माझी कविता कुणीतरी असावे

Submitted by princess on 28 January, 2015 - 01:48

माझी कविता कुणीतरी असावे
कुणीतरी असावे
कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणार
भरलेच डोळे कधी तर ओल आसवाना पुसणार !
कुणीतरी असावे
चादंन्याच्या बरोबर नेणार
अंधारलेल्या वाटेत आपल्या सोबत येणार !
कुणीतरी असावे
फुलासारख फुलणार
फूलता फूलता सुगंध दरवळणार !
कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणार
पालिकडील किनार्यावरून आपली वाट पहणार !
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस......
न संपणारे एखादे स्वप्न असावे..!
न बोलता ऐकू येतील असे शब्द असावेत.!
ग्रिष्मात पाऊस पाडतील असे ढग असावेत..!

Group content visibility: 
Public - accessible to all site users