पारंपारीक ईडली आणि चटण्या

Submitted by आरती. on 14 May, 2015 - 03:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पारंपारीक ईडली
P13-05-15_07.32[2].jpg

ईडली राईस - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी.स्पून

रवा ईडलीसाठी

ईडली रवा - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी.स्पून

क्रमवार पाककृती: 

सॉफ्ट पांढरी शुभ्र ईडली

१. सकाळी ईडली राईस, मेथी एकत्र भिजत घाला. उडीद डाळ वेगळी भिजत घाला.
२. संध्याकाळी डाळ तांदूळ वाटायच्या १५ मि. आधी पोहे थोड जास्त पाणी घालून भिजत घाला.
३. ईडली राईस, मेथी पोहे अगदी बारीक वाटून घ्या. अजिबात रवाळ नको. उडीद डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.

४. दोन्ही मिश्रण एकत्र करा. त्यात चवीपुरत मीठ घालून एकाच दिशेने ढवळून घ्या. १ टे. स्पून कच्च तेल घालून आंबवायला ठेवा.

५. सकाळी ईडलीपात्रात पाणी घालून ५ मि. उकळवून घ्या. नंतर ईडली स्टॅन्ड ठेवून १५ मिनिटे वाफवा. पहिल्या घाण्याच्या नंतर ईडली पात्रातील पाणी उकळवायची गरज नाही.

रवा ईडलीसाठी

ईडली रवा, मेथी, उडीद डाळ वेगळ भिजत घाला. उडीद डाळ, मेथी, पोहे घालून बारीक वाटून घ्या. ईडली रवा वाटलेल्या मिश्रणात घालून मीठ घालून ढवळून कच्च तेल घालून पीठ आंबवायला ठेवा.

अजून काही ईडलीचे प्रकार

१. ईडलीच पीठ ईडलीपात्रात घातल्यावर त्यात वरून भिजवलेल्या चणाडाळीचे ४-५ दाणे घाला. ही ईडलीसुद्धा छान लागतात.

२. ईडलीच पीठ ईडलीपात्रात घातल्यावर त्यात वरून साधी किंवा रंगीत साखर शिंपडा. ही गोड ईडली गोडप्रेमींना खूप आवडते.

३. तट्टे ईडली - ईडलीच पीठ छोट्या डीशमध्ये वाफवा. असच छोट्या वाटी किंवा ग्लासमध्ये वाफवता येते.

४. कांचीपुरम ईडली - ईडलीच पीठ आंबवायला ठेवल की २ टे. स्पून चणाडाळ भिजत घाला. सकाळी काजूचे तुकडे तुपात तळून घ्या. ईडलीच्या पिठात भिजवलेली चणाडाळ, बारीक चिरलेली हि.मि., कढीपता बारीक चिरून, १/२ कप ओल खोबर, १/२ इंच किसलेल आल, काळी मिरी खडबडीत वाटून १ टी.स्पून. हे सर्व मिक्स करा. पिठात काजूचे तुकडे मिक्स करा किंवा वेळ असेल तर ईडलीपात्रातील तेल लावलेल्या प्रत्येक वाटीत काजूचे दोन तीन तुकडे ठेवून् त्यावर पीठ ओता. आणि १५ मिनिट वाफवा.

वरच्या फोटोतील ओल्या खोबर्‍याची चटणी प्रकार १

ओल खोबर, बेडगी मिरची, आल, लसूण. मी लिंबूरस घातला होता, तुम्ही कैरी किंवा चिंच वापरू शकता. चवीपुरत मीठ घालून ग्रांईड करा. वरून कढीपता, हिंग, राई ची फोडणी द्या.

ओल्या खोबर्‍याची चटणी प्रकार २-ओल खोबर, हिरवी मिरची, आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.

ओल खोबर चटणी प्रकार ३ - ओल खोबर, चटणीची डाळ / पंढरपूरी डाळ, हि.मि. आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.

लाल टॉमेटोची चटणी

तेल किंवा तूपामध्ये कांद्याच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, लसूण, आल, बेडगी मिरची परतून घ्यायची. थंड झाल्यावर चवीपुरत मीठ घालून हे मिश्रण वाटायच. वरून हिंग, राई, कढीपत्ताची फोडणी द्यायची. ही चटणी ईडली बरोबर एकदम टेस्टी लागते.

डोसासाठी शेंगदाणा चटणी एकदम बेस्ट.

शेंगदाणे भाजून, साल काढून, लसूण, आल, बेडगी मिरची, चिंच हे मिक्सरला वाटून घ्या. वरून फोडणी.

आल्याची चटणी
ही सुद्धा ईडलीबरोबर झणझणीत टेस्टी लागते. आल छोटे तुकडे करून पाव वाटी, बेडगी मिरची, चणाडाळ आणि उडीद डाळ १ टे.स्पून, लसूण १-२ पाकळ्या नसल्यातरी चालतात, हे तेलात भाजून चिंच, गूळ मीठ घालून मिक्सरवर बारीक पेस्ट करा. वरून फोडणी द्या.

डोसे प्रकार इथे बघा. http://www.maayboli.com/node/53541

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे, माझ्यासारखे ईडलीप्रेमी दिवसभर चरत असतात. :)
अधिक टिपा: 

प्लीज ईडलीच्या पीठात भात घालू नका. आंबण्याच्या प्रक्रियेत भात नासतो आणि अशी ईडली खाल्ली की पोट बिघडत. अशा ईडल्यांची चव आणि रंगसुद्धा वेगळाच असतो.

पोहे नसतील तर कुरमुरे घाला.

पीठात तेल घातल्यावर ढवळायच नाही.
जी काही पिठाची कंन्सिस्टंसी करायची असेल ती पीठ आंबवायला ठेवण्या अगोदर करावी.
एकदा पीठ आंबल्यावर त्यात अजिबात पाणी घालायच नाही.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही केलेल्या इडली अतिशय टेस्टी होतात, नुसती सुद्धा खाऊ शकता. पण फ्लॅट होतात. इडली फ्लफी होण्यासाठी काय सुचवाल? आम्ही वापरतो ते प्रमाण - (३:2)
उकडीचे तांदुळ 2 वाटी + इंद्रायणी तांदुळ 1 वाटी यातच उडीद डाळ 2 वाटी असं एकत्र 8-9 तास भिजवुन मग ग्राइंड करते. बॅटर रात्रभर ठेवुन दुसऱ्या दिवशी सकाळी इडली.
डोसे पण जाळीदार होतात पण साऊथ इंडियन्स करतात तसे मऊ आणि खुप जाळीदार होण्यासाठी टिप्स हव्या आहेत. हे बनवताना प्रमाण (3:3) - 3 वाटी तांदूळ (प्रत्येकी 1 वाटी उकडीचे, आंबेमोहोर आणि इंद्रायणी) + 2 वाटी उडीद डाळ + 1 वाटी हरभरा डाळ + 1 चमचा मेथी दाणे हे रात्रभर भिजवुन सकाळी बॅटर बनवताना त्यात मूठभर पोहे घालते. ही नेटवर वाचलेली टीप आहे. मग तासभर ठेऊन डोसे बनवते. डोसा बॅटर फरमेंट करत नाही.
Submitted by मीरा.. on 11 January, 2021 - 03:49
इडलीचे पीठ वाटताना घट्ट हवे. पीठ आंबल्यावर थोडेसे पातळ होते, त्यामुळे जास्त पाणी न घालता वाटावे. वाटताना उडीद डाळ अगदी गुळगुळीत वाटली जायला हवी. इडलिपात्रात पीठ घालताना ते अजिबात पळीवाढे नको.
घालताना चमच्याला सोडायला तयार नसलेले पीठ हवे. जरा जरी पातळ झाले तरी इडली फ्लॅट होते. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे इडलीपात्रात पाणी उकळत असताना इडली भांडे ठेवा. इडल्या घालून मग इडलीपात्र गॅसवर ठेवले तरीही फ्लॅट होतील.
Submitted by साधना on 11 January, 2021 - 04:48
मीरा, डाळ तांदुळ वाटल्या नंतर ते पीठ एकाच दिशेने चांगले फेटुन घ्यावे, मग फर्मेंट करावे. इडली करायच्या आधी सुद्धा तेल, मीठ घालुन परत फेटावे याने त्या फुगतात. वर साधनाने लिहील्याप्रमाणे इडलीपात्रातले पाणी उकळलेले असावे.
Submitted by रश्मी. on 11 January, 2021 - 05:08
इडली साठी प्रमाण (3:1) घ्या. 3वाटी तांदूळ 1वाटी उडिद डाळ.
1/4वाटी हरभरा/मूग डाळ(ही फक्त पिवळसर रंग येण्यासाठी लागते डोसा बनण्यासाठी)
इडलीच्या पीठात गरज नाही.
Submitted by सियोना on 11 January, 2021 - 05:41
डोसे- उकडा राईस 3 वाटी , व्होल उडद एक वाटी+मेथी दाणे..चार-पाच तास वेगवेगळे भिजवावे..मग एकत्र करून ग्राईंड करू शकता.. ग्राईंड करताना थोडासा शिजवलेला भात टाकावा.. चव, रंग आणि जाळी छान येते..मी इडली/डोश्याला ओव्हरनाईट फरमेन्टेशन करत नाही.. रात्री दहा -अकरा वाजता फ्रिजमध्ये.. दुसर्या दिवशी सकाळी डोसे...
IMG_20201213_110701.JPG
असे बनतात....
तसेच इकडे तामिळनाडू आणि सासरी आंध्रामधे हरभरा डाळ,मुग डाळ घालत नाहीत... आणि आंबेमोहोर, इंद्रायणी सुवासिक तांदूळ पण घालत नाहीत..
Submitted by mrunali.samad on 11 January, 2021 - 05:51
डोश्याला आम्ही उडीद रात्रभर भिजवुन सकाळी वाटून 2 तास ठेवतो आणि 10 मिनिट आणि सम प्रमाणात रवा घालून डोसे टाकतो
मस्त कुरकुरीत होतात.
Submitted by mi_anu on 11 January, 2021 - 05:53
आता इडली-
तामिळनाडू मधे बहुतांश उकडा तांदूळ + व्होल उडिद याची इडली करतात.. प्रमाण आणि भिजवण्याची प्रोसिजर सेम वर डोश्यासाठी दिलेली...
आंध्र मधे बहुतांश इडली रवा ची इडली करतात.. मी ही इडली रव्याची करते....तीन वाटी इडली रवा +एक वाटी व्होल उडिद वेगवेगळे चार तास भिजवणे..फक्त उडिद ग्राईंड करणे..भिजवलेल्या रव्यातील पाणी काढून टाकणे..बारीक केलेली उडिद रव्यात मिक्स करून हाताने एका साईडने फेटने..सेम ओव्हरनाईट फरमेन्टेशन करत नाही.. झोपायच्या आधी फ्रिजमध्ये, सकाळी इडली.. इडलीपात्रात पाणी उकळून मग इडली दहा मिनिटे वाफवणे.
IMG_20201223_090400.JPG
अशा बनतात Happy
Submitted by mrunali.samad on 11 January, 2021 - 06:14
मी ही इडली रव्याची करते....तीन वाटी इडली रवा + व्होल उडिद वेगवेगळे चार तास भिजवणे..फक्त उडिद ग्राईंड करणे..भिजवलेल्या रव्यातील पाणी काढून टाकणे..बारीक केलेली उडिद मिक्स करून हाताने एका साईडने फेटने..सेम ओव्हरनाईट फरमेन्टेशन करत नाही.. झोपायच्या आधी फ्रिजमध्ये सकाळी इडली.. इडलीपात्रात पाणी उकळून मग इडली दहा मिनिटे वाफवणे.>> उडीद डाळ किती?
Submitted by ९६क on 11 January, 2021 - 06:07
एक वाटी.. वर पण एडिट करते
Submitted by mrunali.samad on 11 January, 2021 - 06:12
अनु तु म्हणतेस तसे रात्रभर उडिद डाळ भिजवून पण डोसे करतात..फक्त रव्याऐवजी तांदूळ वापरते मी...
माश (उडिद) के छिले म्हणतात त्याला- एक वाटी उडिद + एक वाटी तांदूळ रात्रभर भिजवून सकाळी ग्राईंंड करून लगेच डोसे...याची चव वेगळी लागते.. जास्त हेल्दी आणि पोटभरीचे होतात.
Submitted by mrunali.samad on 11 January, 2021 - 06:31
मृणाल, अनु, रश्मी, सियोना, धन्यवाद ! हे सगळं डॉक्युमेंट करून ठेवणार आहे.
साधना ताई, जे करायला हवं सांगितलं ते सगळं करत नाही आणि जे avoid करायचं ते नक्की करते आहे हे लक्षात आलं. छान माहितीपुर्ण पोस्ट आहे.
आज मी तुमच्या सगळ्यांच्या पोस्ट्स पाहुन डोसा साठी डाळ तांदूळ भिजत घालते आहे. उद्या फीडबॅक देते Happy
Submitted by मीरा.. on 11 January, 2021 - 11:02
उकडीचे तांदुळ 2 वाटी + इंद्रायणी तांदुळ 1 वाटी यातच उडीद डाळ 2 वाटी असं एकत्र 8-9 तास भिजवुन मग ग्राइंड करते. >>>> मीरा इथे चुकते आहे असे वाटते. इडली साठी नेहमी तांदूळ आणि डाळ वेगवेगळी भिजत घालावी आणि वाटताना ही वेगवेगळी वाटावी. डाळ अगदी बारीक वाटावी तर तांदूळ थोडेसे रवाळ वाटावे. बाकी साधनाताई ने योग्य माहिती दिलीच आहे. इंद्रायणी तांदूळ घेतल्याने इडली ला चिकटपणा येत नाही का?
Submitted by निल्सन on 11 January, 2021 - 11:43
एकेक फोटो भारी, तों पा सु.
Submitted by अन्जू on 11 January, 2021 - 14:33
आज सकाळी ब्रेकफास्टला इडली सांबार बनवलं होतं. एकेक पोस्ट परत वाचुन आणि सगळ्या टिप्स फॉलो करुन या वेळेच्या इडली टम्म फुगल्या होत्या. एवढ्या फ्लफी तर पहिल्यांदा झाल्या. सगळ्यांची खुप खुप आभारी आहे. Happy
निल्सन, धन्यवाद. पुढच्या वेळेस इंद्रायणी राईस वापरणार नाही. आणि हो यावेळेस डाळ तांदुळ वेगवेगळे भिजवुन वेगळे ग्राइंड केले.
Submitted by मीरा.. on 12 January, 2021 - 05:42
छानच...
आमच्या कडे पण आज इडली होती..
Submitted by mrunali.samad on 12 January, 2021 - 05:48
याहू
इडली चं घोडं गंगेत न्हालं.
Submitted by mi_anu on 12 January, 2021 - 06:25
मीरा... अरे वा, लगेच करूनही पाहिल्या. मलाही फ्लफी इडल्या आवडतात. मी तर नुसत्याच खाते.
माझ्या एका मैत्रिणीची आई इडल्या करताना थोडे बॅटर घातल्यानंतर त्याच्यावर चमचाभर जाडसर चटणी पसरायची आणि वर परत थोडे बॅटर पसरायची आणि मग इडली वाफवायची. कॉलेजमध्ये वर्गात शेवटच्या बाकावर बसून गुपचूप डब्बा उघडून आम्ही ह्या इडल्या खायचो. वेगळी चटणी लावायची गरज पडत नसे... एकदा वर्ग चालू असताना डब्याचे झाकण खाली फरशीवर पडून टणाटण उड्या मारत चार बेंच ओलांडून गेले होते Happy Happy
थाळीत इडली बॅटर असेच दोन थरात पसरून नंतर चौकोनी कापून इडली सँडविच करता येते. मुलांना डब्ब्यात द्यायला, बाईटसाईज तुकडे त्यांना उचलून खायला सोप्पे. बॅटर मध्ये हळद, बिटचा रस वगैरे घालून रंगीबेरंगी करता येईल जे खायला मुलांनाही आवडेल.
Submitted by साधना on 12 January, 2021 - 06:30
अरे वा,आता मायबोली खाऊगल्ली वर येऊ दे फोटो.
साधना मी पण इडलीपीठ पात्रात टाकले की किसलेले गाजर,किसलेले बीट टाकते मग वाफवते.
रंग पण येतो आणि नावडत्या भाज्या पण पोटात जातात.
Submitted by सियोना on 12 January, 2021 - 07:28
इडली रव्यासाठी एक प्रश्न. कधी बारीक मिळतो, कधी जाड. सध्या माझ्याकडे बारीक आहे इडली रवा. मग एक वाटी अख्खे उडिद घेतले तर रवा किती घ्यायचा?>>>>>>>>
3वाटी इडली रवा आणि एक वाटी उडिद घ्या.
Submitted by mrunali.samad on 12 January, 2021 - 10:47
आख्खे उडीद म्हणजे? त्याला बाहेरून काळं साल असतं ना? सालासकट घ्यायचं का?
Submitted by मेधावि on 12 January, 2021 - 11:10

आक्खे उडीद म्हणजे काळ्या सालासकटचे आक्खे उडीद
बिनासालाचे आक्खे उडीद म्हणजे गोटा उडीद (हेब्बार्स किचन मधे ती नेहेमी फोडणीत हे वापरते)
Submitted by योकु on 12 January, 2021 - 15:12
हे असे उडीद पण मिळतात का? मी तर कायम डाळच पहाते उडदाची.
Submitted by मेधावि on 12 January, 2021 - 18:23
मी तर कायम डाळच पहाते उडदाची........+१.
लॉकडाऊन मध्ये online ग्रोसरी मागवली असता असे होता उडीद मिळाले होते.
Submitted by देवकी on 12 January, 2021 - 21:10
Same for me, Devki Happy
Submitted by sneha1 on 12 January, 2021 - 21:29
पण मग उ. डाळ आणि गोटा उडीद यामधे दिसण्यातला फरक सोडता काय वेगळेपणा आहे?
तसेही ते भिजवून बारिक वाटायचे असते ना.... चवीत काही फरक पडतो का? मी कधी गोटा उडीद वापरले नाही म्हणून प्रश्न पडला आहे.
Submitted by sonalisl on 13 January, 2021 - 01:24
गोटा उडीद ची स्प्लिट करुन डाळ बनवताना थोडे प्रोसेसिंग असेल. त्यामुळे चव बदलत असेल.
Submitted by mi_anu on 13 January, 2021 - 01:46
मी पुण्यात असताना उडिद डाळच वापरायचे इडली/डोश्यासाठी... पण इकडे आल्यावर पाहिले सगळे आख्खे उडिद वापरतात.. मग मी पण सुरू केले... आईकडे अजूनही उडिद डाळ वापरतात..चवीत आणि टेक्श्चरमधे फरक पडतो...
Submitted by mrunali.samad on 13 January, 2021 - 02:06
मी अनु , तुम्ही डोसा साठी जो रवा लिहिलाय , तो नेहमीचा बारीक रवा घ्यायचा ना ? तोही भिजवून घ्यायचा की वाटलेल्या डाळीत कोरडाच मिक्स करायचा ?
Submitted by अश्विनी११ on 13 January, 2021 - 03:39
ईडली चर्चा मस्तच .
इकडे आल्यावर पाहिले सगळे आख्खे उडिद वापरतात.. मग मी पण सुरू केले... आईकडे अजूनही उडिद डाळ वापरतात..चवीत आणि टेक्श्चरमधे फरक पडतो... >>> माहीतीसाठी धन्यवाद . ईडली रवा मागवला आहे आता गोटा उडीद शोधायच्या मोहिमेवर निघावं हे उत्तम.
पुढच्यावेळी तुम्हा लोकांच्या टीपा वापरून ईडली केली की फोटु टाकेन .
मृ , तु दिलेल्या रेसीपीचा सांबार मसाला अजून शिल्लक आहे . दोन वेळा सांबार बनवून झालं , अधून्मधून मसालेदार भाज्या केल्या की तो वापरते . Happy
Submitted by स्वस्ति on 13 January, 2021 - 03:44
मी नॉर्मल आपण शिरा बनवतो तो घेते रवा. १:१
फक्त खूप आधी भिजवायचा नाही इतकेच. करायच्या थोडेच आधी. मस्त कुरकुरीत पेपर डोसा कोंपोनंट येतो.
इडली रवा डोसा पीठ मध्ये नाही वापरला डोसा मध्ये ईडली मध्ये पण कधीतरीच.
आम्ही १.५:३.५ इडीदः:(उकडा आणि साधा तांदूळ अर्धा अर्धा) आणि ५ मेथी दाणे घेतो. चांगल्या होतात ईडल्या.
Submitted by mi_anu on 13 January, 2021 - 04:01
मी पण एकदा करून खाईन रवा डोसा..अनुच्या पध्दतीने...
थँक्स स्वस्ति Happy
Submitted by mrunali.samad on 13 January, 2021 - 04:09
अनु सगळ्या टिपा-धावदोर्यांसकट वेगळी रेसिपी लिही ना. इथे हरवणार. मला करून बघायची आहे, पण तोवर धागा धावतो.
Submitted by प्रज्ञा९ on 13 January, 2021 - 04:21
साबा रेसिपी आहे.
त्या याला वन डे मॅच डोसा म्हणायच्या. म्हणजे सकाळी उडीद भिजवून दुपारी वाटून रात्री १:१ रवा मिसळून डोसा तयार. मी माहेरी होते तेव्हा इडली आणि डोसा चे एकच पीठ होते. पण डोसे हॉटेल सारखे बनायचे नाहीत. (हे वाक्य टेलिशॉपिंग च्या आवाजात वाचा). मग मी उडीद मध्ये तांदूळ घालता फक्त १:१ रवा घालायला चालू केले आणि मेरी जिंदगी बदल गयी Happy
टिपा काहीच नाही. जेव्हा शक्य तेव्हा उडीद भिजवायचे, नंतर कधीतरी लक्षात आले की वाटायचे आणि १-२ तास ठेवायचे, नंतर वेळ झाली की रवा शोधायला घ्यायचा. आणि मग रवा मिक्स करुन खास डोसा तवा म्हणून बाजूला ठेवलेल्या चांगल्या तव्यावर डॉसे घालायचे. आमच्याकडे या तव्यावर दुसरे काही केल्यास मारामारी व हिंसाचार होतो. (मीच करते)
Submitted by mi_anu on 13 January, 2021 - 04:29

मी ह्या रेसिपीने अनेकदा इडल्या केल्या आहेत, उत्तम होतात. मऊ, शुभ्र आणि हलक्या! निवडक दहामध्ये ठेवून दिली आहे
धन्यवाद आरती Happy

अनु, काल रवा घालून डोसे केले. मस्त झाले. ही सोपी कृती +१ ला फारच आवडली. थंडीत डाळ-तांदूळ वाल्या पिठासाठी आयपीला साकडे घालायला नको.

>> डाळ-तांदूळ वाल्या पिठासाठी
आधी बनवलेल्या इडली बॅटरचं चमचाभर विरजण घालून पहा. विरजण फ्रीज केलं तरी चालतं. मी आधी युसायुसु तिंवा तत्सम धाग्यावर लिहिल्याचं आठवतं. शुभेच्छा Happy

काल ही पाककृती तंतोतंत पाळून इडल्या केल्या. नेहमीपेक्षा जास्त जास्त, स्पाँजी इडल्या झाल्या होत्या.
तेल लावूनही भांड्याला थोड्याफार चिकटल्या. त्यासाठी पुढल्या वेळी प्रति सादांतल्या टिप्स पाळेन.

आज प्रथमच ईडलीच्या पिठाला फणसाच्या पानांच्या द्रोणात शिजवून इडल्या केल्या. इथेच माबोवर कुठेतरी बेळगाव साईडला अशा इडल्या बनवतात हे वाचलं होतं. फणसाच्या पानात शिजलेल्या पांढर्‍या चुटुक इडलीला अप्रतीम चव आली. फक्त फणसाच्या पानात शिजवल्याने काही अपाय तर होणार नाही ना याची रुखरुख लागुन राहिली आहे Uhoh

ज्या झाडाची फळं आपण खातो त्या झाडाची पानं खाऊन काही बिघडत नाही असं कधीतरी कुणीतरी सांगितलेलं आठवतंय. (हे फारच रँडम आहे हे मान्य आहे.)

फणसाच्या पानातल्या इडल्यांना खोट्टे म्हणतात. पाकृ आहे इथे. द्रोण बनवण्यापासून. त्यात बघा काही सूचना आहेत का. लोक वर्षानुवर्षे खातायत. कारवार पट्टा रिकामा झाला असता इतक्यात.
मनात संशय ठेवाल तर त्याचा त्रास होईल. फणसाचा नाही.

परवाच मी यू टयूब ला वेडीयो पहिला त्यात एका हॉटेल मध्ये ही इडली मेन्यू मध्ये होती. ते फणसच्या पानात सर्व करत होते.

धन्स कारवी अन आमुपरी. मी हा फणसातल्या पानात इडलीचा धागा बर्‍याच वर्षांपुर्वी वाचला होता. परवा आई आमच्या मामांकडे गेलेली. त्यांच्याकडे फणसाचं झाड आहे. माझी ट्युब पेटल्यावर मी आईला फोन करून ४०-५० पाने आणायला सांगितली. आज ती वापरून इडल्या (खोट्टे) बनवल्या. केवळ अप्रतीम. इथून पुढे मला इडलीपात्रात बनवलेल्या इडल्या खाऊशी वाटणारच नाहीत हे मात्र नक्की. Bw

अहो रानभुली, तुम्ही आपल्या नेहमीच्या कूकर मधे शिट्टी बाजुला काढून १० मिनिट पानांमधील ईडल्या उकडल्या तरी चालतात. मी एका पानाचं शेंडा-देठ जागच्या जागी दुमडून एकएकच द्रोण केलेलं. त्यामुळे आपल्या पात्रातल्या ईडली एवढ्या आकाराच्याच ईडल्या तयार झाल्या. अन एक एक पान पुर्णपणे भरून त्याच्या शिराम्चा छाप ईडल्यांवर उमटला.

रानभुली माझ्याकडे इडलीपात्र आहे.. कधी त्यामध्ये करते .. कधी कुकर मध्ये करते .. अगदीच कंटाळा असेल तर कूकरमध्ये शिटी काढून दोन डब्यामध्ये लावते.. नंतर चोकोनी ढोकळ्यासारखे तुकडे करते.. फक्त दोन डबे घासले कि काम होऊन जाते..

Pages