१) कृष्णवर्णीय तुळशीची पाने आणि देठ - ओंजळभरुन.
२) दीड ते दोन कप पाणी
३) चहा पत्ती
४) साखर
५) एक चमचे दुध
कृष्णवर्णीय तुळशीची पाने आणि देठ निवडून तोडून घ्यावीत. ती पाने आणि देठ हलक्या हाताने धूऊन घ्यावीत. एका पातेलात अतिमंद आचेवर पाणी गरम ठेवावे. पानी किंचित कोमट झाले की त्यात तुळशीची पाने आणि देठ टाकावे. पाने पाण्यात बुडतील ह्याकडे लक्ष द्यावे. आच वाढवू नये. आता सुमारे १५ मिनिटे पातेल्याकडे बघायची गरज नाही. हळूहळू तुळशीच्या पानांचा अर्क पाण्यात उतरायला लागतो आणि पुर्ण पाणी काळसर हिरवे व्हायला लागते. हळूहळू तुळशीच्या पानांचा गंध वाफेतून घरात पसरायला लागतो. आता थोडीशी चहा पावडर आणि तुम्हाला लागते तेवढी साखर पातेल्यात घालायची. आच अजिबात वाढवायची नाही. चहाला बुडबुड बुडबुडे आलेत की गॅस बंद करायचा. आणि मोजून एक ते दोन चमचे चहाचा रंग बदलेल इतपत दुध घालायचे. हा चहा अनाशापोटी पहाटवेळी निवांत घ्यायचा. असे रोज करायचे. ह्याचे फायदे आयुष्यभर तुम्हाला मिळतील. आपले शरीर निरोगी राहते हा काय कमी मोठा फायदा आहे! आणि तुळशी पाने मिळू नये असे आपल्याकडे कुठे होते!
अधिक टिप हीच की अधिक काहीच घालू नका! वेलची नको, लवंग नको .. हा चहा आहे काढा नाही!!!!
छान, घरी कृष्ण तुळस बहरलीए.
छान, घरी कृष्ण तुळस बहरलीए. उद्या सकाळीच करणार
फोटो देशील एक इथे टाकायला
फोटो देशील एक इथे टाकायला
निरागस धागा आहे. छान!
निरागस धागा आहे. छान!
>>>सर्वांना महिती असेल असा हा चहा आहे फक्त माहिती असून कुणी पित नाही ही खरी खंत आहे<<<
मी रोज पितो. घरात तुळशी लावलेली आहे. गवती चहाची कुंडी मामे बहिणीकडून आणणार आहे. तोवर गवती चहा विकत आणत आहे. बेस्ट अॅन्टिऑक्सिडन्ट! गवती चहा उष्ण असल्यामुळे चार तुळशीची पाने घालतो. चहा अप्रतिम लागतो. काही लोकांना 'चहा' हा 'चहासारखाच' असणे अत्यावश्यक वाटते, त्यात माझ्या सुदैवाने मी नाही. मी दालचिनी, आले, गवती चहा, चहाचा तयार मसाला, तुळशी, गवती चहा + तुळशी असे काहीही घालून चहा करून पितो. इतकेच काय तर मी आजवर तीनवेळा हिंग घालूनही चहा केलेला आहे आणि तोही मस्तच लागतो. (भारतातील मसाल्याचे पदार्थ चवीसाठी व गंधासाठी विख्यात असले तरी ते प्रत्यक्षात प्रकृतीसाठी अनमोल आहेत).
>>>पत्तीमुळे चहा कमी होतो आणि थोडा आटतो. <<<
हे आधी 'पत्नीमुळे चहा कमी होतो आणि थोडा आटतो' असे वाचले गेले व ते अधिक पटले. माझी पत्नी चहा पीतच नसल्यामुळे ती चहा पीत असती तर माझा जितका चहा झाला असता तितका होत नाही ह्याचा अर्थ तो कमी होतो. तसेच, ती जेव्हा माझ्यासाठी चहा करते तेव्हा माझा चहा पिण्याचा उत्साह थोडा आटतो कारण ज्या माणसाला चहा कसा असायला हवा हेच माहीत नसते त्याला तो कसा करायला हवा हे कसे समजेल? (बाकी उत्साह हा शब्द तुमच्या वरील विधानात चुकून राहून गेला असे वाटले).
>>हा चहा अनाशापोटी पहाटवेळी निवांत घ्यायचा. असे रोज करायचे. ह्याचे फायदे आयुष्यभर तुम्हाला मिळतील. आपले शरीर निरोगी राहते हा काय कमी मोठा फायदा आहे! <<<
हीच ती वाक्ये ज्यामुळे हा धागा निरागस वाटत आहे.
>>>खंत ह्यासाठी की लोक फुकटात पैसे घालवतात औषधींमागे. <<<
तुळशी हे सर्व रोगांवरील औषध नाही हो बी!
पण तुम्ही हा मुद्दा काढलात हे फार बरे झाले.
मी कुठे असा दावा केला की हा
मी कुठे असा दावा केला की हा चहा पिऊन तुमचे रोग दुर पळतील. आता नको ते खरडत राहणे हा देखील एक रोगच आहे तो काही हा चहा पिऊन दुर पळणार नाही. साधे साधे आजार जे आपल्याला त्रस्त करतात त्यापोसून नक्कीच सुटका मिळते.
>>> बी | 12 August, 2014 -
>>> बी | 12 August, 2014 - 20:23 नवीन
मी कुठे असा दावा केला की हा चहा पिऊन तुमचे रोग दुर पळतील. आता नको ते खरडत राहणे हा देखील एक रोगच आहे तो काही हा चहा पिऊन दुर पळणार नाही. साधे साधे आजार जे आपल्याला त्रस्त करतात त्यापोसून नक्कीच सुटका मिळते.
<<<
आँ?
हे खालचे वाक्य तुम्हीच लिहिलेले आहेत की?
>>>आपले शरीर निरोगी राहते<<<
सर्वांना महिती असेल असा हा
सर्वांना महिती असेल असा हा चहा आहे फक्त माहिती असून कुणी पित नाही ही खरी खंत आहे. खंत ह्यासाठी की लोक फुकटात पैसे घालवतात औषधींमागे. >>> बी, चहाची रेसिपी दिलीस ती बस होती, हे वरचे वाक्य लिहिल्यामुळे आता उत्तरे द्यायला लागणार ना, नक्की कोणत्या औषधांना हा चहा रिप्लेस करतो ? शरीर निरोगी ठेवतो म्हणजे काय ?
मी पण रोज पिते. घरात तुळशी
मी पण रोज पिते. घरात तुळशी लावलेली आहे. गवती चहा आहे. विकत आणत नाही दालचिनी अॅंड आले अॅडेड..एकदा सकाळी हा चहा घेतला की दिवसभर चहाची आजिबात तल्लफ रहात नाही इतके समाधान मिळते
जनहो फक्त कृती वाचा आणि
जनहो फक्त कृती वाचा आणि एखाद्या वाक्याचा जसाच्या तसा अर्थ न घेता थोडा गर्भित .. थोडा ढोबळ अर्थ घ्या. प्रत्येकाची आपकी एक शैली असते लिहायची बोलायची.
अररर...सॉरी बी
अररर...सॉरी बी
>>>आता उत्तरे द्यायला लागणार
>>>आता उत्तरे द्यायला लागणार ना<<<
मैदेवी, बी,
मीही गंमतीतच लिहित होतो. अगदी उत्तरे वगैरे काहीच नाही.
इन फॅक्ट नुसता साधासुधा चहासुद्धा अनेकदा आरोग्यदायी असू शकतो.
पण तुलना करायचीच झाली तर तुळशीच्या चहापेक्षा दालचिनी चहा, दालचिनीपेक्षा आले चहा, आले घातलेल्या चहापेक्षा सूंठपूड घातलेला चहा आणि सर्वात जास्त गवती चहा आरोग्यासाठी उपयुक्त असतो
(प्रत्येकाच्या)
छान चहा आणि छान लिहिले
छान चहा आणि छान लिहिले आहेस... माझ्याकडे इथे तुळस नाही इथे म्हणून भारतातून आणलाय.
माझ्याकडे इथे तुळस नाही इथे
माझ्याकडे इथे तुळस नाही इथे म्हणून भारतातून आणलाय.<<<
काय आणलाय?
१. ओंजळभर पानं एका कपाला? गरम
१. ओंजळभर पानं एका कपाला? गरम पडतील हो!
२. दीड कप पाणी कोणतीही वनस्पती घालून उकळून १ कप केल्यास काढाच होईल. तो तुळशीचा की अजून कसला इतकाच प्रश्न उरतो.
रच्याकने: कन्नडच्या बस स्टँडबाहेर चहाच्या दोन टपर्या आहेत. त्या बोर्डांवर चहा, कॉफी, डिकाशन असं लिहिलेलं आहे. हे डिकाशन = decoction. ज्यात चहापत्ती अथवा कॉफीबीन्स पावडर पाण्यात उकळून त्याचा अर्क काढणे. याच्या विरुद्ध परकोलेशन. ज्यात गाळणीत चहापत्ती ठेवणे अन त्यावर उकळते पाणी टाकणे. जे खाली येईल ते percolate.
तिसरा प्रकार concoction होईल. आणिक एक infusion असते.
ब्रिटिशकालीन हॉटेल्स असणार ती. तिथे कधीतरी थांबून ते डीकाशन पिउन पहायचे आहे...
कृष्णवर्णीय तुळशीची पाने आणि
कृष्णवर्णीय तुळशीची पाने आणि देठ - ओंजळभरुन.>>>>> चहा नाही. तुळशीचा काढा लागेल.१-२ पानं ट्राय करायला हवी.
तुळशीचा चहा घेताना पहिल्याच
तुळशीचा चहा घेताना पहिल्याच घोटाला निरागस ठसका लागला.
छान. करून बघण्यात येईल.
छान.
करून बघण्यात येईल.
छान लिहिलंय.. माझी कृष्णतुळस
छान लिहिलंय..
माझी कृष्णतुळस खराब झाली त्यामुळे सध्या नाहीय.
बाकी मी नेहमी गवती चहा+आले+जर्र्राशी वेलची, लवंग, मिरी, दालचिनी, जायफळची पुड +(कधीमधी) लेंडी पिंपळी असा काढा करुन त्यात थोडेसे गुळ घालुन सकाळीच ढोसते आणि त्यालाच चहा म्हणते.
माझ्या चहात चहापत्ती अजिबात नसते.
सावधान ! एवढेच म्हणतो .या
सावधान ! एवढेच म्हणतो .या प्रयोगाने माझे तोंड ,घसा लालेलाल झाला होता .कारण हेच बहुमोली बहुगुणी तुळशीचा चहा(काढा )ढोसत होतो .उष्ण पडला .तीन चार दिवस तवकीरीच्या खिरीचा मारा केल्यावर सुटलो .
आयुर्वेदातल्या घरगुती (!)औषधांचे बरेच प्रयोग मी ( माझ्यावरच )करून पाहिले आहेत .बाजारात जे तयार औषधि काढे मिळतात तेच सर्वात गुणकारी असतात असे माझे मत आहे .
माफ करा बी ,खोडी काढायचा हेतू नाही .
सुगंधी गुलाब पाकळ्यांचा चहा चांगला लागतो .
आयुर्वेदातल्या घरगुती
आयुर्वेदातल्या घरगुती (!)औषधांचे बरेच प्रयोग मी ( माझ्यावरच )करून पाहिले आहेत >>>>:फिदी: हे महत्वाचे आहे.
आयूर्वेद काय बाकी काय, काहीच वाईट नाही. पण योग्य माहितीच नसेल तर ती बटव्यातली चान्गली औषधे काळानुरुप गडप होऊ शकतात. तुळ्स उष्ण, लवन्ग-मिरी-दालचिनी हे उष्ण आहेत, म्हणूनच याला गरम मसाला म्हणतात. आता हे सगळे तापट लोक एकत्र आल्यावर गरमागरम चर्चा होणारच की.
बी तुझा हेतू वाईट नाही, पण वर वरच्या माहिती मुळे खूप म्हणजे खूप फरक पडू शकतो.
पित्तवाल्याना वेलचीयुक्त अमृत तुल्य चहा चालतो.. गाडगीळानी लिहीलेला गुलाब चहा चालु शकतो.
कफ प्रवृत्तीवाल्याना लवन्ग्- मिरे- दालचिनी इत्यादी मसालायुक्त चहा चालतो/ काढा चालतो.
गवती चहा सुद्धा उष्ण आहे त्यामुळे तो सर्दीच्या तापानन्तर चालेल.
छान लिहीलय. खुप छान लागतो हा
छान लिहीलय. खुप छान लागतो हा चहा.. हिवाळ्यात रोज होत होता मग कोणास ठाउक का खंड पडला?
आता रोज सकाळी करील..