येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
मग हा विजय इविएम मशिनमधे गडबड
मग हा विजय इविएम मशिनमधे गडबड करुन निकाल बदलुन मिळवला हे पन खर मानायच का ?
मग हा विजय इविएम मशिनमधे गडबड
मग हा विजय इविएम मशिनमधे गडबड करुन निकाल बदलुन मिळवला हे पन खर मानायच का ?
उदय तुम्हाला कदाचित माहेत
उदय तुम्हाला कदाचित माहेत नसेल. १९७१ च्या युद्धानन्तर इन्दिरा गांधीना प्रचन्ड यश मिळाले . तेव्हा मतपत्रिकेवर शिक्का मारण्यासाठी जी शाई वापरली जाते ती जनसंघाच्या उमेदवारांची उडून जाते व तिथे काँग्रेसच्या उमेदवारा पुढे केमिकल अॅक्शन करून ऑटोम्यातिक पणे शिक्का उठतो व त्यामुळे काँग्रेस निवडून आली असे व्हिस्पर ब्रिगेडने अफवा पसरवली होती. काही लोक इंदिरा गांधींचा करिष्मा आहे म्हणत. त्यावेळी कांग्रेसचे चिन्ह गायवासरू होते. सबब गाईच्या पवित्रतेने मते मिळाली असेही विश्लेषण केले गेले. म्हणून व्हिस्पर ब्रिगेडन्म्हणत असे की हा विजय गाईचा नाही बाईचा नाही तर शाईचा आहे. आपल्याला लोकमताचा पाठिम्बा नाही हे यांनी कधीही खुल्या दिलाने मान्य केले नाही. (२०१४ सोडून) या वेळेलाही काँग्रेसवाल्यानी यंत्रे सॅबोटेज केली होती पण आय सी चुकून कमळाशी कनेक्ट झाली. हा विजय मोदींचा नसून चुका करणार्या तेक्निशियनचा आहे. कोकणात म्हण आहे ना 'केले तुका आन झाले माका. कांग्रेसवाले यंत्रात ड्यामेज करायला गेले अन चुकुन कमळाला प्रोग्रॅम झाला अन्यथा भाजप या ही वेळी निवडून न य येता ! आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पहिलवाआनी तशी शंका पूर्वीच बोलून दाखवली होती::फिदी:
<आता आपण विरोधी पक्षात नसून
<आता आपण विरोधी पक्षात नसून सत्ताधारी पक्षात आहोत हे अनेक खासदारांच्या, काही मंत्र्यांच्याही लक्षात राहायचे नाही त्यासाठी हे सांगावे लागते डोळा मारा> हे लिहिताना गेल्या दहा वर्षांत संसदेचे कामकाज सुरळीत चालू न देण्यात भाजप खासदारांच्या बहुमूल्य योगदानाची आठवण करून द्यायची होती.
उदय यांनी ज्याचा उल्लेख केला ते युट्युबवर पाहिले. त्यात मनमोहनसिंग दुर्लक्षिले गेले असले तरी मुद्दाम दुर्लक्ष केल्यासारखे मला अजिबात वाटले नाही.
रॉहू उत्तर देतीलच पण त्यांच्या (जनसंघीय घोषणा) प्रतिसादातलेच शेवटचे वाक्य सुटे उचलून पुढच्या गाठी बांधल्यात. त्या घोषणेमागचा अर्थ खरेच कळला नाही?
रॉबिनहूड, >>
रॉबिनहूड,
>> कॉन्ग्रेसवाल्यानी सर्वर स्क्रिप्ट मध्ये काहीतरी गडबड केलेली दिसते . साले मायबोली प्रशासनातही काँग्रेसवाले
>> आहेत हे पाहून आश्चर्य वाटले. काँग्रेस निवडून आली की एव्ही एम मध्ये गडबड. आता मायबोलीत गडबड.
आपल्या जन्मापासून जग सुरू झालं असं प्रत्येक बालकाला वाटत असतं. वरील समस्या बरीच जुनी आहे.
आ.न.,
-गा.पै.
वरील समस्या बरीच जुनी
वरील समस्या बरीच जुनी आहे.
--------------------- पन हि समस्या कधि कधि गायब होते तेव्हा भाजप निवडुन येते ना ? कि उल्ट ?
ओडिसा, प बन्गाल, तमिलनाडु इथ
ओडिसा, प बन्गाल, तमिलनाडु इथ लाट नव्हति का ?
उदय यांनी ज्याचा उल्लेख केला
उदय यांनी ज्याचा उल्लेख केला ते युट्युबवर पाहिले. त्यात मनमोहनसिंग दुर्लक्षिले गेले असले तरी मुद्दाम दुर्लक्ष केल्यासारखे मला अजिबात वाटले नाही.
------ चित्रफित तिच असेल पण माझे मत वेगळे आहे. केवळ एक वेळा असे झाले असेल तर मुद्दाम केले नाही असे म्हणायला जागा रहाते. मनमोहन आणि इतर थाम्बलेले आहेत, सोनिया मागुन येतात आणि मनमोहन सिन्गानी केलेल्या नमस्काराकडे दुर्लक्ष करतात मात्र चहात्याचा हार स्विकारुन पुढे निघुन जातात...
http://www.youtube.com/watch?v=MeL6nwDZzNk
रॉहू उत्तर देतीलच पण त्यांच्या (जनसंघीय घोषणा) प्रतिसादातलेच शेवटचे वाक्य सुटे उचलून पुढच्या गाठी बांधल्यात. त्या घोषणेमागचा अर्थ खरेच कळला नाही?
पवारसाहेब निवडणुकीच्या धामधुमीत शाई पुसण्याबद्दल काही म्हणाले होते म्हणुन मी भरकटलो होतो.
------ नाही त्यान्च्या स्पष्टीकरणा नन्तरच शाई पुसण्याचा अर्थ कळला...
उदय तुम्हाला कदाचित माहेत नसेल.
------- धन्यवाद.... 'शाईचा विजय' याचा अर्थ कळाला.
बालकाला वाटत असतं. वरील
बालकाला वाटत असतं. वरील समस्या बरीच जुनी आहे.
आ.न.,
>>
आता ही हायपरलिंक कुठल्याशा अगम्य धाग्यावर पोचते आहे. पैलवान आज पुरते भंजाळलेले दिसत आहेत.
जालीम मेरे ठंडाईमे तूने ये क्या मिला दिया असे म्हणत असावेत बहुधा
मायबोलीचा सर्वर काँग्रेसच्या ताब्यात गेलेला दिसतोय अन्य था पैलवानानी कमळाचे दाबलेले बटन पंजावर कसे जात आहे? ::अओ:
रॉबिनहूड, >> आता ही हायपरलिंक
रॉबिनहूड,
>> आता ही हायपरलिंक कुठल्याशा अगम्य धाग्यावर पोचते आहे.
त्या संदेशाच्या खाली प्रशासकांना विनंती केली आहे. ती बघितलेली दिसत नाही तुम्ही. सगळे घास कसे अगदी चमच्याने भरवावे लागतात!
आ.न.,
-गा.पै.
मायबोलीच्या प्रतिष्ठीत
मायबोलीच्या प्रतिष्ठीत द्वि/प्र सदस्यांनो,
आपण हर हर लोधींचे विरोधक असाल तर वैधानिक इशारा देणे अनिवार्य आहे. श्री क्षेत्र गोवा येथे पणजी खंडाचे खांडेराव मनोहरराव हे आर्याव्रताचे क्षत्रप राजमान्य राजर्षि नरपुंगव इंद्र यांच्या अधिपत्याखाली कारभार पाहत असता एका दुष्टात्याने क्षत्रप म्हणजे भूलोकीचे इन्द्र यांचे वदनचोपडीमधे बदनामी केली असता पहारेक-यांनी त्यास त्याच्या सदनातून उचलून कारागृहात बंदीस्त केले आहे याची विशेषत: राज्यामधे माजलेल्या तणग्रस्त विरोधकांनी नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आपणाकडे दुचाकीवरून वायू दंडगोल आणतानाचे पूर्व क्षत्रप व आर्याव्रताची सोनियादेवी यांच्या चित्रासारखी चित्र बनविण्याची निरागसता नाही ना हास्यविनोद पसरवण्यातली निष्पापता. सबब सबुरीने घ्यावे अन्यथा कायदापालनातल्या निष्ठुरतेने उर्ध्वर्गामीचरणासनात लटकल्याने मिर्चीची धुरी होणे अनिवार्य आहे असे दिसते.
आठवले..... माहीती
आठवले..... माहीती दिल्याबद्दल.....धन्यवाद.........!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आता ही माहीती कृपया "मराठीत" लिहा
वदनचोपडी<<< थोबाड पुस्तक्,लई
वदनचोपडी<<< थोबाड पुस्तक्,लई बखरी शब्द राव...
कुणालातरी तुरुंगात डांबले व पुढे धमकी दिली आहे.ब्र.आ. यांनी असे म्हटले आहे.
बाकी सु.स्व. यांची बां.दे. भेट ठरली... आज चीन्यांसोबत खलबतं घडली.विदेश संबंध खात्याची घोडदौड चालूच...
बाकी पवार साहेबांच्या चेहर्यावर दुपारी मला मोदींचाच मुखवटा दिसत होता.है शाबास..मोदींची प्रेरणा घेतली हे बेस झालं...
आणखी काही महत्वाची बातमी??
(No subject)
ब्र.आ. ही लै जुनी केस हय.
ब्र.आ. ही लै जुनी केस हय. लोक्सभा विलेक्षण पासून चालू हय.त्याने अटक पूर्व जामीन मागितल होता तो रिजेक्ट झाल्याने त्याला अटक करणे भाग आहे
परदेशातील विज्ञान व
परदेशातील विज्ञान व तंत्रज्ञान यांसंबंधी होणार्या परिषदांना भारतीय चमूचे प्रमुख म्हणून केवळ वैज्ञानिकांना व तंत्रज्ञांनाच नेमण्याचा स्तुत्य निर्णय नव्या मंत्र्यांनी घेतला आहे.
अग्ग्गोबै, पहारेकरी झोपले
अग्ग्गोबै, पहारेकरी झोपले वाटतं ....
महापुरुश विटंबना प्रकरणात दगडफेकीत निश्पाप मनुश्य कोम्यात गेला.
रामराया, हेच का ते अच्चे दिन ?
http://www.punemirror.in/pune/civic/Stones-hurled-at-protest-put-truck-d...
चिन्मय, चांगला निर्णय. आता
चिन्मय, चांगला निर्णय. आता क्रीडाक्षेत्रात पण असा निर्णय घेऊन टाका म्हणावं.
महापुरुश विटंबना प्रकरणात>> याचा मोदी जागता पहाराशी काय संबंध?
आँ . देशात दन्गली घडु नयेत
आँ . देशात दन्गली घडु नयेत हे शासनाचे कर्तव्य असते ना ?
याचा मोदी जागता पहाराशी काय
याचा मोदी जागता पहाराशी काय संबंध?<<<
माणूस कोमात जाणे त्यांच्यासाठी नवीन आहे. त्यांच्या परंपरेनुसार आत्तापर्यंत कावळा शिवलेला असायला हवा होता.
कायदा आणि सुव्यवस्था राज्य
कायदा आणि सुव्यवस्था राज्य शासनाचे काम असते. हा पृथ्वीराज पहारा नाही.
निकलो न बेणकाब जमाना खराब हे
निकलो न बेणकाब जमाना खराब हे
हा पृथ्वीराज पहारा नाही.<<<
हा पृथ्वीराज पहारा नाही.<<<
अपघात , दन्गल, पाउसही
अपघात , दन्गल, पाउसही लांबला.
मला तरी हे पाहुन महाराजान्चा अभिशेक आठवला. महाराजान्च्या अभिशेकानन्तर एका मोठ्या सरदाराचा मृयुत्यु, मासाहेबान्चे निधन , रायगडावर वीज पडुन घोडे मेले की गवत जळले असे काहीसे घडले होते.
थेरड्या औरन्गजेबाला मात्र इतकी वर्शे सत्ता गाजवुन कसलाच प्रकोप त्रास देऊ शकला नाही.
असो.
अजून नेमके किती दिवस जनता
अजून नेमके किती दिवस जनता मोदींवर आशा लावून बसणार आहे?? अर्थात तसंही आता ५ वर्षे काहीच करू शकत नाही.
प्रचारात केलेल्या अनेक आश्वासनांपासून यु-टर्न घेतलाय...आणि गंमत म्हणजे मोदीभक्त त्याचंही समर्थन करत आहेत. जय हो!
विकास राहू द्या हो मोदीभाई, आधी दंगली आवरा.
<< काही वर्षांपूर्वी
<< काही वर्षांपूर्वी अहमदाबाद मधील साबरमती नदी खूप घाण होती. गेले दोन आठवडे मी अहमदाबादला जाणे येणे करतोय. तिचे स्वरूप हडसन सारखे वाटतेय. (ह्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही !) हडसन सारख्याच थोड्या गढूळ रंगाचे पाणी, तितचीच स्वच्छता, तसेच पायी फिरायला योजलेले मार्ग. मी निदान ६ किमीच्या पट्टात पायी फिरलो नदी किनारी, नदीत कुठेही कचरा नव्हता! नदी दोन्ही बाजूने बांधली आहे आणि दोन्ही बाजूने पुण्यात जसे रस्ते आहेत तसेच पण तीन पदरी तयार करत आहेत. त्या कामाचा राडारोडा असूनही खुद्द नदी एकदम स्वच्छ आहे ! निर्माल्य देखील टाकलेले आढळले नाही. पुढच्या टप्प्यात तिथे बोट टुरिझम आणत आहेत, ते बांधणे चालू आहे. ह्या असलेल्या अनुभवामुळे गंगा प्लान यशस्वी होईल असा मला विश्वास आहे.>>
पण हे दृश्य फक्त अहमदाबादमध्येच आहे की सगळीकडे? कारण साबरमतीबद्दल आकडे काही वेगळंच सांगतात. ह्या रिपोर्टनुसार साबरमती ही भारतातील तिसर्या क्रमांकाची प्रदूषित नदी आहे.
http://www.cseindia.org/node/3701
इथेसुद्धा -- http://infochangeindia.org/environment/news/gujarats-rivers-heavily-poll...
Until 2001, the Sabarmati figured nowhere near the top ten most polluted rivers. Officials blame this on the failure of the local administration to regulate the flow of untreated sewage into the river, and also the activities of polluting industries in the city. These are the two most important factors contributing to the pollution.
The river currently resembles a nullah, with 32 canals dumping chemical effluents and sewage into the river, and slums lining its banks.
ह्यात तथ्य असेल तर मोदींपासून गंगेचं रक्षण आता फक्त महादेवच करू शकतील
मिर्ची, हे तुम्ही स्वतः जाऊन
मिर्ची, हे तुम्ही स्वतः जाऊन बघितले आहे का?
आणि हा धाग्याचे शीर्षक जरा वाचाल का?
प्रचारसभेतून सांगितलेले
प्रचारसभेतून सांगितलेले मुद्दे असे होते. (जसजसे आठवले तसे, नंतर आठवले तर नंतर लिहू )
१. साठ आधुनिक शहरं बनवणार असं
२. गुजरात मधे कारखान्यात काम करणा-या उप्र च्या मजुरांना ओव्हरटाईम देऊन त्या बदल्यात सहा महीने सुट्टी देणार.
३. उप्र, बिहार मधे उद्योगधंदे, शेतीला प्रोत्साहन.
४. महाराष्ट्राला वीज देणार. देशात कुठेच वीज, पाणी यांचा तुटवडा होणार नाही
यातल्या ४ क्र. च्या दुस-या भागाबद्दल दहा कलमी कार्यक्रमात बोललं गेलं आहे. पण पहिल्या ३ क्र. बद्दल दहा कलमी कार्यक्रम किंवा राष्ट्रपतींचं भाषण यात कुठेच उल्लेख नाही. साठ आधुनिक शहरं म्हणजे महिन्याला एक किंवा वर्षाला पाच हा दर झाला. किमान १/५ काम पहिल्या वर्षी व्हायला पाहीजे.त्याबद्दल काहीच उल्लेख नाही. जमीन कुठून येईल ? पाण्याचे साठे, धरणं कुठून येतील ? या साठ शहरांना वीज कुठून येईल ? ही वीज कशी पिकेल ? खर्च किती येईल वगैरे. पाहूयात.
स्वस्ताई करण्याबाबत अधिक
स्वस्ताई करण्याबाबत अधिक स्पष्टीकरण आले आहे. खाद्यान्न, शेतीमाल यांच्या भावावर नियंत्रण आणलं जाईल. भाव कमी केले जातील. यात डिझेल, गॅस, केरोसीन यांचा समावेश नाही. सिलिंडरवरची सबसिडी उठवून साडेचारशे रूपये भाववाढ होईल असं सांगितलं जातंय.
इतर वस्तूंची भाववाढ न रोखता खाद्य, शेतमाल यांचे भाव उतरवले तर शेतकरी देशोधडीला लागणार नाहीत का ?
६००
६००
Pages