Submitted by सायु on 12 June, 2014 - 08:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
कच्ची पपई : १ (छोटी)
लिंबु : १
बारिक चीरलेली कोथींबीर : एक छोटी वाटी.
तेल, हळद, मिठ, सा़खर, हिंग.
क्रमवार पाककृती:
पपई स्वच्छ धुवुन पुसुन सोलुन घ्या, आतल्या कच्च्या बिया काढुन टाकायच्या.
गाजर / काकडी कीसतो तशीच कीसायची आणि एका पसरट बोल/ पातेल्यात काढुन ठेवायची..
दोन चमचे(चहाचे ) तेल गरम झाले की त्यात मोहरी,हिंग,हळद घालुन फोडणी तयार करुन ती कीसलेल्या
पपई वर घालायची, मिठ, साखर, लिंबाचा रस घालुन कालवुन घ्यायची.. बारिक चीरलेली कोथींबीर पेरुन सर्व्ह करा..
वाढणी/प्रमाण:
३ - ४ माणसं
अधिक टिपा:
हा एक गुजराथी आणि चविष्ठ प्रकार आहे... तिकडे ही चटणी ढोकळ्या बरोबर देतात, जेवणातही असते..
कच्ची पपई तशी खाल्ली जात नाही, त्यामुळे या तक्कु/ कोशींबीर मुळे आठवडयातुन एक दोनदा
तरी आमच्या कडे होत..
माहितीचा स्रोत:
अहमदाबाद ची काकु, सौ. तेजश्री भोसेकर
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे प्रकार! मी भाजी करते.
छान आहे प्रकार! मी भाजी करते.
छान लागतो हा प्रकार. पपईचा
छान लागतो हा प्रकार. पपईचा आहे हे मुद्दाम सांगितल्याशिवाय कळत नाही.
जामनगरला एकदा खाला होता लग्नाच्या जेवणात. त्यात लाल तिखटही होते.
पपईचे पातळ काप करून, वाफवून, फोडणीत परतून त्यात बेसन पेरून पण एक प्रकार करतात. तो फरसाण बरोबर खातात. तोही छान लागतो.
धन्यवाद प्रिती, दिनेश दा....
धन्यवाद प्रिती, दिनेश दा.... अहमदाबाद ला लोकं ढोकळ्या सोबत खाताना दिसले नसेल तर"पपिता आपो" अस
दुकानदाराला मागतांना पण दिसले..
ञेस्स्य ढोकळ्ञाअबरोबर मिळते
ञेस्स्य
ढोकळ्ञाअबरोबर मिळते
कच्च्या पपईचा एक नविन उपयोग
कच्च्या पपईचा एक नविन उपयोग कळला.
धन्यवाद.
मस्तच! कच्ची पपई ब्रेकफास्टला
मस्तच! कच्ची पपई ब्रेकफास्टला खावी म्हणतात.
वाह मस्त तुमच्या पाकृ छान
वाह मस्त
तुमच्या पाकृ छान सोप्या असतात
आयुर्हित,मनुषी, जाई खुप खुप
आयुर्हित,मनुषी, जाई खुप खुप धन्यवाद..
Sayali Paturkar, सोपी कृती
Sayali Paturkar, सोपी कृती आहे. नक्की करून पाहणार. तसही कच्चा पपईची चटणी आम्हाला आवडते.
पपईचे पातळ काप करून, वाफवून, फोडणीत परतून त्यात बेसन पेरून पण एक प्रकार करतात. तो फरसाण बरोबर खातात. तोही छान लागतो. <<< दिनेशदा, जिलेबी, फाफडा आणि पपईची चटणी
तों.पा.सु. 
पपईचे पातळ काप करून, वाफवून, फोडणीत परतून त्यात ४-५ खमण ढोकळ्याचे हाताने भुगा करून घालावा. एकदम टेस्टी लागते. आई अळूवड्यांबरोबर करते.
मी पण अशीच करते. छान
मी पण अशीच करते. छान लागते.
सायली, शेअर केल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद मनिमोहोर, आरती. अरे
धन्यवाद मनिमोहोर, आरती. अरे व्वा! नविन प्रकार कळला... नक्की करुन पाहिल.. धन्यवाद..
छान कोशिंबीरीचा प्रकार.मुंबईत
छान कोशिंबीरीचा प्रकार.मुंबईत हॉटेलात कच्च्या पपईचा एक छान प्रकार खाल्ला गोडसर व transparent जिर्याची फोडणीवाला..प्रयोग केला की टाकीन पाक्रू
धन्यवाद मंजु ताई, रेसिपी
धन्यवाद मंजु ताई, रेसिपी नक्की शेयर करा...