Submitted by संयोजक on 9 September, 2021 - 22:37
गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : म्हणी
??गेला आणि ?? केला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
_ _ गेला आणि _ _ केला
_ _ गेला आणि _ _ केला
बैल गेला आणि झोपा केला
बैल गेला आणि झोपा केला
बरोबर मानव. आता पुढचा क्लू
बरोबर मानव. आता पुढचा क्लू तुम्ही द्या
_का_रते _माय_
_का_रते . रा_य_
दोन शब्द आहेत, मध्ये स्पेस रहात नाही देऊनही म्हणून दोन शब्द वेगळे दाखवायला मध्ये पूर्णविराम दिला आहे.
कुणी प्रयत्न करत असेल तर सांगा, क्लु देईन, वा सोपे करून देईन.
तीच म्हण गाळलेले अक्षर बदलून दिलीय.
क्लु१: एक शब्द अत्यंत लोकप्रिय झालेली दूरदर्शन मालिका
विचार करतोय पण काही समजलं
विचार करतोय पण काही समजलं नाही अजून. विदर्भातली म्हण आहे का?
क्लू द्या
क्लू द्या
ताकापुरते रामायण
ताकापुरते रामायण
मला आत्ता घाईत पुढची म्हण
मला आत्ता घाईत पुढची म्हण द्यायला जमणार नाही तरी दुसऱ्या कोणी द्यावी आणि खेळ सुरू ठेवावा
कुणाची ___ नि कुणाला _______.
कुणाची ___ नि कुणाला _______.
म्हैस उठबस? नक्की किती शब्द
कुणाची म्हस नी कुणाला उठबस? नक्की किती शब्द आहेत समजलं नाही.
बरोबर.. क्ल्यू द्या.
बरोबर.. क्ल्यू द्या.
_ _ रु _ _ _ _ पाय _स_ _
_ _ रु _ . _ _ _ . पाय . _स_ _
पूर्णविराम == पुढचा शब्द. यात चार शब्द आहेत.
अंथरून पाहुन पाय पसरावे
अंथरून पाहुन पाय पसरावे
बरोबर
बरोबर
उ_ _ . _ खरा_ . _ से . _जणे
उ_ त्या . _ खरा_ . _ से . _जणे
म्हण नाही येत... पण दुसरा
म्हण नाही येत... पण दुसरा शब्द 'नखरा' आणि शेवटचा 'लाजणे' असू शकेल
हेहे नाही. दुसरा चाराक्षरी
हेहे नाही. दुसरा चाराक्षरी आहे, विभक्ती धरून.
ही व्यक्ती लाजत नाही तर अफाट कर्तृत्व दाखवते.
मग भाजणे असेल!
डोकं नाही चालत आता. १२ वाजले, झोपतो आता. मजा करा मांडवात.
उडत्या <कोणाची तरी> पिसे
उडत्या <कोणाची तरी> पिसे मोजणे!
"उडत्या पाखराने" .... पण म्हण
"उडत्या पाखराने" .... पण म्हण येत नाही पुढे... "ससे मोजणे" असू शकते...
पाखराची
पाखराची
हे तर उडती चिडीयाके पर गिनना
बरोबर.
बरोबर.
उडत्या पाखराची पिसे मोजणे
(हिंदीतून आली असेल ही म्हण)
ससे मोजणेला मी वेड्यासारखा
ससे मोजणेला मी वेड्यासारखा हसतोय!
ए _ _ _ _ . _ _ . _ व _ त्र
ए _ _ _ _ . _ _ . _ व _ त्र
एकादशीच्या घरी शिवरात्र
एकादशीच्या घरी शिवरात्र
बरोबर.
बरोबर.
_ _ च. _ _ ट. _ शा _. _ _. _
_ _ च. _ _ ट. _ शा _. _ _. _ ला
आधीच मर्कट तशातच मद्य प्याला
आधीच मर्कट तशातच मद्य प्याला
__व_ _. _र. _ _म _ _
__व_ _. _र. _ _म _ _
Pages