Submitted by UlhasBhide on 14 December, 2013 - 03:15
भाट
वाजती बेताल वाद्ये अन् सुरांची वानवा
बेसुर्याचे भाट म्हणती, “सूर हा तर आठवा”
झापडांआडून बघुनी भाट होती आंधळे
मान्यवर हा सूर्य त्यांचा, सूर्य वाटे काजवा
मान्यवर गाण्यास बसले, खाकरूनीया घसा
दिव्य सुस्वर ऐकुनी तो, भाट करती वाहवा
हात उंचावून थोडा, मान्यवर बस् हासता
एक दृष्टिक्षेप व्हावा, भाट मागे जोगवा
मान्यवर नी भाट यांचे गूढ ना उकले मला
चाटल्याने काय, कोणा, का मिळावा गोडवा ?
.... उल्हास भिडे (१४-१२-२०१३)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
चपराक
चपराक
काय धू धू धुतलाय ...मस्तच
शालीतून मारलेले शालजोडे असतात तसे गझलेतून मारलेले शेरजोडे ......
कोणाला उद्देशून हे काव्य
कोणाला उद्देशून हे काव्य निर्माण झाले आहे कळेना! पण विशेष काही आवडले नाही हे प्रामाणिक मत! भटसाहेबांच्या 'कुत्रे' रदीफ असलेल्या गझलसदृष रचनेची आठवण तेवढी झाली. कृपया राग नसावा.
कुठेहे जा उल्हास काका, जिथे
कुठेहे जा उल्हास काका, जिथे तिथे त्या त्या क्ष्रेत्रात असे तथाकथित मान्यवर आणि त्यांचे भाट भेटतातच. गझल आवडली.
कविता आणी गझल या
कविता आणी गझल या प्रान्तापासुन तसे दूर आहे. भावली की आवडते, मग ती कविता असो वा गझल.
का कोण जाणे आवडुन देखील असे वाटते आहे की ( विशेषतः वरच्या पहिल्या ३ प्रतीसादावरुन) कुणाला तरी उद्देशुन हे रचले गेले असावे, कुणाला उद्देशुन ते मात्र कळ्ळे नाही.
तुमचे लेखन वाचत असतेच, खूप आवडते. यापूर्वी प्रतीसाद दिले नव्हते पण आता वाटले. पण एक सान्गावेसे वाटले. एक कवी आणी चान्गले गझलकार आहातच, पण माणुस म्हणूनच रहा. जर कुणाला उद्देशुन ( म्हणजे लेकी बोले सुने लागे असे टाईप) ही लिहीली असेल तर तसे करु नका हा भोचक पण प्रामाणीक सल्ला. त्यापेक्षा त्या सन्बन्धीत व्यक्तीलाच भेटुन गैरसमज दूर करा.
आणी तसे नसेलच तर इथे स्पष्ट लिहा,नाहीतर वाचक ( माझ्यासारखे धुमकेतू) गोन्धळुन जातील.
कृपया राग नसावा पण लोभ असावा.
रश्मी त्यांनी गझल निव्वळ
रश्मी त्यांनी गझल निव्वळ मान्यवर आणि त्याचे गुणगान गाणारे भाट यांच्यावरच लिहिली आहे. मला नाही वाटत कुणाला उद्देशून लिहिली आहे असं. पण वाचणारा त्याचे बादरायण संबंध लावू शकतोच की.
"कोणाला उद्देशून हे काव्य
"कोणाला उद्देशून हे काव्य निर्माण झाले आहे कळेना!" >>> बेफीजी, विशिष्ट कुणाला उद्देशून निर्माण झालेले नाही. जनरल आहे.
सेलिब्रिटीचा अती उदोउदो करण्याची प्रवृत्ती समाजात काही वेळा अनुभवायला मिळते, त्या प्रवृत्तीला उद्देशून आहे असे म्हणायला हरकत नाही. अनेकजण काही ना काही लिहित असतात. ते विशिष्ट कुणाला उद्देशून असते असे नाही. अनेक कवितांमधे/गझलांमधे ’मी..., मला...., माझे...., ती...., तिला..., ते...., त्यांचे....’ असे जे काही लिहिलेले असते, ते कुणा विशिष्ट व्यक्तीला उद्देशून थोडेच असते ? अनेकदा ही सर्व पात्रे काल्पनिकच असतात नाही का ! आणि हे वाचकाना माहित असल्याने "यातील कोणा व्यक्तिरेखांशी, घटनांशी संबंध आढळल्यास..... तो योगायोग समजावा." असा टीव्ही सिरिअल टाइप डिस्क्लेमर देण्याची गरज भासत नाही. असो...
“पण विशेष काही आवडले नाही हे प्रामाणिक मत! “ >>> मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल आणि प्रांजळ मताबद्दल धन्यवाद.
"भटसाहेबांच्या 'कुत्रे' रदीफ असलेल्या गझलसदृष रचनेची आठवण तेवढी झाली. कृपया राग नसावा. ">>> यात राग येण्यासारखे काहीच नाही. भटसाहेबांची ही रचना मी वाचलेली नव्हती. या निमित्ताने मी नेटवर शोधून वाचली. एक छान रचना वाचल्याचे समाधान लाभले, आभारी आहे.
रश्मी, मी बेफींच्या
रश्मी,
मी बेफींच्या प्रतिसादावर उत्तर लिहित असताना त्यादरम्यान तुमचा प्रतिसाद आला हे मला माझा वरील प्रतिसाद
प्रकाशित झाल्यावर लक्षात आले. माझ्या त्या प्रतिसादात तुमच्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे.
तुम्ही ही रचना वाचलीत, प्रतिसाद दिलात आणि याआधीच्या माझ्या रचना वाचल्या आहेत, त्याबद्दल धन्यवाद.
"कृपया राग नसावा पण लोभ असावा." >>> मला प्रामाणिकपणे दिलेल्या प्रतिसादांचा कधीच राग येत नाही.
मग तो प्रतिसाद नकारात्मक का असेना !
लोभ असावा वृद्धिंगत व्हावा.
अरे मी माझे शब्द मागे घेते.
अरे मी माझे शब्द मागे घेते. उल्हासजी खरच मनापासुन सॉरी. खरे तर माबोवरच्या मागच्या कटु अनुभवानन्तर सगळ्याना एका मापात तोलणे इष्ट नाही. पण आधी म्हटल्याप्रमाणे पहिल्या प्रतीसादान्वरुन जरा चक्रावल्यासारखे झाले. पण माझे गैरसमज आता पूर्ण दूर झालेत. ( एक्सप्लोरर गन्डल्याने स्माईली टाकता येत नाहीत)
असो, परत एकदा सॉरी.
रश्मी, सॉरी कशाला ? इतकं
रश्मी,
सॉरी कशाला ?
इतकं मनावर घेऊ नका हो.
---------------------------------------------------------------
सर्वांना धन्यवाद.
(No subject)
रश्मी सॉरी वगैरे कशाला? उलट
रश्मी सॉरी वगैरे कशाला? उलट तुझा प्रतिसाद मला तर खूपच आवडला.
परस्पर कोणताही अर्थ न लावून घेता तु ते क्लिअर करून घेतलंस.
दक्षिणा थॅन्क्स
दक्षिणा थॅन्क्स प्रतीसादाबद्दल. अग माझाच काही गैरसमज झाला होता, म्हणून तसे लिहीले. उगीच मनात रुखरुख रहाण्यापेक्षा विचारलेले बरे म्हणून हे धाडस केले.
उल्हासजी, एक इनपुट, जहरी टीका
उल्हासजी,
एक इनपुट,
जहरी टीका किंवा केवळ आगपाखड ही गझलेची प्रवृत्ती नाही.
आपला गझल शिकण्यातला उत्साह फोनवरसुद्धा अनेकदा लक्षात आलेला आहे म्हणून ह्या अनेक प्रकारच्या बारीकसारीक सुचवण्या करीत आहे.
लै भारी!
लै भारी!
सर्वांना
सर्वांना धन्यवाद.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपला गझल शिकण्यातला उत्साह फोनवरसुद्धा अनेकदा लक्षात आलेला आहे म्हणून ह्या अनेक प्रकारच्या बारीकसारीक सुचवण्या करीत आहे. >>> विदिपा, तुमच्या सुचवण्यांचे स्वागत आहे. शिकण्यासाठी उपयुक्त
ठरतील. धन्यवाद.
"जहरी टीका किंवा केवळ आगपाखड ही गझलेची प्रवृत्ती नाही." >>> निश्चितपणे गझलेची प्रवृत्ती काय असावी
याबाबत खुलासा केल्यास आभारी असेन.