दिवाळी फराळ आणि चौकस विचार वगैरे

Submitted by दत्तात्रय साळुंके on 25 October, 2022 - 04:06

ऐन दिवाळीत एक
मेसेज व्हायरल झाला
नको त्या उपमा
देवून गेला फराळाला

काय तर म्हणे शंकरपाळी
म्हणजे चौकस विचार
म्हणून मी शंकरपाळी
हातोडीखाली चिरडली
सुक्ष्मदर्शकाखाली निरखली
कुठेही चौकस विचार नव्हता
तोंडात टाकलेला चुराही चवीला
काहीसा शंकरपाळी सारखाच होता

लाडू, करंजी, चकली फोडवी तर
आपल्यालाच फोडेल कोणी
या चौकस विचारांनी
घेतली मी माघार तत्क्षणी

खाजवलं डोकं थोडं म्हणालो
यार आपणही गाढवच ठरलो
WhatsApp ला ज्ञानगंगा समजलो
शंकरपाळी देती जर चौकस विचार
अहो मग तुमच्या मेंदूचा
सरलाच की कार्यभार

एक करंजी म्हणे
आनंदाने भरलेली, खरचं
किती बर झालं असतं,
मी आयुष्यभर सारणच
करंजीत भरलं असतं

म्हणे एक चकली किर्ती
विस्तारणारी, खर असावं का?
बंड्या कायम चहा चकली खातो
त्याच्या पोटाचा घेरा विस्तरतो

आपण असं कधी वाटेल ते
विशेषण‌ वाटेल तिथे लावतो
अन आळशी पुढारी सुध्दा
कार्यसम्राट म्हणून मिरवतो

म्हणून चकलीनं
विस्तारु नये किरत
मग छान चव तिची
तिखट अन कुरकुरीत

शंकरपाळं शंकरपाळं असावं
करंजी करंजीच असावी
फराळ दिवाळीचा खाताना
फक्त दिवाळीच दिसावी

म्हणून आपणही थोडं शिकावं
जे आहे ते तसंच स्विकारावं
© दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकु...
mrunali.samad
मानव पृथ्वीकर
तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद...

वावे
Ajnabi
Barcelona
रुपाली विशे-पाटील

सर्वांचे खूप आभार...

Barcelona
चिवडा, शेवेत काही तरी रहस्यमय असावं जे शेअरचॅट वाल्यांना सापडलं नाही.... Happy

खरं आहे दत्तात्रय साळुंके
फराळात पण कसले गहन लॉजिक ओढून ताणून आणतात . काहीही . यांना अजिबात फराळ देऊ नये खायला

सामो शुभ दीपावली....
खूप धन्यवाद पुनर्वाचनासाठी....

सामी शुभ दीपावली...
खूप धन्यवाद .... हल्ली लोकांना समोरची जीवंत माणसं दिसत नाहीत पण निर्जीव वस्तूतही गहन गोष्टी दिसतात.

मस्त लिहिलं आहे. हा मेसेज पाहिला तेव्हाच वाटलं होतं की पुढ्यात आलेला फराळ चवीने खाणं सोडून हे काय बॅनर लिहीत बसले आहेत...