Submitted by योडी on 3 June, 2009 - 01:41
खेळाशिवाय लहानपण?? कल्पनाच करवत नाही ना!! तर आपण लहानपणी जे खेळ खेळायचो ते इथे लिहा. शक्य असल्यास कसे खेळायचे ते लिहीलत तर उत्तमच..
आणखी एक नॉस्टॅल्जिया
http://www.maayboli.com/node/8242
गुलमोहर:
शेअर करा
मी मी
मी मी पहिले..! .मी लहानपणी विषामृत, टिपरीपाणी, माझ्या मामाचं पत्र हरवल, कोणीही यावे टिचकी मारुनी जावे, चोर पुलीस, लंडन लंडन , डोंगराला आग लागली पळा पळा पळा , लंगडी पळी हे खेळ खेळत होते. कधीतरी मुलांबरोबर गोट्या, लगोर, विटी-दांडु ही खेळले. वेळ मिळताच सविस्तर लिहीनच!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
तुम्ही हे
तुम्ही हे खेळ खेळायचात का?
१. लंगडशाय दूधभात खाय
राजाच्या बायकोने भोपळा मागितलाय
२. कांदा फोडणी
३. आबाडबा एक्सप्रेस (याला ऐसपैस असे म्हणायचे)
४. सूरपारंब्या
(आणखी आठवतील तसे यात लिहितो.)
डब्बा
डब्बा एक्स्प्रेस अजुनही माझा मुलगा खेळतो..गल्लीमधे
सुरपारंब्या पण खेळलेय! गंमत म्हणजे..सायकलचे जुने टायरही फार पळवलेत रस्त्यावर..!:)
सागरगोट्या, ए बी सी डी सातारा (टाळ्यांचा खेळ), कुल्फीच्या काड्यांचा खेळ, बांगड्यांच्या काचा हातावर झेलुन केलेला खेळ, गावाकडे 'चंगस' नावाचा चिंचोक्या वापरुन आणी बसायच्या पाटाच्या मागच्या बाजुला खडु/ कोळशाने चौकोन आखुन खेळ असायचा (तो तर अजुनही सुट्टीमधे खेळतो )...असे बैठे खेळही फार खेळलो.
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
डब्बाऐसपै
डब्बाऐसपैस खेळायचो आम्ही. पण हे लंगडशाय दूधभात खाय कसं खेळायचं? जरा खेळून दाखव
कांदा फोडणी की कांदा फोडी? ते खाली बसून पाय पसरायचे मग त्यावरुन दुसर्याने ओलांडून जायचे. मग हाताची वीत पायावर धरायची मग त्यावरुन ओलांडायचे. असं होतं ते. काय कळताय का मी काय सांगतेय ते?
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |
हो हो
हो हो कांदाफोडी आम्ही खेळायचो. आणि पच्ची (पाच दगडांचा खेळ), नाव-गाव-फळ-फुल्-रंग-मार्क, आईचा रुमाल हरवला इ. खुप धम्माल यायची.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
आणि
आणि विदर्भात आम्ही टिक्करबिल्ला खेळायचो. आणि कंचे, नदी की पहाड सुद्धा.
टिक्कर्बि
टिक्कर्बिल्ला म्हणजे टिक्कर का पाणी का?
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |
डोंगर का
डोंगर का पाणी, डोंगराला आग लागली पळा पळा हे खेळ आठवतात का कोणाला??
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
होSSSS, खांब
होSSSS, खांब खांब खांबोडी पण खेळायचो आम्ही.
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |
डोंगराला
डोंगराला आग लागली ....मधे एकावर राज्य अन बाकी सगळी गोल गोल पळतात्..मग तो स्टॉप म्हणताच कुठल्याही अॅक्शन मधे जिथल्या तिथे उभे रहायचे.. तो क्लोज वॉच ठेवणार..कोणी हलले की त्याच्या वर राज्य! गंमत म्हणजे त्यावेळेस जे शब्द असायचे ते असेच अपभ्रंश झालेले..उदा. ए बाई तु कटाप ..कटाप बरं का! 'कटाप' म्हणजे cut off होते. आणि 'टॅम्प्लिज' म्हणजे time please होते हे आता समजते!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
टॅम्प्लिज
टॅम्प्लिज किंवा थाप्प्य म्हणायचो आम्ही पालथ्या तळव्याला थोडसं चाटून
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |
डब्बाऐसपै
डब्बाऐसपैस... आम्ही त्याला डब्बा एक्स्प्रेस म्हणायचो... भन्नाट खेळ
तसाच लगोरी सुद्धा... नारळाच्या करवंट्यांची लगोरी खेळायचो...मस्त अगदी अंधार पडे पर्यन्त..धमाल यायची...
०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/
हो
हो टॅम्प्लीज म्हणजे time please हे आत्ताच कळायला लागल. आम्ही तसाच एक खेळ खेळायचो. Bombay samachar म्हणुन. १ २ ३ ४ असे १० पर्यंत मिजायचे आणी मागे वळुन पाहील की सगळे जसे असतील तसच रहायचं. मग ज्याच्यावर राज्य असेल तो सगळ्यांना बघणार आणि कोणी हललं तर बाद.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
योगे...
योगे... नॉस्टॅलजिक केलस ग बाई!
लपाछपीलाच अजुन धोपांडी, भोकंजा पण नावे आहेत!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
अंधार पडत
अंधार पडत आला म्हणजे आम्ही विषामृत नावाचा एक धम्माल खेळ खेळायचो.
लीडर लीडर
लीडर लीडर अॅक्शन चेंज, बिट्ट्या, काचा-पाणी पण खूप खेळायचो!
आणि विषामृत, सुई-दोरा, दगड का माती, लंडन- भारत - पाकीस्तान हे पण भन्नाट खेळ होते!
======================================
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
अरे हो
अरे हो लपाछपी, पत्ते, कॅरम, दोरीच्या उड्या, पकडापकडी हे सगळे तर जोरात असायचेच. भातुकलीच्या खेळात पण जाम धम्माल यायची. आम्ही पोहे भिजत घालुन त्याचा भात करायचो. ज्याच्या पैशांचा खाऊ त्याच्या हातात भातुकलीची सगळी सुत्रं असायची.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
विषामृत,
विषामृत, साखळी- साखळी हे सगळे खेळ अंधार पडल्यावरच आठवायचे.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
मी लहानपणी
मी लहानपणी विषामृत, दगड की माती (म्हणजेच नदी की पहाड), मामाचं पत्र हरवल, कोणीही यावे टिचकी मारुनी जावे, शिवाजी म्हणतो, चोर पुलीस, लंडन लंडन, डोंगराला आग लागली पळा पळा, लंगडी, जोडीची साखळी, भुताची नगरी, डब्बा ऐसपैस (एक आठवडा तरी एकावर राज्य असायचे), कांदा फोडी, गोट्या, लगोर, विटी-दांडु, भातुकली, बाहुलीचे लग्न लावणे (यामध्ये दरवर्षी वधू/वर पक्श बदलायचा), लपाछपी, पकडापकडी, काचापाणी, सागरगोट्यासारखाच पण बिट्ट्या वापरुन एक खेळ, क्रिकेट, सायकलचे जुने टायर पळवणे, नाव-गाव-फळ-फुल, कॅरम, पत्ते, आट्यापाट्या, खांब खांब (याचे नाव नीट आठवत नाही) इ. खेळ खेळायचे.
याशिवाय रात्री जेवण झाल्यावर झोपाळ्यावर बसून भेंड्या लावायचो, अंगणात बॅटमिंटन खेळायचो.
सुट्टीत समुद्रावर जाऊन वाळुत किल्ले करणे आणि (आई व आजीचा ओरडा खाऊनही) उनाडक्या करणे.
अजूनही बरेचसे खेळ आहेत पण सगळेच आठवत नाहीयेत.
ह्याव्यति
ह्याव्यतिरिक्त --
१. संत्री लिंबू पैश्यापैश्याला, शाळेतल्या मुली आल्या विकायला, विकता विकता खोकला आला अस म्हणून गडी पकडायचा, अन नंतर त्याच्यावर राज्य देऊन नदी की पहाड खेळायचे. विषामृत सारखेच. ते सुई की दोरा, गाई की गोर्हा अस सगळं म्हणून..
२. धप्पाकुट्टी - चेंडू पाठीवर ज्याच्या आदळेल त्याच्यावर राज्य. पळापळीच एक प्रकारची.
३. सागरगोटे (यांना आम्ही गजगे म्हणायचो)
४. ते वर कांदा फोडी का काय लिवलय ना ते बी खेळायचो, मज्जा यायची. काय म्हणायचो लक्षात नाही आता.
शिवाय जवळच्या शाळेच्या ग्राऊंडवर रिकामा मोठा पाईप पडला होता त्यात तिघींनी बसायचं अन ४-५ जणींनी गाडी गाडी करायचा अस्ले खेळ तर वेगळेच..
हम्म.. आपल्या मुलांना नाहीये अस मनमोकळं भरपूर खेळायला मिळतय.
धप्पाकुट्
धप्पाकुट्टी >> आबा धोबी
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |
आबा धोबी >>>
आबा धोबी
>>> लै म्हन्जे..लै भारी... त्यात आम्ही प्लस्टिक चा बॉल वापरायचो...जी पाठ शेकुन निघायची..:)
त्यात चा टॅम्प्लीज वापर सगळ्यात जास्त व्ह्यायचा आणि तरीही त्याला शेकटुन काढायचो
०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/
हो ना, बाद
हो ना, बाद व्हायला आलं की खडाच टोचला, तहानच लागली, पोटातच दुखतंय असे बहाणे असायचे टॅम्प्लिज साठी.
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |
योगिता,
योगिता, अगं ह्याचा धागा कर ना.... ललित मध्ये का लिहिलयस?
मंजु धागा
मंजु धागा कुठे बनवु ते कळत नव्हतं मला.अॅडमीनला सांगितलय विरंगुळा मध्ये हलवायला.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
आम्ही
आम्ही आडमिट किडा नावाचा खेळ खेळायचो, यात राज्य असलेला गडी एखादं ठि़काण सांगायचा ते ठिकाण लोखंडाच्या वस्तूंना स्पर्श करत करत गाठायचं.
आडमिटकिडा
आडमिटकिडा हा टिपीकल सांगली-कोल्हापुरकडचा खेळ असावा. मी पुण्यात वगैरे लोकांना खेळताना बघितले नाही. त्या लोखंडी वस्तु पकडणे प्रकरणात जर एखादा पाण्याचा पाइप वगैरे हाताशी आला की मग निवांत असायचं
लोखंडाच्य
लोखंडाच्या वस्तूंना स्पर्श करत करत गाठायचं>> आम्ही हा खेळ पोपटा पोपटा रंग कोणता म्हणुन खेळायचो. ज्याच्यावर राज्य असेल त्याने रंग सांगायचा आणि इतरांनी पळायचे रंग पकडायला. जो नाही हात लावणार तो बाद.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/8235
आम्ही
आम्ही आडमिट किडा नावाचा खेळ खेळायचो>>
हा लै भारी होता खेळ.... त्यात मुद्दाम आम्ही खिशात खिळे वैगेरे लपवुन ठेवायचो..आणि वस्तु नसली कि मुद्दाम रस्त्यात फेकायचो
०----------------------०
मायक्रोसॉफ्ट सर्च ईंजिन
http://www.bing.com/
आम्ही
आम्ही आडमिट किडा नावाचा खेळ खेळायचो, यात राज्य असलेला गडी एखादं ठि़काण सांगायचा ते ठिकाण लोखंडाच्या वस्तूंना स्पर्श करत करत गाठायचं. - इति दक्ष
आडमिटकिडा हा टिपीकल सांगली-कोल्हापुरकडचा खेळ असावा. मी पुण्यात वगैरे लोकांना खेळताना बघितले नाही. त्या लोखंडी वस्तु पकडणे प्रकरणात जर एखादा पाण्याचा पाइप वगैरे हाताशी आला की मग निवांत असायचं - इति टण्या
त्यात मुद्दाम आम्ही खिशात खिळे वैगेरे लपवुन ठेवायचो..आणि वस्तु नसली कि मुद्दाम रस्त्यात फेकायचो - इति केदार
-----
अरे नक्की कसा अस्तो हा खेळ? तुम्हा तिघांच्या लोखंडच कॉमन आहे फक्त.
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |
Pages