणजे ते कसे भ्रष्टाचारी असतात हे सांगता आहेत हे महाशय. जातीयवादी विकृती नसानसात भरली आहे