पुनश्च उद्योग ....

Submitted by विनार्च on 19 June, 2014 - 08:18

आजवर इतके उद्योग माझ्या लेकीने केले आहेत की ही खरं तर उसका "उद्योगपती ऑफ द डिकेड " अ‍ॅवॉर्ड तो बनता है ... Wink (नुकतीच दहा पुर्ण केलीत ना आम्ही Proud )
तर अशाह्या उद्योगांसाठी दरवेळी नविन धागे माबोवर काढून भरपूर सर्व्हर स्पेस अडवण्यापेक्षा आम्ही सुट्टीतील उद्योगांचा एकच धागा काढत आहोत....
ही उन्हाळी सुट्टी आम्ही भरपूर उनाडक्या करण्यात घालवली पण दुपारच्या वेळात घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने तो वे़ळ असा सत्कारणी लावला.....

सुरुवात करुया चित्रकलेपासून....
वारली पेंटिंग

20140615_193328.jpg20140615_193518.jpg20140615_193450.jpg

ह्या लोकांच्या बाबतीत आमच म्हणण अस आहे की "व्हेरी स्वीट पीपल.... कुण्णाच काहीही चालेलं असुदे सारखे नाचत असतात" Happy

हा आम्ही बर्‍याच दिवसांनी वॉटर कलरवर हात आजमावला....भरुन आलेलं आभाळ

20140615_192820.jpg

हे आमच आवडत कार्टुन कॅरेक्टर .. " चिप "

20140615_192701.jpg

(चिपेनडेल हे जोडनाव नसून दोन वेगवेगळ्या खारींची ही नाव आहेत अशी बहूमोल माहीती मला हे चित्र पाहूनच कळली. आता ही गोष्ट वेगळी आहे की सोबत एक तुक ही मिळाला Wink पण महत्वाच काय तर....ह्या दोन खारींमध्ये ज्याचे दात चिकटलेले अन नाक डार्क चॉकलेटी तो चिप आणि नाक रेड दातात फट तो डेल....संपल बाबा एकदाच, केवढ ते ज्ञान... आम्ही मेलं नुसत कार्टुन पहायचो Proud )

ह्याच दरम्यान आमच्याकडे माझी भाची रहायला आली. ती ह्यावर्षी चित्रकलेची दुसरी परीक्षा देतेय...तिच्या सोबत आमच्या मॅडमपण बसल्या चित्र काढायला...(हि सगळी चित्र तिने पहिल्यांदाच काढली आहेत फक्त पुस्तक वाचून)

स्मरणचित्र
20140615_192937.jpg20140615_193006.jpg

रंगवायचा आम्हाला भारी कंटाळा आला.... Happy

निसर्गचित्र
20140615_193159.jpg2013-09-17 17.46.41.jpg

संकल्पचित्र
20140615_192602.jpg20140615_193228.jpg

मुक्तहस्त चित्र
20140615_192912.jpg

ह्यात हात इतका बांधावा लागतो तरी ह्याला मुक्तहस्तचित्र का म्हणतात ,आई ?? ह्या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही देता आलेले नाही Uhoh

अक्षर लेखनाचा कन्सेप्ट भाचीला समजावे पर्यंत आमची चित्र तयार ही झाली.... Happy
20140615_193041.jpg20140615_193108_0.jpg

हे आमचं ठसेकाम... खर तर हे भेंडीच्या ठश्यांच चित्र असणार होत पण भेंडी रंगवताना रंगलेले आमचे हात मस्त आयडिया देऊन गेले ...यातल आकाश नी जमीनच ब्रशने रंगवलीय.

20140615_193135.jpg

आता आमची दुसरी आवड ... माती काम (चिकन माती ) Happy
कॅट
IMG-20140611-WA0060.jpg

डॉग
IMG-20140611-WA0055.jpg

राक्षस
IMG-20140611-WA0069.jpg

हत्ती
IMG-20140611-WA0075.jpgIMG-20140611-WA0082.jpg

बॅलेरीना (काय बाई नाव तरी..... )
IMG-20140604-WA0026.jpg

बॅलेरीना पासून गणपती न पणती (रुपांतरण Wink )
IMG-20140604-WA0032.jpg

टॉकन पक्षी (उच्चार तपासून घ्यावा )
20140611_154029.jpg
रिफर करायला हा फोटो

20140612_104905.jpg

ट्वीटी
20140611_145811.jpg

शेपूट पहा आमच
20140611_145853.jpg

इस्टर बनी
20140602_180151-002.jpg

स्नो मॅन... (पांढरा रंग संपल्याने व सप्लायरने हात वर केल्याने कलरफुल वेशात Proud )
20140613_230040.jpg

मॅलीफिसन्ट - स्लिपींग ब्युटीची व्हीलन
20140614_170109.jpg

इतक करुनही एक दुपार फारच डोक्यात गेली...तेंव्हा केलेला उपाय ... Rofl )
20140609_184242.jpg

या नंतर आम्ही भिंती रंगवण्याच काम काढल....खर तर हॉलची भिंत रंगवायची होती पण खूप बार्गेन करुन गॅलरीवर मांडवली झाली.....
20140610_183032.jpg

पर्सनल हाईट चार्ट...
20140613_194448.jpg

(काढायच्या आधी माहित नव्हत की इतक चांगल काढेल म्हणून वॉटर कलर वापरू दिले..आता हे चित्र प्रिझव्ह कसं कराव? असा प्रश्न पडलाय ...)

तर हे व असे बरेच उद्योग करुन ही सुट्टी आम्ही संपवली.... पण सुट्टी संपली म्हणजे उद्योग संपले असं नाही....
वी विल बी बॅक सुन Wink Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईशप्पथ काय भारी भारी केलंय काय काय... हाईट चार्ट तर सॉल्लिड...
आमच्याकडे आत्ता कुठे सुट्टी सुरू झालीये. मुलीला हा धागा दाखवावाच लागणार आता. Happy

फुलांची चित्रे तर अगदी चित्रकलेच्या परिक्षेच्या दर्जाची आहेत. आपल्याकडच्या पाटील यांचे जे लेख येताहेत त्यावर अवश्य काम करु द्या तिला. ( खरे तर ते आपणहून स्वतंत्र मार्गदर्शन करतील अशी आशा वाटतेय मला. )

सुंदर आहेत सगळे उद्योग Happy

वॉर्निश स्प्रे करून वॉटर कलर नीट राहातात असे एका मैत्रिणीकडून नुकतेच समजले.

मी आधी अनेकदा म्हणलंय तसं - रत्न आहे हे अर्चू,
खुप लकी आहेस तू.
अनन्याला खुप सारी शाबासकी. भेटेल तेंव्हा एक गिफ्ट पक्का!
आणि खुप खुप पप्प्या Happy
जियो अनन्या! अशीच बहरत रहा.
कोणती एक गोष्ट आवडली ते ठामपणे सांगता येणार नाही.
अनन्या, मला तो स्नोमॅन आणि ट्वीटी करायला शिकवशील का?

अप्रतिम! सगळ्याच गोष्टी छान झाल्यात. १० वर्षाच्या मुलीने हे केले ह्यावर विश्वास बसत नाही. फुले, हाईटचार्ट , कोळिण,पाण्यात खेळणारी मुले तर फारच सुंदर! हे असे उद्योग सुट्टी संपल्यावरही आम्हांला बघायला आवडतील, हे तिला आवर्जुन सांगा.

मस्त.. अप्रतिम.. तिला परिक्षा द्यायला लाव चित्रकलेच्या.. अशी चित्र काढत असेल तर सरावाने बी+ ग्रेड नक्की जात नाही कुठेच..

मस्तच Happy
चित्रे फार सुरेख काढली आहेत.

आता हे चित्र प्रिझव्ह कसं कराव? >> पेन्सिल / चारकोल स्केच / वॉटरकलर चित्र प्रिझर्व करायला एक ट्रान्स्परंट स्प्रे मिळतो . त्याचं नाव विसरलेय पण ठाण्यातल्या मँगो नावाच्या दुकानात पाहीला आहे. ( पुन्हा गेले तर नाव बघुन ठेवेन) तो भिंतीवर चालतो की नाही माहित नाही पण प्रयत्न करुन बघता येईल.

१० वर्षाच्या मुलीने केले हे?

आमची लायकी नाही बाबा कमेंट करण्याची

_________/\__________
>>> +१ खरच भारी आहे कलाकारी.

OMG!

एका सुट्टीत आमचेकडे पाठवून द्या...आमची एक भिंत रंगवायचं प्रोजेक्ट आहे शिवाय मुलांना उत्तेजना वगैरे पण होऊन जाईल. Happy कलाप्रांतात आम्ही दोघंही आपलं ते" हे "असल्याने उत्तेजना द्यायची राहूनच जाते..

सगळेच उद्योग मस्त...

Pages