लेखाचं शिर्षक पाहून संभ्रमात पडलात ना?
साधारण मार्चच्या मध्यावर मला एके दिवशी विशाल्_कुलकर्णी ची खरड आली की पल्ली येतेय मार्च एन्ड ला तेव्हा पूण्यात गटग करायचा विचार आहे. मी हो म्हणाले खरी पण मनात धास्ती होती की पल्लीला आपण फार नाही ओळखत... मग कसं काय करायचं?
२८ मार्चला सकाळी विशालचा परत फोन आला की उद्या सगळे पुण्यात भेटतोय म्हणून... २९ चं गटग तसं छोटं पण एकदम इन्ट्रोडक्टरी होतं. विशाल, सायली (सौ. विशाल), अज्ञात, मी, पल्ली, श्रावणी आणि विल्लप थोड्या वेळा करीता भेटलो... बाहेर पडलो ते ठरवून की ४ ला एक गटग करायचं. पल्ली तशी फोनवरून वेळोवेळी बर्याच लोकांच्या सम्पर्कात होती. साधारण १/२ तारखेला पल्लीचा फोन की राज्या, लिम्बूला वेळ आहे ४ ला, गटग करूया का? मग जय्यत तयारी सुरू झाली.... ठिकाण तर आम्ही ठरवलं होतं, पल्लीचं घर.... आता कोण कोण येणार याची यादी मग कॉन्टॅक्ट्स सुरू झाले, मेला-मेली, फोना-फोनी... माझ्या फोनला तर उसंतच नव्हती.. मागचा आठवडा हापिसचं काम बाजूला ठेऊन सगळं माबोचंचकाम केलं
शनिवार ४ एप्रिल ला साधारण ६ वाजता पल्लीच्या घरी जमायचं, गप्पा गोष्टी करायच्या ८ च्या पुढे जितके उरतील त्यानी एकत्र जेवायला बाहेर जायचं असं ठरलं.... बेत तर ठरला.. इन्व्हिटेशन चा मेलही पाठवण्यात आला.
गटगचा दिवस उजाडला... मी ४ वाजता येते म्हणून सांगूनही ५ ला पोचले, आणि पोचल्या पोचल्या पल्लीच्या शिव्या खाल्ल्या, माझ्या मागोमाग येऊ घातलेला राज्या माझ्या आधीच तिथे पोहोचला होता...
हळू हळू लोक यायला लागले, माझ्या पाठोपाठ, लिंबू आणि तन्मय (लिम्बूचा मुलगा) आले. इन्व्हिटेशन तर पाठवलंय आता कोण कोण येतंय कोण कोण नाही याचीच धास्ती होती... ऐनवेळी १००% कन्फर्म असलेले काही मेंबर गळाले महत्वाच्या कामामुळे
गेल्यापासून आमच्या तोंडाला आराम नव्हता, नुसती बडबड, खिदळणं सुरूच होतं.... पहील्यांदा भेटलोय असं वाटलंच नाही... अगदी जन्म-जन्मांतरीची ओळख असल्या सारख्या मुली तर एकमेकांना 'ए टवळे' शिवाय हाकसुद्धा मारत नव्हत्या...
मंडळी जमली... मी, पल्ली, राज्या, नयना, लिंबू, तन्मय, अनघावन, कृष्णाजी, सौ वैशाली, (कृष्णाजी ची पत्नी), उमेश कोठीकर, दीपुर्झा, झकास.... सगळे जमले. खाण्याच्या डिशेस मध्ये; आम्ही बाजूला... गप्पा सुरू झाल्या... विनोद... खिदळणे...
गृहकृत्यदक्ष अशा राज्याने सर्वांना त्याच्या हातचा कडक-मस्त्-जबरदस्त चहा पाजला..
नवा मेंबर आत आला कि त्याला पाणी देण्या अगोदरही आम्ही ओळख परेड करायला लावली. म्हणजे आत बसलेल्या माबोकरांपैकी 'कोण' "कोण" आहे ते ओळखायचं. उमेश कोठीकर कोणालाही ओळखू शकला नाही, नयना; लिंबूला आणि राज्याला ओळखू शकली नाही.. मला तर सर्वांनीच ओळखलं... आणि दीपुर्झाने ही सर्वांना ओळखलं.
खरंतर आदल्या दिवशी मी राज्याला समसवर म्हटलं अरे जर का सगळे मुखदुर्बळ निघाले तर करायला काहीतरी अॅक्टिव्हीटी हवी की, काय करूया? मग त्याने असेच नेहमीचे अन्ताक्षरी, वन मिनिट असे (टुकार) खेळ सुचवले होते बॅकप म्हणून... पण त्यांची काही गरजच लागली नाही (सुदैवाने)
एका अत्यंत आवडत्या विषयावर बरीच ऊहापोह झाली
८ वाजता; लवकर निघणार्या मंडळींकरिता आलू पराठा मागवण्यात आला, त्यांनी खाल्ला आणि आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहून घेतलं.. ९ वाजता पराठे खाऊन मंडळी गेली... मग आम्ही उरलेले गप्पा मारत बसलो.... आत्तापर्यंत हलके हलके विषय घेऊन बोललो होतो, मग वयोमानानुसार वास्तववादी विषय निघाले. एक जरूर शिकले की माणूस म्हणून एखाद्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. या गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते कळलंच नाही... रात्री १२ वाजता आठवण झाली की आपण जेवलेलोच नाही.... ऑर्डर केलेलं जेवण गरम करून जेवायला बसलो.... ते तासभर... जेवणात फार कुणाचं लक्षं च नव्हतं...सगळं लक्ष गप्पांमध्ये. जेवल्यावर काही मंडळी जाऊ लागली पण हायवे वरून जाण्यास इतरांनी विरोधच केला.. मग परत गप्पा रंगल्या.... .... गप्पा मारून सुकलेले घसे पल्लीच्या हातची फॅन्टास्टिक कॉफी पिऊन ओले केले, परत गप्पा पर्व सुरूच.... मग जड वातावरण अजून हलकं होण्यासाठी मी २ गाणी गायली, पल्ली, राज्या तल्लीन होऊन ऐकत होते, आणि झकास माझ्या समोर डोळे मिटून बसला होता, मला वाटलं त्याला झोपंच यायला लागली (माझं गाणं ऐकून) मी गाणं म्हणायचं सोडून जी हसत सुटले....
दिपुर्झा झकास ला खूप ओरडला आणि म्हणाला तू दक्षिच्या मागं जाऊन बस
(किंवा झोप) समोर काय झोपतोस?
राज्या तर रात्री १२ च्या गाडीने गावाला जाणार होता, तो आत्ता निघतो मग निघतो करत तिथेच...
अखेर चक्क उजाडलं, गप्पा संपल्या नव्हत्या... अख्खे १२ तास सम्पले होते. गटग तात्पुरतं संपलं होतं पण मनात अजून सुरूच होतं... पाय निघत नव्हता तरी सर्वजण निघाले.
इथे, ऑनलाईन भेटता भेटता कुणाची ओळख कशी झाली, कधी झाली कधी वाढली ते समजलंच नाही. पल्लीशी तर मी २९ मार्चच्या गटगच्या आधी अर्धा तास आधी पहील्यांदा बोलले होते. पण भेटल्यावर अज्जिबात असं वाटलं नाही की आपण पहील्यांदाच भेटलोय म्हणून... ज्यांना शक्य होतं, शक्य म्हणण्यापेक्षा ईच्छा होती ते आले त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच. विशेष करून लिंबू आणि कृष्णाजी... लिम्बू येईल की नाही याची शाश्वती मला स्वत:ला नव्हती, कृष्णाला सुद्धा मी फोन केला तेव्हा तो ऑफिसातून घरी निघाला होता मग इकडे गटग ला येणार होता, उशिरा का होईना पण त्याने सपत्नीक हजेरी लावली... नयना, अनघावन सुद्धा लांब रहात असूनही, आणि जाण्या-येण्याची गैरसोय असूनही वेळात वेळ काढून आल्या.... उमेश कोठिकरच्या घरी सुरेश वाडकर त्याची वाट पहात बसले होते म्हणून तो ९ ला गेला... आम्हा बाकीच्यांना तर काय उद्योग नव्हतेच...
विशेष कौतुक पल्लीच्या मुलीचं श्रावणीचं.... तशी माझ्याशी तिची बर्यापैकी ओळख झालेली होती.... पण इतर सर्व लोक अनोळखी असूनही ती आमच्यात खूप मिक्स झाली होती... तिच्या वयाचंच काय पण आसपासचं सुद्धा कोणीही नव्हतं (बुद्धिने आम्ही सर्व तिच्यापेक्षाही त्यावेळी लहान होतो :फिदी:) तरिही ती आमच्यात रमली, मध्येच चित्रं काढून स्वत:चं स्वत:ला रमवत होती... पण तिने एकदाही नाराजीचा सुर काढला नाही, अज्जिब्बात त्रास दिला नाही... आमच्या बरोबर बराच उशिर जागी होती.... पल्लीची मुलगी खरंच खूप शहाणी आहे.
लिम्बूचा मुलगा ही माबोकर नसूनही आमच्यात छान रमला, बाबांचं वेगळंच रूप त्याने त्या दिवशी पाहीलं (असेल) लिम्बूने मात्रं सांगितले की त्याला माबोवर सदस्यत्व घेऊ देणार नाही, अन्यथा तो अभ्यास काही करायचा नाही...
रोजच्या त्याच त्यात रोटिनमधून वेगळं काहीतरी करावं असं आपल्याला सर्वांनाच वाटतं पण नक्की काय हा प्रश्न पडतोच.... हे गटग हे त्यावर एक जालिम, रामबाण औषध होतं म्हणा/उत्तर होतं म्हणा.. काहीही म्हणा.
पण....... गटग करावं, आणि असं वेगळं आयुष्य निदान थोड्या वेळाकरिता का होईना जगावं अशी प्रेरणा देणार्या मायबोलीचे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे एकदम जोरात आभार...
****************************************************
दक्षिणा
****************************************************
सुस्स्स्स
सुस्स्स्स्साटच ग दक्षे....गटग आणि वृत्तांत दोन्ही...
-------------------------
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..
छान
छान लिहिलयस

**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो
एकंदरीत
एकंदरीत मजा केलीत...
छान लिहिलाय वृतांत.
=======================
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शीळ वाजवतो.....
दिप्या,
दिप्या, लेका तू पण लिही आता, नुस्त "छान लिहिलयस" अशी प्रतिक्रिया नको
आयला
आयला दक्षे, काय लिहीलयस ग, मला आता मुंबई गटग वृतांत वेगळा टाकायलाच नको. फक्त कोरम कमी होता इथे आणि थोडा वेळ भेटलो होतो इतकाच काय तो फरक. बाकी ओळखा ओळखी, चेष्टा मस्करी सगळ सारखच (माबोचा प्रभाव दुसर काय?). कुणालाही अनोळखी आहोत अस वाटत नव्हत अगदी माझ्या माबोकर नसलेल्या नवरोबाला आणि लेकीला सुद्धा
आमचा इंट्रोडक्टरी गटग होता म्हणुन थोड्या वेळाचा होता, जाताना असाच जास्त वेळाचा करायच ठरवुन बाहेर पडलो.
-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind
धमाल
धमाल केलेली दिस्तेय. उत्तम वृ. एकंदरीत नाईट-आउट पण झाला लोकांचा
एकदम
एकदम झक्कास!!!
visualize च झालं
सह्हीच !!...
सह्हीच !!... नादखुळा केलात तुम्ही...राज्याने नेमका चहाच पाजला ना ?

बाकी मि मिसले सगळे
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
लिंब्या वृ
लिंब्या वृ लिहायची खरी जबाबदारी तुझी होती तु पण हातभार लाव बघु...
----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------
दक्षिणा
दक्षिणा खुप छान लिहिलस.. आंम्हिही प्रत्यक्ष तिथेच होतो अस वाटलं तुझ गाणं ऐकताना.. अहं वाचताना
मज्जा केलीत तर.
तुमचा पहिलाच असेल इतका लांबलेला ग ट ग
दिक्षे,
दिक्षे, छान लिहिलयस गं....
दिपुर्झा आणि लिंबु, तुम्हाला दिलेली जवाबदारी झटकली वाटतं.
पण दिक्षा हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं.. मेहेनत रंग लायी.
एक सांगायच राहिल..
पराठा खुपच छान होता... तुम्हाला चव घ्यायला पण शिल्लक राहिला नाही..
-------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
मस्त
मस्त वृत्तांत
खुप मज्जा केलीये तुम्ही
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
आम्ही
आम्ही म्हणजे मी व झकास आधी निघतानाच ठरवत होतो की एक दीड तासात परत येऊ असं , झ ने तर घरीही सांगून ठेवलं होतं की मी घरीच जेवायला येतो म्हणून , पण तिथे गेल्यावर वेळ कसा गेला ते कळलच नाही . पल्लीने अगत्याने केलेले स्वागत

अनघावन ला अॅना_मीरा असे म्हणालो (चुकून
)
अन पराठा ऑर्डर केला .
बाकी मंडळी बसली होती गप्पा मारत मग 'ओळखा पाहू' झाले , मी सगळ्यांना अचूक ओळखले
नयना ला थोड्या गप्पा मारल्यावर ओळखले
मग गप्पा सुरु झाल्या , कोण कुठे काम करतं वगैरे ..
मग राज्याने केलेला चहा अन पल्लीने खास माझ्यासाठी व तिच्यासाठी केलेली कॉफी घेतली
मी कुठला तरी कीस्सा सांगत होतो लोकांना 'की मला ६ वाजताच जाग आला' ह्या आला की आली वर खूप चर्चा झाली अन दक्षीणाने सांगितले की ती नेहमी मैत्रीणीला म्हणते,सकाळी उठल्यावर 'माझी मोबाइल कुठे ठेवली ?'
मोबाईल नंबराची देवाणघेवाण झाली , बराच वेळ गप्पांनंतर मंडळी जायला निघाली , आमचे जेवण राहीले असल्यामुळे आम्ही ५ लोक तिथेच थांबलो , इतकवेळ हीही हू हू केल्यावर जरा सिरियस विषयांवर गप्पा झाल्या जेवणानंतर , मग पल्लीने सगळ्यांना कॉफी पाजली (अशी कॉफी मी कुठेच अन कधीच पिलि नव्हती
इतकी सुंदर कॉफी !)
तेंव्हा झ ला आठवले की आपल्याला घरीही जायचे आहे
बघतो तर २ वाजलेले मग पल्ली,राज्या,दक्षीणाने दामटवून बसवले त्याला ! तेवढ्यात पल्लीचं पिल्लु जे बेडरुम मधे झोपलं होत ते उठुन आलं की मला भीती वाटते म्हणून.. मग त्या निमित्ताने पल्ली तिला झोपवायला गेली (चांगली दोन तास झोपून आली
) आम्ही सगळे बाहेरच गप्पा मारत होतो , दक्षीणाच्या पॅशन वर बराच वेळ चर्चा केली दक्षीणाने व झकास ने 
मग अजून एक कॉफी राउंड करुन आम्ही ६ वाजता पल्लीच्या घरातून बाहेर पडलो
खूप छान मित्र मैत्रीणी मिळाल्या / जोडल्या गेल्या
पल्लीची तर ओळख आत्ता नवीच आहे असं वाटलच नाही ...
ह्या सगळ्या छान अनुभवासाठी धन्यवाद मायबोली
**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो
हा घ्या
हा घ्या माझा वृतांत
बरोब्बर ५.३० ला पल्लीच्या घरी पोचलो. मला वाटले होते कार्यवाहक आधीच पोचले असतील…. पण भारतीय परंपरेला जागुन त्यांनी बरोब्बर ५.४५ वाजता एंट्री घेतली.
मी पोचलो त्यावेळी पल्ली एका हाताने तिच्या पिल्लुला कलिंगड भरवत होती व दुसर्या हातात मोबाईल पकडुन कुणाशी तरी बोलत होती. स्वत:चं स्वागत स्वत:च करुन घेत मी खुर्चीवर टेकलो……. १० मिनिटे झाली तरी पल्लीचे फोनवरचे संभाषण काही संपायचे नाव घेईना (स्वभाव एकेकाचा :)), इतक्यात कार्यवाहकाने एंट्री मारली.
कार्यवाहकाने मला ओळखले पण मी म्हणालो मी राज्या नाही. कार्यवाहकाचा मोबाईल चार्ज करायचा होता पण तिच्याकडे चार्जर नव्हता म्हणुन माझ्या लॅपटॉप ला यु एस बी चार्जर लाउन दिला…. त्यावेळी माझ्या लॅपटोप वरचे नाव बघुन कार्यवाहकाने मी राज्या आहे हे कन्फर्म केले.
कार्यवाहकांना फ्रेश व्हायचे होते म्हणुन त्यांनी बाथरुम मधला नळ सुरु केला… पण नेमका शॉवर सुरु झाल्याने त्यांची काही क्षण तारांबळ उडाली
मग छोट्या श्रावणीने व्यस्थित सेटींग करुन दिले. फ्रेश झाल्यावर आमच्या तिघांच्या गप्पा सुरु झाल्या… म्हणजे त्या दोघी बोलत होत्या आणि मी ऐकत होतो :P. काय तो आवाज, काय ती अखंड बडबड……. माझी अवस्था तर मांजराला घाबरुन कोपर्यात लपलेल्या उंदरासारखी झाली होती
पल्लीने आणि दक्षिणाने मला संभाषणात ओढायचा प्रयत्न केला पण कसला बधतोय........ 
थोड्या वेळाने एकेक माबोकर यायला लागले. लिंबु आणि लिंबोटला (तन्मय), अनघा, नयना यांच्या एंट्र्या झाल्या. मग चहाचा विषय निघाल्यावर मला माझे पाक कौशल्य दाखवायची हुक्की आली म्हणुन मी चहा केला
चहा कसा झाला होता देव जाणे पण मंडळींनी तोंडावर तर खुप छान झालाय म्हणुन सांगितले…….. आणि हाय रे देवा, चहा तयार झाला आणि झकास व दीपुर्झा टपकले. मग याच्यातला थोडा त्याच्यातला थोडा असे करुन सर्वांना चहा मिळाला.
चहा पित असतानाच आपला लंटन स्थित माबोकर अंकी १ चा फोन आला. त्याच्याशी मी, दक्षिणा, पल्ली आणि लिंब्याने संभाषण केले. मी फोन ज्यावेळी लिंब्याकडे दिला त्यावेळी त्याने तो उलटा कानाला लावला….. म्हणजे बोलायची बाजु कानाकडे व ऐकायची बाजु तोंडाकडे…. मग मी त्याला फोन व्यवस्थित कानाला लावला त्यावेळी त्याने नेहेमीप्रमाणे जमत नाही तरीही विनोद करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केलाच…….
चहा झाल्यावर उमेश कोठीकर, कृष्णाजी व त्यांच्या सौं चे आगमन झाले. चहा मी केला होता मग कप धुवायची व साफसफाईची जबाबदारी दक्षिणाने उचलली.
गप्पा, फोटो काढणे, एकमेकाला चिमटे काढणे, माबोवरील लिखाणावर चर्चा अशी झक्कास मैफल रंगली होती.

पण काही लोकांना लवकर निघायचे असल्याने त्यांच्यासाठी पराठा मागवण्यात आला. ज़े लोक जेवायला थांबणार होते त्यांनी डोळे भरुन पराठे बघुन घेतले
मी आणलेली चॉकलेट्स सर्वांना देण्यात आली आणि उमेश ने आणलेली चॉकलेट्स आमच्यासाठी ठेऊन घेतली
कृषणाजी, त्यांची सौ, उमेश, नयना, अनघा, लिंबु, लिंबोटला हे लोक निघुन गेले आणि मी, झकास, दीप्या, पल्ली व दक्षिणाची खास मैफल सुरु झाली.
दक्षिणाच्या बेरकी मांजराने जी काही धम्माल उडवुन दिली त्याला तोड नव्हती…. काही केल्या हसु आवरत नव्हते……. खुद्द दक्षिणा अक्षश: गडबडा लोळत होती…..
जेवताना दीप्याच्या डस्टबीनने पण अशीच धम्माल उडवुन दिली…. माझ्या तोंडातल्या पाण्याने झक्याची आंघोळ थोडक्यात चुकली.
जेऊन झाल्यावर पल्लीने उत्कृष्ट कॉफी करुन दिली. नंतर एकमेकांच्या सुख दुखा:ची चर्चा विचारपुस असे करत गाडी भलतीच गंभीर होऊ लागली…… वातावरण हलके करण्यासाठी दक्षिणाने २-३ गाणी म्हटली….. मस्त..एकदम मस्त आवाज आहे दक्षिणाचा. झक्या अर्धे डोळे मिटुन मन लावुन गाणे ऐकत होता…. दक्ष ला वाटले तो पेंगतोय म्हणुन ती अशी काही हसत सुटली की…..
यानंतर पल्लीने लिहीलेला आणि बहारीन मधील मराठी लोकांनी विशेष गौरविलेल्या लेखाचे वाचन खुद्द पल्लीने केले. आजपर्यंत तुम्ही पल्लीच्या कथा वाचल्या असतील पण आम्हा चौघांना तिचा लेख खुद्द तिच्या तोंडुन ऐकायला मिळाला.
आश्या प्रकारे सकाळचे पाच कधी वाजले ते कळलेच नाही. मग परत एकदा पल्लीला मस्का लावुन कॉफी मिळवली आणि मंडळी सकाळी सहा वाजता आपापल्या घरी निघाली……
कार्यवाहकः दक्षिणा
************
To get something you never had, you have to do something you never did.
धन्स रे
धन्स रे सगळ्यांना, मी मिसलं हे सगळं....

सुरुवात माझ्यापासुन झाली आणि ऐन महत्वाचा इव्हेंट निसटला हातुन. (ऐनवेळी कलकत्त्याला जावं लागलं एका कस्टमरबरोबर गोट्या खेळायला)
पुढच्या वेळी भेटु...
बाकी कवे, <<मला आता मुंबई गटग वृतांत वेगळा टाकायलाच नको. >> हे आवडलं हो, असं छान छान बोलत जा की नेहेमीच.
दक्षे, आवडीच्या विषयावर गप्पा मारायला माबो आहेना, मग गटग वर कशाला तो विषय
____________________________________________
कृष्णासारखा सखा पाठीशी असेल तर येणारी संकटेही असामान्यच हवीत.
संकटे जर सामान्य असतील तर तो कृष्णाच्या देवत्वाचा अपमान ठरेल ना !!
अरे वा छान.
अरे वा छान. असेच भेटत राहा, स्नेह जुळवत रहा.
अरे झकास
अरे झकास व्रुतांत..
मी पण मिसलं हे सगळ. राज्या मेल कधी करतोय्स? वाट बघतोय लेका..
दक्षे,
दक्षे, दिप्या, राज्या वृत्तांत छानच
गटग पण आठवणीत रहाण्यासारखा झालाय तुमचा
<<माझी
<<माझी अवस्था तर मांजराला घाबरुन कोपर्यात लपलेल्या उंदरासारखी झाली होती >>>
राज्या, दिप, छान लिहिलत अगदि सविस्तर.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
There are two eternities that can really break you down
Yesterday & Tomorrow
One is gone and the other doesn’t exist…So live today..
विशल्या-फि
विशल्या-फिशल्या... आवडीचा विषय नाय झाला तर तो गटग कसला रे भो?
इंद्रा - अगदी मनातलं बोललास,
गटग इतका सुरेख झाला की खरंच आयुष्यभर आठवणीत राहील बघ.
----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------
उमेश
उमेश कोठीकरने आल्या आल्या राज्याची ओळख करुन दिल्यावर त्याचे अभिनंदन केले , कोणाला काही कळलेच नाही , का ते ? मग लक्षात आले की मार्च महीण्याची सर्वोत्तम कविता ज्या कवीने लिहिली आहे त्याचाही आयडी राजा आहे , मग उमेश ला राजा अन राज्या तला फरक समजावून सांगितला कार्यवाहकाने
**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो
दिपू,
दिपू, राज्याने ते अभिनंदन घेतलं??
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |
दिपू,
दिपू, राज्याने ते अभिनंदन घेतलं??>>>>>>>
नाही गं अश्विनी, मीच त्याला सांगितलं की "तो मी नव्हेच"
************
To get something you never had, you have to do something you never did.
मस्त रे
मस्त रे लोक्स...
धमाल केलीत तर एकूणात...
_______
बात चले कोई यार मिले तो हाथ मिला दे ताली...!!!
मस्त रे
मस्त रे वृत्तान्त दिप्या राज्या

राज्या, लेका मी काहीही बोललो तरी त्याला विनोदी समजायची चूक तूच करु जाणेस!
अॅन्क्याचा फोन आला तेव्हा मी जाम टेन्शनमधे, बील किती होईल काय की म्हणून, त्यात हल्लीचे हे फोन? शिन्च्यान्चा शेण्डा नि बुडखा, सगळे सारखेच दिस्ते! आता माझ्याकडून चूक झाल्यावर मी स्वतःलाच घातलेल्या शिव्या तुला "विनोद" कशा काय बरे वाटल्या???? आश्चर्य आहे!
असो
हा जीटीजी तसा अचानकच ठरलेला होता, अनासाये शनिवारी सुट्टी असल्याने, तसेच राज्या, दिप्या आणि झकास येणार असे निश्चित झाल्याने मी निश्चिन्तपणे जाणार होतो!
माझ्याबरोबर धाकटी येणार होती, पण तिची तब्येत ठीक नसल्याने थोरला आला!
आला तो सरळपणे आला नाही, "बाबा, तुम्ही कुठे जाता हो? येतोच मी बघायला" असे लिम्बीच्या समोर म्हणला!
खर तर झकोबा माझ्याबरोबर येणार होता, तो बायकोला आणणार अशी अफवा असल्याने मी मेव्हण्याकडे त्याच्या कारची विचारणा करुन ठेवली होती! ऐनवेळेस दिप्या माझ्याबरोबर येणार असे ठरु लागले, तेव्हा मी दोघच जायचे तर कार कशाला, म्हणून कार कॅन्सल केली! सरते शेवटी दिप्याने निघायच्या आधी काही तास फोन करुन सान्गितले की तो नि झक्या एकत्र येणार!
मी मनात म्हणले, बोम्बला, हे दोघेही पक्के आळशी, निदान इथे तरी तसे वाटतात, आता हे कुठले येतात??? तरी दिप्याला बजावुन बजावुन सान्गितले की झकोबाला घेवुन यायची जबाबदारी आता तुझी, "तो आळशी आहे"! दिप्याने जबाबदारीच्या आनन्दात होकार भरला
तर बराच सव्यापसव्य करुन शेवटी नेहेमीप्रमाणे मी लिम्बीच्या भावाची बाईक उसनी आणून तिच्यावरुन बावधनला निघालो. बावधन पुर्वी पासुन माहित होते, म्हणजे देहू कात्रज बायपास झाल्या पासून! दुसरे बावधन म्हणजे पाचवड जवळचे, तिथल्या बगाडामुळे माहीत! पण तिकडे जायचे नव्हते. सोबत गुगल मॅप वरुन नकाशा घेतला, ऑफिसमधे एकदोघा जाणकारान्ना आधीच विचारले होते, त्याप्रमाणे कुठेही न चुकता थेट पल्लीच्या घरी पोचलो!
लिफटच्या शेजारीच जाळिचा दरवाजा होता, आतिल दरवाजा अर्धवट उघडा, आतून मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज, मी दरवाज्यावरिल नम्बर बघुन खात्री करुन घेतली, बेल वाजवली



दार उघडायला दक्षी आली, दार उघडले आत गेलो
मी चपला काढेस्तोवर दक्षी माझ्यापासून दहाबारा फुटावरील गच्चित जाऊन पल्लीशेजारी उभी राहिली! अन दोघी माझ्याकडे भयमिश्रित कुतुहलाने बघताहेत असे आपले मला जाणवले.
मला समजेना, मी काय गडबड केली! की घरातुन निघताना आरशात बघायला विसरलो?
तेवढ्यात तिथेच बाजुला मला राज्या दिसला, मग माझ्या जीवात जीव आला! अरे आहे, कोणतरी ओळखीचे आहे!
मग काय? या दोघी अजुनही गच्चीतच, मी सरळ जाऊन सोफ्यावर बैठक मारली! आलोच आहे तर आता आपलेच घर आहे!
मग आमच्या गप्पा रन्गल्या, कोण काय काय करते वगैरे वगैरे. हळु हळू बाकी जण आले!
मध्यात केळिच्या वेफर्सचे निरनिराळे प्रकार ठेवले होते!
बाकीच्यान्चे माहित नाही, लिम्बोटल्याचे तर नाहीच नाही, पण मी मात्र सवईने एका पाठोपाठ एकेक तुकडा उचलुन तोन्डात टाकत होतो! तेवढे खारे/तिखट शेन्गदाणे, कान्द्याची फोड अशाचि कमी मला जाणवत होती! जे जे काय कमी वाटत होते, ते, घुटका घुटका पाणी पिऊन विसरुनही जात होतो!
बहुधा यामुळेच की काय? या काकाला फारच तहान लागलेली दिस्त्ये असे वाटून की काय, पल्लीच्या चिमुरडीने माझ्यासमोर ग्लासभर पाणी आणून ठेवले
असो
अनघा म्हणजे तीच ती माझे पति रेवापति वाली अनघा हे कळायला मला जरा उशिरच लागला!
नयनाला कट्ट्यावर बघितले होते
उमेशशी माझी मायबोलीवर बहुधा "सलामी" झडलेली नसल्याने मला सन्दर्भ फारसा लक्षात येत नव्हता, पण त्यान्च्याशी समयोचित गप्पा मारल्या, व एकमेकान्ना टाळ्या देतघेत, कधी सलामी झडलिच आपली, तर झडू शकते असे सान्गायला मी विसरलो नाही!
मधेच माझा पेशल नमस्ते फेम किस्ना आला! सहकुटुम्ब आला! झकोबा नि दिप्या पोचले, मग काय? नुस्ता धुमाकुळ!
राज्याने चहाची जबाबदारी घेतल्यावर मी नि:सन्कोचपणे त्याला सान्गितले की मला डबल शक्कर चहा हवा! (मुद्दमहून असे सान्गण्याचे कारण की अदरवाईज पुण्यामुबैत हल्ली कुठे चहा पिणे म्हणजे शिक्षा वाटते, डायबेटीस वा तत्सम भितीने चहामधे साखर टाकल्या न टाकल्यासारख करुन बनवलेला पानचट चहा पिणे हे महाभयन्कर सन्कट वाटते मला) राज्याने हुकुमाबर चहा बनवला, भरीस दक्षेने त्याला "खडा चमचा" की कायसासा क्रायटेरिया सान्गितला
राज्या म्हणतो ते चूक आहे, चहा पुरवावा लागला नाही, उलट माझ्यासमोर एक आख्खा मग शिल्लक होता, माझा आधीचा मग सम्पवुन मी हळूच त्यातील चहा ओतुन घेऊ लागलो, तशी राज्याने देखिल त्याचा मग पुढे केला! मग आम्ही सन्गनमताने, शिल्लक मगावर जास्त चर्चा होऊ न देता, दोघातच तो अमृततुल्य चहा फस्त केला!
एरवी लिम्बोटल्याच्या चेहर्यावरची माशी हलणार नाही, ह्सणे वगैरे तर फार दूरची गोष्ट झाली! पण तेथिल चर्चेमधिल "न समजण्यार्या" आयड्यान्चे उल्लेख नि त्यान्च्या कथा ऐकुन मधेमधेच तो देखिल खदखदुन हसत होता, यातच काय ते समजुन घ्या!
मधेच मी त्याला सान्गितले, की यातिल कोणीही आधी प्रत्यक्ष भेटले नाहीये! मायबोलिच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलोत
तेथिल आलेल्या प्रत्येक व्यक्तिस मला जमेल तसे मी बोलते करुन घेत होतो, माहिती मिळवत होतो जेणे करुन लिम्बोटल्याला ते ऐकायला-बघायला मिळेल. एकन्दरीत प्रत्येक व्यक्तीची आपापल्या क्षेत्रातील अधिकारवाणी त्यास चान्गलेच इम्प्रेस्ड करुन गेली होती
झक्या (आळशी विसरभोळ्या) नेहेमी प्रमाणेच त्याचा कॅमेरा घरी विसरुन आला होता
नन्तर पराठे मागविले गेले, जे जेवायला थाम्बणार नव्हते त्यान्ना पराठे होते, मी राज्या कि झक्याला विचारले बर का की टेस्ट करा पराठा! नको म्हणले होते तेव्हा!
साडे आठला निघेन असे सान्गणारा मी साडेनऊ वाजले तरी तिथेच होतो!
मग मात्र, मला रात्रीची गाडी चालविण्यास त्रास होतो याची आठवण होऊन आता निघायचेच असे ठरवुन निघालो
तेव्हड्यात, कशी ना मला दुर्बुद्धी सुचते???? आता येवढे पल्लीच्या घरी आलोत, बाकी लोक देखिल आहेत तर गप्प बसावे ना? बाकी लोक काय करतात्-म्हणतात त्याची वाट पहावी ना? पण तसे करेल तर तो लिम्ब्या कसा काय?
मी आपले साळसुदपणे दक्षीला विचारले, बाईग, कॉन्ट्रीब्युशनचे काय???????
अन मग त्यावरुन जो काय गोन्धळ मला जाणवला त्याचे वर्णन करण्यास मज पामराकडे शब्द नाहीत!
अन येवढे होऊनही जित्याची खोड का काय म्हणतात ना? तस्सच हो,
मी अजुनच कौतुक करुन सान्गु लागलो की झक्की आले त्यावेळेस ना, कॉन्ट्रिब्युशनचे त्यान्नी खूप छान म्यानेज केले होते!
मण्डळीन्नी बहुधा माझ्या वयाचा वा वयपरत्वे आलेल्या "मागल्या पिढीच्या" बावळटपणाचा वा पुणेरी पेठीपणाचा आदर राखत वेळ निभाऊन नेली!
पण माझ्या कडून अस्थानी विचारणा करण्याची ती चूकच झाली हे मान्य केलेच पाहिजे! किन्वा अस म्हणता येईल की चार लोकात वावरताना काय बोलावेचालावे याचे भान मला उरत नाही! मी माझ्याच तन्द्रित अस्तो
हे मी म्हणतो असे नाही, आमची आई हेच म्हणायची, नन्तर तिचा वारसा लिम्बी चालवते, मी फक्त माझ्याकडून कबुली दिली इतकेच!
तर असो
येथुनही निघाल्यावर, गाडीवरुन परत जाताना लिम्ब्याला विचारले, कशी काय वाटली लोकं?
लिम्ब्या म्हणाला की त्याला असेच परत यायला आवडेल, पुन्हा कधी असेल तर सान्गा!
मला वाटते की, लिम्ब्या पेक्षा त्याच्या जस्ट अकराव्वीतल्या पोराची ही प्रतिक्रियाच पुरेशी बोलकी आहे, नाही? तेथिल सर्वच जण त्याला ज्येष्ठ, पण तसे काहीही न भासता तो त्यान्च्या गप्पात रन्गुन गेला, नव्हे तर पुन्हा यायला आवडेल असे सान्गतो यातच सर्व काही आले!
यात कुणाचा उल्लेख राहिला असल्यास क्षमस्व!
चु. भु. द्या.घ्या
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***
दिप्याने
दिप्याने जबाबदारीच्या आनन्दात होकार भरला >>

**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो
>>तेवढे
>>तेवढे खारे/तिखट शेन्गदाणे, कान्द्याची फोड अशाचि कमी मला जाणवत होती! जे जे काय कमी वाटत होते, ते, घुटका घुटका पाणी पिऊन विसरुनही जात होतो! << लिम्बू
तरीच तू ते खाताना अगदी गप्प गप्प होतास... 'अमृतपान' मिस करत होतास काय? 
----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------
हॅलो! I missed it.
हॅलो!
I missed it. एक तर मला उमेशने अगदी शेवटच्या क्षणी सांगितले. दुसरे म्हणजे आमच्या हॉस्पीटल मध्ये उषा मंगेशकरांचा कार्यक्रम होता. एक दिवस आधी कळलं असतं तर मी नक्की काहीतरी करून आलो असतो. तिसरे म्हणजे
पत्ता समजला नाही व्यवस्थित!
खूप वाईट वाटते.
दक्स, आता माझा फोन घे; आणि पुढच्या वेळी फोन कर प्लीझ. म्हणजे जर मला आपल्यातला समजत असाल तर!
शरद [९७६६३२६३११]
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
भो आ क फ
भो आ क फ

**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो
का रे
का रे दिपड्या, लय हासायलंयस..
----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------
Pages