पोलीसांवरील हल्ले

Submitted by संजयb on 12 December, 2016 - 04:41

पोलीसांवर हल्ले का होतात हा प्रश्न सध्या पोलीसांसह सगळ्यांनाच सतावतो आहे.
ज्यांनी जनतेच रक्षण करायचे तेय असुरक्षीत का झाले आहेत याचे ऊत्तर शोधावेच लागेल.
पोलीसांची भुमीका तशी विचीत्रच आहे. या जगात सध्या पटकन निर्ण व लगेच परिणाम
अशा पद्धती सराकारात वखाजगी क्षेत्रात रूढ होत असताना पोलीसांना मात्र न्यायलयाच्या
काहीश्या गूढ व बरचश्या वेळकाढू यंत्रणेवर परिणाम मिळण्या साठी अलवलंबून राहावे लागते.
त्या मूळे पोलीस कामच करत नाहीत,पोलीसांनी केलेल्या तपासातून काही निष्पंन्न होत नाही
ही भावना जनतेत वाढीस लागली आहे.ज्यांचा काही ऊपयोगच दिसून येत नाही त्यांच्या बाबत
काय आदर राहाणार. फीतूर होणारे साक्षीदार व तपासाचा निकृष्ट दर्जा याने देखील पोलीसांची प्रतीमा
डागाळली आहे.भ्रष्टाचाराचे भूत देखील पोलीसांच्या मानगुटी वरून ऊतरायला तयार नाही.
या समस्येवर ऊपाय मात्र पोलीसांचेया हातीच आहेत.पोलीसांना आपले वागणे,विचार अधिकाधीक व्यावसाईक व शिस्तबद्ध करावे लागतील.त्यांना आपले जनतेशी असलेले वागणे सुधारावे लागेल. सैजन्यशीलता अंगी बाणवून जनतेचा विश्वास आपूलकी जिंकावी लागेल.त्या नंतरच पोलीसांना
खरे व्यावसाईक यश मिळू लागेल व त्यातून त्यांची प्रतीमा सुधारण्यास मदत होईल.सैजन्याने वागणे म्हणजे कोणाला घाबरून वागणे नव्हे.आपले कर्तव्य चोख पार पाडणाऱ्यास कोणा समोर कमीपणा घेण्याची गरजच नसते.पण म्हणून कोणाचे ऋणच मानायचे नाहीत अशी अरेरावी काय कामाची! या ऊलट ज्यांची कायद्याच्या कक्षेत राहून सेवा करायची आहे त्यांना प्रसंगानरूप मानाने वागवणे हे पोलासांन जमलेच पाहिजे. अशी वागणूक कोणा अका पोलीसाचे स्वभावाचे वैशीष्ट्य म्हणून सेडून न देता सैजन्य हे पोलीस लिस्टमचा एक अविभाज्य भाग बनून राहीले पाहिजे. यातून अनेक गोष्टी सहज साध्य हेतील . एक तर लोकांना पोलीस आपले वाटू लागल्या मूळे पोलीसांना तपासात व कायदा व सुव्य्वस्था राखण्यात जनतेचे सहकार्य
मिळेल.अशा सहकार्याचे थेट रुपांतर न्यायालयात पोलीस तपास जनतेतील साक्षीदारा कडून ऊचलून घरला जाईल व पोलीसांचे ऊपयोगीतता जनतेला पटेल.पोलीसांचे म्हणणे जनते कडून अधिक गाभिर्याने एकले जावू लागेल. संघर्शाचे प्रसंग कमी होतील.
पण सैजन्यपूर्ण वागणूक केवळ स्वभाव वैशिष्ट्य म्हणून सोडून देता येणार नाही. तो सिस्टमचा भाग व्हावा या करीता पोलीसांना प्रशिक्षणातच सैजन्य व सहकार्यने वागण्याची सवय लालावी लागेल.त्यकरीता पोलीस दलात नव्याने रुजू झालेल्या व्यक्तींना जाणीव पूर्वक प्रशीक्षण दिले पाहिजे.
पोलीसांनी केवळ ताकदवान व्यक्तीनां मान देतात व गरीब जनतेला हडूत तूडूत करतात हे चित्र बदलले पाहिजे.सैजन्यपूर्ण वागणूकीत कोणाची हजीहजी करणे अभिप्रेत नाही. सैजन्य हे प्रसंगावरूप व्यक्त झाले पाहिजे.
केवळ सैजन्याने पोलीसांचे काम संपणार नाही. सौजन्या सोबतच ऊच्च कोटीची व्यवसाईक वृत्ती
पोलीसांना अंगी बाणवावी लागेल. पोलीसांना आपल्या व्यावसायाचे ऊतकृष्ट प्रशीक्षण दिले गेले पाहिजे.
त्यांच्या कामात पोलीस वाकबगार असलेच पाहिजेत. त्या साठी पोलीस व्यावसाया संबधी संशोधन होण्याती गरज आहे. अशा संशोधनातून पोलीसांना त्याच्या कामात ऊपयोगी पडणाऱ्या कैशल्ये व प्रक्रिया शोधून त्या बाबतचे प्रशीक्षण पोलीसांना दिले पाहिजे. पोलीसांची कर्तव्याचे वर्गीकरण करून ती कर्यव्ये पार पाडणारे तज्ञ पोलीसांतून निर्माण केले पाहिजेत.त्या मूळे पोलीसांच्या कामाचे विभाजन होवून ईफिशीयन्सी व अचूकता हे गूण कोणा एका पोलीसाचे व्यवसाईक धन न राहाता ते पोलीस व्यवस्थेचा भाग बनतील.
पोलीसंाची वागणूक जशी सैजन्यपूर्ण असणे आवशक आहे तसेच पोलीसांचे सर्व निर्णय हे पारदर्शक व सचोटीने घेतलेले असले पाहिजे. निर्णय प्रक्रियेत सातत्य असायला हवे.प्रत्येक निर्णय व पोलीसंची प्रत्येक क्रिया कायदा व तर्काच्या बाजूचेच असले पाहिजेत.यातून पोलीसां बद्दलचा आदर वाढीस लागेल.
पोलीसांवर कोण्याही फूटकळ योजनांचे आझे लादू नये.एकादी योजनना व्यपक जनहितार्थ पेलीस यंत्रणे मार्फत रबण्याचे ठरल्यास त्य करीता काय कैशल्ये आवशक आहेत काय प्रशीक्षण द्यावे लागेल याचा विचार व्हायलाच हवा.अशा योजनां एकूणच पोलीस व्यवस्थेत कोणत्या स्थानी राहाणार , अशा योजनां राबण्या करीता मनूश्यबळ कोठून ऊपलब्ध होणार याचा बारकाईने विचार व्हायला हवा.त्या नंतरच अशा योजना रबवल्या जाव्यात. पोलीस जरी जनसेवक असले तरी पर्स्थापीत कायदा य नियम यांनी बाधलेले आहेत याची जाणीव स्वत: पोलीसांनी व जनतेने ठवणे आवशक आहे.
पोलीस जनतेला काही प्रमाणात का होईना पण त्वरीत परिणाम देवू शकतील असे तरतूदी कायद्यात व नियमात करण्यात याव्यात.जसे चोरा कडून परत मिळवलेल्या वस्तू मुळ मालकास थेट परत करणे, पोलीसांनी अकाद्य भांडणात यशस्वी मध्यस्ती करून भांडण मिटवले असल्यास त्याला कायदेशीर मान्यता देणे वगैरे. त्यानूळे लोकांना पोलीस यंत्रणे कडून थेट मदत होईल व लोकांना समस्यांवर त्वरीत समाधान मिळेल-
पोलीस सध्या न्यायदान प्रक्रियेचा भाग न वाटता त्यांची कसोटीच कोर्ट घेत अहेत असे वाटत राहाते. कोर्टांनी देखील पोलीसांची बाजू जरी नाही तर साहनभूती बाळगली पाहिजे.पोलीस कारवाईतील पंचांचे महत्व कमी करून पोलीसांच्या म्हणण्याला व मताला किॅमत दिली पाहिजे. याकरीता कायद्यात्या कक्षा रूंद करणे आवशक असेल तर ते देखील करण्यात यावे. तपासात पोलीसांना येणाऱ्या समस्या व अडचणी यांचा एकदा
खराखूरा अभ्यास झाला पाहिजे व त्यावर ऊपाय शोधण्यात यावेत.मेडीकल रिपोर्ट,फोरेन्सीक रिपोर्ट मिळण्यात होणारा विलंब नष्ट करण्या साठी त्या यंत्रणांचे कामकाजाच्या पद्धती व परंपरा यांत बदल करणे आवशक आहे.
काही बदनाम विषय पोलीसांचा पिच्छा पूरवून आहेत. अगदी त्या विषयां करीता स्वतंत्र खाती असून देखील! दारूबंदी,जूगारबंदी वाहातूक व्यवस्था ईत्यदी स्वतंत्र व व्यापक रूप प्रप्त झालेल्या समस्या पोलीसांच्या कर्तव्ययादीतून वगळून पोलीसांना त्याची मूळ कर्तव्ये जसे अपराधाचे अन्वेशण करणे कायदा व सुव्यवस्था राखणे या वर लक्ष केंद्रीत करायला पूर्ण सुविधा दिली पाहिजे.बरेचदा दंगलखेर व अराजकता माजवणाऱ्या जमावाचे नेतृत्व विवीध थराचे लोकप्रतिनीधी करत असतात.अशा आक्रस्तळ्या लोकप्रतिनीधींवर लगाम बसवण्या करीता त्याना देखील निलंबीत करण्याचे प्रवधान कायद्यात असले पाहिजे.
चित्रपट वगैरे सारख्या माध्यमांना वास्तव दर्शवण्याच्या नावा खाली एकादी काल्पनीक कथा रचून पोलीसांची प्रतीमा मलीन करता येणार नाही अशी बंघने घालयला हवीत ईतपत परिस्तीती निर्माण झाली आहे.पोलीसांची गैरवर्तणूक दाखवून वास्तव मांडण्यास कोणतेही बंधन असू नये पण पोलीसांचे थिल्लर चित्रीकरणास अजीबात वाव देवू नये.पोलीस हे आपल्या देशातील व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहेत व त्यांचे यशापयश ही गंभीरतेने धेतली गेली पाहिजेत एव्हढा संदेश तर समाजात जायलाच हवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users