डायरी

Submitted by हेमांगी on 24 October, 2007 - 22:48

diary1.jpg'अथ समाप्ती' म्हणत
डायरीचं पान उलटलं तरी
मुद्दाम केलेले उल्लेख,
आणि अनुल्लेखही
बेगुमानपणे थडकू लागले
न भरलेल्या पुढील पानांवरही...

ठसका लागून श्वास अडकावा
तशी पावलोपावली
अडखळू लागली लेखणी...

जीवघेण्या बंधांना
दुराग्रहाचे भयच नसते..
उंच उसळतात अशा लाटा
जणू किनार्‍याची सवय नसते..

म्हणून मग
स्वतःला समजावलं
आणि उलटलेलं पान सुलट करून
कोरीव अक्षरांत लिहिलं
" क्रमशः "

-हेम्स

विशेषांक लेखन: