ववि२०१४-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2014 - 13:05

वविकर्स्,धम्माल आली ना वविला. मग ववि२०१४ बद्द्लचे तुमचे वॄत्तांत आणि प्रतिक्रिया इथे लिहा पाहु.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक्स, ऑन सिरीयस नोट...

काल मी एका लहान मुलाला वाचवलं. देवाच्या कृपेनं काही वाईट झालेलं नाही. मुल कोणाचं होतं माहीत नाहि, नंतर बोलायला भेटायला वेळच मिळला नाही. तिने/त्याने पिवळ्या रंगाचा टिशर्ट घातंलेलं.

प्लिज, आई बाबांनो जेव्हा चिमुकल्यंना पाण्यात उतरवता तेव्हा त्यांच्या कडे लक्ष द्या एवढंच सध्या सांगु शकतो. बाकी तुम्हि सुज्ञ आहात असं समजतो.

ऑन सिरीयस नोट...>> असे आहे तर लिहितेच..
काल त्या बंगल्यातल्या जिन्यावरुन ....शिंदे (नक्की आयडी आठवत नाही) (नशीबाने) शेवटच्या (च) पायरीवर पाय घसरुन पडले. कडेवर लहान बाळ. (ते रेनकोट घालुन होते ते लहान बाळ) बर तर बाळाचे डोके पायरीच्या काठावर आपटले नाही. पण बाळ खुप घाबरलेले व रडत होते. नंतर त्या बाळाला आईच्या मांडीवर शांत झोपलेले पाहिल्यावर खरच बरं वाटले. होप त्याच्या बाबांना जास्त लागले नसावे. टेक केअर.
संयोजक, त्या बंगल्यात वरचा पाऊस जिन्यावरुन ओहोळरुपात खाली येतो हे त्या मालकाला शक्य झाल्यास क़ळवावे ही विनंती.

संयोजक, त्या बंगल्यात वरचा पाऊस जिन्यावरुन ओहोळरुपात खाली येतो हे त्या मालकाला शक्य झाल्यास क़ळवावे ही विनंती.
मालकाला खुप गोष्टी कळवण्यात आलेल्या, पण तो ऐकिव मोड मध्ये नव्हताच.
येताना निल ने चांगलंच ऐकवलय.

नाही नाही नाही हेमंतला अजिबातच लागलेलं नाहिये. पण वविची पुर्वापार चालत आलेली खुर्ची मोडण्याची परंपरा यंदाही मोडली नाही ह्याचं समाधान वाटलं.

ण वविची पुर्वापार चालत आलेली खुर्ची मोडण्याची परंपरा यंदाही मोडली नाही ह्याचं समाधान वाटलं. >> गुब्बे आपल्या घरच्यांकडुन म्हणुन अभिमान वगैरे नाही. Wink

मल्ली.. मी ही होतेच तिथे... सुदैवाने ते मुल माबोकरांपैकी कोणाचे नव्हते. पण तुझी सूचना रास्तच.

मागच्या वर्षी नाव नोंदणी करून आणि पैसे भरूनही ववि चुकला

यावेळेला मात्र ववि ला हजेरी लावता आली.
खूपच छान अनुभव होता. पावसाची पण उपस्थिती असल्यामुळे अजूनच धमाल आली. संयोजकांनी घेतलेले गेम्स खूप आवडले.'लाल बटाट्याची भाजी', 'मालपुवा' अशा पदार्थांनी खेळात रंगत (का चव?) आणली Lol
येतानाचा बसमधला कल्ला भारी....थोडक्यात म्हणजे एस पी फार्म्स मधून निघाल्यावर नाही, तर, आपापल्या स्टॉपवर उतरल्यावर ववि संपला Happy

सर्व संयोजकांचे आभार!

धम्माल येतेय वाचताना!

देसाई बस मधून उतरल्यावर मजबूत भोकाड पसरले.. >> मला आधी वाटलं देसायांनी मजबूत भोकाड पसरलं की काय?

तर मंडळींनो-
माझ्या यावर्षीच्या माबो ववि वृत्तांताची सुरुवात होते शनिवार रात्रीने.....
शनिवारी ऑफिस करुन रात्री उशीरा घरी आल्याने पेड्रा गाण्याने भरायचा कार्येक्रम अपुर्ण राहिला होता. मला ववि बाफवरच्या (माझ्याच) प्रतिक्रिया आठवल्या.
म्हणलं शिव्या खाण्यापेक्षा आहेत भराभर मिळतील ती ढिंच्याक गाणी पेड्रा मधे भरुन टाकू.... असं म्हणते ना म्हणते तोच माझ्या लॅपटॉपने तो आजारी असल्याची आणि त्यामुळे त्याला बरचं व्हायरल इन्फेक्शन झाल्याची नम्र जाणिव मला सगळीच्या सगळी गाणी/ डेटा ईत्यादी ईत्यादी उडवुन टाकुन करुन दिली.
वायरसच्या आंटीला शोधलं पण ती काही मिळाली नाही. मग म्हणलं जाऊ द्या असाच नेऊयात पेड्रा भरुन...
धडाधड गूगलवरुन हनी सिंग बिंग गाणी डालो केली आणि पेड्रा मधे कॉपी करणार इतक्यात लॅपटॉपने त्याला आजारपणातही काम करायला लावल्याबद्दल निशेध नोंदवताना गाणी कॉपी करुन पेड्रा मधे पेस्ट करायला निशेध नोंदवला Uhoh (फारेण्डची क्षमा मागुन ) अतिशय जड अंतःकरणाने मी मल्लीला माझ्याकडुन सोय होत नसल्याचा मेसेज टाकला आणि तो म्हणाला मी बघतो काहीतरी.

पण अस्कसस्कस? एवढा दंगा (मीच) केलाय तर गाणी तर (मीच) न्यायला हवीत ना.................... मग पळत पळत (गाडी पाशी गेले , गाडी स्टार्ट केली आणि ) जाऊन एक डीव्हीडी घेऊन आले. आणि डालो केलेली सगळी गाणी त्यात भरली.
हुश्श!!!!!!!!
वविची तयारी केली आणि मी झोपायला मोकळी झाले....

(एकदाचा) रविवार उजाडला....आयुष्यात पहिल्यांदा मी पहाटे ४ ला उठले होते...सव्वा सातला माझ्या स्टॉपला बस येणार होती. साडे सहाला हिम्याला फोनुन विचारलं कुठे आहेस तर शहाणा मला विचारतोय आत्ताच उठलीयेस की काय? Uhoh Angry पण 'तू भी क्या याद रखेगा' म्हणत बच्चे को मैने माफ कर दिया Proud

आणि मग मी घरातुन निघाले. स्टॉपला थांबलेच होते तेंव्हा एका मागे एक सहलींच्या बसेस सारख्या सारख्या येत होत्या आणि मी आणि बाबा 'ही असेल का ती बस' याचे अंदाज लावत बसलो होतो.
एक बस आमच्या दिशेने येताना बघुन मी ठाम पणे बाबांना म्हणाले, 'ही आमची बस नसेलच मुळ्ळी... आमची बस एवढी शांत येत नाही' आणि इतक्यात ती बस माझ्यापाशी येऊन थांबली आणि आतुन मयुरेशचा आवाज आला 'चला आपलीच लोकं आहेत' Uhoh Proud
पण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण! इतक्या वेळ शांत असलेल्या त्या बसला जाणिव ही नसेल की अब अपने साथ क्या होने वाला है.!!!! कारण बसमधे हमारी एंट्री हो चुकी थी आणि इतक्या वेळ शांत झोपलेला हिम्याचा मुलगा जागा झाल्याने हिम्याची सायली फ्री झाली होती Proud

बस पुढच्या स्टॉपला पोहचली. मल्ली येईपर्यंत गाडीला बोर्ड लावून झाला. एक दोन फोटो काढुन झाले आणि बस मार्गाला लागली. अजुनही बसचा मागचा पार्ट शांतच होता.........!!!!
फायनली शेवटच्या स्टॉपवरचे पॅसेंजरही चढले..
आणि बसमधे खरी हलचाल होईला लागली.
ग्रूप पाडले गेले.. अंताक्षरी सुरू झाली..
अंताक्षरीच्या वेळेला आमच्या टीममधुन मी आणि सायली आणि श्यामलीच्या टिममधुन श्यामली, केदार आणि रुमा एवढेच गात होते.
इतर टिममेंबरांना संधी द्यावी असा विचार करत खेळताना आम्ही दोन्ही टिम हरायला लागलो होतोत कारण नवी लोकं गातच नव्हती Proud

या सगळ्या आरडा ओरडा, गोंधळाला आवर झालण्यासाठीच की काय हिम्याने आणि मयुरेश ने खाण्याचे पदार्थ बाहेर काढले. आणि तोंड खरचं खाण्यात गुंग झाली. पण खेळ कसा सोडणार ना? म्हणून मी काही खाल्लंच नाही.
मल्या आणि श्यामलीची मात्र मस्त 'टिम' जमलेली Wink जे अक्षर येईल त्याच्या गाण्याची सुरुवात मल्ल्या करुन द्यायचा आणि मग खात बसायचा Proud पुढचं गाणं बिचार्‍या श्यामलीला गावं लागायचं Proud
नंतर ती एवढी वैतागली की तीने 'ए थांबा जरा आधी खाऊन घेऊयात' असं फर्मान सोडलं आणि आमची सगळे खाण्यात गुंग झाले. Proud

या टाईमस्पॅन मधे मी आणि मल्ल्याने मराठी भाषील २ शब्द बहाल केले Proud
"रिया, सगळ्या 'भाव'ना गायला सांग" आणि "नंतर खावा की आधी 'व' वरुन 'गावा' " अशा प्रकारे त्यांचे वाक्यात उपयोगही करुन दाखवले Proud पण आमच्या वाटेला कौतुक न येता मस्करी आली.यामुळेच मराठीत नवोदित शब्दनिर्माते तयार होत नाहीयेत या कडे मी लक्ष वेधु इच्छिते Proud
खानपान संपेपर्यंत गाणी लावू म्हणुन मी सीडी पुढे दिली आणि अंताक्षरीला टाटा बाय बाय करून आम्ही नाचायला सुरुवात कधी केली कळालंच नाही. 'चार बज गये लेकिन पार्टी अभी बाकी है, ए फॉर आओ रे आओ' अशा आषाढी स्पेशल गाण्यांवर नाचता नाचता आम्ही एसपीला पोहचलो आणि ड्राव्हरभावंनी सुटकेचा निश्वास टाकला Proud
-------------------------------------

येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स आम्ही मुंबईकरांच्या आधी पोहचलो होतो!!!!!!!!!!!!!!!!!!!! पण त्या फार्ममधे आधीच हीssssssssssssss एवढाल्ली गर्दी पाहुन मुंबईकर पोहचले नाहीत यावर माझा विश्वासच बसायला तयार नव्हता. शेवती त्या फार्मच्या मालकांनी (का कोणीतरी) आम्हाला मुंग्यांनी भरलेली रूम दिली आणि आमच्या आधी तिथे दुसरं कोणीच नव्हतं हे बघुन 'आम्हीच पहिले' याची खात्री पटली Happy
आम्ही तिथे बॅगा ठेवुन रूम साफ करुन घ्यायच्या विचारात होतो तेवढ्यात फार्मवाल्यांनी 'कस्स फसवलं तुम्हाला' म्हणत ही आमची रूमच नसल्याचं सांगितलं आणि नव्या रूम मधे शिफ्ट करणार असल्याचं कळवलं Happy
पण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण यहा आता है कहानी मे ट्विस्ट!!! ती नवी रूम कोणती आहे हयाची खुद्द फार्मच्या मालकांनाही कल्पना नव्हती तेंव्हा ते सांगेपर्यंत आपण नाष्टा करुन घ्यावा या विचाराने आम्ही एकदाचे खुर्च्यांवर टेकलो....आणि मुंबईची बस आली Happy
नाष्ट्याने पोट भरण्या आधीच माझ्या दीपा, वल्ली, मोना, कांचन, प्रितीभुषण, कविन, मुग्धा, राखी (कांहींची नावं मिसण्याची शक्यता आहे त्याबद्दल आधीच सॉरी) या लाडक्या मैत्रीणी आणि तायांची गळाभेट घेतली आणि मन भरुन घेतलं Happy
आणि नाष्टा करायला सुरुवात केली.... नाष्ट्यामधे इडली, मिसळ, पोहे, चहा अशी नावं टेंप्टिंग असणार्या डिशेश होत्या पण त्यांची फकत नावंच टेंप्टिंग होती. ते सगळं कसंबसं संपवून शेवटी मी इडली खाणारच होते (रुमा, अरु नोटच Proud ) पण त्या माणसाने माझं ताट उचलून नेल्याने माझ्या ताटातले काही पदार्थ वाया गेले. नाही तर मी अन्न वाया घालवत नाही तसं कधीच Proud
इति नाष्ता वृ समाप्त......
फायनली आम्हाला एक रूम मिळाल्याचं कळालं. तिथे जाऊन पाण्यात उतरायची तयारी केली.
काल राखीचा वादि होता Happy तीने दिलेला टेस्टी केक खाऊन मी अटेस्टी (टेस्टीच्या विरुध काय असतं? Uhoh ) नाष्टा बनवणार्या आचार्य्ला माफ करुन टाकलं Happy आणि स्विमिंग पूल कडे प्रस्थान केलं.....
आणि समोर पहाते तो काय साक्षात जिप्सी.... दीपाला म्हणलं हायला हा कसा आलाय? ती म्हनाली मलाही माहीत नाही. पण मला झालेला आनंद २ क्षणच टिकला कारण जिप्सी म्हणाला मी लगेच जाणार आहे Sad
हे बोलताना त्याने माझ्या हातात छत्री दिली आणि कॅमेरा बाहेर काढला. मला कोण आनंद झाला म्हणून सांगू..... पण त्याने मला छ्त्री पकडायला लावून इतरांचेच फोटोज काढले Angry जिप्सी बेटा, इसका बदला लिया जायेगा.....

पाण्यात धम्माल खेळ खेळलो... कांचन एक नंबरची चिटर आहे हे मी नम्रपणे सांगू इच्छिते Proud का ते कोपच्यात सांगेन
इतक्यात आम्हाला कळालं की फार्मच्या मालकाने पुन्हा एकदा 'कस्स्स फसवलं' पवित्रा घेतलाय आणि आम्हाला रूम बदलून दिलीये. मग आमच्या सामानाची(कुणीतरी) हलवाहलव केली. आम्ही मात्र पाण्यातच खेळत होतो Happy
बच्चे कंपनींनी मला पकडुन ठेवल्याने मी त्यांच्यासोबत खेळले आणि मज्जा घेतली Happy

तिथे ठेवलेल्या मेरी गो राऊंडवरही लोकांनी खेळून घेतलं Happy
नील, विनय आणि बागुलबुवाने नेमबाजीचा खेळही ठेवला होता Wink Proud

सोबतीला पावसाची साथ होतीच!!!! फायनली मनसोक्त पाण्यात खेळून झाल्यानंतर आम्ही बदलून दिलेल्या रूम्सकडे कुच केली. तेंव्हा आम्हाला अजिबात कल्पना नव्हती माबोवर एखादा बीबी, मग तो आहार आणि पाकशास्त्राचा बीबी का असेना, इग्नोर केल्याचे काय काय परिणाम होऊ शकतात Wink
सगळे कपडे बदलून फ्रेश झाले, जेवण झालं. छोले, बिरड्याची उसळ (ही मी मुळ्ळीच खाल्ली नाही) , तांदलाची भाकरी, बटाट्याची भाजी, दाळ, भात, सलाड, पापड पापड्या, , गुलाबजाम हा मेन्यु Happy
होतं कसं ना.. फार टेस्टी मेन्यु असला की लोकं फार खातात आणि मग सुस्तावतात. किंवा नुसतं जेवणच लक्षात ठेवतात आणि केलेली मज्जा विसरुन जातात याचं भान ठेवून एसपीच्या मालकांनी आचार्याला सगळेच पदार्थ अटेस्टी बनवण्याचा हुकुम सोडलेला म्हणे Proud पण ते असोच!

इतक्यात घोषणा झाली सासंनी एका हॉलात जमायला सांगितलंय म्हणून. आणि आम्ही तिकडे पळालो Happy
प्रत्येक आयडीने आपली ओळख करुन दिली आणि त्याबद्दल त्यांना एक एक चिठ्ठी मिळाली त्यावर प्राण्यांची नावं होती आणि तो म्हणे आमचा ग्रूप...... बरं ग्रूप मेंबर शोधायचे कसे तर त्या प्राण्यांचा आवाज काढत Uhoh
ग्रूपची नावं होती - कावळा, कोंबडा, बोका आणि बोकड....

आता बघा हं.... एकही नाव लिंग निरपेक्ष नाही Wink जिथे तिथे आपला पुरुषांना मान Proud
आणि त्यात आमच्म ग्रूप आयकॉन बोकड म्हणजे अगदीच अबोल. ते ओरडतं कसं तेच कोणाच्या लक्षात येईना . मग अशुतोषने बोकडाला नवा आवाज बहाल केला 'बो'. आम्ही आपले बो बो करुन आमचा ग्रूप शोधतोय Proud
बर हा आवाज नुकताच इन्वेंट झाल्याने ऐकणार्यालाही कळेना नेमका ग्रूप कोणता Proud
बाकी ग्रूप चे कोंबडे कुकुचकु करत आपल्या आपल्या ग्रूप मेंबर कडे कुच करत होते, कावळे काव काव करत मेंबर शोधण्याचा कावा करत होते आणि बोके बोकळले होते (हे आपलं उगाच काहीतरी :फिदी:)
शेवटी ग्रूप जमले आणि खेळाला सुरुवात झाली...
पहिलाच खेळ डमशेराग- मनात म्हणलं नेहमीचच हे पण इतक्यात संयोजकांनी सांगितलं की सिनेमाची नावं, म्हणी वगैरे नसुन हा नवा प्रकार आहे आणि तो म्हणजे पाकृ ओळखण्याचा... Happy अणि या पाकृ माबोवर किमान ५० हिट मिळवलेल्या आहेतच आहेत...
कोंबडा ग्रूपला आला खरवस... सायलीने जितक्या पटकन अॅक्ट केला तितक्याच पटकन जाईने ओळखला सुद्धा ... पुढे बोक्यांसाठी होता बाळ बटाट्याची भाजी. हा ग्रूप आमच्या पासुन दुर असल्याने मला तिथे काय झालं ते कळालं नाही.पण त्यांनी ओळखला .
कावळ्यांना आला मालपोवा..... त्यांनी तो न ओळखल्याने तो आमच्याकडे आला.
मी शब्द २ भागांमधे तोडला- माल आणि पोवा आणि मी अ‍ॅक्ट केला जो लग्गेच ओळखला गेला. Wink
नंतर वल्लरीची आई मला विचारत होत्या, 'तू पहिले दोन शब्द म्हणून जे दाखवत होतीस त्याचा अर्थ काय होतो' Uhoh मी सांगितलं, 'आजकाल सुंदर मुलींना माल म्हणतात काकू' आणि त्यांनी मला जो काही लूक दिला त्याने अगदी धरणीमाय फील आला हो Proud
त्यानंतर हाय्ग्रिव, दम बिर्यानी, दोई बेगुन ( (असला कसला पदार्थ काय माहीत) हा पदार्थ आनंदसुजु ने 'म्हणायचं काहीतरी कधी ना कधी तुक्का लागतोच' असं म्हणत ओळखला Proud ) आणि कर्माची फळं यांनी जीव मेटाकुटीला आणला.
इथुन पुढे माबोवर असल्या विचित्र नावाच्या पदार्थांना बंदी घालण्यात यावी ही नम्र विनंती Wink
त्यानंतर मॅड अ‍ॅड्सची वेळ आली Happy आणि अ‍ॅड बनवणं खरच इतकंही सोप्प नसतं हे लक्षात आलं Happy मज्जा आली खेळताना. मात्र संयोजकांनी जे विषय शोधुन काढलेले तसली उपकरण खरच बाजारात आली तर काय मज्जा येईल हा विचार डोक्यात आल्यावाचुन राहीला नाही Happy

या गेमपर्यंत येथेच्छ दंगा घालून झाल्यानंतरही तो संयोजकांना पुरेसा वाटला नसावा बहुदा Wink त्यांनी आणखी एक गेम काढला... दहा प्रश्न आणि त्यानुसार वस्तूंचे मोजमाप.
नोकियाचे फोन, एका ग्रूप मधले कपल्स, वॉलेटमधला नवरा-बायको,गर्लफ्रेण्ड बॉयफ्रेण्डचा फोटो (यावर आत्तापुर्त आमच्या आमच्यात कपल्स बनवू का असा प्रश्न आनंदसुजु यांनीही पुढ्यात मांडलेला पण संयोजकांनी नकार दिल्याने असोच!) या प्रश्नाची वेळ संपता संपता गे कपल्स चालतील का असा मुद्दा आमच्या ग्रूप मधुन पुढे येतच होता पण त्यात कोणी इंटरेस्टेड नसल्याने मांडण्यात आला नाही Proud
शेवटच्या टर्नला मात्र सगळ्या ग्रूपस मधे टाय झाली. ज्याच्या हातावर पर्मनंट टॅटू आहे असे लोकं विचारल्यावर एकही जण उभा राहीला नाही Proud

फायनली कोंबडे जिंकले आणि गेम्सची सांगता झाली.

मग उरलेल्या गप्पा मारुन झाल्या, आपापले फोटोज काढुन झाले. ग्रूप फोटोज राहीलेच खरे पण असु देत Happy
आणि केलेल्या चुकांचं क्षालन म्हणून फार्मच्या मालकांनी जाता जाता स्वादिष्ट भजी खायला देऊन समाधान दिलं.....
मस्त पाऊस, वाफाळता चहा, हिरवा शालू ल्यायलेला परिसर(फाचीक्षमा) यांनी वविचा गोड शेवट केला

हिम्याने जुन्या टीशर्टचा लिलाव केला आणि माबो हिरो केदार 'मला एक एम साईज हवाय. तब्येत कमी झाल्याने मागच्या वर्षीचा टीशर्ट बसत नाही' असं सांगुन खालेल्ल्या भज्यांबद्दल मनात पाप भरुन दिलं पण देवकाकांनी लगेच मला माझं वजन कस ठिक आहे ते सांगुन पाप माझ्या मनातुन हकलून दिलं...
आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेऊन वाटेला लागलो Happy

पण पिक्चर अभी बाकी है मेरेदोस्त!!!!!!!
पुणेकरांचा ववि अजुन संपलेला नव्हता... परतीचा प्रवास बाकीच होता.
गाडीने एसपी फार्म सोडलं आणि बस मधल्या पिल्लांनी नर्सरी राईम्स म्हणत डान्स करायला सुरुवात केली. त्यांना बघुन शांत बसलेल्या मोठ्यांना पण स्फुरण चढलं आ'णि ही पोल्ली साजुक तुपातली पासुन ते बग्दाद से लेके दिली वाया आग्रा' वर नाचायला सुरुवात झाली.
सायली, मी मल्ली, वर्षा, नेहा,केदार आम्ही नाचत होतोच, साप डान्स, पतंग डान्स सगळं चालूच होतं इतक्यात मल्लीच्या तेजूला जोर चढला आणि बस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स मल्ली आणी तेजूने पार आग लगा दी Proud

मग हिम्या- सायली, मल्ली-तेजु, श्री व सौ ज्म्बो, मया- रुमा यांच्यासोबतच विवेकदादा आणि नंदिनीने देखील कपल डान्स करुन घेतला Wink तेवढ्यातल्या तेवढ्यात केदार्ने त्याच्या कविताला मिस ही करुन घेतलं आणि अचानक जाणिव झाली की डेस्टीनेशन आयेला हय.....

एकमेकांचे फोन नंबर एक्स्चेंज करुन, टाटा बाय बाय करुन पुन्हा भेटायचं प्लॅनिंग करत करतच अतिशय समाधानी मनाने सगळे घराकडे निघालो. Happy
मायबोली रॉक्स, ववि रॉक्स! Happy

________________________

काही स्पेशल टिपा :
१) या वर्षी खुप नवे माबोकर होते आणि सगळेच माबोवर आणि वविवर खुष असल्याचे दिसले.
२) गायत्रीने दिलेली काजुकतली मस्त होती, राखीचा केक मस्त होता, फलेरोची स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड चॉकलेट्स परफेक्ट पण पेरू फ्लेवर आणखी मस्त असतात Wink
३) सामी,ओवी आणि अशा नेहमीच्या मैत्रीणींना तरीही मी मिस केलंच Happy
४)लास्ट बट नॉट लिस्ट... संयोजकाचं खुप कौतुक Happy एसपी फार्मवरती जो गोंधळ झाला त्यावरुन त्यांना स्वतः किती एंजॉय केलं कुणास ठाऊक पण वविकरांना त्या गोंधळाची झळही लागू दिली नाही Happy अगदी कमी वेळ उरला होता तरीही सगले खेळ मस्त आयोजित केले Happy

शाब्बास संयोजक आणि खुप खुप धन्यवाद Happy

संयोजकांसाठी मी गिफ्ट्स आणले होते. त्यांनी बनवलेल्या सुंदर अ‍ॅड्सबद्दल पण द्यायचीच विसरले Proud

छान लिहिलास वृ, रिया. Happy
माझं गिफ्ट हिम्या नाहीतर मयाकडे देऊन ठेव. Proud
आणि ते शालनचं क्षालन कर... बस्स!! Wink

मस्त वृत्तांत, रिया Happy

एसपी फार्मवरती जो गोंधळ झाला त्यावरुन त्यांना स्वतः किती एंजॉय केलं कुणास ठाऊक पण वविकरांना त्या गोंधळाची झळही लागू दिली नाही>>>>>>अनुमोदन. जेंव्हा पब्लिक स्विमिंगपूलमध्ये धम्माल मस्ती करत होती तेंव्हा संयोजक S.P. फार्म्सच्या मालकांनी घातलेलं रूमचं कोड सोडवत होते याचा चश्मदीद गवाह आहे मी. Happy Happy

त्याने मला छ्त्री पकडायला लावून इतरांचेच फोटोज काढले >>>>याच्याबद्दल सॉरी. गाडीत बसल्यावर हे माझ्या लक्षात आलं.

जिप्सी बेटा, इसका बदला लिया जायेगा.....>>>>ते "दादा" पेक्षा "बेटा" जरा तरी बरं वाटतंय. Proud

रीया मस्त व्रुतांत. स्पेशल रीया टच.

सामी,ओवी आणि अशा नेहमीच्या मैत्रीणींना तरीही मी मिस केलंच >> मस्त वाटलं वाचून. थॅन्क्स ग. Wink

मस्त मज्जा केलेली दिसतेय!! Happy

आवर्जून वृ वाचायला डोकावले!! Wink

रीये , पण खरर्र खर्र्र्र्र्र्र्र्रं सांग - ववि दशकपूर्ती सोहळयाच्या ववि ला (२०१२) सग्गळ्यात जास्ती मज्जा आली होती किनई??!! Wink Wink Lol

थँक्स सगळ्यांना Happy
जिप्स्या Proud

नील, शुभांगी ताई : खर्‍याचा जमानाच नाही राहीला बुवा... दंगा मस्ती मधे मी गिफ्ट्स विसरले खरच Happy
तायडे भेटशील तेंव्हा सगळ्यांचेच गिफ्ट्स तुझ्याचकडे देऊन टाकते Happy

ओवी हो Happy Wink

अगदी खरर्र्र्र! Happy
पण यावेळेला बस मधे जास्त धम्माल केली आम्ही हेही खरं Happy

बाकीचे वृत्तांत कुठे आहेत?

Pages