मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462
मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504
मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568
मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611
मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672
पिकासा वरून पोस्ट करत राहताना काहीतरी प्रॉब्लेम येतोय. सध्या पुरते ( मला जमेल त्या ) इंग्रजीमधे लिहिलेय. घरी गेल्यावर एडीट करतो. तोपर्यंत फोटो बघा !
1) हिच ती भारलेली जागा. इथे दूरवर क्षितिजाजवळ दिसतोय तो समुद्र. इथेच मला मोंगियाने गेलेला दिवस परत मिळवून दिला होता.
2)
हि जागा थोडीशी रस्त्याच्या बाजूला आहे. याच रस्त्यावर पुढे अगदी रस्त्यावरच अशी जागा आहे. तिथे थोडी पार्किंगला जागा आहे, पण तिथे बहुदा गर्दी असते.
3) पण हि जागा मात्र खुप एकाकी होती... खास माझ्यासाठी
4)
५) हा रस्ता पुढे येमेनला जातो ( ओमानचा शेजारी देश )
6) आम्ही पुढे जाऊ शकलो असतो, पण पावसाची चिन्ह दिसायला लागली होती. आदल्या रात्री पाऊस पडलाही होता, म्हणून परत फिरलो.
7)
8) मग आम्ही एका खास जागेकडे निघालो
9) ही आहे प्रेषित जोआबची कबर. एका मोठ्या डोंगरावर ती आहे. इथून पुर्ण सलालाह दिसते आणि अर्थातच सलालाह मधून हा डोंगर. हे महाशय अल्लाचे निस्सिम भक्त होते. म्हातारपणी त्यांना डोंगर उतरून पाण्यासाठी जाणे जमेना. त्यांनी अल्लाची करुणा भाकली. अल्लाने त्यांना सांगितले, जिथे असाल तिथे फक्त जमिनीवर पाय दाबा. त्यांनी तसे केल्यावर तिथे एक झरा निर्माण झाला. उंच डोंगरावरचा तो झरा आजही वाहता आहे, आणि त्यांच्या पायाचा ठसाही
10)
खरं तर ही जागा खुप साधीसुधी आहे. पण मला खुप आवडते. आपल्या हैद्राबादचे एक गृहस्थ तिची देखभाल करतात. त्यांनी माझे स्वागत केले. मी त्यांना सांगितले कि मी पुर्वी आणि इतक्या वर्षांनी परत यावेसे वाटले
त्यांनी आशिर्वाद दिला
11)
हि ती कबर. हिच्या लांबीवरुन असे वाटतेय कि ते प्रेषित खुप उंच असावेत. इथे पैसे, फुले वगैरे वहायची नाहीत असे लिहिलेले आहे.
12)
हा त्यांच्या पायाचा ठसा. यामधूनही कधी कधी पाणी पाझरते. मागच्या भेटीत मी बघितले होते.
13) हे आहे Frankincense म्हणजेच धुपाचे झाड. या झाडाची राळ / डिंक म्ह्णजेच धूप. याला अप्रतिम सुगंध असतो. पण झाडाच्या बाकीच्या भागात मात्र असा सुगंध नसतो. हे झाड किमान ८/१० वर्षांचे असावे लागते तरच त्यातून धूप मिळवता येतो. कधी कधी हे झाड खडकावरही वाढते आणि तश्या वाढलेल्या झाडाचा धूप जास्तच सुगंधी असतो.
सध्या जरी हे झाड निष्पर्ण दिसत असले तरी याला पावसाळ्यात कढीपत्त्यासारखी पाने येतात. पानांना काही कास गंध नसतो. पांढर्या फुलांचा तुरा येतो. या झाडाची साल पातळ पापुद्र्यामधे सतत सुटत असते.
आपल्याकडे बहुतेक या झाडाला सालई असे नाव आहे. विदर्भात याची झाडे आहेत. बहिणाबाईंनी सालई आणि मोई हि झाडे एकत्र छान वाढतात, असे एका ठिकाणी म्हंटलेले आहे.
14)
15) तिथेच एका वेगळ्या प्रकारची मेंदी पण बघितली. हिच्या फुलांनाही छान सुगंध होता.
16) वरून दूरवर असे सलालाह दिसते.
17) आता कल्पना करा हे डोंगर हिरवेगार आहेत आणि मधोमध निळीशार नदी वाहतेय. तूम्ही पावसाळ्यात इथे गेलात तर अशी कल्पना करायची गरज नाही.. खरोखरच तसे असते. आणि हे दृष्य एका गूहेमधून टिपलेय.
18)
हिच ती गुहा. अगदी स्वच्छ राखलेली आहे. बसायला बाकेही आहेत.
19)
गुहेच्या वर ड्रॅगन सारखा आकार नैसर्गिकरित्या तयार झाला आहे.
20)
मला तिथे चित्रक दिसला..
21)
आणि धायटी पण. इतकी गोड वस्तू माझ्या तावडीतून सुटेल ? खाऊन टाकली मी. हो ही फुले खाण्याजोगी असतात. खुप गोड लागतात. आयुर्वेदातील आसवं ( द्राक्षासव वगैरे ) करण्यासाठी ही फुले वापरतात. महाराष्ट्रातील बहुतेक घाटांत रस्त्यांच्या कडेने हि फुललेली असते.
22 ) ध्यानधारणेसाठी आदर्श जागा ( खास करून समोर धबधबा असेल तर.. पावसाळ्यात तो असतोच. )
23 ) आणखी एका नदीचा उगम. इथे पाणी कमीत कमी २ फूट खोल होते तरीच अक्षरशः नितळ
24)
25)
इथे काही निसर्गशिल्पं दिसली.
26)
27)
अहमदने आपल्या मनानेच मला फिरवले. आणखी एक वादी दाखवतो म्हणून इथे घेऊन आला..
28)
इथला गाडीरस्ताच मुळी वादीमधून जातो
29) आणखी एक "कूल" जागा
30)
31)
32) आणखी काही निसर्गशिल्पं
33)
34)
35)
36)
37)
38) इथला रस्ताच वादीमधून जातो. तूम्हाला पाय भिजवायचे नसतील तर वेगळी वाटही आहेच, पण असे अरसिक कमीच असतील नाही ? आणि ती बाके बघितलीत का ? झुळ झुळ वाहणार्या पाण्यात पाय घालून निवांत बसणे.... . So Romantic
39) आणि अचानक या शेळ्या कुठूनतरी आल्या..
40)
तर हा सलालाहमधला शेवटचा दिवस होता. जायच्या आधी आम्ही तिथल्या शहाळे, पपया, केळी यांचा अस्वाद घेतला. तिथल्या बाजारातही भटकलो. ( सर्वात जास्त दुकाने धूप आणि अत्तरे विकणारीच आहेत. ) ठरले नव्हते तरी अहमदने मला एअरपोर्टवर सोडले. एअरपोर्टच्या रस्त्यावरही दुतर्फा नारळीचेच बन आहे. तिथेही नवीन
विमानतळ होतोय.
दोन दिवस सलालाहसाठी पुरेसे नाहीत. तिथे बघण्यासारखे अजून बरेच काही आहे.. ( हे मी मलाच समजावतोय बरं ! परत जायला बहाणा नको ? )
एअरपोर्टवर मात्र बराच वेळ बसावे लागले. विमान दोन तास उशीरा सुटले. काऊंटरवर चक्क मराठी माणूस होता.
मस्कतला पोहोचायला रात्रीचे साडेबारा झाले. रात्रीच्या त्या वेळेस, विमानतळासमोरचा रस्त्या क्रॉस करून, नेहमीची शेअर टॅक्सी करून मी मत्राह हॉटेलला पोहोचलो.. ( मुद्दाम लिहायचे कारण... भारताबाहेर असे धाडस मी फारच कमी देशांत करू शकेन. ) तर पुढच्या भागापासून मस्कत फिरु..
क्रमशः
मस्त फोटो आणि इंग्लिश वर्णन
मस्त फोटो आणि इंग्लिश वर्णन ही
ये धूप आला. मला आवडली ही
ये धूप आला.
मला आवडली ही जागा. काही अत्तरे घेतली का?
तिथे बायका सर्वांगी बुरखा घालत असल्याने त्यांचे गोरे मेहंदी लावलेले पाय पाण्यात बुडलेले किती सुरेख दिसत असतील. खरेच रोमँटिक.
आभार... अमा, अत्तरे मस्कतला
आभार...
अमा, अत्तरे मस्कतला घ्यायची होती.. पण .. ( पुढच्या भागात )
ओमानी बायका मनमोकळ्या असतात, त्या आपणहून बोलतातही. फार कमी जणी बुरखा / अबाया घेतात. तिथे तशी सक्ती नाही.
वाह!! क्या नजारा है!!!! मस्त
वाह!! क्या नजारा है!!!! मस्त मस्त मस्त!!!!
वाह, दिनेशदा, खरोखर फार सुंदर
वाह, दिनेशदा, खरोखर फार सुंदर ठिकाणे पहायला मिळाली तुमच्यामुळे ...
'कूल' फोटो, दिनेश ३३ व्या
'कूल' फोटो, दिनेश
३३ व्या फोटोत ते झाड नागाच्या फण्यासारखे दिसते आहे.
वा मस्त. विशेषतः धुपाचे झाड
वा मस्त.
विशेषतः धुपाचे झाड आणि गुहा जास्त आवडले फोटो. धुपाबद्दल पहिल्यांदाच वाचलं. चांगली माहिती.
शेळ्या खूप क्युट आहेत.
शेळ्या खूप क्युट आहेत.
सही!!! विदर्भात नवरात्रात
सही!!!
विदर्भात नवरात्रात राळ जाळतात. मस्त वास येतो. मी राळीचे झाड कधी पाहिलेले नाही. आमच्याकडे धुपाटण्यात राळ जाळतात.
मस्त जागा होत्या या सगळ्या.
मस्त जागा होत्या या सगळ्या. मी फोटो फारच कमी टाकलेत. शिवाय बहुतेक ठिकाणी, मी सोडल्यास एखादे कुटुंबच असायचे. त्यामूळे निवांत फिरता आले.
ओमानी लोक स्वतःहून बोलायला येतात. कुठून आलास ? हे बघितलंस का ? तिथे गेलास का ? असेही आवर्जून विचारतात. ते खात असतील तर खायलाही बोलावतात. तो त्यांचा धर्मच आहे.
बी, तूमच्याकडे बहुतेक सालई हे
बी, तूमच्याकडे बहुतेक सालई हे नावच असणार याचे.
इशान्य भारतातले आगरतळा या शहराचे नाव, याच झाडावरून पडले आहे.
फारच आवडला हा भाग.
फारच आवडला हा भाग.
व्वा धुपाचे झाड मेन्दी आस व
व्वा धुपाचे झाड मेन्दी आस व स ग ळेच अnokhe...
सगळे भाग छान ! उलटे बघत आले.
सगळे भाग छान ! उलटे बघत आले.
मस्तच !
मस्तच !
काय सुंदर जागा आहे! रखरखीत
काय सुंदर जागा आहे!
रखरखीत वाळवंटातुन तिथे पोहचल्यावर किती गारेगार वाटत असेल ना?
मला मुद्दाम सांगावेसे वाटतेय,
मला मुद्दाम सांगावेसे वाटतेय, फोटोतला भाग जरी रखरखीत असला तरी प्रवास मात्र आरामदायीच असतो. रस्ते सुंदर, गाड्या उत्तम.. त्यामूळे प्रवासाचा त्रास होत नाही. काही लागले तर छोटी सुपरमार्केट्स सगळीकडेच असतात. पब्लिक टॉयलेट्स पण असतात.
मी असे प्रवास तिथल्या उन्हाळ्यातही करत असे. ( यावेळी तर उन्हाळाही नव्हता. ) शिवाय इतर ठिकाणी प्रवास करताना, वाटेत गाडी बंद पडली तर, रस्त्यावर दंगल झाली तर, चोर आले तर... असे जे ताण मनावर असतात, ते ओमानमधे अजिबात नसतात.
वाह!!! मस्त फोटो. एवढे नितळ
वाह!!! मस्त फोटो.
एवढे नितळ पाणी फार पुर्वी आमच्या गावी नदीला असायचे. किती मस्त वाटत असेल त्या नितळ पाण्यात पाय सोडून बसायला.
वॉव! बरेच फोटो अद्भुत या
वॉव! बरेच फोटो अद्भुत या कॅटॅगरीत मोडणारे! सुंदरच!
अप्रतिम फोटो !
अप्रतिम फोटो !