
ओट्सचा उपमा आणि दुधात शिजवलेले खीरीसारखे ओट्स नेहेमीच होतात. त्यामुळे ओट्सच्या नवनवीन रेसिपी करायचा मोह होत असतो. पण ओट्सच्या अंगभूत चिकटपणामुळे ओट्सच्या पाककृतींना आणि त्यांच्या चवीला मर्यादा येतात. ओट्सचे मफिन्स अगदी ए वन होतात, पण त्यांना खटपट आहे. ओट्सची सोपी आणि चांगली रेसिपी म्हणून दिनेशदांची 'ओट्सची धिरडी' करून पाहिली (http://www.maayboli.com/node/17912) पण एकेक धिरडं करायला खूप वेळ गेला. शिवाय ती जराशी मऊ झाली. विशेष पसंत पडली नाहीत. अशात कालच टीव्हीवर 'ओट्सचे आप्पे' पाहिले. अगदी झटपट प्रकार आहे. शिवाय मायबोलीवर पिरियॉडिकली आप्प्यांची कृती येणं मस्ट आहे त्यामुळे लगेच ट्राय केली आणि जमली!!
साहित्य धिरड्यांचंच आहे. पण यांचा प्लस पॉईंट म्हणजे हे पटपट होतात आणि एक घाणा एका माणसासाठी पोटभरीचा होतो. शिवाय हवी ती व्हेरिएशन्स करता येतीलच.
तर साहित्य असं:
१) १ वाटी ओट्स
२) १/२ वाटी कच्चा रवा
(जितके ओट्स त्याच्या निम्मा रवा हे प्रमाण)
३) मीठ चवीप्रमाणे, हिरवी मिरचीचे बारिक काप, आलं (चेचून), कोथिंबीर (बारिक चिरलेली)
बस इतकंच. मूळ कृतीनुसार भिजवण्यासाठी दही, ताक, सोडा काहीही गरजेचं नाही! मात्र आप्पे फुगतील का अशी शंका असेल तर आप्पे करायच्या आधी त्यात अर्धा टीस्पून खायचा सोडा घाला किंवा आंबट ताक असेल तर त्यातच पीठ भिजवा.
१) कोरडे ओट्स मिक्सरमधून काढून बारिक करून घ्या.
२) ओट्स, रवा, मीठ आणि चवीचे जिन्नस पाण्याने आप्प्यांच्या कन्सिस्टन्सीचे असे भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं मिश्रण तसंच ठेवा. (स्टँडिंग टाईम).
३) आप्पेपात्रामध्ये आप्पे करा.
४) पाचच मिनिटांत गरमागरम, पौष्टिक, सोनेरी, वरून क्रिस्प, आतून मऊ (पण शिजलेले) आप्पे तयार!
५) चटणीसोबत सर्व्ह करा.
मी पुदिन्याची चटणी केली आहे. पण आप्प्यांच्या बरोबरीने खाण्यासाठी दीड मायबोलीकर यांनी एका स्पेशल अप्रतिम चटणीची कृती दिली आहे. ती नक्की करून पहा. कृती खाली प्रतिसादातही आहे आणि या लिंकवरही आहे- http://www.maayboli.com/node/57351
कांदा, जिरं, लसूण, पुदिना वगैरे आवडीप्र॑माणे घालून चव एन्हान्स करता येईल.
हळूहळू, स्टेप बाय स्टेप
हळूहळू, स्टेप बाय स्टेप चिरफाड करायची मंजू. डायरेक्ट स्रोतावर नाही यायचे.>>>
घ्या!
तंतोतंत रेसिपी फॉलो करुन केले
तंतोतंत रेसिपी फॉलो करुन केले होते नाश्त्याला. अप्रतिम झाले. रवा कच्चा असून ( माझा तर फ्रीजमध्ये ठेवलेला असतो ) आणि सोडा, ताक न घालताही मस्त झाले.
धन्यवाद पूनम
अगो!!!! मैत्रिणे! उपकृत केलंस
अगो!!!! मैत्रिणे! उपकृत केलंस मला तू ही प्रतिक्रिया देऊन! शतश: आभार तुझे!
कॉन्फिडन्सबूस्टर फीडबॅक खरंच!
दिसतायत भारी! मी आप्पेपात्र
दिसतायत भारी!
मी आप्पेपात्र विकत घेतले की तंतोतंत याच रेस्पीने करेन हो पूनम.
प्राची, आशू, अवनी, मंजू.....
अवनीऐवजी मीच म्हणते आवरा!!
स्टँडिंग टाईम मधे आपण काय
स्टँडिंग टाईम मधे आपण काय करायचं हे ही लिहाल का जरा प्लिझ..
म्हणजे त्या भांड्याकडे उभं राहून बघत बसायचय का?
उभं राहून बघत कसं बसतात
उभं राहून बघत कसं बसतात
लेकाला सगळ्या प्रकारचे आप्पे
लेकाला सगळ्या प्रकारचे आप्पे आवडत असल्याने डब्यासाठी अजून एक सोपा आप्प्यांचा प्रकार मिळाला. धन्यवाद.
बाकी माबोवरच्या आप्प्यांच्या रेसेपींची संख्या बघता सलग आठवडा-दोन आठवडे आप्प्यांचे प्रकार करता येतिल.
लसूण सोला..कांदे
लसूण सोला..कांदे चिरा...टिव्ही वर फेरी मारा.दूध तापायला ठेवा..कपडे वाळत घाला..घडी करा.. या अशा टाईम शेअरिंग.कामांचा कंटाळा असेल तर ओट्यापाशी बसून एखादे गाजर्/सुकामेवा/लाह्या खा
पूनम, छान रेस्पी. बाकी आजकाल
पूनम,
छान रेस्पी.
बाकी आजकाल माबोकरांना दिसली रेस्पी की घाल दंगा अशी सवय लागली आहे.
पूनम, मस्त गा.. ओट्स या
पूनम, मस्त गा.. ओट्स या कंटाळवाण्या इन्ग्रेडिएंट चा हा उपयोग भार्री आवडला.. ट्राय करीन
आत्तापर्यन्त घरच्याघरी ग्रेनोला करण्याइतपतच उपेग होता ओट्स चा..
पूनम, मला फोटोही टाकायचा होता
पूनम, मला फोटोही टाकायचा होता खरंतर पण गडबडीत विसरुनच गेले काढायचा. नेक्स्ट टाईम नक्की, नेक्स्ट टाईम लवकरच येणार आहे कारण जास्तीचे ओट्स काढले आहेत मिक्सरमधून
ह्या ह्या, स्टँडिंग टायमाला
ह्या ह्या, स्टँडिंग टायमाला माबोवर पिंका टाका की! नवीन धागे उघडा! :p
ही रेसिपी वापरून आप्पे करून
ही रेसिपी वापरून आप्पे करून पाहिले. चवीला ठीक होते पण अजिबात फुगले नाहीत. काय कारण असेल?
केले. छान झाले. सोबत ह.डा,
केले. छान झाले.
सोबत ह.डा, उ.डा. कांदा, लाल मिर्ची कढीपत्ता तेलावर भाजून, चिंच घालून चटणी केली.
झक्कास बेत.
हा घ्या पुरावा :

अरे वा! धन्स दीमा. फोटो नाही
अरे वा! धन्स दीमा. फोटो नाही काढलात?
सायकलस्वार, असं सांगता येणार नाही.
अल्पना, वर्षू नक्की करून बघा.
अगो, वाट बघते फोटोची
हे अतिसोप्पे (निदान वाचून तरी
हे अतिसोप्पे (निदान वाचून तरी वाटताहेत) आप्पे वाचून परत एकदा आप्पेपात्र घ्यायची सुरसुरी आलेली आहे.
आमच्याइथे आप्पे हा प्रकार इतरेजनांना अज्ञात असल्याने मिळालंच तर नॉनस्टिक आप्पेपात्र/तवा मिळेल. बरं असतं का ते? का बिडाचंच हवं वगैरे प्रकार आहेत? (खरंतर या प्रश्नामधे आख्ख्या एका बीबीचं पोटेन्शिअल सामावलेलं आहे याची नम्र जाणीव आहे, पण तरी वाढला तर याच बीबीचा ट्यार्पी वाढूदे म्हणून इथेच विचारला..)
पूनम, इतकी सोपी पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद. मला ते भिजवून ठेवा-मग वाटून घ्या वगैरे भयंकर कंटाळवाणं वाटतं त्यामुळे आप्पेप्रकरणात मी फारसं कधी लक्ष घातलं नव्हतं, पण हे मस्त आहे
नॉनस्टिक आप्पेपात्र/तवा
नॉनस्टिक आप्पेपात्र/तवा मिळेल.>>> माझ्याकडे नॉनस्टिकवालेच आहे, अगदी छान आप्पे होतात, हे ओट्सचे पण करुन बघितले आहेत.
वरदा, माझं आप्पेपात्रही
वरदा, माझं आप्पेपात्रही नॉनस्टिकच आहे. बिडाचं आता फारच कमी ठिकाणी मिळेल असं वाटतंय
जरूर घे. नॉनस्टिकच घे. आप्प्यांची भरपूर व्हरायटी आहे करण्यासाठी. शिवाय त्यात मिनी मफिन्स, साबुदाणे वडे, कोफ्तेही करतात (कमी तेल लागतं!) असं ऐकून आहे (मी कोफ्ते केले आहेत, बाकी नाही केलं काही), त्यामुळे वाया जाणार नाही. काहीना काहीतरी प्रयोग करता येतीलच
स्वस्तही असतं. शिवाय अजून 'मांसाहारी आप्पे' हा प्रकार राहिलाच आहे माबोवर! मासे घालून आप्पे ट्राय केलेस तर तो 'मान' तुझ्याकडे जाऊ शकेल 
ओट्स घरात नसल्याने अजून केले
ओट्स घरात नसल्याने अजून केले नाहीत. आज-उद्याला वाणसामानात आणल्यावर सोमवारच्या डब्याला हेच आप्पे करणार.
वरदा, माझ्याकडे पण नॉनस्टीक आप्पेपात्रच आहे. चांगले होतात त्यात आप्पे. इथल्या भांड्यांच्या दुकानात पण निर्लेपचं आप्पेपात्र दिसलं होतं. तुमच्याकडे पण मिळू शकेल.
मी आप्पेपात्रात रव्याचे आप्पे, इडली पिठाचे आप्पे (त्यात भिजवलेली चणा डाळ वाटून घालून), मिक्स डाळींचे आप्पे /वडे, ह. डाळीचा वडा, कोफ्ते, चीझ बॉल्स,पनीर-चीझ-बटाटा टिक्क्या असलं बरंच काय काय केलंय.
आजच पुण्यात आलो तर केले आणि
आजच पुण्यात आलो तर केले आणि खाल्ले मस्त स्वादिष्ट!!
आमचे आप्पे पात्र नॉनस्टिक नाही खापराचे कि दगडी असले आहे खूप वर्षांपूर्वीचे पण त्यात हे न चिकटता बनविणे हे बायकोचे स्किल....☺
वाॅव!!! मस्तच
वाॅव!!! मस्तच
काल मी पण करुन बघितले ..
काल मी पण करुन बघितले .. जास्त फुगले नाहीत .. बहुतेक मी टोमॅटो मसाला ओटस वापरले \ स्टँडिग टाईम कमी होता .. पण चव आवडली .. कमी खटपट
बाकी आजकाल माबोकरांना दिसली
बाकी आजकाल माबोकरांना दिसली रेस्पी की घाल दंगा अशी सवय लागली आहे.<<<< आज काल????? माबो अभ्यास कच्चा राहतोय तुमचा!! होमवर्क देऊ का?
मस्त रेसिपी. ट्राय करके देखेंगा. बाय द वे, तमिळमध्ये यांना (म्हणजे आप्प्यांना) पणियारम म्हणतात. नवर्याने मेनूकार्डात एकदा चुकून प्रणयम वाचले होते.
आज काल????? << आजकाल पुन्हा
आज काल?????
<<
आजकाल पुन्हा एकदा असं म्हणा
क्या बात है दीमा, उच्च रंग
क्या बात है दीमा, उच्च रंग आलाय आप्प्यांना. पर्फ़ेक्ट सोनेरी!!
कृष्णाजी, वहिनी ख-या सुगरण खरंच!
फोटोंमुळे मजा येते आहे. हळूहळू लोक करूनही बघत आहेत. अजून काय हवं? रेसिपी लिहिणं सफल झालं असं या ठिकाणी मी नमूद करते!
बरं, दीमा, लगे हात ती चटणीची
बरं, दीमा, लगे हात ती चटणीची रेस्पी तंतोतंत लिहा बरं इथे. चविष्ट वाटतेय
अर्रे व्वा!! सर्वांचे अप्पे
अर्रे व्वा!! सर्वांचे अप्पे मस्त झालेत सोनेरी ,टप्पोरे.. वॉव..
अप्पेपात्र घेण्यापासून तयारी ला लागावं लागेल आता..
तोपर्यन्त, दीमा. चटणी ची रेसिपी द्याच इकडे.
आप्पेपात्रात लाडू पण छान वळून
आप्पेपात्रात लाडू पण छान वळून होतात. त्या सर्व खळग्यात लाडूचे मिश्रण दाबून भरायचे. मग ते उलटे करुन धाडकन ताटात आपटायचे. दोन दोन अर्धुके जोडायची ( हवी तर दोन वेगवेगळ्या मिश्रणाची, रंगाची, पोताची, चवीची घ्यावी ) आणि लाडू करायचा. अश्या रितीने स्टफ्ड लाडू पण करता येतील..
आयडियाचहव्याहोत्यानाघ्याआता....
दिनेश मल्टीटास्किंग
दिनेश
मल्टीटास्किंग आप्पेपात्र ..
मांसाहारी आणि मासाहारी
मांसाहारी आणि मासाहारी आप्पे>>
मी खात नसल्याने योग्य व्यक्तीला फॉरवर्ड करायला लागेल. पण आधी आप्पे काय असतात ते करून दाखवेन.
माशांपेक्षाही खिमा घालून आप्पे जास्त चांगले लागतील (व करायला सोयीचे जातील) असं वाटतंय. इथल्या जाणकारांनी प्रकाश टाका ओ!
Pages