Submitted by वैभव_जोशी on 24 October, 2007 - 09:58
खूप आनंदात जातो काळ आता
हिंडतो मी फक्त रानोमाळ आता
लेखणी होतीच या हातांत माझ्या
आणि धरला नांगराचा फाळ आता
पावसाळी मेघ तर नाहीच कोठे
हाय! आकाशात उठतो जाळ आता
गाव हे सारे जरी अंधारलेले
सूर्य हो तू, तूच तू तेजाळ आता
लागते इथलीच माती या कपाळी
टेकतो येथेच मी हे भाळ आता
-प्रमोद खराडे
विशेषांक लेखन:
शेअर करा