मायबोलीवर गेली २५ वर्षे, ७x२४ तास चालू असणारा एक लोकप्रिय खेळ म्हणजे अंताक्षरी.
यावर्षी तुमच्यातल्या काव्यगुणाना आव्हान म्हणून खेळू या: शीघ्रकवींची अंताक्षरी
एकेकाळी ही अंताक्षरीही मायबोलीवर बहरत होती. आपण पुन्हा त्या दिवसांना उजाळा देऊ या !
१) म्हणजे बाकीचे सगळेच नेहमीच्या अंताक्षरीचे नियम , पण मुख्य अट म्हणजे यातलं गाणं कुठेच प्रसिद्ध नसलं पाहिजे किंवा कुणी ऐकलं नसलं पाहिजे. थोडक्यात तुम्हाला ते तयार करायचं आहे.
२) गाण्यात गेयता हवी . कुठल्याही वृत्तात चालेल . पण मीटर पाहिजे . मुक्तछंद चालणार नाही.
३) गाणं मराठीत हवे.
४) कमीत कमी एक कडवं हवे.
५) विडंबन, टाईमपास , आरत्या, गंभीर गाणे सर्व प्रकार चालतील.
५-अ) विडंबन असेल तर मूळ गाणे चालीसाठी सांगा म्हणजे मोठ्याने म्हणताना आणखी मजा येईल. कारण सगळ्यानाच मूळ गाणे लक्षात येईलच असे नाही.
प्रश्नः गाण्याच्या बाबतीत नेहमी ध्रुवपद आणि अंतरा (म्हणजे बोलीभाषेत कडवे) असते
तर इथे ध्रुवपद आणि एक कडवे लिहणे अपेक्षित आहे का? की नुसतेच कडवे? म्हणजे गेयता असलेल्या चार ओळी लिहायच्यात?
उत्तर: नुसते कडवे (चार ओळी ) चालतील. पण ध्रुवपद लिहिलेत तर पळेल.
(वर लिहिल्याप्रमाणे जर भविष्यात कुणाला इथली कडवी+ ध्रुवपद गंमत म्हणून नेहमीच्या अंताक्षरीत वापरता आली तर मजा येईल . पण शेवटी हा खेळ आहे आणि एखाद्याला ध्रुवपद नाही जमले म्हणून खेळ थांबायला नको)
उदा: श्री गणेशाय नमः
ह
(रात्र काळी घागर काळी या चालीवर )
हिव सकाळी
थंडी दुपारी
घरामधे हिटरच नाही वो माय !
बील सकाळी
भरलं दुपारी
खिशामधे चिल्लरच नाही वो माय !
य
कधी पिकनिकला गेल्यावर तिथे खरी अंताक्षरी सुरु असताना, गंमत म्हणून मधेच इथले एखादे गाणे वापरता येईल. हो "ह" वरून असे गाणे आहे याचा पुरावा देता येईल.
हा खेळ सप्टेंबर १० ला सुरु होईल.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
य
य
या बाई या
बघा बघा मायबोली सजली पहा
खेळ खेळती
सदस्यांच्या उत्साहाला आली भरती
नवनिर्मिती
बाप्पापुढे माझी पहीली दुर्वांची जुडी
ड
——- या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया च्या तालावर
पाखरा येशील का परतुन....
पाखरा येशील का परतुन....
चिवड्या घेशील का परतुन
तीखट मिठ तेल हळद मीसळुन
डाळ दाणे काजु मनुका पारखून
चिवड्या घेशील का परतुन
पुढचे अक्षर ड (सामो ) किंवा न
पुढचे अक्षर ड (सामो ) किंवा न (नीळा) यांच्या गाण्यातले शेवटचे अक्षर घेऊन सुरु करा.
नीचे प्रतिसाद की भरताड
नीचे कमेंट्स की भरताड / खाली कमेंट्सची भरताड
उपर धागा है धमाल/वरती धागा हा धमाल
जब वो भरकटने सा लगे/ जरा भरक्टू लागे
मेरा दिल हो बेईमान / झाले मन बेईमान
आ हाय रे आ हाय रे...
(नीचे फूलोंकी दुकान वर आधारीत)
रेशमाच्या नात्यांनी,
रेशमाच्या नात्यांनी, उत्सवाच्या धाग्यांनी
बाप्पाच्या स्वागताला मायबोली सजली रे
नैवेद्याच्या ताटांनी, अन खेळांच्या वाटांनी
बाप्पाच्या स्वागताला मायबोली सजली रे
झब्बूच्या फोटोंनी, वादविवाद दूर लोटोनी
बाप्पांच्या स्वागताला मायबोली सजली रे
म्हणींच्या खाणींनी, शीघ्रकवींच्या गाण्यांनी
बाप्पाच्या स्वागताला मायबोली सजली रे
रबडी मजा ना देगी
रबडी मजा ना देगी
घेवर मजा ना देगा
तेरे बगैर साखर
मिठाई मजा ना देगी
(चुडी मजा ना देगी च्या चालीवर..)
गतीशीलता हाच वसा, दिव्य
गतीशीलता हाच वसा, दिव्य मानुनी सुंदरसा,
कुठेही उगा थांबू नका, पुढे चला हो पुढे चला
येईल यश तव दृष्टीपथी, युक्ती सांगा ही खाशी
'चरति चरतो भग' हेची, सत्य असे की अविनाशी
छान!
छान!
धन्यवाद मानव.
शतजन्म शोधिताना शत आयडी
शतजन्म शोधिताना शत आयडी व्यर्थ झाल्या
शतसूत्रमालिका त्या अॅडमिनने बंद केल्या
ही आयडी शेवटाची उरलीय फक्त गाठी
हीही उडो न आता ही एक आस मोठी
(आई म्हणोनी कोणी -चालीवर)
(आई म्हणोनी कोणी -चालीवर)
ठिगळे जोडून कोणी, वेमास हाक मारी
ती हाक येई कानी ,मज होय टिपीकारी
वाद प्रतिवाद सारे , मारी कुणी कुठारी
लेखक कुणा म्हणू मी , किबोर्ड बडवती सारी.
( टि.पि. टाईमपास)
वाह स्वाती & अस्मिता - मस्त.
वाह स्वाती & अस्मिता - मस्त.
.
.
रेखिव साजीरी मूर्ति पहा बाल गणेशाची
मुकुटावर कलाकुसर केशर-मृगमदाची
आईच्या कडी राजस बाळ कसा शोभतो
जणू नभात चांदण्यांच्या चंद्र शुभ्र हासतो
चित्र जालावरुन साभार.
मृगमद - कस्तुरी
तोच हा गणेश, परब्रह्मरूपी
(अतिशय सुरेख सामो)
तोच हा गणेश, परब्रह्मरूपी
चतुर्थीस येई भक्तांच्या भेटी
घेऊन रूप साजरे खूप
चौंसष्ट कला ह्या त्यासी अनुरूप
विघ्नांच्या माथी हाणून काठी
सुखी करी सर्व संयोजकांसी .
संयोजकांना समर्पित.
(माबोकरांसी पण चालेल. )
वाह मस्त अस्मिता!!!
वाह मस्त अस्मिता!!!
सखी बंद झाली मालिका
सखी बंद झाली मालिका
आता तरी येशील का? येशील का?
लघुशंकुनी जणु लेखणी
वाहे, तशी लिहिली कुणी -
ही गोष्ट पाट्या टाकुनी?
धिक्कार तू करशील का?
दुसऱ्या कुणाची बायको (वरचा सा लावा)
मैत्रीण अन् सवतीपरी
असल्या कथा ह्या देखुनी
विसरून तू जाशील का?
जे जे दिसे टीव्हीवरी
ते (इथे आलाप) सर्व आहे पाहिले
तरीही उरे काहीतरी
ते नंतरी बघशील का?
(चाल: अर्थातच, सखी मंद झाल्या तारका)
भारी लिहिलंय.
भारी लिहिलंय.
वरचा सा लावावा लिहिल्याने लगेच मृत्यू जरी वर गेलो. मजा आली वाचताना.
हर्पा
सखी बंद झाली मालिका
सखी बंद झाली मालिका
आता तरी येशील का? येशील का?>> भारी लिहीलय
बाकीचेही सगळे प्रयोग आवडले सगळ्यांचेच
हपा मस्त!
हपा मस्त!
सर्वांचे आभार! वरच्याही सर्व
सर्वांचे आभार! वरच्याही सर्व छान आहेत.
वरचा सा लावावा लिहिल्याने लगेच मृत्यू जरी वर गेलो >> जो 'बो' लावल्यावाचून येतो, तोच ना?
(No subject)
हा माझा पेटंट जोक आहे.
बरोब्बर!
हा माझा पेटंट जोक आहे.
आमच्या इकडे नवी घरं बांधली की क्लोजिंगला बिल्डर घराला 'बो' लावतो. 'बो' लावल्या शिवाय येणार नाहीत लोक असं वाटतं त्याला.
कोट्याधिश पुलं मधला आहे बहुतेक. किर्लोस्करांवरचा ना?
मस्त लिहीताय सर्व.
मस्त लिहीताय सर्व.
कवी च्या जागी दर वेळी कोपी
कवी च्या जागी दर वेळी कोपी वाचलं जातंय शीर्षकात.
कणकणीचे अंग वाटे
कणकणीचे अंग वाटे
टेस्ट करू दे थांब ना
फ्लू की कोविड तू
इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा
सोडवू दे थांब ना
मास्क माझा सावरू दे थांब ना
लस गुणाची कोवक्सिन की कोविशिल्ड दुखरी
मिसळण्या गर्दीत आतुर वेडी ही जनता सारी
चाल- सर सुखाची श्रावणी
ते कोवक्सिन आणि कोविशिल्ड
ते कोवक्सिन आणि कोविशिल्ड बद्दल उगाच लिहिलंय शब्द बसवायला
कोट्याधिश पुलं मधला आहे
कोट्याधिश पुलं मधला आहे बहुतेक. किर्लोस्करांवरचा ना? >> बरोबर.
रीया, मस्त लिहिलंय
ह. पा., मस्त!!
ह. पा., मस्त!!
रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा
रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा जेवून जा
ज्वारीच्या ताज्या पिठाच्या , भाकर्या रिचवून जा
भाकर्या रिचवून जा , ज्या वाढल्या चटणीविना
कालची ती आमटी मी, उकळली आता पुन्हा
त्या कटाच्या आमटीला, न्याय तू देऊन जा
न्याय तू देऊन जा हे बोलते सारे पुणे
पर्वतीच्या पायथ्याला हातचा होई उणे
या गणिती कल्पनेचा अर्थ तू लावून जा
चाल : रात्र आहे पौर्णिमेची
Pages