पोर्ट्रेट स्केच 5 (added tutorial)

Submitted by रिषिकेश. on 5 August, 2020 - 14:59

एका ऑनलाइन काँटेस्ट साठी मी पेन्सिल आणि चारकोल वापरून पोर्ट्रेट केले आहे.
IMG-20200805-WA0025.jpg
हे त्यांनी दिलेले रेफेरेन्स पिक्चर आहे. त्यानुसार कोणत्याही माध्यमात चित्र बनवायचं होत.
Screenshot_2020-07-30-11-16-52-436_com.instagram.android.png
या चित्राचे स्टेप बाय स्टेप tutorial टाकायला थोडा उशीरच झाला आहे. नक्की बघा सर्वांनी आणि सांगा कसे झाले आहे.
https://youtu.be/FuLdN8Xa60Q

चित्र आवडले तर instagram वर मला फॉलो करा.
https://instagram.com/_artusic_?igshid=1sstvaedyyz13

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांनी प्रत्यक्षात घातलेलं काजळ किंचित लाईट आहे तुम्ही दाखवलं त्यापेक्षा. तुम्ही खूप डार्क दाखवलंय त्यामुळे प्रथमदर्शनी चित्र पाहिल्यावर ते हॉरर कॅटेगरी मधलं वाटले. नंतर रेफरन्स फोटो पाहिल्यावर लक्षात आलं. काजळ थोडं लाईट करता आलं तर बघा.

बाकी एकदम सुंदर. अगदी हुबेहूब जमलं आहे..

येस काजळसाठी सहमत सगळ्यांशी. मलाही आधी हॉरर वाटलं होतं. डार्क काजळ मूळे डोळ्यातील भाव पण लपून जात आहेत.
एरव्ही खूप सुंदर आहे चित्र. माझ्यासारख्या सरळ रेघ ही
न काढू शकणारीसाठी तर अप्रतिम.

मूळ चित्रातही डोळ्याखाली भरपूर काळे आहे. तुम च्या सुंदरीचे डोळे घारे वाटतायेत म्हणून टोन डिफरन्स वाढलाय. डोळे तरी जरा काळे करा किंवा डोळ्याखालचे काळे जरा लाईट करा. मस्त झालय चित्र.

तुम च्या सुंदरीचे डोळे घारे वाटतायेत म्हणून टोन डिफरन्स वाढलाय. +100
मला काहीतरी खटकत होते. ते हेच. तुमची प्रतिक्रिया वाचून ध्यानात आले.

सर्वांना थॅंक्यु.
खरतर मी चित्र पेन्सिल आणि चारकोल मध्ये करणार असल्याने मी reference फोटो ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट करून आणला होता. त्यात काजळ एवढेच डार्क दिसत होते.
डोळ्यांच्या बाबतीत i agree थोडे काळे करायला हवे होते. पण आता स्केच काँटेस्ट साठी सबमिट करून झाले आहे. पुढच्या वेळी मी नक्की या सर्व सूचना लक्षात ठेवेन. Happy
thank you everyone for your honest comments.

छान काढलय.
पण वरील मतांशी सहमत. प्रथमदर्शनी पाहिल्यावर horror वाटतय डोळ्यांमुळे.
मेधावीची कमेंट वाचून लक्षात आलं डोळे घारे झालेत तुमच्या चित्रातले.

ऋषिकेश , तुम्ही सगळ्या सूचना उमदेपणाने घेतल्या हे आवडलं. +११११ नाहीतर हल्ली कोणाला काही सांगायची पण भीती झाली आहे माबोवर. एकतर अंगावर धावून येतात नाहीतर रडून रागावून निघून जातात.

पुढील चित्रास शुभेच्छा रीषिकेश

तुम्ही सर्वांनी मला इतकं छान पद्धतीने सांगितलं आहे तर मला का राग येईल! उलट तुमच्या सूचनांच स्वागत च आहे त्यानुसार मी माझं आर्ट अजून इंप्रूव करेन. Happy
सर्वांच्या honest कंमेंट्स साठी खरच मनापासून धन्यवाद.

माझ्या या स्केच चा विडिओ मी 2-3 दिवसात माझ्या youtube चॅनेल वर टाकणार आहे तेव्हा इथे ही शेअर करेन लिंक.
नक्की पहा सर्वांनी.

सर्व सूचना इतक्या मोकळे पणाने स्विकारल्यात म्हणून अजून एक... पवन नाटेकर नावाचा चारकोल आर्टिस्ट आहे .. इंन्स्टाग्राम, फेसबुक, यू-ट्यूब..वर .... वेळ मिळाला तर नक्की त्यांचं काम बघा... हायपर रिअलिस्टीक ड्राईंग काढतो.. amazing बारकावे असतात

बाकी तुमचं हे चित्र झक्कास जमलंय....

चांगला प्रयत्न ऋषिकेश,
तुम्ही सगळ्या सूचना उमदेपणाने घेतल्या हे आवडलं. पुढील चित्राला शुभेच्छा .

सर्व सूचना इतक्या मोकळे पणाने स्विकारल्यात म्हणून अजून एक... पवन नाटेकर नावाचा चारकोल आर्टिस्ट आहे .. इंन्स्टाग्राम, फेसबुक, यू-ट्यूब..वर .... वेळ मिळाला तर नक्की त्यांचं काम बघा... हायपर रिअलिस्टीक ड्राईंग काढतो.. amazing बारकावे असतात

बाकी तुमचं हे चित्र झक्कास जमलंय....

Submitted by नंबर१वाचक on 15 August, 2020 - 20:34>>>>>>
आभारी आहे.
नक्की बघतो चॅनेल.

फारच छान !
( मूळ फोटोतल्या चेहरयापेक्षा हा चेहरा अगदीं किंचित लांबट वाटला मला. माझा दृष्टीदोष कीं 'शेडींग' मुळे ? )

@भाऊ नमसकर धन्यवाद. Happy
मी सर्व मोजमाप घेऊनच स्केच बनवले आहे त्यामुळे फारसा काही फरक नाहीये. पण तुम्ही जर बारकाईने पाहिले तर तुम्हाला दिसेल की रेफरन्स फोटो आहे तो झूम केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ओरिजनल फोटो आणि स्केच मध्ये फरक वाटतोय.