यंदाचा (२०१६) वर्षाविहार हा आपला १४वा ववि आहे.. गेली १३ वर्ष उत्साहात साजर्या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..
तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.
संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्या नावडणार्या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.
***********************
माहिती इंद्रधनुष्य यांनी दिली आहे. यांत जसं जमेल तसं जुन्या समिती सदस्यांनी भर घालावी.
अंदाजे ५० ते ७५ मायबोलीकर ववि साठी येतात... त्या अनुशंगाने लिहित आहे.
१. सुरुवात कशी होते. >>>
१.१ मे महिन्याच्या अखेरीस पुणेकर आणि मुंबईकर संयोजक ववि स्थळ शोध मोहिम आखतात.
१.२ दोन्ही संयोजक टिम आपले फिडबॅक संयोजकाच्या BBवर देऊन चर्चा करतात.
१.३ शक्य असल्यास फोनवर/मेलवर/प्रत्यक्ष भेटूनही स्पॉट बद्दल चर्चा करतात.
२. ठिकाण कसं निवडलं जातं.>>> ववि योग्य ठिकाण निवडण्यासाठी खालिल बाबिंचा विचार केला जातो.
२.१ पुणे-मुंबईला मध्यवर्ती ठिकाणाचा पर्याय शोधणे... (लोणावळा, खंडळा, खोपोली, कर्जत)
२.२ मागिल वविच्या ठिकाणाची पुर्नरावृत्ती टाळणे...
२.३ ववि साठी निवडलेल्या रिसॉर्टचे एका दिवसाचे भाडे प्रत्येकी रु.२५० - ३५०/- च्या दरम्यान असावे.
२.४ रिसॉर्टच्या भाड्यात लहान मुलांसाठी ५०% सूट आहे का ते पहाणे.
२.५ रिसॉर्टवर इलेक्ट्रिसिटीला बॅकअप सिस्टम असावि जेणे करून सांसकृतिक कार्यक्रमाच्या वेळी स्पिकर मधे वत्यय येऊ नये.
२.६ खुर्च्या, स्पिकर व माईकची सोय रिसॉर्टवर आहे का ते पहाणे.
२.७ रिसॉर्टवर २ चेंजिंग रुम असव्यात. (चेंजिंग रुमचे भाडे गृपच्या संखेनुसार negotiate करावे)
२.८ रिसॉर्टवरील जेवण, नाष्ट्याच्या मेन्यूची विविधता तपासणे.
२.९ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एखादा हॉल किंवा शेड उपलब्ध आहे का ते पहाणे.
३. पैसे कसे गोळा केले जातात. >>>
३.१ वविची दवंडी पिटल्यावर पैसे गोळा करण्याचे ठिकाण आणि तारिख त्या दवंडीत नमुद केली जाते.
३.२ वविच्या १ आठवडा आधी नोंदणीकृत सभासदांची वर्गणी जमा करण्यासाठी पुणे संयोजक बाल गंर्धवच्या स्पॉटवर तर मुंबई संयोजक शिवाजी पार्कातील स्पॉटवर भेटायची जागा निश्वित करतात.
३.३ जमा झालेल्या पैश्यातून रिसॉर्टला काही अनामत रक्कम द्यावि लागते.
३.४ वर्गणीची वर्गवारी खालिल प्रमाणे करावि
A. रिसॉर्टचे भाडे प्रत्येकी
B. बस भाडे प्रत्येकी
C. सांस्कृतिक कार्यक्रमांची वर्गणी प्रत्येकी
D. चेंजिंग रुमचे भाडे
E. स्पिकर, माईक आणि खुर्च्यांचे भाडे
४. तिथले कार्यक्रम कसे ठरतात? >>> सांस्कृतिक समिती तेथिल कार्यक्रमांची जबाबदारी पार पाडते... सां.स.ने याबाबत मार्गदशन करावे.
५. जाण्याची सुविधा? त्याचं संयोजन कसं होतं >>>
५.१ जाण्याची सुविधा बसने केली जाते.
५.२ स्वतःच्या गाडीने येणार्या सदस्याकडून बसची वर्गणी घेतली जात नाही.
५.३ संयोजकांनी बसची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी खालिल गोष्टी पडताळून पहाव्यात...
a. गृपच्या नोंदणी नुसार १८ सिटर, २२ सिटर, २६ सिटर की ५४ सिटर बस सोईची पडेल ते ठरवणे.
b. बसची रक्कम Lumpsum ठरवली असेल तर त्यात Toll include आहे का ते पहाणे.
५.४ वविच्या २-३ दिवस आधी वविच्या BBवर बसची खालिल माहिती पुरविणे.
a. बसचा रुट (pickup points)
b. pickup point वरील वेळ
c. शक्य असल्यास बस क्रमांक, बसचा रंग, बसचा प्रकार याची माहिती देणे.
६. त्या दिवशी करण्याच्या गोष्टी. >>>
६.१ सगळ्या सदस्यांना फोन करून बसच्या ठरलेल्या वेळेवर pickup point वर येण्याची आठवण करणे.
६.२ म्युझिक सिस्टम, सांस्कृतिक कार्यक्रमाच सामान, बसमधील उपहार, First Aidच सामान इत्यादीची योग्य ती सोय करणे.
६.३ रिसॉर्टच्या वाटेवर शक्य असल्यास चहापानाचा कार्यक्रम पार पाडणे.
६.४ रिसॉर्टवर पोहचल्यावर चेंजिंग रूमचा ताबा घेऊन सभासदांची योग्य ती सोय करणे.
६.५ रिसॉर्टवर सांस्कृतिक समितीला म्युझिक सिस्टमची सोय उपलब्ध करून देणे.
६.६ रिसॉर्टवरील नाष्टा, जेवण, चहापान योग्य त्या वेळी पार पाडणे.
६.७ रिसॉर्टचे भाडे चुकते करून रीसिट घेणे.
६.७ संध्याकाळी ५च्या दरम्यान सगळे कार्यक्रम आटोपून एक गृप फोटो काढून परतीच्या प्रवासाला लागणे.
७. काही विशेष सूचना: ज्या पाळायला कींवा टाळायला हव्यात.
७.१ वविच्या ठिकाणी मद्दपान / धुम्रपान टाळणे.
७.२ सगळ्यांना छत्री, रेनकोटची सक्ती करणे.
७.३ रिसॉर्टवर स्विमिंग पूल असेल तर जलक्रिडा करणार्या सभासदांनवर लक्ष ठेवणे आवश्यक.
७.४ बसची सोय शक्यतो माहितीतील ट्रॅव्हल्स वाल्याकडूनच करणे... (ट्रॅव्हल्सवाले ऐन वेळी बस बदलतात)
७.५ वविचा हिशोब त्या नंतरच्या आठवड्यात पार पाडून अॅडमिनकडे सुपुर्द करणे.
शुभेच्छा
शुभेच्छा
कधी आलो नाही पण धागा वाचतो
कधी आलो नाही पण धागा वाचतो नेहमी.नंतर जाऊन आल्यावर निबंध लिहितात ( शाळेच्या सहलीनंतर लिहितात तसा ) काहीजण तोही आवडीने वाचतो.
मला यायला नक्की आवडेल. हा
मला यायला नक्की आवडेल. हा माझा पहीलाच ववि असेल.
दरवेळी पुण्या मुंबईला सोईचे
दरवेळी पुण्या मुंबईला सोईचे पडेल असे ठिकाण निवडण्याऐवजी यंदा काहीतरी वेगळे करा.पावसात भिजायचे व रिसॉर्टला जेवन करुन परत यायचे हे आता कंटाळवाणे झाले आहे.
पुण्या मुंबैजवळ अनेक ट्रेक पॉईंट आहेत ,एखादा ट्रेक आयोजीत करा ,असे टेलरमेड ट्रेक आयोजित करुन देणार्या अनेक संस्था मुबै पुण्यात आहेत.ट्रेकची मजाही लुटता येईल,माबोकरांचा व्यायामही होईल,नेहमीच्याच ठिकाणची गर्दीही टाळता येईल.व खर्या निसर्गाचा आनंद लुटता येईल.फक्त वन डे ट्रीप करता येणार नाही,वन नाईट स्टे करावा लागेल.वविला शुभेच्छा.
अरे वा! आला का धागा?? नवीन
अरे वा! आला का धागा??
नवीन लोकांचे स्वागत. लागा बघु तयारिला...
<दरवेळी पुण्या मुंबईला सोईचे पडेल असे ठिकाण निवडण्याऐवजी यंदा काहीतरी वेगळे करा.> म्हणजे काय करा ते डिट्टेल्वार लिवा.
येणारी मंडळी ही फक्त आणि फक्त पुणे ,मुंबईची असतात, त्यामुळे त्यांच्या सोयीचेच ठिकाण पहावे लागणार ना?
ववि आणि टी शर्ट संयोजन करायची
ववि आणि टी शर्ट संयोजन करायची इच्छा आहे यावर्षी ...
येणारी मंडळी ही फक्त आणि फक्त
येणारी मंडळी ही फक्त आणि फक्त पुणे ,मुंबईची असतात,..
नाशिक कर ही येतील की..नक्की प्रयत्न करेन. पहिलीच ववि असेल
एक वर्ष मुंबई पुणे आणि नशिक
एक वर्ष मुंबई पुणे आणि नशिक करांना जमेल असा ववि चा स्पॉट ठरवला होता... पण त्यावर्षी कोणीही नाशिककर आले नाहीत.
केशव तुलसी ओवर नाईट सोडा ...
केशव तुलसी
ओवर नाईट सोडा ... एक दिवसाच्या ववी ला येणार्यांची संख्या फार रोडावली आहे.
एक वर्ष मुंबई पुणे आणि नशिक
एक वर्ष मुंबई पुणे आणि नशिक करांना जमेल असा ववि चा स्पॉट ठरवला होता... पण त्यावर्षी कोणीही नाशिककर आले नाहीत.. ओके पन मी नक्की प्रयत्न करेन, जमल्यास येइनच..
ववितल्या आवडणार्या गोष्टी
ववितल्या आवडणार्या गोष्टी -
१. टी शर्ट साईज,डिझाईन , रंगावरून घडणार्या चर्चा
२. पैसे भरताना आणि टी शर्ट घ्यायला होणारे जीटीजी
३. ववि स्थळनिवडीपासून बस रूट पर्यंत माबोवरील प्रश्नोत्तरे आणि अगाध मार्गदर्शन
४. वविच्या जाहिराती
५. बसमधला दंगा
६. ववि मधले आयोजित आणि उत्स्फूर्त कार्यक्रम
७. ववि वृत्तांत
८. टी शर्ट आणि ववि शुल्कातला काही भाग सत्पात्री दान झाल्याची बातमी.
हे सगळं असताना ववि कुठेही असो, रिसाॅर्ट , खाणं कसंही असो, पाऊस पडो न पडो काहीही फरक पडत नाही. आपल्यासाठी काही लोक झटून सगळी उठाठेव करत असतात निरपेक्षपणे ही जाणीवच तुम्हाला कृतज्ञ करते.
मला मायबोली सगळ्यात जास्त गणेशोत्सवात आणि वविच्या दिवसांत आवडते.
हे सगळं असताना ववि कुठेही
हे सगळं असताना ववि कुठेही असो, रिसाॅर्ट , खाणं कसंही असो, पाऊस पडो न पडो काहीही फरक पडत नाही. आपल्यासाठी काही लोक झटून सगळी उठाठेव करत असतात निरपेक्षपणे ही जाणीवच तुम्हाला कृतज्ञ करते. स्मित
मला मायबोली सगळ्यात जास्त गणेशोत्सवात आणि वविच्या दिवसांत आवडते. >>>> आशुडी पटल अगदी. मी वविला आले नाही तरी ही . या वर्षी जमवणारच आहे पण.
ववि संयोजनात काम करायला
ववि संयोजनात काम करायला आवडेल. आशूडी +१
जागा कुठलीही असो कल्ल्ला हा होतोच.
नजर ठेवून आहे याच्यावर...
नजर ठेवून आहे याच्यावर...
व्वा भिडे..तुमचा उत्साह
व्वा भिडे..तुमचा उत्साह दांडगा आहे.. किप इट अप !!
आशू +१ या वर्षीच्या वविला मला
आशू +१
या वर्षीच्या वविला मला मिस करा
ऑनलाईन काही मदत हवी असेल तर कळवा, मला मदत करायला आवडेल. बराचसा फ्री वेळ आहे माझ्याकडे सद्ध्या
मी आतापर्यंत कधी आले नाहीये,
मी आतापर्यंत कधी आले नाहीये, मायबोलीवर फार एक्टिव देखील नाहीये. पण ह्या निमित्ताने संयोजनात भाग घ्यायला आणि सक्रीय व्हायला नक्की आवडेल.
व्वा, मस्त! आशूडी +१. यावर्षी
व्वा, मस्त! आशूडी +१.
यावर्षी घरगुती अडचणीमुळे संयोजनात कितपत भाग घेऊ शकेन याबद्दल शंका आहे. पण ववि होणार याचा आनंद जास्त आहे. नव्या ओळखी, जुजा माबोकरांच्या भेटीगाठी, अगाध चर्चासत्रे, वविचा दंगा, नंतर कितीतरी काळ रेंगाळणाऱ्या आठवणी हे सगळे 'चुकवू नये असे काही' सदरात येते. अगदी कोणालाही न ओळखणारे, स्वभावाने बुजरे किंवा शांत, मुळातच फारसे कोणात न मिसळणारे किंवा ठराविक लोकांतच मोकळेपणे वावरू शकणारे माबोकरही वविच्या उत्साहात आणि उधाणात आपल्या नेहमीच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून सामील होताना पाहिलं आहे. मज्जा!!
तर लोकहो, जास्तीत जास्त प्रमाणांत वविला हजेरी लावा. बाकी धम्माल आपसूक घडून येईलच!
१. मुंबई पुणे रस्ता किंवा
१. मुंबई पुणे रस्ता किंवा जवळपासचा भाग - एका वर्षाच्या कालावधीत या परिसरात नवी नवी पर्यटनस्थळे अशी कितीशी विकसित होणार... नेहमीच्या ठिकाणांपेक्षा काही वेगळे, नवे रिसॉर्ट किंवा पर्यटनस्थळे या भागात झाली असल्यास व बजेटात बसत असल्यास त्यांची माहिती मिळवून संयोजकांकडे जरूर ढकला.
२. थीम बेस्ड ववि ठेवू शकतो. त्यातल्या त्यात नाविन्य, वेगळेपण वगैरे वगैरे.
३. चॅरिटीसाठी कोणत्या संस्थेला ठरवायचे, कोणती संस्था फायनल करायची हे माबोवर वेगळ्या धाग्यावर मतदानाद्वारे ठरवण्यात यावे. सदर धाग्यात संस्था, नोंदणीकृत क्र, कशा संदर्भात व कोणासाठी काय काम करते, काय गरज आहे, मिळालेल्या निधीचा विनियोग कसा करू इच्छिते, वेबसाईट, संपर्क इ. तपशील असावेत म्हणजे मतदान करणे सोपे जाईल.
आशु डी ... एकदम सही ..
आशु डी ... एकदम सही ..
आशुडे, बेश्ट..
आशुडे, बेश्ट..
नविन लोक कोण कोण इच्छुक
नविन लोक कोण कोण इच्छुक आहेत?
मी असेन. जिथे कमी तिथे आम्ही.
ववि संयोजनात काम करणे हा माझ्यासाठी पुर्ण वर्षाचा स्ट्रेस बर्स्टर असतो.
ववि च्या नियम अटी काय
ववि च्या नियम अटी काय आहेत...लोकेशन साठी?
सातारा जवळ एक गाव आहे...
मागे कोयना धरणाच् पाणी ... भरपूर पवनचक्क्या... हिर्वगार...
ट्रेक पॉइंट आहे...गावाच नाव आहे 'काठी'
राहण्याची सोय होउ शकते...जेवणाचीही...कुठलेही हॉटेल उपलब्ध नाही...कौलारु घरे आहेत...
कॉंटॅक्ट मिळवून देऊ शकेन...कराड पासून ३५ किमी.
please count me in.
please count me in.
वविच्या लोकेशनसाठी सगळ्यांत
वविच्या लोकेशनसाठी सगळ्यांत मोठी अट.. पुणेकर आणि मुंबईकर सगळ्यांना प्रवासाच्या दृष्टीने मध्यवर्ती असावे.. साधारण तीन एक तासाचा प्रवास करुन तिथपर्यंत पोहोचता आले पाहिजे..
दक्शे कशात मोजायच तुला ?
दक्शे कशात मोजायच तुला ?
अरे वा आला का वविचा धागा.
अरे वा आला का वविचा धागा. मस्त
किलोतच मोज रे, नाहीतर टनात
किलोतच मोज रे, नाहीतर टनात मोजशील.
ही ही ही, टनात तरी मावशील ना?
ही ही ही, टनात तरी मावशील ना? :p
दक्षे, नक्की कशात मोजायचं..
दक्षे, नक्की कशात मोजायचं.. मिली, सेंटी, डेसी, किलो, हेक्टो, डेको..
Pages