Submitted by श्यामली on 24 October, 2007 - 08:00
हा कुठला साज निराळा, का घेतला जन्म नवा
तू चंद्राचे नाव वेगळे, कलेस त्याच्या बदल हवा
कधी शब्द हे पूर्ण पौर्णिमा, कधी चंद्राची कोर
कधी गगन हे गर्द निळे, कधी रात काळी भोर
कधी मुके हे होती शब्द, कधी खळखळ झरा
कधी सरळ साधे भोळे, कधी आडवळणाची तर्हा
कधी सळसळती तरुणाई, कधी बोटांची थरथर
कधी रम्य प्रभात होई, कधी सांज ही कातर
वेगवेगळी रुपे तुझी अन वेगवेगळ्या कळा
सर्वांत सामावून जाई रंग तुझा आगळा
-देवदत्त
विशेषांक लेखन:
शेअर करा