१. २ टेबलस्पून तेल.
२. २ सुक्या मिरच्या (तुकडे करून)
३. थोडी कढीपत्याची पाने. (बारीक चिरून)
४. १/२ चमचा बडिशेप
५. २ मध्यम कांदे बारीक चिरून
६. १ टॉमॅटो बारीक चिरून
७. २ चमचे आले+लसूण पेस्ट
८. १/२ ते ३/४ चमचे मीठ.
९. १/२ चमचा हळद.
१०. १ चमचा तिखट
११.२ चमचे धणेपूड
१२. १ चमचा मिरीपूड
१३. १ चमचा गरम मसाला
१४. २ टेबलस्पून खोबरे
१५. १/२ चमचा बडिशेप
. तेल गरम करा.
. त्यात (२/३/४ मधले जिन्नस घालून फोडणी करा).
. तडतडल्यावर कांदा परतून तेल सोडेपर्यंत शिजवा (थोडे मीठ शिवरल्यास कांदा लवकर शिजतो).
. आले+लसून पेस्ट, टोमॅटो आणि मीठ टाका. टोमॅटो अगदी पूर्ण शिजू द्या.
. सगळे मसाले (९ -१३) टाकून २/३ मिनिटे परतून घ्या.
. दु सर्या कढईत खोबरे बडिशेप (१४-१५) थोडी तपकिरी होईपर्यंत भाजून/ परतून घ्या. १/२ कप पाणी घालून मिक्सरमधे बारीक वाटून घ्या. दोन्ही मसाले मिसळून घ्या.
काय करायचे आहे ते ठरवा. चिकन (१/२ किलो), कोलंबी १/२ किलो साफ करून उरेल ती, चिंबोर्या मोठ्या ६ साफ करून.. भरली वांगी ६/८ लहान..यापैकी एक काहीतरी घ्या.
थोड्या तेलावर परतून घ्या. (चिकन्/चिंबोर्या, कोलंबी).
वांगी असतील तर भरली वांगी करताना चिरतात तशी चिरून त्यात सगळा मसाला भरा. आणि कुकरमधे शिकवा.
चिकन असेल तर तुकडे करावे लागतील.
चिकन्/कोलंबी/चिंबोर्या असतील तर मसाल्याबरोबर शिजवून घ्या.
शिजवताना थोडे पाणी हवेच. (रस्सा मस्त लागतो भात/चपाती बरोबर).
१. आमच्या इकडे आरूसुवाई नामक खानावळीत गेलो होतो. चेट्टीनाड वांगी आणि चेट्टीनाड चिंबोरी खाल्ली. तुफान आवडली. म्हणून घरी येऊन नेटवर शोधून अजून काही प्रयोग करून केली.
२. करायला सोपी आहे, पण डोके वापरावे लागते.
३. कुणाही मद्रासीला खायला घालून प्रयोग केलेला नाही.
४. तिखट कमी जास्त करता येईल.
.
.
.
http://www.maayboli.com/node/49007 अमेरिकेत डोकं न वापरता उंधियू
http://www.maayboli.com/node/45519 'खडे आलू' अर्थात बाळ्-बटाटे
http://www.maayboli.com/node/46057 मालवणी भाजाणे वापरून केलेल्या पाककृती (व्हिडिओ)
http://www.maayboli.com/node/45955 पास्ता
http://www.maayboli.com/node/45519 बाळ बटाटे
http://www.maayboli.com/node/42083 कोवळा फणस
http://www.maayboli.com/node/46123 डाळ पक्वानची डाळ
कोलंबी घालून कधी खाल्ला /
कोलंबी घालून कधी खाल्ला / केला नाही हा प्रकार. आता करुन पाहीन,
खोबरे - ओले की सुके ?
हा ऑथेन्टिक चेट्टीनाड मसाला
हा ऑथेन्टिक चेट्टीनाड मसाला वाटत नाहीये. आमच्या सेल्व्ही बाई करायच्या तेव्हा त्यात नागकेशर, वेलची, मिरी, असलं बरंच काहीबाही कढईत परतून मग ते वाटून घ्यायच्या. घरात असला घमघमाट सुटायचा की त्यानंच भूक खवाळायची. मागे चेट्टीनाडवर एक आर्टिकल केलं होतं त्यासाठी तिची मसाल्याची रेसिपी मी लिहून घेतली होती.
ऑथेन्टिक चेट्टीनाड असो, नसो -
ऑथेन्टिक चेट्टीनाड असो, नसो - एकुणात चविष्ट वाटतो आहे. घरी नॉनव्हेज बनवणार्या मेम्बरांना पाकृ देण्यात येईल
अहो डोक कधी वापरायचे ते लिहा
अहो डोक कधी वापरायचे ते लिहा ना :))
नक्की करुन बघणार. नेहमी तोचतोच मसाला करुन कंटाळा येतो.
प्रकार टेस्टी
प्रकार टेस्टी वाटतोय.
हैद्राबादीचा काय संबंध?
हवं तर मद्राश्याला म्हणा.
नंदिनी , तू सेल्वीला विचारून टाक अजून ऑथेंटिक कृती असली तर.
मस्त वाटतेय रेसिपी! बडीशेपेने
मस्त वाटतेय रेसिपी! बडीशेपेने फ्लेवर वेगळा येत असेल एकदम . चिकन वापरून करून बघणार.
काल आमच्याकडे मुघलचं
काल आमच्याकडे मुघलचं हैद्राबादी चिकन आलं होतं. हेच इन्ग्रेडियंट्स असावेत, भरीला म्हणून नारळाच्या दुधाची चव वाटत होती.
अरे वा .. छान वाटते आहे
अरे वा .. छान वाटते आहे रेसिपी .. मेधाचाच प्रश्न मलाही पडला आहे .. खोबरं ओलं की सुकं?
रेसिपी लिहीण्याची स्टाईल एखादं अॅल्गॉरिदम लिहील्यासारखी आहे ..
(BTW भरली वांगी तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेता? एकदम पिठलं नाही का होत त्याने त्या वांग्यांचं?)
तुम्ही अगदी सोप्या भाषेत
तुम्ही अगदी सोप्या भाषेत लिहिले आहे. मसाला पण सोपा दिसतोय. तरीही क्र.२ च्या सुचनेप्रमाणे डोके वापरावेच लागेल का? शाकाहारी करण्यात येईल.
क्या तोबी लिकरे नवाबसाब,
क्या तोबी लिकरे नवाबसाब, इस्कू बोल्ते क्या चेट्टीनाड? फिरबी अच्छाइच दिकरा. आप लोगां बैंगन को कुक्कर में पढांते क्या? क्या पढेंगा जि बैंगन. तुम ठीक इच बनाते सब चीजां. बेगम साहिबा को पसंद आया क्या? मेरेकु कोई बनाको दिया तो मै बैंगन भी खातुं. खुद कर ना बोले तो चिकन बनातुं.
दिवे घ्या साहेब. मजा म्हणून हैद्राबादीत लिहिले आहे. पण चेट्टीनाड चेन्नै चा प्रकार आहे.
छान रेस्पी विनय. काहीतरी एक
छान रेस्पी विनय. काहीतरी एक पैकी एकच पर्याय करता येण्यासारखा आहे, तो नक्की करणार!
>>थोडे मीठ शिवरल्यास कांदा लवकर शिकतो
हाच प्रयोग इतरांनाही लागु पडेल कै
वा छानच वाटते आहे रेसिपी.
वा छानच वाटते आहे रेसिपी. करुन बघणार वांगी घालुन.
झोपलं की सगळं.. चेट्टीनाडला
झोपलं की सगळं.. चेट्टीनाडला हैद्राबादी शेंडी लावली मी. आता बदलतो.

मेधा.. खोबरं ओलं वापरलं.. जरा रस्सा चांगला व्हावा म्हणून..
नंदिनी... >>> नागकेशर, वेलची >>>> वगैरे काय तेही लिहा...
अहो डोक कधी वापरायचे ते लिहा ना<<< काय घालायचे हे ठरवताना वापरावे. म्हणजे चिकन आणि वांगी एकदम घालू नये..
रेसिपी लिहीण्याची स्टाईल एखादं अॅल्गॉरिदम <<<< मग काय तर.. अगदी स्टेप बाय स्टेप... (आता तू त्यात कच्ची केळी शिजवणार त्याला काय करावे)...
भरली वांगी तुम्ही कुकरमध्ये शिजवून <<< एक शिट्टी आणि एकदम मस्त..
मजा म्हणून हैद्राबादीत लिहिले आहे << Noted..
अगदी स्टेप बाय स्टेप >>
अगदी स्टेप बाय स्टेप
अर्चू एफेक्टेय का हा? 
>>
वांगी आवडत नाहीत, चिकन/चिंबोरी/कोळंबी खात नाही

पण आईला वांगं आवडतं तेंव्हा तिच्यासाठी माझ्याकडुन सर्प्राईज कुकिंगचा बेत असेल तेंव्हा करुन पाहीन
अर्चू एफेक्टेय का हा? <<< मी
अर्चू एफेक्टेय का हा? <<< मी बेफि थोडाच आहे?

वांगी आवडत नाहीत, <<< तर बटाटे घाला.. हाकानाका..
तुम्ही बेफी नसला तरी अर्चू
तुम्ही बेफी नसला तरी अर्चू माहेरची देसाई आहे ना
बटाटे? सिरिअसली? ट्राय करायलाच हवे मग तर
पनीर चालेल का?
)
(सायो बघ गं
बघतांव.. रिया, ते प्रश्न
बघतांव.. रिया, ते प्रश्न टाळायलाच हेडरमध्ये ऑप्शन्स आहेत. त्यात आता पनीर, बटाटे आले की सुडोमि
कोण अर्चू ?
कोण अर्चू ?
मैत्रेयी , अर्चू हे जुयेरेगा
मैत्रेयी , अर्चू हे जुयेरेगा (हो तीच ती गोगांची आवडती सिरिअल) मधलं पात्रं आहे जी सगळं स्टेप बाय स्टेप करते
कोण अर्चू ? <<< तुला अर्चू
कोण अर्चू ? <<< तुला अर्चू माहित नाही... देसाई असूनही? कमाल आहे..
आणि मला वाटले की तू माबोवर सगळीकडे असतेस...
>>अर्चू हे जुयेरेगा (हो तीच
>>अर्चू हे जुयेरेगा (हो तीच ती गोगांची आवडती सिरिअल) मधलं पात्रं आहे जी सगळं स्टेप बाय स्टेप करते>> अरे देवा!! आणि सांगतेही स्टेप बाय स्टेप केल्याचं?
अरे देवा!! आणि सांगतेही स्टेप
अरे देवा!! आणि सांगतेही स्टेप बाय स्टेप केल्याचं?
>>
अरे देवा
गोगांची आवडती सिरिअल नाही....
गोगांची आवडती सिरिअल नाही.... <<<< घरची सिरीयल..