काय ज्वाळेतून केव्हा धूर येतो रे धुराड्या

Submitted by वैवकु रीटर्न्स on 28 June, 2014 - 11:02

गेले काही दिवस झाले एका माणसाने वात आणलाय माबोच्या गझल सदरात . पण असो दु:ख त्याचे नाही ह्याचे आहे की त्या माणसामुळे इतरांच्या चांगल्या गझलांवर अत्यल्प किंवा शून्यच प्रतिसाद देणार्‍या अनेक आयडीज गझल आणि गझलकारांवर तोंडसुख घेत सुटले आहेत आकृतीबंधातच न बसणार्‍या रचना गझलेच्या धाग्यावर पडत आहेत..तरी मी आता ज्या गझलकारावर राग काढत आहे आहे खरेतर हा माझा पिंड नव्हेच वगैरे ब्लाब्लाब्लाब्ला ....तरीही मी जी रचना केलीये त्यास हिजो असे परदेशी भाषेत वगैरे ब्लाब्लाब्ला वगैरे
माबोवर हल्ली या प्रकारास ड्युझल असेही वगैरे वगैरे ब्लाब्लाब्ला
असो
आज आम्हा ड्युझलकारांचे गुरू पै. तिलकधारी ह्यांची राहून राहून आठवण येत आहे ह्या रचनेचे श्रेय मी त्यांना अर्पण करतो (पै म्हणजे पैलवान नव्हे पैगंबरवासी ! .... )
आपला ब्लाब्लाब्ला
~नवाच एक कुणीतरी
_______________________________________

हे तुझ्या 'मी-मीपणा'चे चोचले थांबव जिभाड्या
ह्याच 'मी-प्रेमा'मुळे रे बायका होतात जाड्या

या गझलदिंडीत का रे चालतो आम्ही बिचारे
आमच्या पार्किंग्जमधुनी चोरल्या रे तूच गाड्या

थोडकीही रसिकनिंदा शायराला वर्ज्य असते
आणि तू अमुच्याचपाशी सांगशी अमुच्या चहाड्या

झाक ह्या सौंदर्यबोधाच्या तुझ्या विद्रेपणाला
पाय्जम्याला तू बुटाच्या लावल्या आहेस नाड्या

आगपाखड ही तुझी रे सांगते विझलीच प्रतिभा
काय ज्वाळेतून केव्हा धूर येतो रे धुराड्या

काय रे धंदा तुझा आहे खरा कळते जगाला
काय विकुनी बांधल्या आहेस तू गझलेत माड्या

रोज नेमे तीन जमिनी खोदतो आहेस हल्ली
वेड तुजला लागले की लागले वेडे फकाड्या

ते ..रिया ,हापूस ,इब्लिस, लक्षुमी, अन् डी विनीता
चीड ह्याना का गझलची आणलिस तू गझलपाड्या

~नएकु Angry

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

दिनेश. | 29 June, 2014 - 12:41 नवीन
मस्त !
माझं पण नाव घेतलं असतं तर चाललं असतं !

>> माझं पण नाही घेतलं !

Sad
Angry

>>आमच्या पार्किंग्जमधुनी चोरल्या रे तूच गाड्या
>>पाय्जम्याला तू बुटाच्या लावल्या आहेस नाड्या
>>काय विकुनी बांधल्या आहेस तू गझलेत माड्या
Rofl

अस्सल ड्युझल <<<<+१
अनेक दिवस मी ड्युझलकार लोकान्ना जे काय लेखन करायचय ते गझलेच्या आकृतीबंधात करा असा आग्रह करतच होतो . बरे झाले ही रचना आली

माझं पण नाव घेतलं असतं तर चाललं असतं !<<<<<
दिनेश / दिनेशदा हे नाव वृत्तात बसवता आले नसावे
रसप हे कसे का असेनात पण गझलकार आहेत हे नएकुंना माहीत असावे. इथे त्यांनी गझलेत शष्पदेखील योगदान न दिलेल्या लोकांची( जे आजकाल माबोवर गझलेचा दुस्वास करत हुंदडत फिरतात ) त्यांची नावे वापरली आहेत असे दिसते

इथे त्यांनी गझलेत शष्पदेखील योगदान न दिलेल्या लोकांची( जे आजकाल माबोवर गझलेचा दुस्वास करत हुंदडत फिरतात ) त्यांची नावे वापरली आहेत असे दिसते<<<< गझल वाचकांचे गझलेसाठी योगदान नाही असे म्हणून तुम्ही वाचकांचा अवमान करीत आहात.

गझलेच्या नावाखाली व्यर्थ शाब्दिक खेळ करणारे तथाकथित कवीच गझलेचा जास्त अपमान करत आहेत.

गझल वाचकांचे गझलेसाठी योगदान नाही असे म्हणून तुम्ही वाचकांचा अवमान करीत आहात.<<<<<<

डी विनीता आपल्याला तरी मी गझलेच्या धाग्यांवर दात वेंगाडून हसण्या पलिकडे काही करताना पाहिले नाही
आणि आपणासारखे वाचक चांगल्या गझला असलेल्या अश्या किती धाग्याना भेट देता प्रतिसाद देत आहात .

रसिकांनीही हसायचे असल्यास शायरावर हसावे शायरीवर नव्हे असे सांगावेसे वाट्ते

डी विनीता आपल्याला तरी मी गझलेच्या धाग्यांवर दात वेंगाडून हसण्यापलिकफे काही करताना पाहिले नाही<<<<तुम्ही पाहिले नाही ही काही माझी चूक नाही, तुम्ही धागे नीट वाचत जा.

आणि आपण वाचक चांगल्या गझलकारांच्या अश्या किती धाग्याना भेट देता प्रतिसाद देता .<< वाचक नसले तर गझलांचे डोंगर काय कामाचे!! प्रतिसाद दिला की वाचक अशी व्याख्याच नाही.

डी विनीता बाई माझ्या ह्या धाग्यावर हास्योत्पादक प्रतिसाद देण्यापूर्वी आपल्या रेशनकार्डावर नाव असलेल्यांपैकी एकानेही गझल कधी वाचली तरी आहे का हा विचार केला होतात काय ???

अरेवा, तुम्हाला वाचकांचे प्रतिसाद आवडत नाहीत असे दिसते.. की फक्त चांगलेच म्हणायचे वाचकानी..

नि "रेशनकार्डावर नाव असलेल्यांपैकी एकानेही गझल कधी वाचली तरी आहे का हा विचार केला होतात काय" हा असा प्रश्न विचारून तर तुम्ही स्वत:चीच लायकी सिद्ध केली आहे.

बहुतेक तुमच्या रेशनकार्डावर तुम्ही सो कॉल्ड गझल लिहिता नि रेशनच्या भावात पब्लिश करता असे लिहिलेले असावे, स्वानुभवावरून प्रश्न विचारलेला दिसतो.

तुम्ही इतके अपरिपक्व असाल असे वाटले नव्हते.

माझा अपरिपक्वपणा अजून तुम्हाला मी दाखवलेलाच नाहीये
तुमच्यासारखे अनेक पुरुष माबोवर बायकांच्या वेषात फिर्तात त्यांना कशाला परिपक्वपण वगैरे दाखवत बसू मी

थांबा थांबा वैवकु आणि विनीताजी थांबा

कृपया लक्षात घ्या की हा धागा तुमच्या भांडणासाठी नाही

वैवकु प्लीज लक्षात घ्या जे मी वर म्हटलेच आहे की >>>थोडकीही रसिकनिंदा शायराला वर्ज्य असते<<
आपण जाणताच की आंतरजालावर तर्‍हेतर्‍हेचे वाचक मिळतात त्यांच्या अभिरुचीची क्वलिटी वेगवेगळी असते .पदरी पडले पवित्र झाले असा पावित्रा घ्यावा हेच उत्तम

डी विनीताजी वैवकु अनावधानाने आपल्याला काही म्हणाले असतील तर त्यांच्या वतीने मी माफी मागतो
त्याचं कायय एकतर त्यांना प्रतिसाद फार कमी लोक देतात त्यातही तुम्ही तसे प्रतिसाद द्याल तर माणसाची सटकणारच ना त्यातही ते आधीच सटकेले आहेत ;).... वैवकु Light 1

इथे त्यांनी गझलेत शष्पदेखील योगदान न दिलेल्या लोकांची( जे आजकाल माबोवर गझलेचा दुस्वास करत हुंदडत फिरतात ) त्यांची नावे वापरली आहेत असे दिसते<<<<
वैवकु ,सिरिअसली?
मला गझल रचता येत नाही म्हणजे माझा चांगल्या गझलेशी संबंध नाही? Uhoh

मी गझलेवर दात विचकण्याखेरिज काही करत नाही?

असो ही गझल आवडली आहे Happy
बाकी वर जे काही माझ्याबद्दल लिहिलय ते वाचुन खरच वाईट वाटलं.....इतकंच!

रियाजी
वरील चर्चेतून दिसते की वैवकु डी विनीता यांच्यावर त्या प्रतिसादामुळे विशेष अप्रसन्न आहेत वगैरे त्यांचा तुमच्यावर वगैरे राग नसावा बहुतेक

नाही!
गझलेत माझं नाव लिहिलय आणि नाव आलेल्या प्रत्येक व्यक्ती बद्दल नत प्रदर्शित केल गेलय...
असो! माझ्याकडुन विषय बंद!

वाचक विशेष अप्रसन्न असतात आपल्या लिखाणावर याचे त्याना जास्त लागले असावे...

<<<< होहो तसेच दिसते

@रिया << खरेतर मी त्या मुद्द्याशी सहमत आहे पण काय आहे की आपल्याला कुणबद्दल काय वाटतं हे असं उघडपणे सांगायचं नसतं हे काही लोकाना कळत नसतं