कोणतेही चित्र रंगवताना कोणते रंग कसे मिसळावेत, कोणत्या रंगाच्या बाजुला कोणता रंग ऊठुन दिसेल ,एकंदरीत रंगसंगती आणि त्याचा परिणाम यांचा विचार करावा लागतो. याचा अभ्यास कलर थिअरी मधे करावा लागेल. हा अभ्यास खुप खोलात जाउन करता येईल मात्र आपल्या पुरता बेसिक कलर थिअरीचा अभ्यास आपण करुया.
हा अभ्यास या पुढील चित्र करताना वापरुया.
लाल , पिवळा आणि निळा हे तिन रंग प्रायमरी कलर्स आहेत जे दुसर्या कोणत्याही रंगाना मिसळुन बनवता येत नाहीत. ( तसे पांढरा आणि काळा हे रंगही दुसरे रंग मिसळुन बनवता येत नाहीत पण पांढरा /काळा हे कलर व्हील मधे सामाविष्ट केले जात नाहीत, it either denotes absense or presense of all colors )
आता लाल आणि पिवळा रंग मिसळला तर ऑरेंज , पिवळा आणि निळा मिसळला तर हिरवा , निळा आणि लाल मिसळला तर जांभळा रंग मिळतो हे झाले सेकंडरी कलर्स
आता तयार झालेले सेकंडरी कलर्स आणि त्याच्या बाजुचा प्रायमरी रंग मिसळुन तयार होणारे Yellow-orange, red-orange, red-purple, blue-purple, blue-green & yellow-green हे झाले tertiary कलर्स.
रंगसंगती- चित्र रंगवताना वेगवेगळ्या रंग संगती वापरल्या जातात, हा खरतर डीझाईनचा भाग झाला मात्र चित्र आकर्षक दिसण्यासाठी किंवा काही चित्र जास्त आकर्षक का दिसतात हे कळण्यासाठी याचा थोडा अभ्यास हवा
ट्रायाडीक (triadic) रंगसंगती: आपण जे वर कलरव्हील काढलेय त्यात सारख्या अंतरावर असलेले कोणतेही तीन रंग वापरुन जर चित्र तयार केले तर ते या रंगसंगतीनुसार होईल . उदा: जर आपण पिवळा रंग घेतला तर त्यानंतर तीन रंग सोडुन नीळा आणी नीळ्या पासुन तीन रंग सोडले तर लाल आणि परत तिन रंग सोडले तर पिवळा रंग मिळेल. म्हणजे तिन प्रायमरी रंग घेउन ट्रायाडी़क कलर स्किम बनवता येते, हेच सेकंडरी कलर्स ना लागु होउ शकेते. याच प्रकारे टर्शरी कल्रर्स मधुनही अशी कल्र्र स्किम बनता येते. हे तिन्ही रंग सारख्या अंतरावरचे असल्याने डीझाईन प्रकारच्या चित्रात याचा वापर जास्त होतो.
Analogous रंगसंगती - कलर व्हील वरचे येक मेका लगतचे तीन रंग वापरुन केलेले चित्र या प्रकारात मोडते. उदा पिवळा , पिवळा हिरवा आणी हिरवा हे रंग मुख्यत्वे करुन वापरले तर तर Analogouकलरस्किम मधले चित्र तयार होइल. अशा कलरस्कीम हार्मनी तयार करतात.
Complementary /विरुध्ह रंगसंगती. कलरव्हील वर येक मेका च्या विरुद्ध दिशेला असलेल्या दोन रंगांचा मुख्यत्वे वापर करुन केलेली चित्र यात मोडतील उदा. पिवळ्याच्या विरुद्ध दिशेला असेल जांभळा. अशा रंगानी येक उत्तम कॉन्ट्रस्ट मिळतो
शित रंग संगती
उष्ण रंगसंगती
कलर्व्हीलचे चित्रात दाखवल्या प्रमाणे दोन भाग केले तर आपल्याला या दोन रंग संगती मीळतात
या शिवाय खाकी आणि ocres , earth colors हे Compound कलर्स (मातकट रंग) या गटात मोडतात.
उदा. यलो ocre , बर्न्ट अम्बर , बर्न्ट सिएना इ>
लँडस्केप करताना ट्रायाडीक रंगसंगतीपेक्षा इतर रंग संगतीचा वापर जास्त होतो. उदा. शित रंगसंगती वापरुन त्यात येखादा उष्ण रंग वापरुन थोडा ड्रामा तयार करता येतो. याचा अंदाज आपण खुप सारी चित्र करीत गेल्यावर येतो आणि प्रत्येक चित्रकारची येक पॅलेट तयार होते.
कोणत्याही रंग किती डार्क किंवा लाईट आहे त्यावर त्याची कलरव्हॅल्यु ठरते . जर येखादे रंगीत चित्र आपण ग्रेस्केल मधे बदलले तर या व्हॅल्युज समजायला सोपे पडेल.
मागे गजानन यांनी सावली रंगवण्याबाबत काही प्रशन विचारले होते.
त्याचा कलर थिअरीच्या अनुषंगाने थोडा विचार करु. सावलीतला भाग हा थोडा डार्क दिसेल आणि अर्थात त्या प्रमाणे त्या भागाची कलर व्हॅल्यु बदलेल. तसेच सावलीच्या भागात उजेडातल्या भागा पेक्षा कमी डीटेल्स दिसतील.
सावलीही दोन प्रकारात मोडते
१. form shadow - येखाद्या वस्तु चा प्रकाशाच्या विरुध्ह असलेला भाग सवालीत असेल आणि तो त्या वस्तुच्या आकराप्रमाणे सावलीत उजेडाचे प्रमाण कमी अधीक होइल. काही भागवर प्रकाश सरळ पडला असेल तर तेथे हायलाईट्स तयार होतील , प्रकाशाच्या अगदि विरुध्ह किंवा ज्यावर ती वस्तु ठेवली आहे त्या पृष्ठभागा जवळ खुप गडद सावली (डार्क्स) तर जिथे परावर्तित प्रकाश पडलाय तेथे सावळि थोडी कमी गडद होईल.
याचा अभ्यास वस्तु चित्र, पोर्ट्रेट , क्लोजअप्स करताना होतो.
२.cast shadow- त्या वस्तुची जमीनवर पडलेली सावली - यात फार वेरिएशन नसते. वस्तु जवळ थोडी गडद आणि हळूहळू कमी गडद रंगवता येते मात्र फार वेरिएशन नसते.
खालील चित्रात या दोन्ही सावल्या मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
सावली दिवसाच्या वेळे प्रमाणे रंगवावी लागते , सावल्यांची लांबी तर कमी जास्त होतेच मात्र त्यांची मात्रा (intensity) हि बदल्;अत राहाते. सकाळ च्या सावल्या सॉफ्ट तर दुपारच्या कच्कचीत पडतात.
कलरव्हील मधे बघितलेले विरुद्ध रंग मिसळुन काळपट छटा मिळवता येतात , त्यांचा सावली साठी वापर करता येतो
, जी रंग छटा वापरली आहे त्याचीच डार्क शेड वापरता येते किंवा मुळ्चटेच्या आसपासचा सेकंडरी कलर वापरता येतो. मी पिवळ्या रंगाच्या घरावर तिन प्रकारे शॅडो रंगवली आहे, चित्राच्या मुड प्रमाणे हे वापरावे लागते.
या शिवाय काहीजण नीळ्या रंगात किंवा payne's gray रंगात सावल्या रंगवतात. पुर्ण काळ्या रंगाचा वापर मात्र टाळला जातो.
थिअरी मी सुरुवातिला लिहणे टाळले कारण बर्याच जणाना याचा कंटाळा येतो मात्र याचा थोडातरी अभ्यास आवश्यक आहे .
इथे काहीजण वेब डीझाईन , फॅशन डीझाईन अशा क्षेत्रात असतील त्यांचा कलर थिअरीचा चांगला अभ्यास असेल आणि ते यात अजुन भर घालु शकतील.
मस्त समजावलेय. मी परत
मस्त समजावलेय. मी परत प्रयत्न करतेय
अजय, चांगली माहिती देत आहात.
अजय, चांगली माहिती देत आहात.
कलर थिअरीबद्दल आणखीही लिहिलंत तरी आम्हाला फायदाच होईल. कोणी कंटाळणार नाही (बहुतेक).
mast..vachtiye...
mast..vachtiye...
सर माहिती बद्दल धन्यवाद. कलर
सर माहिती बद्दल धन्यवाद.
कलर थिअरी बद्दल आता पर्यंत कधी विचार केला नव्हता.इथे खूप शिकायला मिळते आहे .मला नाही वाटत कोणी कंटाळेल.
छान! परत उजळणी होते आहे!
छान! परत उजळणी होते आहे!
खुप छान माहिती ! प्रत्यक्ष
खुप छान माहिती ! प्रत्यक्ष एखादे चित्र दाखवून त्यात असा रंगाचा वापर कसा केलाय त्याबद्दलच्या लेखाची वाट बघतोय. अर्थात तोपर्यंतच्या सगळ्या पायर्या वाचणारच.
मस्त!! मला फक्त प्रायमरी व
मस्त!! मला फक्त प्रायमरी व सेकंडरी कलर्स माहीती होते.
मस्त् माहिती .
मस्त् माहिती :).
मला फक्त प्रायमरी व सेकंडरी
मला फक्त प्रायमरी व सेकंडरी कलर्स माहीती होते >>> +१
एलिमेंटरी इन्टेरमिडिएटला
एलिमेंटरी इन्टेरमिडिएटला थिअरी केली होती शाळेत. आता इतक्या वर्षांनी त्याची उजळणी होतेय
अजय, हा भागही मस्त आहे.
मी माझी चित्र बरेचदा माझी
मी माझी चित्र बरेचदा माझी चित्र फोटो एडीटर ने ग्रे स्केल मधे कन्व्हर्ट करुन टोनल व्हॅल्यु बरोबर आहेत का हे बघतो.

हे नॅशनल पार्क मधले असेच ग्रे स्केल कन्व्हर्ट केलेले चित्र
या चित्रात जास्तित जास्त उष्ण रंग वापरुन आणि शार्प सावल्या रंगउन उन्हाचा परिणाम साधायचा प्रयत्न केलाय.

यात जास्त शित रंग वापरले आहेत त्यातुन शांत समुद्र दाखवलाय मात्र अगदिच येक सुरिपणा टाळण्यासाठी काही अर्थ कलर्स आणि फिगर्स च्या कपड्यांवर लाल्सर छटा वापरल्यात.

भारी उदाहरणे आहेत, अजय!
भारी उदाहरणे आहेत, अजय!
शेवटचे तर खलास आहे. अप्रतिम! घोड्याचे पोश्चर, ओलसर रेती, तिच्यावरची प्रतिबिंबं, टांग्यातल्या फिगर्स! आकाश, आणि किनार्यावरची तटबंदी (?)!! सगळेच खूप सुंदर आहे.
ट्राय करतो. (हे लिहायला धाडस करावे लागले!
)
थिअरी मी सुरुवातिला लिहणे
थिअरी मी सुरुवातिला लिहणे टाळले कारण बर्याच जणाना याचा कंटाळा येतो >> अजयसरजी.. तू ज्याप्रकारे समजवत आहेस तेव्हा थिअरीदेखील कंटाळवाणी झाली नसती हे १०० %.
पुन्हा एकदा धन्यवाद पुन्हा मस्त मस्त माहिती चांगल्याप्रकारे समजवल्याबद्दल
मस्त लेख. ही चित्रं किती
मस्त लेख. ही चित्रं किती सुरेख आहेत.
किती छान टिप्स... मन लावून
किती छान टिप्स... मन लावून सर्व धडे वाचतेय.. गिरवायला अजून वेळ मिळाला नाहीये पण माझ्या आवडत्या दहात सेव करून ठेवलेत
जलरंग कार्यशाळा संपल्यावर चारकोल पेंटिंग बद्दल काही शिकवाल का??
हाही लेख आवडला. बरीच नवीन
हाही लेख आवडला. बरीच नवीन माहिती मिळाली.
ही थिअरी शिकल्या नंतर आपण
ही थिअरी शिकल्या नंतर आपण वेगवेगळे (दोन किंवा जास्तित जास्त तीन) रंग मिक्स करुन बघितले आणि त्याचे swatches पेपर वर बनउन घेतले तर आपल्या रंगपेटीतुन तयार होणार्या शेड्स ची रेफरंस शीट तयात होईल .
यातुन तुम्हाला कोणते रंग मिक्स केले तर डार्क शेड मीळेल , कोणत्या रंगानी मातकट किंवा डल शेड मिळेल याचा अभ्यास होइल.
उदा अल्ट्रामरीन ब्लू + क्रिमसन रेड या मिश्रणा तुन सुंदर जांभळा रंग मिळेल तर यात क्रिमसन ऐवजी कॅड्मीअम रेड वापरला तर काळपट जांभळा तयार होइल( जो काही चित्राना उपयुक्त ही असेल पण जर चुकुन अयोग्य जागी वापरला किंवा ग्लेझ केला तर पुर्ण चित्र बिघडेल)
चित्र डल /काळपट व्हायची काही कारणे
१. पॅलेट न धुणे. यात पॅलेटच्या मिक्सिंग वेल मधे असलेले आधिचे रंग मिसळुन गेल्याने चुकिच्या छटा मिळतात आणि चित्र बिघडते. ( माझ्या माहितीत काही उत्तम चित्रकार आहेत ते महिनोंमहिने पॅलेट धुत नाहित , हवा तेव्हढा भाग ब्रश ने पुसुन घेतात तरीही त्यांची चित्र फ्रेश दिसतात , हे झाले अपवाद)
२. रंगाने गढुळ झालेले पाणि न बदलता वापरणे. आपल्याकडे कधीही दोन कंटेनर्स हवेत येकात स्वच्छ पाणी आणि दुसर्यात ब्रश धुणे , साफ करणे
३.कागदावर येकाच भागात खुप वेळा काम करणे. रंगांचे जितके थर बसतील तितकि ट्रांस्परंसी कमी होइल आणि चित्र डल होईल. थंब रुल येका जागेवर जास्तीत जास्त तीन वेळा रंग लेपन झाले पाहीजे. येका किंवा दोन वॉशमधे झाले तर उत्तम.
४. चुकुन विरुद्ध रंग मिक्स होणे, या मिक्स चा वापर जाणिवपुर्वक केल्याने सावलीचा इफेक्ट किंवा इतर हवा तसा इफेक्ट मिळेल चुकुन कागदावर किंवा पॅलेट वर हे रंग मिसळुन चित्र काळपट होउ शकते
५. अर्थ कलर्स चा वापर हा लँड्स्केप मधे होतोच /करावा लागतोच मात्र मुळात हे रंग मातकट शेडकडे झुकतात. त्यात दुसरे रंग मिक्स केल्याने बर्याचदा अधिक मातकट होतात . याचा अर्थ हे रंग वापरायचे नाहीत किंवा ते दुसर्या रंगात मिक्स करायचे नाहीत असा नाहि मात्र आपण हे रंगाचे मिश्रण दुसर्या कागदावर वापरुन ठरऊ शकतो. सरावाने याचा अंदाज येतो.
६.खुप सारे रंग मिसळणे - कोणतीही शेड तयार करायला दोन किंवा जास्तीत जास्त तीन रंग पुरेत. त्यापेक्षा जास्त रंग मिसळल्याने रंग काळ्याकडे झुकण्याची शक्यता अधिक.
वर्षू नील- चारकोल मधे काम
वर्षू नील- चारकोल मधे काम करायला मला आवडते पण त्यावर लिहण्या येव्हढे काम मी त्या माध्यमात करीत नाही. काही शंका असल्यास शक्य तेव्हढे निरसन करु शकेन.
http://www.dummies.com/how-to
http://www.dummies.com/how-to/content/watercolor-painting-for-dummies-ch...
उपयुक्त चीट शिट
मस्त!
मस्त!
चित्रात आपल्याला बरेचदा
चित्रात आपल्याला बरेचदा फिगर्स टाकाव्या लागतात, स्केचिंगचा चांगला सराव असेल तर हे सहज जमते. लँड्स्केप मधल्या फिगर्स मुळ चित्राला पुरक म्हणुन टाकल्या जातात आणि त्यामुळे खुप मोठ्या किंवा डीटेल्ड नसतात. मनुष्याकृती काढायची झाल्यास साधारण डोक्याच्या ( हेड) उंचिच्या ६ ते ७ पट उंच आणि दोन हेड रुंद , शरिराचे सांधे हे लक्षात घेउन करावे. ( हे एक्झॅक्ट प्रपोर्शन नाही मात्र लँडस्केप ला चालुन जाईल) , स्त्री फिगर्स काढायला सुद्धा असेच प्रपोर्शन फक्त रुंदी साधारण दिड हेड , बॉटल शेप फिगर आणि बाजुला चित्रात पुरुष फिगर असेल तर उंची थोडी कमी असे करावे. चित्रात खुप जाड्या , बेढब आकृत्या टाळाव्यात.





अशाच रितिने प्राणि काढायचे झाले तर प्रपोर्शन साधारण तीन बॉक्स मधे बसवता येते, पाय कुढुन सुरु होतात , शिंग , कान यांच्या जागा इत्यादी ऑब्जर्व केले तर या आकृत्या सहज जमतील
चित्रात आपल्याला माणसं, गाय , बैल, बकर्या, कुत्रे , कोंबड्या अशा पाळीव प्राण्यांच्याच आकृत्या लागतात , वाघ , सिंह काढायची वेळ फारशी येणार नाही , मग तेव्हढी प्रॅक्टिस तर हवीच
रंगवताना कपड्यांचे रंग चित्राच्या रंग संगतीला सुट करतील असे ठेवायचे , बरेचसे वेट इन वेट काम करुन या फिगर्स संपवता येतात.


फिगर्स नी चित्राला येक जीवंतपणा येतो.
यापुढील चित्रात आपण काहि फिगर्स अॅड करायचा प्रयत्न करु.
मस्त... पुढील गृहपाठाच्या
मस्त... पुढील गृहपाठाच्या प्रतिक्षेत.
अजय खूपच मस्त आणि विस्तृत
अजय खूपच मस्त आणि विस्तृत माहिती दिली आहे... फारच छान!!
कलर थिअरी, आमचा फाऊंडेशनचा अभ्यास 
कलर व्हॅल्यू / ग्रे स्केलचा चार्ट दिलात हे पण छान!!. खालचे घराचे चित्र सर्वात आवडले.
याही आठवड्यात ब्रश हातात धरता आला नाही. पण पुढच्या आठवड्यात नक्की जमवणार.
रंगवल्यावर छोट्याश्या
रंगवल्यावर छोट्याश्या फिगर्सपण किती छान दिसतात.
वाचतेय..... एप्रिलच्या
वाचतेय.....
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून परत होमवर्कला सुरुवात करेन
ओके.. अजय जी!! मला
ओके.. अजय जी!!
मला माणसांच्या फिगर्स बर्यापैकी जमतात, प्राण्यांच्या खूप कठीण वाटतात.. अब प्रॅक्टीस होगी..
गजानन - या लेखा साठी वेगळा
गजानन - या लेखा साठी वेगळा गृहपाठ नाही. सुरुवातीच्या लेखात दिलेले सात /आठ रंगांच्या जोड्या करुन त्या प्रंआणे रंग बनवायचे, त्यात परत रंगांचे प्रंमाण , पाण्याचे प्रमाण कमी जास्त करायचे . यातुन आपल्या कदच्या रंगाचे रिझाल्ट्स कळतील, कोणत्या रंग मिश्रणाने चित्र काळपट होईल तेही कळेल म्हणजे काय अव्हॉईड करायचे तेही कळेल. यातुन ज्या वापरण्या जोग्या शेड्स तयार होटिल त्यात तिसरा रंग अॅड करुन अजुन याच पद्धतीने अजुन शेड्स तयार करता येतील.
उदा. आपल्या कडे दोन पिवळ्या आणि दोन निळ्या रंगाच्या शेड्स आहेत त्यातुन हीरव्या रंगाच्या चार शेड तयार होतील, त्यात परत पिवळ्या किंवा नीळ्या रंगांचे प्रमाण बदलले , पाणि वाढ्वले तर अजुन शेड्स , टोन्स मिळतील.
या हिरव्या रंगात नंतर बर्न्ट सियेना, ऑरेंज, लाल असे येक येक मिक्स करुन बघा , त्यातुन डार्कर शेड्स मिळतील.
याबरोबर फिगर्स , शॅडो यांचा अभ्यास आहेच.
मस्त माहिती . तुम्हि फार
मस्त माहिती . तुम्हि फार सोप्या भाषेत समजावुन सांगता. धन्यवाद.
मस्त माहिती.
मस्त माहिती.
कलरव्हील मधे बघितलेले विरुद्ध
कलरव्हील मधे बघितलेले विरुद्ध रंग मिसळुन काळपट छटा मिळवता येतात , त्यांचा सावली साठी वापर करता येतो <<< अजय, म्हणजे लाल आणि हिरव्या या दोन्ही रंगातल्या वस्तूंच्या सावल्या ( लाल + हिरवा ) यापासून जो रंग मिळेल त्या एकाच रंगवायच्या का?