चांगली-वाईट, सुष्ट-दुष्ट, काळ्या-पांढर्या अशा एकाच रंगातल्या व्यक्तिरेखांच्या गर्दीत अचानक कधीतरी करड्या व्यक्तिरेखा सापडतात आणि मी चौकस होते. त्या जर स्त्रिया असतील तर अपील जरा जास्तच. अॅना केरनीना, स्कार्लेट-ओ-हारा, लिजबेथ सेलँडर... यांना ननायिका म्हणतात. यांच्यात काही सद्गुण सहजपणे सापडतात म्हणून त्या नायिका. पण तेवढेच दुर्गुणदेखील असतात त्यामुळे ननायिका. अँटीहिरोइन.
पण कधीकधीमात्र अश्श्या बायका भेटतात की बस्स! धक्काच बसतो! काय चांगलं काय वाईट याची जाण यांच्यात भीषणपणे गंडलेली असते. या बायका स्वतःहून कुठल्याही चांगल्या व्यक्तीला त्रास देत नाहीत. पण जर कोणी यांच्याशी वाईट वागलं तर मात्र त्याची काही खैर नाही. तरीही या खलनायिका किंवा ननायिका नाहीत. त्या नायिकाच. अशाच काही 'व्हिलन हिरोइन'च्या पुस्तकांची थोडक्यात ओळख:
1. गॉन गर्ल - एमी एलीअट:
निक आणि एमी यांच्या लग्नाचा ५वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे न्याहरी करुन निक कामाला (बहिणीसोबत चालू केलेला बार) जातो. थोड्या वेळाने घरासमोर राहणार्याचा फोन येतो की तुमच्या घराचं दार सताड उघडं आहे. निक घरी येऊन पाहतो तर हॉलमधलं सामान विखुरलं आहे आणि एमी गायब झालीय. मग पोलीसतपास, खून/अपहरणची शक्यता, आसपासच्या भागात एमीचा शोध, मिडीया सर्कस इ. चालू होतं आणि सांगाडे कपाटातून बाहेर पडू लागतात. निकला बायको गायब झाल्याचं दुःख, काळजी वाटत नाही. तिचे मित्रमैत्रीण कोण, तिचं घरातलं रुटीन काय अशा साध्या प्रश्नांची उत्तरं त्याला देता येत नाहीत. एवढंच काय तिचा रक्तगटदेखील त्याला आठवत नसतो. अधिक तपासात नुकताच एमीचा जीवनविमा दुप्पट केल्याचं कळतं. आणि अर्थातच संशयाची सुई त्याच्याकडे वळते. पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.
या पुस्तकाने इतका धुमाकूळ घातला की त्यानंतर थ्रिलर प्रकारात एखादे क्रेझी पुस्तक आले की त्याला 'नेक्स्ट गॉन गर्ल' म्हणले जाऊ लागले. एक पुरुष आणि एक स्त्री असे एकाआडएक न्यारेटर असलेली बरीच पुस्तकं लिहली जाऊ लागली. त्यातला एक किंवा सगळेच अविश्वासू असतील. ते वेगवेगळ्या काळातील घटनांबद्दल बोलत असतील. किंवा एकाच घटनेकडे आपापल्या दृष्टीकोनातून बघत असतील. त्यातून बरेच रेड हेरींग मिळतील. व्यक्तिरेखांबद्दलची वाचकाची मतं एका टोकापासून चालू होऊन पुर्ण विरुद्ध दुसर्या टोकाला जातील. एकंदरच फुलटू रोलर कोस्टर राइड.
2. सायलेंट वाइफ - ज्योडी ब्रेट:
निक-एमी तरुण, लग्नाला पाचंच वर्ष झालेलं जोडपं होतं. इथे टोड आणि ज्योडी यांचं २० वर्ष मुरलेलं नातं आहे. एखाददुसर्या पेशंटला सायकोथेरपी काऊंसलींग करणारी ज्योडी मुख्यतः होममेकर आहे. घर टीपटॉप ठेवणे, टोड कामाहून आल्यावर त्याच्या आवडीचे खाणेपिणे तयार ठेवणे इ कामं ती वर्षानुवर्ष करत आली आहे. टोड हा बाहेरख्याली आहे. ज्योडीला ते माहीत आहे. पण त्याबद्दल ती काही बोलत नाही. छोटेछोटे प्रतिशोध घेऊन ती शांत राहते. हे केवळ कचरा गालिचाखाली ढकलणं असतं का? ज्योडीची शांतता ज्वालामुखीसारखी ठरणार का? हे जाणून घ्यायला पुस्तक नक्की वाचा.
गॉन गर्ल सुरवातीपासूनच डिस्टर्बींग आहे. तर सायलेंट वाइफ हळूहळू अँटीसिपेशन वाढवत नेणारं आहे. नात्यांमधला साचलेपणा, गृहितकं यांच्याबद्दल प्रश्न निर्माण करणारं पुस्तक.
3. द गर्ल ऑन द ट्रेन - रेचल, अॅना, मेगन:
घटस्फोटीत, वांझोटी, बेकार, बेवडी रेचल रोज ट्रेनने (दारु पीत पीत) नोकरीवर जाण्याचे नाटक करत असते. वाटेत सिग्नलला ट्रेन जिथे स्लो होते तिथल्या एका घरातील पर्फेक्ट कपल मेगन-स्कॉट यांचे डेली रुटीन पाहणे हा तिचा छंद आहे. एकेदिवशी ती मेगनला त्रयस्थ इसमाचे चुंबन घेताना पाहते आणि तिला फार धक्का बसतो. रेचलला दारुमुळे बर्याचदा ब्लेकआऊट येत असतात. अशाच एका ब्लेकआऊटमधुन चिखल, रक्ताने माखलेल्या कपड्यांत ती जागी होते आणि आदल्या दिवशी मेगन बेपत्ता झाल्याची बातमी येते. मेगनचं काय झालं? अॅना कोण आहे? रेचलचा या सगळ्याशी काय संबंध? हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचा.
मला स्वतःला हे पुस्तक अर्ध्यापर्यंतच आवडलं. पुढेपुढे कंटाळले आणि शेवटीशेवटीतर 'कमॉनऽ संपवा आता!' झालं. पण हे पुस्तकदेखील नेक्स्ट गॉन गर्ल म्हणून फ्रेंझी निर्माण करणारं होतं (कदाचीत केवळ मार्केटींग गिमीक) म्हणून इथे या यादीत आलं.
4. लकीएस्ट गर्ल अलाइव - अॅनी फनेली:
सुंदर, चांगले करीयर, श्रीमंत+प्रेमळ मंगेतर... वरवर पाहता २८ वर्षीय अॅनीचे आयुष्य कोणालाही पर्फेक्ट वाटेल. पण पौगंड वयातील काही भयानक अनुभवांनी अजूनही तिची पाठ सोडलेली नाही. ते अनुभव कोणते हे जाणून घ्यायचे असेल तर पुस्तक वाचा.
हे पुस्तकदेखील मला फारसे आवडले नाही. पण गऑदट्रेप्रमाणेच हे पुस्तकदेखील नेक्स्ट गॉन गर्ल म्हणून फ्रेंझी ब्ला ब्ला ब्ला :-D. वेलऽ लेखिकेने स्वतःचा 'अनुभव' यात लिहला आहे. अमेरीकेतील कॉलेज लाइफ, बुलिइंगबद्दल मला थोडीफार आयडीया यातून मिळाली म्हणता येइल.
5. द काइंड वर्थ किलींग - लिली किटनर:
टेड आणि लिली विमानतळावरील बारमधे भेटलेले अनोळखी. कॉकटेल रिचवताना ट्रुथ गेम चालू होतो. अगदी जवळच्या व्यक्तिशी जे बोलू शकणार नाही ते परत कधीच न भेटणार्या अनोळखी व्यक्तिलामात्र सांगू शकतो. टेड आपल्या बायकोच्या व्याभिचाराबद्दल बोलतो. लिली विचारते "मग तू काय करणार आहेस याबद्दल?". टेड डोळा मारायचा प्रयत्न करत उत्तरतो "तिचा खून करावासा वाटतोय". लिली डोळे मोठे करत म्हणते "मला वाटतं तू हे जरुर करावं." पुढे काय होतं जाणण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.
गॉन गर्ल-एमीइतकीच कावकि-लिली मला आवडली. गर्ल ऑन द ट्रेनपेक्षा या पुस्तकाला जास्त प्रसिद्धी मिळायला हवी होती. फार जबरदस्त पुस्तक आहे. आणि शेवट तर खल्लासच! याचा सिक्वेल यावा अशी माझी फार इच्छा आहे. आणि हो पुस्तकात एक फार विनोदी कविसुद्धा आहे बरं का. नक्की वाचा.
===
* ही सगळी पुस्तकं थ्रिलर/सस्पेंस असल्याने प्लॉट, बायकांच्या श्रुडपणाबद्दल जास्त लिहले नाही.
* तुम्हीदेखील इतरत्र समिक्षा, चिरफाड वाचत बसू नका. सरळ पुस्तक वाचा किंवा चित्रपट बघा. आणि काय वाटलं ते इथे लिहा.
* डिटेल लिहणार असाल तर स्पॉयलर अलर्ट टाकायला विसरू नका.
* लेखातील इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवा.
* वांझोटी शब्द ट्रीवलाइज करण्यासाठी मुद्दाम वापरला आहे.
कजाग पाहिजे ना?
कजाग पाहिजे ना?
कजाग म्हणायच आहे का
कजाग म्हणायच आहे का तुम्हाला?
धागा वाचते आता...
मला मोबाइलवरुन शेवटचे वाक्य
मला मोबाइलवरुन शेवटचे वाक्य पुर्ण टंकता येत नाहीय. ते
* वांझोटी शब्द ट्रीवलाइज करण्यासाठी मुद्दाम वापरला आहे.
असे आहे. नंतर ट्याबवरुन अपडेट करेन.
>> अपडेट केलं.
पुस्तकओळखीबद्दल धन्यवाद पण
पुस्तकओळखीबद्दल धन्यवाद पण तुम्ही दिलेल्या शीर्षकात ते 'कजाग' बायका असतील तर पुस्तकओळखीत नायिका/न्नायिका कजाग असतिल अस अजिब्बात वाटत नाही.. शीर्षकावरुन तुम्ही पुस्तकओळखीत त्या स्त्रीपात्राचा कजागपणा दिसेल असे सीन वर्णायला हवे होते...
इतर पुस्तक वाचली नाहीए पण 'द गर्ल ऑन द ट्रेन'मधील नायिका कजाग पेक्षा खरतर मानसिक रुग्णासारखी जास्त वागते... मला वाटत तुम्हाला 'कजाग' चा नक्की अर्थ माहिती नसावा..
माझ्यामते तरी शीर्षक बदललेल जास्त बर...
बाकी पुस्तकओळखी बद्दल आभार...
टीना +१ हो कजागएवजी, गुढ,
टीना +१
हो कजागएवजी, गुढ, अनाकलनीय किंवा तत्सम नाव अधिक योग्य वाटेल. छान पुस्तकओळख. मिळाली तर वाचायला आवडतील ही पुस्तके.
कृपया विपू बघा..
कृपया विपू बघा..
शेवटची दोन सोडून बाकी सगळी
शेवटची दोन सोडून बाकी सगळी वाचली आहेत. पण कजाग शब्दाचा संबंध काही कळला नाही. कजाग म्हणजे भांडकुदळ.
या बायकांना गूढ किंवा थंड रक्ताच्या नायिका म्हणता येईल.
कजाग म्हणजे shrewed. माझ्या
कजाग म्हणजे shrewed. माझ्या मते मी योग्य शब्द वापरला आहे.
या नायिका खासकरुन एमी, लिली पुर्णपणे आणि ज्योडी, अॅनीदेखील बर्याच प्रमाणात श्रुडच आहेत.
कृपया पुस्तक वाचा.
>> मी तो शब्द चूकीच्या अर्थाने वापरत होते. धाग्यात बदल केला आहे.
कजाग म्हणजे भांडकुदळ. कशावरुन
कजाग म्हणजे भांडकुदळ. कशावरुन भान्डण करेल हे सान्गता ने येणारी. मुळात स्त्रियान्विषयी अशा सर्व शब्दान्वर बन्दी घालण्याचा धागा कधी येतो याची वाट बघतेय.
अरेरे वाट लागणार वाटतं
अरेरे वाट लागणार वाटतं धाग्याची... एकच शब्द पकडून त्याच्याभोवती पिंगा घालत बसायचा... चालू द्या सगळ्यांचंच. माबो आपलंच आहे
काही उल्लेखनीय वाटलं तर येइन मी.
>> बायकांनो, मी 'तो' शब्द काढून टाकला आहे. जर स्त्रियांविषयी बोलताना हे हे शब्द वापरायचे नाहीत असा काही फतवा आला तर या एका शब्दापुरतेच मी त्याला पाठींबा देइन
मस्त ओळख एक पुरुष आणि एक
मस्त ओळख
एक पुरुष आणि एक स्त्री असे एकाआडएक न्यारेटर असलेली बरीच पुस्तकं लिहली जाऊ लागली. त्यातला एक किंवा सगळेच अविश्वासू असतील. ते वेगवेगळ्या काळातील घटनांबद्दल बोलत असतील. किंवा एकाच घटनेकडे आपापल्या दृष्टीकोनातून बघत असतील. त्यातून बरेच रेड हेरींग मिळतील. व्यक्तिरेखांबद्दलची वाचकाची मतं एका टोकापासून चालू होऊन पुर्ण विरुद्ध दुसर्या टोकाला जातील. एकंदरच फुलटू रोलर कोस्टर राइड.
>>>>>
हे त्या मुसाफिर चित्रपटात असे होते ना?
राया, ऋन्मेष धन्यवाद
राया, ऋन्मेष धन्यवाद
===
ऋन्मेष, मी मुसाफिर पाहिला नाही त्यामुळे सांगू शकत नाही. बादवे तू कुठेतरी लिहलेलं की "मी इंग्रजी फारसे वाचत नाही". 1, 3 वर बेतलेले चित्रपट आले आहेत, 4 वरचा येणार आहे. ते तू पाहू शकतो.
छान लेख. अशा पुस्तकांची ओळख
छान लेख. अशा पुस्तकांची ओळख करून देताना त्यातील रहस्य कायम रहावे असे लिहिणे अवघड असते. ते छान जमलंय. ह्या प्रकारातील पुस्तके फारशी वाचत नाही. एखादे तरी वाचून बघावे असं वाटतंय.
रच्याकने,
Shrewd ≠ कजाग
Shrewd (in a negative connotation) = कावेबाज, धूर्त, पाताळयंत्री, अतिचलाख
गॉन गर्ल, लकिएस्ट गर्ल
गॉन गर्ल, लकिएस्ट गर्ल अलाईव्ह आणि द गर्ल ऑन द ट्रेन ही तिन्ही मी वाचली आहेत.
ह्या तिन्हीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ( जरी लकिएस्ट ची अॅड तशी केली असेल तरी).
तिन्हीची तुलना होऊ शकत नाही. पण गॉन गर्ल हे पुसक विकेड गर्ल असे म्हणता येईल. ते जास्त थरारक आहे.
ह्या बायका कजाग कॅटेगिरिच्या नाहीत. रेचल, तुमाला श्रुड का वाटली? ती तशी नाही. अॅनी ही श्रुड नसून कॅलक्युलेट, फ्री आयुष्य जगणारी आहे, तिला तिच्यावर विश्वास आहे, म्हणून तीने शेवटचा निर्णय घेतला, ह्या श्रुड पेक्षाही आत्मविश्वासी, प्रबळ इच्छा असणारी असे म्हणू शकतो.
इनफॅक्ट अॅनी ( खरेतर अॅहनी कारण तिला अॅनी नावाचा तिटकारा आहे) ही व्यक्तीगत आयुष्यात पोळलेली बाई आहे. अर्ध पुस्तक तिला वेगळे पोर्ट्रे करतं अन शेवटंच अर्ध वेगळं. पुस्तक शेवटा पर्यंत चांगल आहे, पण पुस्तकाचा शेवट गुंडाळला आहे. जो अजून खुलवता आला असता. पण ह्या पुस्तकात एक ट्विस्ट आहे, जी पूर्ण पुस्तकभर उलगडलेली नाही. कदाचित लेखिकेला निर्णय वाचकांवर सोडायचा आहे. आणि त्या ट्विस्ट मुळेच पुस्तकाचे तसे नाव आहे, ह्याची एक वाचक म्हणून मला खात्री वाटते. ( लोकांचे मत वेगळे असू शकते.)
द गर्ल ऑन द ट्रेन मध्ये रेचल ही नायिकेची व्यक्तीरेखा पण खूप सुंदर उतरली आहे. तिला बदलायंच आहे ही जाणिव वाचकांनाही होत असते, पण खर्या आयुष्यात देखील माणसे बदलायला किती अवघड जाते, तसेच पुस्तकातही दाखवले आहे. ह्या पुस्तकाचा शेवट मला आवडला.
ही पुस्तकं बरेचदा खिळवून ठेवतात, त्यामुळे वाचावी अशी आहेत. आणि प्रत्येक वाचक स्त्रीने तर वाचायलाच हवीत.
धन्यवाद जिज्ञासा गॉन गर्ल &/
धन्यवाद जिज्ञासा गॉन गर्ल &/ काइंड वर्थ किलींग वाच. बाकीची नाही वाचली तरी ठीकय.
===
केदार,
पाचही पुस्तकांचा एकमेकांशी एवढाच संबंध आहे की त्यातली चार ही 'नेक्स्ट गॉन गर्ल' म्हणवली गेली.
कजाग शब्दावर सगळेच आक्षेप घेताहेत तर बदलते. कावेबाज करु का? पण या बायका स्वतःहून कुठल्याही चांगल्या व्यक्तीला त्रास देत नाहीत. जो त्यांच्याशी वाईट वागतो त्याचीमात्र काही खैर नाही. याला इंग्रजीत 'व्हिलन हिरोइन' शब्द आहे.
रेचल काय किंवा ज्योडी काय. दोघीही आधी मीक, कोणीही या टपली मारुन जा वाटतात. पण पुढे त्या हीट ब्याक करतातच की.
रेचेलखेरीज अॅना आणि मेगनला काय म्हणाल? त्या आहेत का श्रुड?
खरंतर गऑदट्रे आणि लगअ दोन्ही पुस्तकं, नायिका मला फारसे आवडले नाहीतच. पण त्यांच्या प्रमोशनमुळे त्यांना या यादीत घेतलंय. तसं मी मुळ लेखातच लिहलंदेखील आहे.
ह्या पुस्तकात एक ट्विस्ट आहे, जी पूर्ण पुस्तकभर उलगडलेली नाही. कदाचित लेखिकेला निर्णय वाचकांवर सोडायचा आहे. आणि त्या ट्विस्ट मुळेच पुस्तकाचे तसे नाव आहे, ह्याची एक वाचक म्हणून मला खात्री वाटते. ( लोकांचे मत वेगळे असू शकते.) >> कोणता? स्पॉयलर असेल तर अलर्ट देऊन लिहा.
हा प्रतिसाद पुस्तक न
हा प्रतिसाद पुस्तक न वाचणार्यांनी वाचू नये.
रेचेलखेरीज अॅना आणि मेगनला काय म्हणाल? त्या आहेत का श्रुड? >>
अं नाही. त्या पण नाही. कारण अॅनाने तसे काहीही केले नाही की ती श्रुड कॅटेगिरी मध्ये यावी. ती, फक्त तिच्या सध्याच्या नवर्यासोबत व्यवस्थित जीवन घालवू पाहत आहे, आणि रेचल ही सारखी त्याच्याकडे धाव घेत असते, तिच्याकडून कथा निर्मितीसाठी फक्त एकच घटना घडते, ती म्हणजे, रेचलविरुद्ध ती एकदा तक्रार करते, त्याला श्रुड ऐवजी स्व सरंक्षण म्हणावे लागेल.
मेगन ही नैराष्यात जगणारी आहे, ती पण श्रुड कॅटॅगिरि मध्ये येत नाही. तिने केवळ दुसरीकडे आनंद शोधला आहे. कारण तो आनंद तिला तिच्या नवर्याकडून मिळत नसतो. त्यातही विनाकारण एक माणूस गोवला जातो ...
खरा श्रुड कोण आहे ते पुस्तक वाचल्यवर कळतेच.
पण पुढे त्या हीट ब्याक करतातच की. >> रेचलच्या बाबतीत दॅट इज नॉट प्लान्ड. म्हणून ती श्रुड मध्ये येत नाही. ते तसं आपोआप घडतं. आणि त्यामुळेच अॅना मदत करते.
कोणता? स्पॉयलर असेल तर अलर्ट देऊन लिहा. पूर्ण पोस्टच स्पॉयलर म्हणावी लागेल.
स्पॉयलर अलर्ट
तो पोलिस जेंव्हा इन्व्कॉयरी करताना म्हणतो की, सो यु आर द लकियस्ट गर्ल अलाईव्ह" इथे ट्विस्ट निर्माण झाला आहे. कदाचित ते पूर्ण कांड अॅनी, तिच्यावर झालेल्या गोष्टींचा बदला म्हणून तिच्या मित्रांमार्फत घडवून आणते हा तो ट्विस्ट. कदाचित आहे / कदाचित नाही. हा निर्णय लेखिकेने आपल्यावर सोडला आहे. कारण तो भाग मुद्दामच, व्यवस्थित क्लोज केलेला नाही. त्यामुळेच पोलिस देखील म्हणतो की आय कान्ट बिलिव्ह, आणि मग पुढे सो यु आर द लकियस्ट गर्ल अलाईव्ह. हेन्स द टायटल.
स्पॉयलर अलर्ट संपला
अॅमी, त्यात नवरा बायको
अॅमी, त्यात नवरा बायको एकाच घटनेतील तपशील बदलत दुसर्याला वाईट ठरवत तो किस्सा अनिल कपूरला सांगतात आणि त्याला आपल्या जोडीदाराची सुपारी देतात. कोण खरा कोण खोटा याबाबत अनिल कपूर कन्फ्यूज, आपण कन्फ्यूज. असे होते त्यात.
असो, येस्स मी ईंग्रजी फारसे वाचत नाही. अनुवादीत वाचायला आवडते. तरी आपण सुचवलेले चित्रपट नोंद करून ठेवतो.
ह्या पुस्तकांची अनुवादित
ह्या पुस्तकांची अनुवादित पुस्तकं आहेत का?
ह्या पुस्तकांची अनुवादित
ह्या पुस्तकांची अनुवादित पुस्तकं आहेत का?>> बहुतेक नाही.. कारण हि सगळी बर्यापैकी लेटेस्ट पुस्तकं आहेत.
<गऑदट्रे आणि लगअ वाचू
<गऑदट्रे आणि लगअ वाचू इच्छिणार्यांनी इथून पुढचे वाचू नये>
केदार, अरे अॅनाने एका विवाहीत पुरषाला सिड्युस केलंय की! त्याची बायको अंधारात असताना त्यांच्याच घराजवळच्या क्याफेत ती मुद्दाम त्याला घेऊन जाते. नंतरही आपली हैपी फैमिली ती रेचलच्या तोंडापुढे मुद्दाम नाचवत असते.
मेगनचा भूतकाळ तर भयानक आहे. आणि तीदेखील टू/थ्री टायमिंग करतेय.
गंभीरपणे, खर्या आयुष्याबद्दल बोलायचं तर मला विबासं ब्रेकअप घटस्फोट वगैरे फार मोठे गुन्हे वाटत नाहीत. पण फिक्शनमधे तसं असू शकतं
रेचलच्या बाबतीत हिट ब्याक पुर्णच अनप्लान्ड म्हणता येणार नाही. कुठेतरी काहीतरी झोल आहे हे तिच्या सबकॉन्शसला जाणवलं असणार. त्यामुळेच ती मेगनच्या केसमधे डिटेक्टीवगिरी करायला लागते.
===
बरोबर. त्या पूर्ण कांडात अॅनी तिच्या मित्रांना सामील असायची शक्यता बर्याचजणांना वाटत असते. सायकेट्रीस्ट, पोलीस, कॉलेजमधले इतरजण... पण ते तसं नसतं. आधी तिला स्लटशेमिंग केलं तेव्हादेखील ती विक्टीम होती आणि या कांडातदेखील विक्टीमच आहे.
<अलर्ट संपला>
===
वा थँक्स ऋन्मेष मुसाफिर बघतेच आता. एक्चुली हे सगळे राशोमनचेच अवतार म्हणता येतील.
===
सस्मित, अनुवाद बहुतेक नाहीयत.
हे पोस्ट फक्त अँमी आणि पुस्तक
हे पोस्ट फक्त अँमी आणि पुस्तक वाचलेल्यांसाठी
विवाहित पुरूषाला सिड्युस करणे श्रुड असते का? खरे तर टॉम हा तीन स्त्रीयांबरोबर आहे, मग कोण कोणाला सिड्युस करत आहे?
मेगनच्या भूतकाळा अनाहुत घटना घडल्या. त्या तिने मुद्दामहून केल्या तर त्याला श्रुड म्हणता येईल पण तसे नाही. त्याला नशेत दुर्लक्ष ( बिईंग हाय) असेच म्हणता येईल.
द गर्ल ऑन द ट्रेन मध्ये कुठलेही स्त्री पात्र श्रुड नाही असे मला वाटते. तिघी जणी परिस्थितीचा बळी आहेत. आपली हॅपी फॅमिली रेचल समोर नाचवण्यापेक्षा, रेचल ही घटस्फोटानंतरही त्यांच्या आयुष्यात यायला बघत असते, म्हणून जी काळजी तिला वाटते, त्यातून तिचा द्वेष दाखविला आहे.
कुठेतरी काहीतरी झोल आहे हे तिच्या सबकॉन्शसला जाणवलं असणार. त्यामुळेच ती मेगनच्या केसमधे डिटेक्टीवगिरी करायला लागते. >>
नाही. अॅच्क्युअली, यु मिस्ड द की पाँईट मग . आपले " विवाहित जीवन" त्या मेगन अन तिच्या नवर्यासारखे अस्तित्वात असावे असे डे ड्रीमिंग ती करत असते. शिवाय ती अल्कोहिलिक. त्यामुळे तिला काही आठवत नसते, आठवतात त्या तुटक तुटक घटना, त्या घटनांची सांगड लावताना तिची दमछाक होते. आणि हा प्रवास घडतो. त्यातूनच मग मेगनच्या नवर्याला भेटने वगैरे वगैरे आणि मग त्या माणसामुळे अचानक तिला सगळे रहस्य उलगडते. त्यामुळे रेचल हे दिशाहिन, इमोशनल, अल्कोहोलीक, मुल न झालेली वांझ अन परिस्थितीमुळे गांजलेले पात्र आहे. तर अॅना ही आपल्या फॅमिली मध्ये रेचल लुडबुड करते आहे म्हणून कावलेली दाखवली आहे, तर मेगन ही नैराष्यात असलेली, पण जीवनात आनंद घेऊ इच्छिणारी दाखवलेली आहे.
म्हणून त्या तिघीही श्रुड नाहीत असे मी लिहिले.
(डोन्ट वरी लोको, तुम्ही वाचले तरी मी रहस्यभेद केलेला नाही, करणार नाही )
अॅमी, ह्या निमित्ताने ह्या पुस्तकांवर बोलायला मिळाले.
केदार, पोस्ट आवडली
केदार, पोस्ट आवडली
<गऑदट्रे वाचू इच्छिणार्यांनी
<गऑदट्रे वाचू इच्छिणार्यांनी इथून पुढचे वाचू नये>
विवाहित पुरुष/स्त्रिला सिड्युस करणे श्रुड असू शकते. पण माझ्या मते तो फार मोठा गुन्हा नाही.
टॉम हा तीन स्त्रियांबरोबर आहे आणि मेगनदेखील तीन पुरुषांबरोबर आहे. जर टॉम दोषी असेल तर मेगनपण दोषीच.
जर मेगनला भूतकाळातील घटनांबद्दल दोष द्यायचा नसेल, त्या भूतकाळाच्या ओझ्याने ती वर्तमानकाळात वाईट वागते असा बेनिफीट ऑफ डाऊट द्यायचा असेल तर मग टॉमचादेखील काहीतरी भूतकाळ असू शकतो. त्याला कदाचीत चाइल्ड अब्युज फेस करावा लागला असेल म्हणून तो आता असा वागतोय.
अॅनाला रेचल आपले आनंदी कुटुंब स्पॉइल करते वाटल्याने ती तिला हिडीसफिडीस करतेय तर टॉमलादेखील वाटतं की मेगन आपल्याला ब्लेकमेल करुन आपले आनंदी कुटुंब स्पॉइल करतेय. अॅना पोलिसात तक्रार करते तर टॉम स्वतःच खून करतो (हा खरा गुन्हा आहे). आणि मेगनने नशेत केलेलादेखील गुन्हाच आहे (आठवा सलमानचे गाडी फुटपाथवर घालणे) आणि तो तिने जागेपणी दाबून टाकलाय.
अविवाहीत अॅनाने विवाहीत टॉमला सिड्युस केले, विवाहीत मेगनने विवाहीत टॉमला आणि अविवाहीत अलमला सिड्युस केले, वि टॉमने अवि अॅनाला आणि वि मेगनला सिड्युस केले... बेसिकली टाळी एकाच हाताने वाजत नाही अफेअर करण्यासाठी दोन लोक लागतात. दोघे तितकेच दोषी/निर्दोष.
https://www.amazon.com/Girl-Train-Paula-Hawkins/product-reviews/1594633665 इथले ऋण रिव्यु वाच.
हम्म. रेचलबद्दल की पाँईट मिस केलाही असेन मी. किंवा त्या अमेझॉन रिव्युत एकाने लिहलंय तसं लेखिकेनेच ते पात्र गंडवले असेल.
<अलर्ट संपला>
===
अॅमी, ह्या निमित्ताने ह्या पुस्तकांवर बोलायला मिळाले. >> हां हे बाकी खरंय. धागा मूळ विषयावर आणण्याचं श्रेय तुलाच. धन्यवाद
आवडला परिचय. यातले एकही
आवडला परिचय. यातले एकही वाचलेले नाही. तो पिक्चरही याच पुस्तकावर असावा (गॉन गर्ल). तो ही अजून पाहिलेला नाही. आता कुतूहल आहे.
गॉन गर्ल-एमीइतकीच कावकि-लिली
गॉन गर्ल-एमीइतकीच कावकि-लिली मला आवडली. गर्ल ऑन द ट्रेनपेक्षा या पुस्तकाला जास्त प्रसिद्धी मिळायला हवी होती. फार जबरदस्त पुस्तक आहे. >> +१ प्रसिद्धी अधिक मिळायला हवी होती का हे सांगणे कठीण आहे पण जबरदस्त पुस्तक आहे ह्याला अनुमोदन.
फारेण्ड, आभार :) हो तो
फारेण्ड, आभार हो तो चित्रपट याच पुस्तकावर बेतलेला आहे. स्क्रिनप्ले जिलीयन फ्लिनचाच होता. मला वाटतं त्यासाठी तिला ऑस्कर नामांकनदेखील मिळालेलं.
===
असामी, क्या बात है! कावकि वाचलेला आणि आवडलेला एकजणतरी भेटला धन्यवाद.
पुस्तकांची ओळख आवडली.
पुस्तकांची ओळख आवडली.
गॉन गर्ल - सिनेमा पाहिला आहे. पुस्तक वाचायचंच आहे मला. 'गर्ल ऑन द ट्रेन' पुस्तकाचंही गेल्या वर्षी लोकसत्ता-बुकमार्कमध्ये कौतुक आलं होतं. आता 'द काइंड वर्थ किलींग' हे पण यादीत अॅड झालं.
गॉन गर्ल सिनेमात एमीच्या नरेशनला वापरलेला आवाज इतका गूढ, खर्जातला आहे, की त्या आवाजानेच तिची अर्धी-अधिक व्यक्तीरेखा आपल्यासमोर उभी राहते. सिनेमाचं नाव आठवलं की आजही तो आवाज माझ्या कानांमध्ये घुमतो. आणि हे सगळं घरी टी.व्ही.वर सिनेमा पाहूनही! थेट्रात पाहिला तर फारच परिणामकारक होईल!
प्रतिसाद देणार्या सर्वांचे
प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार _/\_
काही लिंका रेकमेंड करतेय. गॉन गर्ल पुस्तक वाचू इच्छिणारे अथवा चित्रपट पाहु इच्छिणारे यांनी त्या लिंका वाचू नयेत.
http://www.newyorker.com/culture/cultural-comment/marriage-abduction
http://www.theguardian.com/books/2013/may/01/gillian-flynn-bestseller-go...
http://gillain-flynn.com/for-readers
http://www.newyorker.com/books/joshua-rothman/gone-girl-really
http://thebooksmugglers.com/2013/02/joint-review-gone-girl-by-gillian-fl...
जिलीयन फ्लिनचे पहिले पुस्तक
जिलीयन फ्लिनचे पहिले पुस्तक 'शार्प ऑब्जेक्टस्'वरून बनलेली मालिका HBOवर चालू झाली आहे 8 जुलैपासून.
कोणी बघतेय का? कशी आहे?
हि एक मुलाखत
https://www.goodreads.com/blog/show/1305-inside-gillian-flynn-s-dark-and...
द गर्ल ऑन द ट्रेन हा
द गर्ल ऑन द ट्रेन हा चित्रपटही आला आहे ह्याच पुस्तकावरून...
<स्पॉयलर अलर्ट - ज्यांनी चित्रपट पाहिला नाही किंवा पुस्तक वाचले नाही त्यांनी पुढची लिंक पाहू नये>
https://en.wikipedia.org/wiki/The_Girl_on_the_Train_(2016_film)
Pages