बाई मी गेली.....!

Submitted by satish_choudhari on 2 April, 2009 - 01:49

बाई मी गेली पाण्याला
घागर घेऊन विहिरीला
विहिरीच्या बाजुला दिसली बाटली
भुंगा डसला नी पळत सुटली….

बाई मी गेली शेतात
घेऊन शिदोरी हातात
कमीन्या दिवानजीची नजर फुटली
फेकलं काम नी पळत सुटली….

बाई मी गेली बाजारा
आली घेऊन मोगरा
रस्त्यात पोट्ट्यांनी गर्दी कुटली
मारली एकाच्या नी पळत सुटली…..

बाई मी गेली सिनेमाला
तिकिट काढून थिएटरला
चुकिचा सिनेमा मी डोळे मिटली
सोडला सिनेमा नी पळत सुटली…..

बाई मी गेली जत्रेला
सोबत घेऊन कुत्र्याला
रस्त्यात त्याला कुत्री भेटली
डोकं धरलं नी पळत सुटली……
डोकं धरलं नी पळत सुटली……

कवि - सतिश चौधरी

बाई मी गेली मॉलला
कार्ड घेऊन खरेदीला
मॉलच्या बाजुला ऑफर दिसली
भुंगा डसल्यासारखी पळत सुटली….

बाई मी गेली ड्रायव्हींग्गला
घेऊन पीयुसी हातात
कमीन्या गाडीची काचच फुटली
सोडली गाडी नी पळत सुटली….

बाई मी गेली डीस्कोला
पास नाय मिळाला पबचा
रस्त्यात श्रीरामसेनेची गर्दी दिसली
डीस्कोला न जाता पळत सुटली…..

बाई मी गेली मल्टीप्लेक्स्ला
तिकिट काढून थिएटरला
रामूच्या सिनेमानी नजर विटली
सोडला सिनेमा नी पळत सुटली…..

बाई मी गेली पार्टीला
सोबत घेऊन नवर्‍याला
वाटेत त्याला खबर भेटली
इन्कम टॅक्स ची रेड पडली……
डोकं धरलं नी पळत सुटली……

चू भू द्या घ्या Light 1
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

बाई मी गेली जत्रेला
सोबत घेऊन कुत्र्याला
रस्त्यात त्याला कुत्री भेटली >>>>
रस्त्यात त्याला कुत्री भेटली...
कुत्र पिसाळल..पळत सुटली ...//?? (बाई का कुत्री ?? )

जबरी आहे..हे हे हे हे Lol
केदार Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

Lol
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

Rofl Rofl Rofl
जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

आता काय भोंड्ल्याची गाणी की काय खरं नाही...

विहिरीच्या बाजुला दिसली बाटली
भुंगा डसला नी पळत सुटली….

भुंगे का बाटलीसे क्या वास्ता? Sad

भुंगा बहुदा पिदाडा असावा.. Rofl

केदार ..... लई भारी.... Rofl
****************
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान! Happy

प्रो. रिमिक्सेस जास्त भारी आहेत हं ओरिजनल पेक्षा Lol

केदार Rofl

Biggrin Biggrin Biggrin
*******************
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
----------------------------------->>

Lol सतीश, भन्नाट !

    ***
    तुका म्हणे नाही | आमुची मिरासी | असावेसी एसी | दुर्बळेची ||

    वा केदारदा...पुन्हा ..! ....:हहगलो:
    ! धन्यवाद सर्वांचे..!......:हहगलो:
    *************************
    प्रा.सतिश चौधरी
    काव्यातुन ...हे जिवन फुले....
    ----------------------------------->>

    सतीश, केदार
    छान आहेत दोघांच्याही रचना.

    मुकुंद कर्णिक
    मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com

    प्रोफेसरांनी गावातल्या स्त्रीची व्यथा मांडलीये आणि मी शहरातल्या स्त्रीची व्यथा
    Rofl

    ------------------------
    देवा तुझे किती सुंदर आकाश
    सुंदर प्रकाश सूर्य देतो

    सहीच सुटलायत!:)

    केदार, तू माबोवरच्या स्त्रियांची व्यथा पण मांडू शकतोस की ! Wink त्या कधी पळू लागतात वगैरे वगैरे
    ************
    निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

    Lol
    काय भारी आहे पळापळी!!
    स्त्रियांना पळायला लावताय म्हणून खटले दाखल होतील तुमच्यावर, तेवढे फक्त सांभाळा..!! Proud

    --
    कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!

    केदार १२३...
    विडंबन लईच झक्कास.
    Rofl

    --------------------------------------------------------
    जापानचे केदार...

    कुत्र पिसाळल..पळत सुटली ...//?? (बाई का कुत्री ?? )
    --------------------------------------------------------
    Rofl

    केदार१२३

    प्रोफेसरांनी गावातल्या स्त्रीची व्यथा मांडलीये आणि मी शहरातल्या स्त्रीची व्यथा
    -------------------------------------------------------------------
    Rofl

    अता त्या भुंग्याची, पीसाळलेल्या कुत्र्याची , कुत्रीची, व्यथा ही येऊ देत प्रोफेसर साहेब.

    Lol हायला काय जुगलबंदी आहे !

    प्रो आणि केदार Lol

    प्रकाश Lol Lol Lol
    ****************
    प्रा.सतिश चौधरी
    काव्यातुन ...हे जिवन फुले....
    ----------------------------------->>