Submitted by pltambe@yahoo.co.in on 21 April, 2014 - 03:24
इच्छा मरण कायदेशीर असावे का ?
माझे एक जेष्ठ स्नेही वय वर्षे ८७ हे गेली दोन वर्षांहून जास्त काळ अंथरुणावर खिळून आहेत. या दोन वर्षात जेंव्हा जेंव्हा मी त्यांना भेटण्यासाठी त्यांचेकडे गेलो त्या प्रत्येक वेळी त्यांनी मला सांगितले आहे की त्यांनी त्यांचे आयुष्य अगदी कृतार्थपणे व्यतीत केले असून त्यांची आता कसलीच इच्छा उरलेली नाही त्यामुळे त्यांना आता जगणे नकोसे झाले असून ते स्वत: संपवावे असे वाटते आहे. परंतु असे जीवन संपवणे याला कायदेशीर मान्यता नाही व तसे केल्यास ती आत्महत्या ठरेल व आयुष्यात त्यांनी कधीही कायदा मोडला नाही त्यामुळे तो मार्ग त्यांना वापरावयाचा नाही. जे काही करेन ते कायदेशीरच असले पाहिजे हा त्यांचा निश्चय आहे.
यावर आपले व्विचार काय आहेत ?
इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता द्यावी का नाही ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिळूनी सार्याजणी या मासिकात
मिळूनी सार्याजणी या मासिकात विद्याताईंनी ज्यो रोमन यांच्या इच्छामरण या लढ्याबद्दल विचारांबद्दल लिहीले आहे. ते नक्की वाचून बघा.
द्यावी. मात्रं आपल्या समाजाची
द्यावी.
मात्रं आपल्या समाजाची या कायद्यान्वये येणारी नैतिक जबाबदारी पेलण्याची ताकद असेल तरच.
बाकी अन्न पाणी इ. चा त्याग करून मरण अंगिकारणारे वृद्ध पाहिले आहेत.
जरुर कायदेशीर
जरुर कायदेशीर असाव.
याविषयवरील काही चर्चा पहा
सुखांत
परमसखा मृत्यू : किती आळवावा.
तांबेसाहेब, आपण मायबोलीवर
तांबेसाहेब, आपण मायबोलीवर नवीन आहात. आपण जे धागे उघडता आहात त्यापैकी बर्याच विषयांवर ( आणि पाककृतीवरही ) इथे आधीच धागे आहेत. आपण शोध सुविधेचा फायदा अवश्य घ्या. त्यातूनही आपल्याकडे नवीन मुद्दे असतील तर अवश्य तिथे लिहा. आपण उघडत असलेल्या भारंभार धाग्यांमूळे महत्वाचे धागे मागच्या पानावर जाताहेत. एक जूना मायबोलीकर म्हणून एवढ्या कठोरपणे मला लिहिणे भाग आहे. आपण समजून घ्याल अशी आशा आहे.
आपण जे धागे उघडता आहात
आपण जे धागे उघडता आहात त्यापैकी बर्याच विषयांवर ( आणि पाककृतीवरही ) इथे आधीच धागे आहेत. आपण शोध सुविधेचा फायदा अवश्य घ्या. त्यातूनही आपल्याकडे नवीन मुद्दे असतील तर अवश्य तिथे लिहा.
या वाक्यांशी सह्मत.
आपण उघडत असलेल्या भारंभार धाग्यांमूळे महत्वाचे धागे मागच्या पानावर जाताहेत.
या वाक्याशी पूर्णपणे असहमत. कोणते धागे महत्त्वाचे हे व्यक्तीसापेक्ष आहे. तुम्ही पण तुम्हाला हवे असलेले धागे शोधू शकता search वापरून.
इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता
इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता द्यावी का नाही ?................
माझ्या मते अजिबात देऊ नये. वैचारिकदृष्ट्या पटले तरीही व्यवहारात याचे खूप दुरुपयोग होतील.
अवांतर आहे.
माझी आई ,तिच्या मैत्रिणीची(तिला क्ष म्हणू) ,गोष्ट सांगायची की क्षची आई अशीच म्हातारी व अंथरुणावर खिळून
होती.तिने क्षला सांगितले की आता आयुष्य अगदी पुरे झाले आहे.तेव्हा मला झोपेच्या गोळ्या दे.तिची सर्व परिस्थिती क्षला पटली आणि तिने आईला गोळ्या दिल्या. काही वेळाने क्षला राहवेना. डॉक्टरला बोलावून सर्व इलाज केले.(बाकी तपशील माहीत नाही.) शुद्धीवर आल्यानंतर आईने क्षशी बोलणे टाकले ते पुढे काही वर्षांनी आईचा मृत्यू होईपर्यंत.
आता माझी आई इच्छामरणाची भलामण करीत असते.'मिळून सार्याजणी 'मासिकाचा दाखला देते.
असावे, पण एकदाच असावे. (दोन
असावे, पण एकदाच असावे.
(दोन धागे झाले आहेत.)
होय. असावे.
होय. असावे.
ईबा बहुदा जे कन्फ्यूज्ड आहेत
ईबा
बहुदा जे कन्फ्यूज्ड आहेत त्यांना एका धाग्यावर 'होय' आणी दुसर्यावर 'नाही' लिहायची सोय असावी म्हणून दोन धागे असावेत.
होय असावे.
होय असावे.