Submitted by हेमांगी on 24 October, 2007 - 22:39
भरून यावे माथ्यावरती
थबकलेले जलद थोडे
नयनातील अश्रूत सुटावे
गहन घनाचे अवघड कोडे
बहरातल्या फुलांची छाया
पानगळीवर व्हावी नक्षी
टपटपत्या फुलांत मिळाव्या
बरसण्याच्या अक्षय साक्षी
हलकासा तरंग तरी
भरून यावे, भारून जावे
अंगावरल्या रोमांचांनी
कवितेला कवेत घ्यावे!
-हेम्स
विशेषांक लेखन:
शेअर करा