६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.

पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.

मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.

मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.

त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.

एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..

असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!

** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भलेही एक रोटी खाऊन राहु, पण दिल्ली जिंकुच. Uhoh आँ!!!

आता तर सरकारी खर्च् कमी करुन मंत्र्यांचे पगार बंद करायची वेळ आली. तरी पण हम नही सुधरेंगे. सडेतोड बोलुन आईना दाखवल्याबद्दल जावेद अख्तर यांचे अभिनंदन. असाच पराक्रम फिरोज खान याने केला होता. इम्रान खानने त्याच्या निवडक भारतीय मित्रांना ( फिरोज, विनोद खन्ना व रेखा ) पाकीस्तानात पार्टी दिली. त्यात फिरोज बरेच काही बोलला, आमच्या भारतात असे, तुमच्या इथे काय वगैरे. तिथले मौलाना खूप संतापले आणी मग पाकी सरकारने फिरोझ खानवर पाकीस्तानात येण्यावर बंदी घातली.

वास्तवीक पाकीस्तानचा ( अफगणिस्तानला लागुन असलेला ) स्वात हा प्रांत कश्मीर सारखा अप्रतीम आहे. पण या मुर्खांना पर्यटनात काही रसच नाही. बासमती तांदळापासुन बरेच काही पिकवु शकणारा, खाण्या पिण्यात , बोलण्यात, कपडे वगैरेत आपलीच संस्कृती असणारा पाक दहशतवादाने पोखरला गेलाय. सत्ताधारी कधीच सुधारणर नाहीत. पण पाकचे तुकडे होणार हे निश्चीत. २० वर्षापूर्वी युरोप टुरवर असतांना एअरपोर्टवर भेटलेले २ पाकीस्तानी घरच्या काळजीने जाम चिंताग्रस्त होते. आता ते कुठे असतील माहीत नाही. कारण आई वडलांना आम्ही युएस मध्ये नेणारच, भलेही त्यांना तिकडे चांगले वाटो न वाटो अशी त्यांनी चिंता व्यक्त केली होती. ह्या दोघांना अमेरीकेचे नागरीकत्व मिळाले होते. पण कायम जगभर फिरती वर असायचे. सध्या बलोच आणी बाकी प्रांतात जे चालले आहे ते बघुन विचीत्र वाटतेय.

पण पाकीस्तानातील ह्या अराजकतेचा भारतावर फार परीणाम होईल. कारण खायला काही नाही अन झैद सारखे लोक पैशाचे अमिष दाखवुन परत तिथल्या तरुणांना दहशतवादाकडे ढकलणार.

शबाना पेक्षा जावेद अख्तर ज्ञानी सुसंस्कृत वाटतात, जसे जया पेक्षा अमिताभ बच्चन.
फिरोजखान बद्दल पण आदर वाढला .

हो. आम्हांला सुद्धा मोदी पेक्षा नड्डा आणि जसोदाबेन सुसंस्कृत वाटतात.
आणि हेमा म्हणजे आयेशा बी पेक्षा धर्मपाजी म्हणजे दिलावर खान. धर्म बदलून दुसरं लग्न केलं तेवढं सोडा.

पण तुम्ही लोकांना सुसंस्कृतपणाचं सर्टिफिकेट देताय ? हा या महिन्याचा विनोद झाला.

At least 131 essential medicines out of stock in Pakistan due to price-row with govt

Atleast Four pharma MNCs have already left Pakistan, while 40 local pharma companies have formally told that they're heading for a shutdown due to the unaffordable cost of production- DW News >>

भिका मागतील , दुबई द्वारे भारताची औषधे मागवतील पण भारता बरोबर सुरळीत संबंध निर्माण करणार नाहीत.

दुसरी गोष्ट आश्चर्य आहे की त्यांच्याकडे मेडिकल सिस्टीम होती ?
मला वाटले शरीयत नुसार रस्त्यावर तंबू ठोकून जडीबुटी विकली जात असेल .
कदाचित पाच ऐवजी दहा वीस वेळा नमाज पढल्यावर ती शोर्टेज औषधे मागवयची गरज देखील पडणार नाही .

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत भारतात लोक उपचारांना किंवा उपचार मिळूनही मरत होते, ऑक्सिजन साठी तडफडत होते तेव्हा पाकिस्तानी लोक भारतीयांसाठी प्रार्थना करत होते, काळजी दाखवत होते.
याला सुसंस्कृतपणा म्हणतात.

जावेद अख्तर वरून शबानाला, मग जयाला ओढणं हे जिथला विषय तिथेच ठेवणं. मोदी आल्यावर मिरच्या झोंबल्या. : D
.

हजार वेळा मोदी बद्दल बोला की आम्हाला काही फरक पडत नाही !
फक्त जरा सोनिया बद्दल वाचायलाही दिलदारपणा ठेवा Happy

आणि पाकिस्तानच्या पोर्किजचा सुसंस्कृतपणा बद्दल तुम्ही सांगताय ? जरा मेंदूचा एम आर आय काढून घ्या !
तेथील हिंदूचे चाललेले हाल तुम्हाला दिसत नाही की , त्यात तुमची विकृती शमते ?
हिंदूंच्या लहान मुली पळवून नेवून जबरदस्तीने थेरड्या बोकड दाढी वाल्या बरोबर निकाह लावणे कोणत्या सुसंस्कृतपणात मोडते ?
वकिली कोणाची करायची ? कोणत्या विषयावर याचे भान देखील तुम्हा लोकांना नसते का ?
तेथील हिंदूची संख्या २०% वरून १% वर आली आहे ,कशामुळे झाले असेल ?
तुमच्या सुपीक डोक्यातील ज्ञान जरा सांगा ना ?
आता पळून जावू नका!

https://twitter.com/pakistan_untold/status/1630528239344160771?s=19>>>>>
पाकिस्तान मधील हा सामान्य नागरिक म्हणतोय हाफीज सईद निर्दोष आहे , त्याने जे काही केलं ते इस्लाम साठी केले !
याचा अर्थ असा होतो की कसाब गँग भारतात दोन्ही धर्मातील दरी मिटवायला आले होते आणि आपल्या पोलिसांनी विनाकारण त्यांना गोळ्या घातल्या !
पण इस्लाम धर्म यांना रोट्या का देत नाही ? यांचे नेते जगाकडे भीक का मागत असतात हा ही प्रश्न शिल्लक राहतो

त्यांचं परकीय चलन साठा वाढत आहे.
कोणाला कमी समजण्यात काही अर्थ नाही.
आपल्याकडे पण काही सर्व सुरळीत नाही.
देशातील मोजकीच राज्य,आणि मोजकीच शहर सोडली तर भारताची अवस्था पण अत्यंत गंभीर आहे.
अती प्रचंड गरिबी पण भारतात खूप आहे.

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत भारतात लोक उपचारांना किंवा उपचार मिळूनही मरत होते, ऑक्सिजन साठी तडफडत होते तेव्हा पाकिस्तानी लोक भारतीयांसाठी प्रार्थना करत होते, काळजी दाखवत होते.>>> तरिच भारतिय वाचले.

काही वाचले नाहीत लाखो भारतीय मेले आहेत.
गंगा नदीत हजारो प्रेते वाहत होती.
सत्य कधी तरी मान्य करा
उद्धव जी मुख्य मंत्री होते त्या मुळे लोकांस योग्य उपचार फुकट मिळत होते महाराष्ट्र मध्ये.
ज्यांना मोदी चे कौतुक आहे ते सर्व उद्धव जी नी दिलेल्या सुविधा मुळे हयात आहेत.
ते जर यूपी मध्ये असते तर गंगा मध्ये समर्पित झाले असते

हे मात्र मान्य करावेच लागेल !
उध्दवजीनी कोट्यवधी महाराष्ट्रियन कोविड लाटे तून वाचवले , तेही घराबाहेर न पडता !
आहे की नाही स्मार्ट वर्क फ्रॉम होम ?
पण हे भाजपे डबल ढोलकीवाले त्यांना घरकोंबडा म्हणतात ........

त्यांचं परकीय चलन साठा वाढत आहे.
कोणाला कमी समजण्यात काही अर्थ
>>>>>>>>
त्यांचा परकीय चलन साठा वाढत आहे ?
काही आकडेवारी आहे का ?
गेल्या तीन चार महिन्यातील असेल तरी चालेल ...

जाऊ द्या की ते पाकिस्तान बिकीस्तान. इथे कांदा एक रुपया दरानेसुद्धा विकला जात नाहीय. कापसाचा भाव प्रचंड गडगडलाय आणि जखमेवर मीठ म्हणून कापसाची आयात सुरू होत आहे! शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे वाढतच आहेत...
पाकिस्तानाचे दिवाळे निघण्यात आमच्या सामान्य माणसाला नेमका काय फायदा?

अंध ते अंध च आहेत..कांदा निर्यात मोदी नी पुढाकार घेवून केली असती तर ...हिंदू कांदा उत्पादक लोकांना चांगला भाव मिळाला असता.
पण bjp ल Hindu शी काही देणेघेणे नाही.
फक्त गाव वाले मोदी न चे ह्यांचे हित होणे हेच त्यांचे ध्येय.
पाकिस्तान वाईट स्थिति मध्ये जाण्याने भारतीय हिंदू ना एक रुपयाचा फायदा नाही.
अंध भक्त स्वतःची बुध्दी वापरतील तो सू दीन

ते म्हणतात सुक्की रोटी खायेंगे लेकीन काश्मीर लेकेही रहेंगे !
मग घरात उंदीर झाले म्हणून साप कोणी पाळतो का ?
पण शेतकऱ्यांच्या प्रश्न बद्दल वाईट वाटतं !
शहरी ढोंगी विचारवंत रस्त्यावरील अपघाताकडे ज्या नजरेनी बघतो त्याच नजरेनी शेतकरी प्रश्नाकडे बघतो हे नक्की .
त्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून फक्त भाजप वर तोंड सुख घेण्यात मजा येत असते .
पण भारतातील शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न आज्ज पर्यंत सुटलेला नाही हे निश्चित.
कालच अर्बन विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे उत्पादन कमी असल्यामुळे भाजप ने साखर निर्यात ची परवानगी ( ४ हजार रु क्विंटल) दिली असती तर कारखान्यांना फायदा झाला असता असे म्हटले .
या अर्बन विचारवंतांचे ऐकून परवानगी दिली आणि इथे सामान्य नागरिकाला दुकानदारांनी लुटला की पुन्हा मोदींच्या नावाने खडे फोडायला मंद गुलाम तयार !
कमी उत्पादन झाले तरी , अतिरिक्त उत्पादन झाले तरी , दुष्काळ किँवा पूर आला तरी शेतकरी आत्महत्या करतो .
आपली शेती हा एक उद्योग समजून त्याचे व्यवस्थापन आज पर्यंत कोणत्याही सरकार ने केलेले नाही म्हणून त्याची फळे म्हणजे शेतकरी आत्महत्या करत आहे ....

सुक्की रोटी खायेंगे लेकीन काश्मीर लेकेही रहेंगे >> हे आपले लोक म्हणतात ना .. की वाताहत झाली तरी मत मोदींनाच देणार का असं काही तरी. आपला मास्तरस्ट्रोक चोरला की या पाकड्यांनी!

हिंदूंच्या लहान मुली पळवून नेवून जबरदस्तीने थेरड्या बोकड दाढी वाल्या बरोबर निकाह लावणे कोणत्या सुसंस्कृतपणात मोडते
>>>>>>>>>>>>>
१००% सहमत
अगदी सो कॉल्ड न्यायव्यवस्था त्या १४/१५ वर्षांच्या कोवळ्या, आक्रोश करणाऱ्या मुलींना पालकांकडे ना सोपविता त्यांच्या किडनॅपर्सकडे सोपवते आणि वन ऑफ केस नाहीये. सर्रास होते आहे हे तिकडे. समाजाचा पाठिंबा असल्याशिवाय ?
काय सुसंस्कृतपणाच्या गोष्टी करता तुम्ही?
पाकिस्तानी लोकांशी प्रत्यक्ष बोलले आहे भारताबाहेर. इंडिविज्युअली चांगले असतील ही पण जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा ते हिंदूविषयी कट्टर असतात. कधी तरी हुसैनीवाला बॉर्डर वर जाऊन 'पाकिस्तान का मतलब क्या' घोषणा ऐकून या.

आणि म्हणे आम्हांला अखंड भारत पाहिजे!
की आता बदलली मागणी ?-- आता आम्हांला पाकिस्तानची फक्त जमीन आणि तिथले चाळीस लाख हिंदूच पाहिजेत?

अखंड हिंदुस्तान ची मागणी करणारे मूर्ख आहेत , ते कधीच पाकिस्तान मधील हिंदू आणि ख्रिश्चन च्या नरसंहार बद्दल बोलत नाही.
वर माझे मन नी सांगितले त्या बद्दल एका केस चा व्हिडिओ पूर्वी पहिला होता .
तेथील कोर्टाने पळवून नेलेल्या लहान हिंदू मुलीला तिच्या म्हाताऱ्या मुस्लिम नवऱ्याच्या हवाली करण्याचा निर्णय दिला होता .
त्या वेळी कोर्टाच्या बाहेर मुलीची आई रडून बेशुद्ध झाली होती.
पाकडे निव्वळ जंगली आणि त्यांचे कोर्ट कायदेही जंगली !
कोवळ्या मुलीला थेरड्या च्या हवाली करण्याचा निर्णय जगातील इतर कोणताही देश देवू शकतो का ?
त्या बधीर लोकांना यात वावग असल्याची कल्पना ही येत नाही , त्यांच्या पुस्तकातील आदेशा प्रमाणे फक्त इतर धर्मियांना उध्वस्त करण्याचे काम पाकिस्तान मध्ये जोरात चालू आहे हे निश्चित .
भारतातील बऱ्याच लिब्रांडू ना पाकडे हिंदू आणि ख्रिश्चन वर करत असलेल्या अन्याय बद्दल काहीच वाटत नाही , हे मोठ्ठे आश्चर्य आहे .....

ही भारतातील केस आहे. सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू होती.
the Supreme Court bench headed by the CJI asked a man if he was willing to marry the girl he sexually abused for years.

आता यावरून पाकिस्तानात जे झालं त्याचं मी समर्थन केलं असा विकृत निष्कर्ष काढला जाईल. वरची केस वाचून ही आपल्याकडची केस आठवली एवढंच.

असला निर्णय देणारे कोर्ट षंढच असणार !
भविष्यात असल्या केसेस वाढल्या तर कोर्ट जबाबदारी घेईल का ?
आरोपी त्या पवित्र पॉर्न पुस्तकाचे आदेश पाळणाऱ्या
मानसिक अजारग्रस्त धर्माचा होता का ?

बरोबर. तुम्हांला त्यातच रस असणार. Lol

न्यायाधीश कोणतं पुस्तक वाचून हे विचारत होते? बातमी उघडून त्यांचं नाव वाचलं की नाही?

ही अलाहाबादची केस

ही तमिळनाडूतली

तिन्ही प्रकरणांत मुली मायनर होत्या.

याबाबतीत तरी पाकिस्तानी आणि भारतीय एकमेकांना 'तुम बिलकुल हम जैसे निकले' असं म्हणू शकतील.

आपल्याकडे स्त्रीचा रेप करून तिच्या कुटुंबियांना ठार करणार्‍यांना लवकर सोडले जातेच, वर सत्कारही होतो. समाजाचा पाठिंबा असल्याशिवाय ?
पाकिस्तानात एक देऊळ मॉब ने पाडले तर मॉब वर कारवाई झाली, देऊळही सरकारे खर्चाने बांधून दिले.
पाकिस्तानात हिंदु होळीही साजरी करतात.
https://www.dawn.com/news/1740810/celebration-of-spring-reflected-in-the...

पाकिस्तानात सारे आलबेल आहे असे नाही, तिथेही इशनिंदेवरून हत्या होतात, खुन्यांच्या मयताला गर्दी होते ई ई आहेच. पण प्रत्येक बाबतीत पाकिस्तान चा आदर्श का ठेवायचा ? हे obsession बरे नव्हे !

मागे सर्जिकल स्ट्राईक च्या वेळी ३०० अतिरेकी मेले असणे अशक्य आहे असे मी नम्रपणे नमूद केले तर सालाबादाप्रमाणे मला पाकिस्तानात निघून जाण्याचे सल्ले मिळाले. नंतर आपण F16 पाडलेले नाही असे नम्रपणे नमूद केले तर पुन्हा तीच रडारड.

आणि म्हणे आम्हांला अखंड भारत पाहिजे!

नको रे बाबा अखंड भारत.आताच फक्त पाच सहा राज्य वर च देशाचं पूर्ण बोजा आहे.
अजून हे पाकिस्तान,अफगाणिस्तान भारतात आले तर हालत खराब होईल .
पश्चिम आणि दक्षिण भारताची

पुरोगामी जे धार्मिक अत्याचार सांगत आहे.
भारतात रोज असंख्य अत्याचार स्व धर्मीय आणि स्व जातीय लोकांकडून होतात.
मुस्लिम हिंदू वर अत्याचार करत आहेत ह्याचा प्रचार करणे हे ह्यांचे टारगेट आहे.
तेव्हाच पैसे मिळतात..भारतात रोज लाखो लोकांवर अत्याचार होतात आणि अत्याचार करणारे मुस्लिम नसतात.
कारण पोलिस यंत्रणा सक्षम नाही.
लायकी नसणारे पोलिस मध्ये आहेत.
सरकार लायक नाहीत कारण सर्व चोर लोक लोकांचे प्रतिनिधी आहेत.
न्यायालय विषयी न बोलणेच उत्तम.
बापाच्या काळातील केस चा निकाल पणतू च्या काळात लागतो.
तेव्हा अत्याचार करणारा आणि अत्याचार ग्रस्त दोघे पण हयात नसतात

पुरोगामी जे धार्मिक अत्याचार सांगत आहे.
भारतात रोज असंख्य अत्याचार स्व धर्मीय आणि स्व जातीय लोकांकडून होतात.>>>>>>>>>>>

धागा पाकिस्तान बद्दल आहे , आणि पाकिस्तान मध्ये सर्वकाही आलबेल नाही .
तेथील अल्पसंख्याकांना सामोरे जावे लागत असलेल्या घटना बद्दल चर्चा केली तर बिघडले कुठे ?
अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लिम असा जागतिक मापदंड आहे का ?
शिवाय तुम्ही स्वजातीय आणि स्वधर्मिय च्या समस्या बद्दल वेगळा धागा काढू शकता !
किँवा या धाग्यावर देखील फक्त भाजपवरच टिका झाली पाहिजे असा अंतस्थ हेतू आहे का ?

तुलनाच करायची असेल तर भारतातल्या अशा केसमधे सपोर्ट करणारे व विरोध करणारे यांचे प्रमाण आणि तेच पाकिस्तानातले प्रमाण यांची तुलना करूया का?

पाकिस्तानला आदर्श किंवा प्रमाण कुणी मानत नाहीये. पण तिथे कट्टर हिंदू द्वेष बालपणापासून सरकारी पातळीवर शिकवला जातो याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानी लोकांच्या सुसंकृतपणाचे धडे भारतियांना शिकवू नका.

हो. बिल्किस बानो, कथुआ येथील आठ वर्षांची असीफा यांची प्रकरणे घेऊ तुलनेला. हाथरस , उन्नावही घेऊ.

पाकिस्तानात भारत द्वेष शिकवला जातो असं म्हणतात तसंच भारतात आपणही करायला लागलो आहोत.

पाकिस्तानातील हिंदू मुलींवर झालेले अत्याचार आणि न्यायालयाने दिलेली शिक्षा यावर तावातावाने बोलणारे भारतातही अशाच केसेस घडतात हे दाखवल्यावर गप्प बसतात

<शिवाय तुम्ही स्वजातीय आणि स्वधर्मिय च्या समस्या बद्दल वेगळा धागा काढू शकता !>
कागाळू सरांना भारतात रोज होणार्‍या बलात्कार आणि खुनांच्या केसमध्ये रस नसतो - अपवाद आरोपी मुस्लिम असेल तर. पाकिस्तानातील बातम्या मात्र ते शोधून शोधून चघळत असतात. आज आठ मार्च . जागतिक महिला दिन, त्या निमित्त आरसा बघा आणि सांगा तुम्हांला राग मुलींवर होणार्‍या अन्यायाचा आहे की मुस्लिमांचा आहे हे ?

Pages