खालील धागा वाचा आणि इथे पोल समजून मतदान करा.
प्रतिसादात मी दोन पर्याय देतो, त्यापैकी एकाला निवडा.
१) सई मला आवडते.
२) सई मला आवडत नाही.
सई = सई ताम्हाणकर = दुनियादारी गर्ल
होऊन जाऊ दे, दूध का दूध, पाणी का पाणी ..
सई आवडणार्या मूकवाचकांनी कृपया इथे आपली आवड बिनधास्त नोंदवावी.
आपले मतच बोलेल !!
______________________________________________
______________________________________________
सई मला आवडते - निकाल ! आणि निष्कर्ष !!
नाही जरी ‘सई’ तरी ...
http://www.maayboli.com/node/50822
वरील लेखावर आधारीत चार दिवसांपूर्वी गुरुवारी सकाळी काढलेल्या पोलचा हा रविवारी रात्रीपर्यंतचा निकाल.
(पुढेमागे थोडाफार बदलेन, बदलत जाईल, पण तुर्तास पोलचे उद्दीष्ट साध्य झाल्याने यालाच प्रमाण मानूया)
सई मला आवडते - ३० मते
सई मला आवडत नाही - १२१ मते
पण हा निकाल ईथेच संपत नाही!
यातून निष्कर्ष निघणेही तितकेच गरजेचे आहे, आणि पोलकर्ता म्हणून तो मी काढणे हे माझे कर्तव्य आणि माझी जबाबदारी आहे.
मुळात हा पोल मी का काढला???
सई न आवडणार्या लोकांपेक्षा सई आवडणार्यांची संख्या जास्त आहे हे मला दाखवायचे होते का???
किंवा तसे झाले असते तर मी जिंकलो असतो का???
तर याचे उत्तर आहे, अर्थातच .. " नाही " !!
माझ्या सईच्या लेखावर, किंवा सईच्या माझ्या लेखावर म्हणूया, कित्येकांनी गरज नसताना नकारात्मक प्रतिसाद दिले. अगदी विरोधालाच विरोध करायचे म्हणून पुरते टोकाचेही दिले. ज्यातून एक असे चित्र निर्माण झाले की अरे हि अभिनेत्री कोणालाच आवडत नाही का? पण अर्थातच हे धादांत खोटे होते. कारण हि वस्तुस्थिती असती तर आज रिलीज होणार्या कित्येक महत्वाच्या चित्रपटांमध्ये कोणत्याही निर्मात्या दिग्दर्शकाने तिला घेतलेच नसते. तिच्या गत दोनेक वर्षात आलेल्या आणि भविष्यात येऊ घातलेल्या चित्रपटांची संख्या पाहता तिची जी लोकप्रियता निर्विवादपणे आहे तीच मला आकड्यांची भाषा चटकन समजणार्यांना दाखवायची होती...........
आणि ती दिसली!
सर्वप्रथम ‘सई मला आवडते’ या पर्यायाला मत देणार्या माझ्यासह सर्वच सभासदांचे मी आभार मानून अभिनंदन करतो.
आणि आता सईची लोकप्रियता दाखवणारा खरा आकडा जोडून दाखवतो, तो असा -- ३० + १२१ = १५१ मते टोटल!
गुरुवारी सकाळी मी हा पोल काढल्यावर १ ल्या तासाभरातच जवळपास ३५ ते ४० जणांनी मतदान केले.
पावणे २ तासांतच ५० शी गाठली गेली..
रात्री झोपण्यापूर्वी मी हा आकडा ९० दीच्या घरात पोहोचलेला पाहिला..
आणि २ र्या दिवशी २४ तास उलटून जातात न जातात तोच १०० फलकावर लागले होते!
विकांताचा फायदा उचलत आज रविवार मावळताना केवळ साडे ३ दिवसांच्या मतदानानंतर तब्बल १५१ जणांनी या धाग्यावर हजेरी लावत आपले मत नोंदवले.
हा आकडा मायबोलीची सक्रियता लक्षात घेता छोटा कि मोठा असा विचार करता मला सहज सुचले का नाही याची तुलना भरभरून प्रतिसाद मिळालेल्या गणेशोत्सवातील मतदानाशी करावी, तेव्हा मला खालील आकडे आढळले.
स्पर्धा - मलाही कोतबो - १२१ टोटल मते.
स्पर्धा - आता कशाला शिजायची बात - १४२ टोटल मते.
(मतदानाचा कालावधी - साधारण आठवडा!)
सई ताम्हाणकर - १५१ टोटल मते
(मतदानाचा कालावधी - साडे ३ दिवस!)
आता या निकालाचे आणि निष्कर्षाचे मोजमाप करणारे माझ्या लेखातीलच वाक्य पुन्हा एकदा देतो -
यू कॅन हेट हर, यू कॅन लव हर ..
बट बट बट..
यू कॅन नॉट कॅन नॉट ..
इग्नोर हर!
सई ताम्हाणकर!
- ऋन्मेऽऽष
जाता जाता -- एक प्रतिसाद असा आला कि कोण सई???? तर त्या सद्गृहस्थांना मी सांगू इच्छितो, याचे उत्तर मायबोलीवरील या साडे ३ दिवसांत सक्रिय असणार्या त्या १५१ पैकी कोणत्याही सभासदाला नक्की विचारा
१) सई मला आवडते.
१) सई मला आवडते.
२) सई मला आवडत नाही.
२) सई मला आवडत नाही.
वेळ जात नाहीये का
वेळ जात नाहीये का
३ विरुद्ध १४ १ न्युट्रल लगे
३ विरुद्ध १४
१ न्युट्रल
लगे रहो
वेळ जात नाहीये का >>>> इन्ना,
वेळ जात नाहीये का >>>> इन्ना, कोणाचा? सईचा का ऋन्मेशचा?
सई माझ्या डोक्यात
सई माझ्या डोक्यात जाते.....मंद माठ दिसते
१ न्युट्रल ?? आपण स्वता का?
१ न्युट्रल ??
आपण स्वता का?
वेळ जात नाहीये का >>>> इन्ना,
वेळ जात नाहीये का >>>> इन्ना, कोणाचा? सईचा का ऋन्मेशचा?
>>>>>>>
की आपल्याला कोणीतरी आवडत नाही हे वेळ खर्ची करून सांगणार्यांचा..
माझे म्हणाल तर मला ती आवडते, तिच्यासाठी आयुष्यातील चार-चौदा क्षण खर्ची केलेच तर ते आणखी मौल्यवान होतील.
४ वि. २२ ही तर वन साईड मॅच
४ वि. २२
ही तर वन साईड मॅच होणार असं दिसतंय !
सई म्हणजे मराठीतली 'किम
सई म्हणजे मराठीतली 'किम कार्दाशीन ' .
यापैकी काहीही नाही हा पण
यापैकी काहीही नाही हा पण पर्याय द्यायला हवा होता. कारण नेहमीच आवडत नाही कधीतरी आवडुन जाते एखाद्या सिनेमात असही असू शकत ना?
विक्रम गोखलेंच्या एका सिनेमात ती अगदी घरगुती अवतारात होती त्यांची सुन असते. सासु दवाखान्यात असते आणि सासरे उपचाराच्या पैश्यासाठी वणवण फिरत असतात तेंव्हा जबाबदार सून ही भूमिका चांगली वठवलिये तिने.
अरे संमि उर्फ सरडा कसा नाही
यापैकी काहीही नाही हा पण
यापैकी काहीही नाही हा पण पर्याय द्यायला हवा होता. कारण नेहमीच आवडत नाही कधीतरी आवडुन जाते एखाद्या सिनेमात असही असू शकत ना?
विक्रम गोखलेंच्या एका सिनेमात ती अगदी घरगुती अवतारात होती त्यांची सुन असते. सासु दवाखान्यात असते आणि सासरे उपचाराच्या पैश्यासाठी वणवण फिरत असतात तेंव्हा जबाबदार सून ही भूमिका चांगली वठवलिये तिने.
>>>>>>>
सकारात्मक विचार करा - न आवडण्याची कारणे शोधण्यापेक्षा आवडल्याचे एक कारण मिळाले आहे ते बघून मत द्या.

अशी विचारप्रक्रिया आपणा सर्वांना एक चांगला माणूस बनायला मदत करते
ओ दादा, उगा एका आवडीनावडीवरुन
ओ दादा, उगा एका आवडीनावडीवरुन माणसाच्या चांगुलपणाचा लेखाजोगा मांडु नका हो. असो.
सई जाडी आहे आणि तिला ड्रेसिंग
सई जाडी आहे आणि तिला ड्रेसिंग सेंन्स नाही.
कमी कपड्यात तर ती जास्त च वाईट दिसते.
६ वि. ३६. नंबर्स सेज इट ऑल.
६ वि. ३६. नंबर्स सेज इट ऑल.
६ वि. ३६. नंबर्स सेज इट
६ वि. ३६. नंबर्स सेज इट ऑल.
>>>
हा अंतिम निकाल नाहीये.
नाही नाही वाले पहिल्या तासाभरातच तुटून पडले, हळूहळू ती आवडणारे पण आपला संकोच बाजूला ठेवून येतील.
महत्वाचे म्हणजे इथे आतापर्यंत माझे पकडून ६ मत आलेत, जे त्या धाग्यावर नव्हते हे लक्षात घ्या.
महत्वाचे म्हणजे इथे आतापर्यंत
महत्वाचे म्हणजे इथे आतापर्यंत माझे पकडून ६ मत आलेत, जे त्या धाग्यावर नव्हते हे लक्षात घ्या.
<<
<<
तुमच्या अजुन/एकुण कीती "आयडी" आहेत इथे.
तुमच्या अजुन/एकुण कीती "आयडी"
तुमच्या अजुन/एकुण कीती "आयडी" आहेत इथे.
>>>>>
१) हा प्रश्न पोलचे गांभीर्य घालवतो.
२) तसे नसेल तर, ३६ लाही लागू होतो.
हा अंतिम निकाल
हा अंतिम निकाल नाहीये.
ऋन्मेऽऽष भाऊ,
किती प्वाईंटांची मॅच आहे हे तरी सांगा.
म्हणजे किती पॉईंट पर्यंत हे चालु ठेवणे अपेक्षित आहे?
घ्या आत्ताच सई आवडते ला फक्त
घ्या आत्ताच सई आवडते ला फक्त ७ आणि आवडत नाही ला ५० मतं मिळाली आहेत
अजून काय हवं तुम्हाला? शितावरून भाताची परिक्षा करतात तसंच आहे हे. धागा बंद करा.
तुमचा आणि आमचा सर्वांचा वेळ वाचवा.
चला हवा येऊ द्या.
प्रसन्न, काही लोक वीकडेजमध्ये
प्रसन्न,
काही लोक वीकडेजमध्ये लॉगिन असतात तर काही जण फक्त वीकेंडमध्ये,
त्यामुळे सोमवारी सकाळी लागेल जवळपास खराखुरा निकाल
ह्याने साध्य काय होणार? इतर
ह्याने साध्य काय होणार? इतर अनेकींप्रमाणेच सई ताम्हणकर एक अभिनेत्री असून तिला चरितार्थ चालविण्यापुरते चित्रपट/ मॉडेलिंग / नाटके इत्यादींमधून काम मिळते आहे असे दिसते. आपल्याला ती आवडते / न आवडते या मतदानाचा निष्कर्ष काहीही असला तरी तिच्या व्यावसायिक कारकीर्दीवर परिणाम होईल असे वाटत नाहीये. जर या मतदानाचा निष्कर्ष वाचून चित्रपटनिर्माते सई ताम्हणकरला चित्रपटांतून काम द्यायचे / नाही द्यायचे / तिचे मानधन वाढवायचे / कमी करायचे याचा निर्णय घेणार आहेत का?
गेला बाजार इतरांची आवड निवड पाहून लेखकाचे स्वतःचे मत तरी बदलणार आहे का? वर ज्या धाग्याची लिंक दिलीय तो वाचता लेखकाची सई ताम्हणकर हीच स्वप्नसुंदरी असल्याबाबतचे मत ठाम आहे हे जाणवते. ते बदलणे अशक्यच आहे. याउलट प्रतिसादकांचे नकारात्मक मत बदलणेही अवघडच आहे.
"माळ्याची मका आणि कोल्ह्यांचे भांडण" यातलाच प्रकार दिसतोय.
चेतन अनुमोदन खूप खूप.
चेतन अनुमोदन खूप खूप.
चे.सु.गु, अपवादात्मक अपवाद हा
चे.सु.गु,
अपवादात्मक अपवाद हा फराह खान आधारीत लेख आपलाच ना.
तसाच मी सईवर लेख लिहिला.
तिथे आपल्या लेखावर मी साजिद खान या तिच्या भावाला तिच्या आधीपासून ओळखतो, तो मला जास्त आवडतो, तसेच मी त्याला जास्त मानतो असे म्हणताच आपण गूगल सर्च केल्यावर कोणाचे रीझल्ट जास्त येतात इथवर आकडेवारी निर्माण केली होतीत.
आता मला सांगा आपल्या दोघांमधील वादाने/चर्चेने त्या खान बंधु भगिनीच्या प्रेमात काही फरक पडणार होता का? नाही नं, तरीही चार-चौदा पोस्टपोस्ट खेळलोच ना आपण. तसेच हे
घ्या आत्ताच सई आवडते ला फक्त
घ्या आत्ताच सई आवडते ला फक्त ७ आणि आवडत नाही ला ५० मतं मिळाली आहेत> दक्षिणा , 'वेळ जात नाहीये का' आणि 'सई माझ्या डोक्यात जाते.....मंद माठ दिसते' चा काऊंट पण अॅड कर.
तो झपाटलेला बाहुल्याबरोबर
तो झपाटलेला बाहुल्याबरोबर ह्या भोपळीचा नुकताच म्हणे एक जगप्रसिद्ध सिनेमा येवुन गेला.
'वेळ जात नाहीये का' आणि 'सई
'वेळ जात नाहीये का' आणि 'सई माझ्या डोक्यात जाते.....मंद माठ दिसते' चा काऊंट पण अॅड कर.
>>>>>
वाह काय पण लॉजिक गंडलय !
काउंट करायची घाई करू नका भगिनींनो, सोमवारी निकाल आणि (प्रामाणिक) निष्कर्श दोन्ही देतो.
अवांतर - निष्कर्श हा शब्द बरोबर आहे का हो, या शब्दातील दोन ष-श मध्ये माझा नेहमी गोंधळ उडतो
मला सई आवडते या पर्यायाला
मला सई आवडते या पर्यायाला मायनस मध्ये मत द्यायचे आहे. त्याची सोय आहे का??
आशु ऋन्मेष सोमवार परेंत असा
आशु

ऋन्मेष सोमवार परेंत असा काय उजेड पडणार आहे म्हणे
मला सई आवडत नाही याचे जरा
मला सई आवडत नाही याचे जरा मोठे कारण-
१) तिला अजीबातच ड्रेस सेन्स नाही. ( टोचा अनुमोदन) बिकीनी घालण्यासाठी कमनीय बान्धा/ फिगर लागते( कुर्बानी मधली झीनत अमान आठवा), जी सई जवळ अजीबात नाही, उलट त्यात ती ढब्बाडी बोजड वाटते.
२) ती खात्या-पित्या घरातली वाटते, त्यामुळे हिन्दी अथवा पन्जाबी फिल्म्स मध्ये पन्जाबी कुडी शोभेल. अब्सॉल्युटली नो मराठी लुक्स! ( जे उर्मिला कानेटकर कडे आहेत)
३) सारखीच हसत बसते, त्यामुळे डोक्यात जाते. माधूरी माझी आवडती आहे, पण त्ती ही जास्त हसलेली मला आवडत नाही.( जान्हवी सारखे)
४) अनावश्यक अन्गप्रदर्शन करत रहाते.(सन्दर्भ :- फुबैफु ची फायनल की त्यातला एक भाग)
५) लबाड मान्जर वाटते. ( उन्च माझा झोकातल्या सुभद्रा काकु सारखी)
हुश्श!
सई म्हणजे मराठीतली 'किम
सई म्हणजे मराठीतली 'किम कार्दाशीन ' ...>>>... सॉरी... घाई-घाईत मी ते 'कैदाशीण' असं वाचलं...
आता मत नोंदवणं गरजेचं(च) आहे का?...
व्हीडी मी पण तेच वाचलेलं
व्हीडी मी पण तेच वाचलेलं चुकुन.
अरे बरोबर वाचलंत की माफी
अरे बरोबर वाचलंत की

माफी कशाला मागताय
आपला पास . चित्रांगदा
आपला पास . चित्रांगदा नाराज होईल
दक्षिणाजी, धन्यवाद. रिशी
दक्षिणाजी,
धन्यवाद.
रिशी पकूर / ऋन्मेऽऽष
<<तिथे आपल्या लेखावर मी साजिद खान या तिच्या भावाला तिच्या आधीपासून ओळखतो, तो मला जास्त आवडतो, तसेच मी त्याला जास्त मानतो असे म्हणताच आपण गूगल सर्च केल्यावर कोणाचे रीझल्ट जास्त येतात इथवर आकडेवारी निर्माण केली होतीत.>>
तिथले सर्व प्रतिसाद नीट पुन्हा एकदा वाचावेत. तुम्ही "फराह साजिदची बहीण का?" असे विचारल्यावर मी "तिची तशी आधीपासून ओळख करून द्यायची गरज नसून ती साजिद च्या आधीपासून प्रसिद्ध आहे" हा मुद्दा मांडला होता. तिथे कोण कोणापेक्षा अधिक प्रसिद्ध आहे याविषयी वाद होता. तुमची वैयक्तिक आवड / निवड काय आहे यावर मी वाद घातला नव्हता कारण तुमची आवड मी बदलू शकत नाही. इथेही तुम्हाला सई आवडते या मताचा मी आदरच करतो व मी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये किंवा सई वरही कुठलीही आक्षेपार्ह शेरेबाजी केलेली नाहीये.
फक्त इतरांना ती किती आवडते यावर मतदान घेऊन तुम्ही "येरे बैला आणि घाल शिंग सईच्या ..." असा प्रकार केला आहे.
माझा मुद्दा एवढाच की या मतदानाचा सईला काहीच फायदा किंवा तोटा होणार नाही. तुम्हालाही आर्थिक तर सोडाच मानसिक देखील फायदा होण्याची शक्यता दिसत नाहीये. तुमच्या धाग्यावर तुमच्या स्वतःच्या सोडल्या तर इतर कुणाच्याही सईविषयी फारशा चांगल्या प्रतिक्रिया नाहीत. तिच्या बौद्धिक आणि शारिरीक वैशिष्ट्यांवर अनेकांनी जी शेरेबाजी केली आहे ती तिच्या खर्या चाहत्याला दुखावू शकतात. आपण तिचे खरे चाहते असाल तर याबद्दल आपणांस दु:ख व्हायला हवे. तिच्यावर अशी शेरेबाजी प्रत्यक्ष आपण केली नसली आपल्या या धाग्यामुळेच इतरांना करायची संधी मिळाली म्हणजे आपण यास अप्रत्यक्ष रीत्या जबाबदार आहात. तिथे माझ्या त्या धाग्यावरही आपण साजिद खानाचे उदंड कौतूक केल्याने इतरांनी त्याच्यावर बरीच तिखट टीका केली होती. मूळात माझ्या लेखात साजिद खानाचा उल्लेख देखील नव्हता. प्रतिसादाच्या रुपाने आपणच त्याचा उल्लेख केलात आणि इतरांना शेरेबाजीची संधी दिलीत.
साजिद खान व आता सई ताम्हणकर या दोघांविषयी आपण बहुदा वर्तमानपत्रात / इतर सामाजिक प्रसार माध्यमात व्यक्त होणारी मतमतांतरे वाचत नाहीत. ह्या दोघांच्या प्रशंसकांपेक्षा विरोधकांची संख्या मोठी लक्षणीय आहे. सबब ह्या दोघांचा (किंवा यांच्या सारख्याच इतर अनेक जणांचा - उदा. महागुरू सचिन पिळगांवकर, अर्चना पुरणसिंग, अलिया महेश भट्ट, यमि गौतम, इत्यादी.. यादी बरीच मोठी आहे) संकेतस्थळांवर विषय काढला असता त्यांचे विरोधक जहाल शेरेबाजी करतात हा नेहमीचा अनुभव आहे.
त्यांना अशी संधी उपलब्ध करुन देणारे त्यांचे खरे चाहते (ट्रू फॅन) आहेत की छद्म चाहते (स्यूडो फॅन) आहेत ही शंका येते.
साजिद खान व आता सई ताम्हणकर
साजिद खान व आता सई ताम्हणकर या दोघांविषयी आपण बहुदा वर्तमानपत्रात / इतर सामाजिक प्रसार माध्यमात व्यक्त होणारी मतमतांतरे वाचत नाहीत. ह्या दोघांच्या प्रशंसकांपेक्षा विरोधकांची संख्या मोठी लक्षणीय आहे. सबब ह्या दोघांचा (किंवा यांच्या सारख्याच इतर अनेक जणांचा - उदा. महागुरू सचिन पिळगांवकर, अर्चना पुरणसिंग, अलिया महेश भट्ट, यमि गौतम, इत्यादी.. यादी बरीच मोठी आहे) संकेतस्थळांवर विषय काढला असता त्यांचे विरोधक जहाल शेरेबाजी करतात हा नेहमीचा अनुभव आहे.>>>>> ऋन्मेष तुम्हाला माबो जॉइन करुन फार दिवस झालेले नाहीत, तरी आधीच्या कहाण्या महागुरु वगैरेन्विषयी वाचा, म्हणजे तुम्हाला आमचा विरोध लक्षात येईल.:स्मित: ( या कहाण्या माबोच्या उपग्रह वाहिनी च्या एकापेक्षा एक या बाफावर वाचा. )
कलाकार हा शिकत असेल तर तो पुढे जातो, अन्यथा त्याचा कुमार गौरव व्हायला वेळ लागत नाही.
लै भारी पोस्ट चेसुगु!
लै भारी पोस्ट चेसुगु!
सई म्हणजे मराठीतली 'किम
सई म्हणजे मराठीतली 'किम कार्दाशीन ' ...>>>... सॉरी... घाई-घाईत मी ते 'कैदाशीण' असं वाचलं...
आता मत नोंदवणं गरजेचं(च) आहे का?...
>>
रश्मी कसं गं होणार तुझं?
रश्मी


कसं गं होणार तुझं?
जुजा माबोकर ना तू?
मला वाट्त हा तमाशा बास झाला.
मला वाट्त हा तमाशा बास झाला. चुकुन त्या सईने वाचल तर ती तिच्याबद्द्ल काहितरी उलट्सुलट लिहलय म्हणून कायदेशीर कारवाई वगैरे करेल अस वाट्तय..........
मला वाट्त हा तमाशा बास झाला.
मला वाट्त हा तमाशा बास झाला. चुकुन त्या सईने वाचल तर ती तिच्याबद्द्ल काहितरी उलट्सुलट लिहलय म्हणून कायदेशीर कारवाई वगैरे करेल अस वाट्तय..........>>>

हॅ हॅ हॅ, असल्या पोस्टस कडे सेलिब्रेटिज लक्ष द्यायला लागल्या म्हणजे सम्जुन जा की त्यांना काम नाहीये.. आणि भरपुर वेळ आहे
चेसुगु, चांगली भली मोठी पोस्ट
चेसुगु,
चांगली भली मोठी पोस्ट लिहिलीत, तिचा सारांश मला समजला.
आपल्या प्रश्नाचे/पोस्टचे उत्तर निकालात/निष्कर्शात आपल्याला मिळेलच याची खात्री बाळगा.
सोमवारी सकाळी नक्की वाचा
विक एन्डला डुल्पिकेट आयडीज
विक एन्डला डुल्पिकेट आयडीज काढायचा विचार आहे का?

सोमवारी सकाळी वाचा म्हणतो आहेस सारख म्हणुन विचरल
अदिती, स्वताचा आयडी कित्येक
अदिती,
स्वताचा आयडी कित्येक तपांच्या प्रतीक्षेनंतर इथे स्विकारला गेला, तर ड्यूआयड्या कसल्या निघताहेत दोन-चार दिवसांत.
ते तर रविवापर्यंत पोलिंगचा फायनल निकाल हाती येईल त्यानुसार जो काही निकाल लागेल तो प्रामाणिकपणे अॅक्सेप्ट करत त्यावर माझे दोन शब्द लिहेन ईतकेच. त्यानंतर माझ्यासाठी हा विषय संपला, किंबहुना हा पोल काढतानाच मी वाद-प्रतिवाद घालणे बंद करायचे ठरवेलेयच. उगाच धागा सुरू करून पळाला असा ओरडा नको म्हणून उपस्थिती दाखवतोय बस्स!
ए रिया हे जुजा काये? विक
ए रिया हे जुजा काये?:फिदी:
विक एन्डला डुल्पिकेट आयडीज काढायचा विचार आहे का? हाहा
सोमवारी सकाळी वाचा म्हणतो आहेस सारख म्हणुन विचरल>>>>>>>
बहुतेक.( हा बहुतेक ब्रॅकेट मध्ये घालावा):--
१) सोमवारपर्यन्त ऋन्मेष सगळ्या ओळखी-पाळखीच्या लोकाना माबो जॉईन करायला सान्गुन सई साठी कौले- वीटा गोळा करेल.
२) सर्व सईच्या पन्ख्याना, जे फेसबुक, काये, टिवटिव, ऑर्क्कुट्/ बोरकुट् / चिरकुट्वर पडीक असतात, त्याना माबो वर यायला सान्गेल. आणी सईला कौले द्यायला सान्गेल.
३) प्रत्यक्ष सईलाच माबो जॉईन करायला लावुन तिला तिची बाजू मान्डायला लावेल.
४) या वरील पैकी काही झाले नाही तर थन्ड राहील, आणी धाग्याला गाठ मारेल.
रश्मी, जुजा म्हणजे जुनीजाणती
रश्मी,
जुजा म्हणजे जुनीजाणती असावे.
रिया मॅडमना आता मी बरेपैके ओळखू लागलोय त्यावरून हा अंदाज.
खाली जे आपण ४ आकडे टाकलेत त्या आणखी १४ ची भर टाका पण मी करतो तेच जे योग्य असते, प्रामाणिक असते, पळ काढणे वा फसवणूक मला जमत नाही. हा एवढाच एक गुण घेऊन जन्माला आलोय बाकी दुर्गुणांची कमी नाही.
ए हे काय एवढे मनाला लावुन
ए हे काय एवढे मनाला लावुन घेतोस? मला अमिताभ आवडतो, त्यावरुन माझ्या जवळच्यानी किती नावे ठेवलीत त्याला, अजून ठेवतात. पण मी राग नाही मानत. कारण...........................
प्रेम आणी श्रद्धा डोळस असावी.:स्मित:
ओये, मनाला कुठे कोण लाऊन
ओये, मनाला कुठे कोण लाऊन घेतेय.
सई मला आवडते १७ झालेय, आहात कुठे
पण सई आवडत नाही, ह्याची
पण सई आवडत नाही, ह्याची सेंच्युरी होत आली आहे...आहात कुठे
Pages