मुलगा/ मुलगी विवाह योग्य झाली कि आई वडिलांना सून / जावई यायचे वेध लागतात .
पण बर्याच वेळा लग्न ठरण्यास उशीर होत असतो .
लग्न लवकर न ठरण्याची वेगवेगळी कारणे असतात त्यातील काही कारणे म्हणजे त्याच्या / तिच्या अपेक्षा खूप आहेत . दिसायला चांगला, चांगले करियर म्हणजे आर्थिक स्थिती उत्तम असणाराच जोडीदार हवा आहे . वयात जास्त अंतर नको . अजून योग नाही वगेरे .
बाकी सगळे मुद्दे मान्य केले तरी वयातले अंतर ह्य मुद्द्यावर मात्र विचार करायला हवा असे वाटते .
हल्ली ५-६ वर्षाचे अंतर हे खूप वाटायला लागले आहे . खरेतर आजकाल मुली पण शिकतात त्यांना पण चांगले जॉब असतात . त्यामुळे त्यांना जोडीदार साहजिकच आपल्याहून एक पाऊल पुढेच अपेक्षित असतो यात काही गैर पण नाही पण जेव्हा लोक म्हणतात ( विशेषत: मुली व त्यांचे पालक ) कि ५-६ वर्षांचे अंतर नको आम्ही २-३ वर्ष अंतर असणारे स्थळच बघत आहोत आणि बाकी त्या स्थळाची कहिही चौकशी न करता ते नाकारतात तेव्हा साहजिकच असा प्रश्न पडतो कि खरेच एवढे अंतर खूप आहे का ? केवळ त्या एकमेव कारणासाठी स्थळ नाकारणे कितपत योग्य आहे ?
मला असे वाटते कि ५-६ वर्षाचे अंतर असले तर स्थळ बघायला काही हरकत नसावी . कधी कधी वयापेक्षा मुलगा दिसायला लहान वाटतो किंवा वयाने लहान असून मोठा पण वाटू शकतो . तेच त्याच्या maturity बद्दल पण म्हणता येईल . कितीतरी तेवढे किंवा जास्त अंतर असलेल्या जोडप्याचे सुखी संसार बघतच असतो . आत्ताचा काळ बदलला आहे. आता ५-६ वर्ष अंतर म्हणजे generation gap असते वगेरे पण एकू येते पण तरीही अशावेळेस मुलाला भेटून मगच मत बनवावे असे वाटते . अर्थात वयातील अंतर किती असावे ह्या बाबतीत वेगळी मते असू शकतात .
तसेच ज्या मुलींची / मुलांची लग्न काहीही कारण नसताना वेळेत ( म्हणजे बघायला लागल्या पासून लवकर ) ठरत नाहीत असे मुले/ मुली पण नाराज असतात . त्यांनीही लग्न ठरत नाही म्हणून नाराज होऊ नये . लग्न ठरेपर्यंत त्या काळात करियर कडे जास्त लक्ष द्यावे ,एखादा आवडणारा छंद जोपासावा . पुढे लग्न झाल्यावर जबादारी वाढते त्यावेळेस स्वत: साठी वेळ मिळतोच असे नाही . आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघावे असे वाटते .त्यांच्या आई वडिलांनी (परिवाराने)पण लग्न ठरत नाही या विषयाचा फार मोठा issue करू नये .
हा लेख आधी माझ्या ब्लोगवर ( anaghabhade.blogspot.in ) लिहिला होता . परंतु माझा ब्लोग हा 'ज्योतिषशास्त्र ' विषयावर असल्याने त्या विषयात रस असणार्यांनीच फक्त हा लेख वाचला असावा असे वाटले हा जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या उद्देशाने इथे देत आहे .
आपली मते ह्या विषयी काय आहेत हे पण जाणून घ्याला आवडेल .
मी नऊ वर्षांचे अंतर असल्याने
मी नऊ वर्षांचे अंतर असल्याने एका मुलीचे प्रेम नाकारले होते, अर्थात फुलायच्या आधीच याचे लग्नात रुपांतर होणे शक्य नाही या विचारापोटी वेळीच माघार घेतली होती. तेव्हा मी २८-२९ चा होतो आणि ती १९-२० ची.... आज मात्र मी ३३ चा असताना ती २४ ची पाहताना तेव्हा हा मुद्दा लक्षात घेतला नसता तरी चालले असते असे वाटते....
असो, पण माझ्यामते ५-६ वर्षांचा फरक काही हरकत नाही. उलट बरेच ते. बायको तुलनेत कमी वयाची असल्यास नवर्यापेक्षा थोडी तरुण वाटत राहते आणि तिच्या मनात तरी असुरक्षिततेची भावना कमी असते अश्यावेळी.
माझ्यामते मुलींना मॅच्युरीटी सुद्धा लवकर येते वयाच्या मानाने त्यामुळे मुलगी लहान असली तरी मॅच्युरीटी लेवल वर दोघे एकच असतात.
बायको तुलनेत कमी वयाची
बायको तुलनेत कमी वयाची असल्यास नवर्यापेक्षा थोडी तरुण वाटत राहते आणि तिच्या मनात तरी असुरक्षिततेची भावना कमी असते अश्यावेळी. >> असेच असेल तर मग नवर्याला असुरक्षित वाटू शकते की राव!!
//आज मात्र मी ३३ चा असताना ती
//आज मात्र मी ३३ चा असताना ती २४ ची पाहताना तेव्हा हा मुद्दा लक्षात घेतला नसता तरी चालले असते असे वाटते..////
अगदी अगदी.
प्रेमविवाह बाबत अशी बरीच उदाहरणे असतील ज्यामध्ये बायकोचे वय नवर्यापेक्षा ८-१० वर्षाने लहान आहे किंवा बायको नवर्यापेक्षा मोठी आहे. तरीही संसार सुखाचे झाले आहेत.
इथे arranged marriage चा प्रश्न आहे. अलीकडे काही अनुभवातूनच हे लिहिले आहे. अगदी ३५ वर्षाच्या मुलीला ४० वर्षाचा मुलगा नको म्हणाली कारण ५ वर्षे अंतर . फारतर ३८ वर्षापर्यंत चालेल असे म्हणाली. फक्त वयातील ५ वर्षे अंतर ह्या शिवाय काही कारण नाही . स्थळाची माहिती ऐकून घेतलीच नाही. अशीच अजूनपण उदा . आहेत.
अन्विता तै तुम्ही म्हणता ते
अन्विता तै
तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे.
आजच्या युगात लग्न हे केवळ एक समाज ब्॑धन आहे म्हणुन केले जाते कि काय असे मला वाटते.
मुलगा/ मुलगी स्वतःचे वाढते वय लक्षात न घेता, अश्या काही अटी तयार करुन ठेवतात की बस् , त्या॑ना आपले करियर लग्ना पेक्षा जास्त मह्त्वाचे वाटते.( यात करीयरच्या मागे न लगण्या-या मुली देखिल आहेत) मग लग्नाला कितीहि उशिर झाला तरी चालेल.
मग त्यात् ते तसु भरही बदल करायला तयार नसतात. ह्या गोष्टी केवळ नोकरी करण्या-या मुलि॑न्मधेच नाही तर अगदी
काहिही न येणा-या न मिळवत्या मुलि॑मधे पण असतात. मग अगदी १० वी शिकलेली मुलगी/मुलगा या॑च्या अपेक्षा ६० /७० हजार अथवा जास्त कमवणारा जोडीदार हवा अश्या असतात. नशिबात असेल तर त्या॑ना तसे जोडीदार मिळतातही, पण सगळ्या॑च्याच बाबतित असे होत नाही. मग वय॑ वाढतच॑ जात पण स्थळ बघण काही था॑बत नाही.
आपल्या ५ पैकी जर ४ अटी पुर्ण होत असतिल तर एखादी अट शिथिल करण्यास काय हरकत आहे?
जर मुलगा/ मुलगी जास्त वय असुन लहान दिसत असतिल तर ५-६ कि॑वा त्या पेक्षा जास्त वयात अ॑तर असेल तर काहीच हरकत नाही. माझ्या मते जर नवरा-बायकोत जास्त अ॑तर असेल तर त्या॑च्यात जास्त समजुतदार पणा असतो. दोघा॑चे वय जवळ्पास असेल तर कुणी नमते घ्यायचे ? असे होते. स्थळ बघताना केवळ वर-वरची माहीती वाचली जाते. या वरुन परिक्षण करुन बाकिची माहीति न बघता सरळ पहिल्याच वेळी ते स्थळ बाद करणे केवळ वयाच्या बाबतित योग्य न्हवे.
ज्याचा त्याचा प्रश्न आहे,
ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तिर्हाईताचे काय काम?
वात्सयानाच्या मते वयातले अंतर
वात्सयानाच्या मते वयातले अंतर ३ ते ११ असावे. (म्हण्जे कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त अकरा)
बाकी राजसी+१.
राजसी , अगदी बरोबर आहे////
राजसी , अगदी बरोबर आहे//// ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तिर्हाईताचे काय काम?//
परंतु अशावेळेस समजावणे आपले काम आहे. निर्णय हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा आहे. बर्याच वेळा हि मुले / मुली तिर्हाईत नसतात अगदी आपल्या जवळचीच असतात मग नात्यात असो वा ओळखीत .
अर्थातच त्यांची मते काही कारणाने तयार झालेली असतात आपण जर नीट समजावले तर ते वेगळ्या दृष्टीने विचार करू शकतात असे वाटते .
बाकी अंतिम निर्णय त्या व्यक्तीचाच कारण पुढे त्यांनाच संसार करायचा आहे.
अन्विता, ज्याचं त्याला कळत
अन्विता, ज्याचं त्याला कळत असतंच



तुम्ही समजावता म्हणजे नेमकं काय करता तर तुझे विचार चुकीचे आहेत हे समोरच्याला पटवून देतात.
मी त्या बोटीत आहे म्हणून सांगतेय!
आमच्या घरात अनेक मुद्दे आहेत -
मुलगा जातीतला हवा.
मुलगा कर्तुत्ववान असला म्हणजे झालं, तूला कशाला शिक्षण पुर्ण केल्यावरच लग्न करायचय? तो करून घेईल शिक्षण पुर्ण तुझं.
लग्नानंतर नोकरी करायचीच आहे असा अट्टाहास का आहे तुझा?
स्वयंपाक तू शिकलाच पाहीजेस कारण नवर्यांना घरचं जेवण लागतं.
इत्यादी इत्यादी.
माझे आई वडीलच असं म्हणतात असं नाही पण माझ्या अनेक नातेवाईकांकडे यातले अनेक मुद्दे आहेत.
वरीलपैकी एकही गोष्ट मला मान्य नाही आणि तेच ते मला "समजावतात" यू नो!
इरिटेट होतं!
अंतर जास्त हवं की कमी हे त्यांचं त्यांना ठरवू द्याकी. नकोय ना त्यांना मोठा मुलगा/ लहान मुलगी? मग एवढा मोठा काय फरक पडतो? दुसरा बघा!
मी माझ्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठ्यांना ताई-दादा म्हणते
नवरा म्हणून शोधणार असाल तर ५-६ वर्षांनी मोठा मला चालणार नाही असं म्हणल्यावर नुकतंच नात्यातल्या एकीने मला चांगलंच "समजावलय"
त्यामुळे हा बाफ बघुन चांगलंच डोकं फिरलंय माझं!
नाही लिहायचं ठरवलं तरी लिहीलं गेलंच
रिया , जेव्हा आजूबाजूला आपण
रिया , जेव्हा आजूबाजूला आपण वयात ५-६ वर्षे अंतर बघतो आणि त्यांचे सुखी संसार पण बघतो तेव्हा त्या व्यक्तीला फक्त ५-६ वर्षे अंतर आहे म्हणून बाकी काही न बघत नाकारणे योग्य नाही एवढेच वाटते.
तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही द्या सोडून . जबरदस्ती कोणीच करत नाहीये .
५-६ वर्षे अंतर असणाऱ्या मुलाला दादा म्हणा किंवा अगदी २-३ वर्षे अंतर असणार्यांना हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
मी सुद्धा ह्या लेखात असा विचार करणार्यांनी सगळ्या बाजूने विचार करून निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. तसा निर्णय घ्याच असा आग्रह नाही.
त्यामुळे बाफ बघून डोके फिरवून घ्यायची गरज नाही.
समजावतो म्हणजे तुझे विचार चुकीचेच आहेत असे नव्हे तर तोच विचार वेगळ्या दृष्टीने करून बघा कदाचित मत बदलू शकते . बर्याच वेळा चित्रातील एकाच गोष्टीकडे बघितले तर चित्र आवडत नाही पतन्तु सगळे बघितले कि आवडते तसेच आहे . कदाचित सगळे बघून आवडले नाही तर ठीक आहे न . परंतु विचारांती निर्णय घेतला होता असे तरी वाटते.
अगदी ११०% बरोबर आहे रिया
अगदी ११०% बरोबर आहे रिया तुझ.
२-३ varshane पिढीचे विचार बदलतात. त्यामुळे जास्तीत जास्त ३ वर्षा अंतर असायला have. कारण दिसणे म्ह्ण़़जे सगळ काही नसत. माझ्यामते मुलगा आणि मुलगी सारख्याच वयाचे असावेत. ते जास्त मित्र बनतात मग.
मला जो पहिला मुलगा सागून आला होता तोच ४ वर्षने मोठा होता. चांगला करोडपती होता. पण त्याना नोकरी न करणारी मुलगी हवी होती. काय करायची आहे असली श्रीमन्ती ज्यात मुलगी फक्त शोभेची बाहुली आहे अस समजतात. मी नकार दिल्यावर ज्याने स्थळ् आणल होत त्याने बरच गहजब केला . स्पष्ट सान्गितल - मी माझ्या जिवावर नोकरी मिळवली आहे मुळीच सोडणार नाही. आणि असल्या अटी असलेली स्थळ सान्गू नका.
आणि आजच्या युगात तर प्रत्येकाने स्वावलन्बी असायलाच हव.
सुम , तेच म्हणणे आहे माझे ४
सुम , तेच म्हणणे आहे माझे ४ वर्षाचे अंतर म्हणून तुम्ही बघितलेच नाही असे नाही केले तर बघून विचार पटले नाहीत म्हणून नकार दिलात हे योग्यच केले .
पण वयात कमी अंतर असणाऱ्या मुलाचे पण असे विचार असू शकतात. हे व्यक्तीसापेक्ष आहे. मैत्रीचे नाते हे ५-६ वर्षे अंतर असणाऱ्या जोडप्यात पण पहिले आहे.
आणि खरे म्हणाल तर आधीच्या पिढीत पण सगळ्यांचे विचार बायकांनी घरी बसावे असे नाहीत माझी आई सुद्धा अजून नोकरी करत आहे. बाबाचे पण विचार प्रत्येकाने स्वावलंबी असायला हवे असेच आहेत.
अर्थात नोकरी करणे हा आईच सर्वस्वी स्वत: चा निर्णय होता. बाबांची सक्ती नव्हे.
काय करायचे हे स्वातंत्र्य जोडीदाराला हवे असे वाटते मग ते नोकरी करणे असो वा नसो.
तसे असेल तर सामंजस्य आहे म्हणायचे आणि मगच संसार सुखाचे होतात .
त्यामुळे तो मुलगा तुमच्याहून ४ वर्षे मोठा म्हणून आधीच्या पिढीतील म्हणून असे विचार असे नाही.
विचारांना महत्व द्या ५ वर्षे अंतराला नव्हे.
अंतर जास्त हवं की कमी हे
अंतर जास्त हवं की कमी हे त्यांचं त्यांना ठरवू द्याकी. नकोय ना त्यांना मोठा मुलगा/ लहान मुलगी? मग एवढा मोठा काय फरक पडतो? दुसरा बघा!
+१११११
लग्न हा अत्यंत खाजगी प्रश्न आहे. करायचं की नाही, कधी, कोणाशी हे आपल्या इथे मुलींना स्वत:चं स्वत: ठरवून का देत नाहीत देव जाणे. आणि इथे त्यांनी उदाहरण दिलंय ती मुलगी पस्तीस वर्षांची आहे. आता पस्तीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही खूप जग बघितलेलं असतं, टक्केटोणपे खाल्ले असतात त्यामुळे आपल्याला काय हवंय हे नक्की झालेलं असणारचे त्या मुलीचं.
लग्न हा अत्यंत खाजगी प्रश्न
लग्न हा अत्यंत खाजगी प्रश्न आहे. करायचं की नाही, कधी, कोणाशी हे आपल्या इथे मुलींना स्वत:चं स्वत: ठरवून का देत नाहीत देव जाणे. आणि इथे त्यांनी उदाहरण दिलंय ती मुलगी पस्तीस वर्षांची आहे. आता पस्तीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही खूप जग बघितलेलं असतं, टक्केटोणपे खाल्ले असतात त्यामुळे आपल्याला काय हवंय हे नक्की झालेलं असणारचे त्या मुलीचं.
>> +१
असेच असेल तर मग नवर्याला
असेच असेल तर मग नवर्याला असुरक्षित वाटू शकते की राव!!
>>>>>>>>
प्रमाण लक्षात घेतले तर पुरुषांमध्ये ही असुरक्षिततेची भावना कमी असते.
बायकांनी नवर्याचे मोबाईल चेक करायचे प्रमाण जास्त असते पण तेच पुरुषांनी बायकांचे मोबाईल चेक करायचे प्रमाण कमी असते.
अर्थात एखाद्या पुरुषाला आपल्या जोडीदाराबद्दल काही समजले आणि संशय आला तर ते तसे करू शकतात, पण बायका मात्र उगाचच्या उगाच करत असतात. कारण त्यांचा स्वभावच मुळात संशयी असतो. मग हा प्रेमातून बनतो की असुरक्षितेतून हा चर्चेचा विषय होईल. माझ्यामते प्रेम असो वा नसो, असुरक्षितता असतेच.
Anvita, हा प्रकार थोडा सोयीचा
Anvita,
हा प्रकार थोडा सोयीचा पडतो असं माझं मत आहे. पूर्वी निवड कमी असे. हल्ली जालसुविधेमुळे मुले आणि मुली ढिगाने मिळतात. साहजिकच या ढिगाऱ्यास कात्री लावावीच लागते. त्यासाठी वय हा त्यातल्यात्यात वस्तुनिष्ठ पर्याय आहे. इतर गुण (पगार, उंची, नातेवाईक, इत्यादी) वयाइतके वस्तुनिष्ठ नसावेत.
अर्थात प्रेमविवाहाच्या बाबतीत वय आड येत नसावं.
आ.न.,
-गा.पै.
अंतर जास्त हवं की कमी हे
अंतर जास्त हवं की कमी हे त्यांचं त्यांना ठरवू द्याकी.///
हो तेच म्हणते आहे मी कि ठरवायचे त्यांनीच आहे . तसेही कोणी सांगून कोणाच्या आग्रहाखातर लग्न करणारी मुले- मुली नाहीत आणि तसे असूही नये .
कोणतेही मत बनवताना त्याचा सगळ्या बाजूने विचार करावा एवढेच म्हणत आहे.
पस्तीस वर्षाच्या मुलीचे उदाहरण एवढ्या साठी दिले आहे कि ५ वर्षाचा फरक हा १९-२४ किंवा२२-२७ मध्ये कदाचित जास्त जाणवेल परंतु ३५ वयापर्यंत maturity येते . त्यात ४० मध्ये खूप फरक पडेल असे नाही.
३५ वर्षाच्या मुलीवर पण कोणी सक्ती नाही करत आहे कि ४० वर्षाची मुले बघच . निर्णय तिचाच आहे.
शेवटी मुलीना ठरवू द्यायचे आहे. त्यात काही दुमत नाही.
आणि जर मनासारखा जोडीदार मिळत नसेल तर तो मिळेपर्यंत घरच्यांनी किंवा बाकीच्यानी त्याचा issue करू नये
हे पण लिहिले आहेच . त्यामुळे सजगतेने निर्णय घावा कोणी म्हणते आहे म्हणून नव्हे.
५ वर्षे अंतर असले तर लग्न करावेच असेही नाही .
कोणी जर कोणाला चांगल्या
कोणी जर कोणाला चांगल्या हेतूने काही सांगायला गेले ते सुद्धा एक विचार किंवा एक मत म्हणून म्हणजे सक्ती नव्हे तरी ' mind your own buisness ' हाच सूर ऐकू येतोय . असो.
माझ्या मते विचार मांडणे आणि विचार लादणे यात फरक आहे. मी इथे विचार मांडला आहे.
कोणी त्याच्याशी सहमत असणार किंवा कोणी नसणार हे आलेच .
कोणी जर कोणाला चांगल्या
कोणी जर कोणाला चांगल्या हेतूने काही सांगायला गेले ते सुद्धा एक विचार किंवा एक मत म्हणून म्हणजे सक्ती नव्हे तरी ' mind your own buisness ' हाच सूर ऐकू येतोय . >>
ताई , असा अनुभव घेऊनही काय चूकतेय हे तुमच्या लक्षात येत नाहीये बहुतेक. ते हे की आपल्याला कीतीही योग्य वाटत असला आणि आपला हेतू आपल्यामते चांगला असला तरी दुसर्याने स्वतःहुन मागितल्याशिवाय त्याला सल्ला द्यायला जाऊ नये. दुसर्याच्या ईच्छा नसताना त्याच्या खाजगी बाबतीत डोकावून उपदेश करणार्यांना मग लोक भोचक म्हणतात ( in other words ' mind your own buisness ')
डेलिया ताई, अहो ' भोचक ' हा
डेलिया ताई, अहो ' भोचक ' हा शब्द येत जाता नको ते सल्ले देणार्यांना वापरतात . मनापासून एखादा सल्ला देणार्यांना नाही. सारखे तसे मी सल्ले देत पण नाही विचारल्याशिवाय आणि इथे मी मत मांडले आहे. सल्ला दिला नाहीये कि तसेच करा आणि वागा म्हणून.
त्यामुळे गैरसमज नसावा .
'भोचक ' म्हणाल तर मला तुमचा प्रतिसाद वाटतो आहे. तुम्हीच मला नको असताना ' उगीचच विचारल्याशिवाय सल्ला द्यायला जाऊ नये' असा सल्ला देत आहात नाही का?
असल्या मुलामुलींकरता खरंतर
असल्या मुलामुलींकरता खरंतर कौन्सेलिंगच सुरू करायला हवं. हे नको, ते नको, अस्सा नक्को आणि तश्शी नको. काय हे! चांगलं आपल्या आईवडिलांनी आणलेल्या पहिल्याच स्थळाला हो म्हणायचं आणि लग्न करून इतर चारचौघांसारखं सुखात रहायचं सोडून हे असले विचार कसे सुचतात म्हणते मी!
एकदा लग्न केलं की कसं 'अँड दे लिव्ह्ड हॅपिली एवर आफ्टर'च असतं हे ही त्यांना कळत नाही. उग्गाच नकार देत बसतात. बरं दिसता का ते!
लग्नेच्छू मुलीच वय ३५ वर्षे,
लग्नेच्छू मुलीच वय ३५ वर्षे, म्हणजे अपत्ये हवी असतील तर आधीच हाय रिस्क प्रेग्नन्सी. त्यात अपत्याचे वडील अधिक वयाचे असतील तर अजून इतर कोम्प्लीकेशन. ही मुलगी समजूतदार दिसते कारण उगीच रिस्क वाढवत नाहीये. ती सुखाने राहील एवढ्या सदिच्छेवर नाही का संभाषण संपवता येत तिच्याशी? समजूत घातलीच पाहिजे का? का तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे? ऐश्वर्या - अभिषेक, फरहान-ओधुना यांनी "बिघडवलेली" पिढी आहे.
मामी
+१
http://www.mayoclinic.org/paternal-age/expert-answers/faq-20057873
फरहान-ओधुना यांनी "बिघडवलेली"
फरहान-ओधुना यांनी "बिघडवलेली" पिढी आहे.//ह्याचे उदाहरण कळले नाही . समजावता का ?
फरहान-ओधुना यांनी "बिघडवलेली"
फरहान-ओधुना यांनी "बिघडवलेली" पिढी आहे.//ह्याचे उदाहरण कळले नाही . समजावता का ? <<<<<
नवराबायकोतली बायको वयाने मोठी.
अच्छा ! पण इथे बायको वयाने
अच्छा ! पण इथे बायको वयाने मोठी हा मुद्दा नाहीये. नवरा बयकोहुन ५ वर्षाने मोठा हा आहे ना त्यामुळे कळले नाही .
अच्छा अच्छा , म्हणजे ३५
अच्छा अच्छा , म्हणजे ३५ वयाच्या मुलीने तिच्याहून लहान मुलाशी लग्न केले पाहिजे असे होय ( फारच tubelight आहे बाई माझी)
पुढचा प्रतिसाद बहुतेक कोणीतरी ' कळले एकदाचे स्वत: बद्दल ! ' असा देईल . ते ओळखून मीच लिहिला
पण इथे बायको वयाने मोठी हा
पण इथे बायको वयाने मोठी हा मुद्दा नाहीये. >>> का बरं तो मुद्दा नाहीये? नवरा मोठा असतो तशी बायकोही मोठी असली तर काय जातं?
सिमन्तिनी, सचिन-अंजली ला विसरलीस.
पुरुषांच्या मॅच्युरिटीचं म्हणाल तर ... जाऊच दे.
बाकी, मुलं लग्नायोग्य झाली
बाकी, मुलं लग्नायोग्य झाली की, त्यांच्यासाठी जोडीदार शोधणं आपणच सुरू करण्यापेक्षा मुलांनाच ती जबाबदारी स्वतःची स्वतः घेऊ दिली पालकांनी तर जास्त बरं होईल. त्यांच्या ते अपेक्षा ठरवतील, त्यात तडजोड करतील/करणार नाहीत, त्यांचं ते घेतील पाहून.
मामी, अर्चना पूरणसिंग-परमीत सेठी, अर्जुन रामपाल-मेहेर जेसिया पण राहिले की.
नवरा मोठा असतो तशी बायकोही मोठी असली तर काय जातं?<<<< आपली उदात्त संस्कृती नाही का? रसातळाला.
अच्छा अच्छा , म्हणजे ३५
अच्छा अच्छा , म्हणजे ३५ वयाच्या मुलीने तिच्याहून लहान मुलाशी लग्न केले पाहिजे असे होय >> असेच केले पाहिजे असे नाही. प्रत्येक स्त्रीची इच्छा वेगळी असते. कुणी मुले दत्तक घेईल, कुणी मुले नकोच म्हणेल, कुणी पार्टनरच्या मुलांना आपलेसे मानेल. थोडक्यात त्या मुलीचे आयुष्यातील काय 'फंडे' आहेत त्याला अनुसरून पार्टनर/नवरा शोधावा.
का बरं तो मुद्दा नाहीये? नवरा
का बरं तो मुद्दा नाहीये? नवरा मोठा असतो तशी बायकोही मोठी असली तर काय जातं?/// तशी काहीच हरकत नाही .
इथे फक्त वर जे ३५ वर्षाच्या मुलीचे उदाहरण दिले आहे त्यात तो मुद्दा नाहीये कारण तिच्या केस मध्ये मुलगा ४० वर्षे म्हणजे तिच्याहून मोठा होता.
माझ्या मते अन्विता यांनी आपले
माझ्या मते अन्विता यांनी आपले निरिक्षण व मत मांडले आहे. पण काहींना तो अनावश्यक सल्ला वाटला असेल. कारण त्यांच्या पालकांनी( खर तर पालक शब्द नको वापरायला आईवडिलांनी म्हणाव. कारण एवढे घोडे झाले तरी विवाहेच्छु सज्ञान वधू वरांना पाल्य म्हणणे हे काहींना अवमानदर्शक वाटू शकते) त्यांना स्थळांवरुन पीडले असणार. इथे जालावर ही तोच विषय का? त्यामुळे ते वैतागले असणार असा माझा प्राथमिक अंदाज आहे.
लिव्ह इन रिलेशनशिप कस बर असतय ! गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडुन खाल्ली. असो....
Pages