Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा पहिल्या धाग्याच्या पुढचा
हा पहिल्या धाग्याच्या पुढचा धागा आहे ना?
मी ही मालिका क्वचितच बघते, ती
मी ही मालिका क्वचितच बघते, ती बघण्यापेक्षा मामांचे अपडेट्स वाचणे आवडते, खास त्यासाठी मी इथे येते.
मामा आता यापुढचे अपडेट्स इथे
मामा आता यापुढचे अपडेट्स इथे टाका.
अन्जू मी पण अगदी तेच. कधी कधी
अन्जू मी पण अगदी तेच. कधी कधी सिरियल पाहणं होत नाही पण अपडेट वाचले की लग्गेच लक्षात येतं नक्की काय झालं असेल ते.
रिया., तुझ्यात हिंमत नाही का?
रिया., तुझ्यात हिंमत नाही का? तुला स्वप्नाची ढाल कशाला पाहिजे?
>>>>
इकडे लिहिते कारण मी एकटी गड लढवू शकत नाही.
मला स्वप्नाची साथ हवीये
मला मालिका 'पहावी' लागते.
)
(ती बंद केली तर आई-बाबा लग्नाचा विषय काढुन गप्पा मारतात त्यापेक्षा हे बरं
बरं या मालिकेबद्दल जराही वाकडं बोललं की आई आणि बहिण व्हसकन अंगावर येतात.. तुला तिच्यातले चांगले गुण दिसतच नाहीत का? तिच्यासारखं बनायचा प्रयत्न कर जरा- इति आई, माबोवरचं काही वाचुन इथे बोलत जाऊ नकोस - इति बहिण
त्यामुळे मला चिडचिड करायला हा एक धागाच वाली उरलाय
जान्हवी - श्री चा फोटो टाका
जान्हवी - श्री चा फोटो टाका ह्या धाग्यावर....
मग इथेही मालिका 'वाचावी'च
मग इथेही मालिका 'वाचावी'च लागेल
दक्षुतैचं हे लॉजिक काही कळत
दक्षुतैचं हे लॉजिक काही कळत नाही..
म्हणून हा धागा -१
तो धागा -० पकडते ती
दक्षीणा ...........तु पण ????
दक्षीणा ...........तु पण ????
रिया गप्प सिरियलवर चर्चा कर
रिया गप्प सिरियलवर चर्चा कर ना. कशाला शून्य आणि एकात अडकून बसतेस?
असं कसं असं कसं? आम्हाला नाही
असं कसं असं कसं?
आम्हाला नाही आवडतेय तर आम्ही हात पाय आपटणारच
दक्षुतै, तेवढंच गणित येतं मला
मलापण हेच विचारायचं आहे
मलापण हेच विचारायचं आहे दक्षिणा कि पहिल्या धाग्याला १ नं. देऊन ह्याला २ नं. म्हणायला हवंना?
तमाम सार्या भाच्यांनो.....या
तमाम सार्या भाच्यांनो.....या नवीन धाग्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत.....
~ मी विनाअट कबूल करतो की जान्हवीला दिग्दर्शकाने नको तितके हसायला लावले आहे, त्यामुळे प्रसंगी ते नाटकीही वाटत असेल. पण त्यात तिचा नाईलाज झाला असेल कदाचित असे मानू या ना आपण. फार चांगली मुलगी वाटते....आता सून म्हणूनही सोशीकपणा दाखवायला शिकली आहे, अन्यथा भडक माथ्याची असती तर तिने पहिल्याच दिवशी बेबीआत्यावर भडास काढली असती....पण ते पात्र तसे दाखविता येणार नाही, कारण जान्हवी त्या सर्वं आयांना आपल्या शांतचित्त वृत्तीने आणि कृतीने जिंकून घेणार आहे असे देवस्थळी यानीच एबीपी वरील एका मुलाखतीत सांगितले होते.
मला या मालिकेविषयी जे वाटते ते या कलाकारांच्या भूमिकांमुळे....यात सारेच आले....श्री आणि जान्हवी यांच्यातील नात्याला कुठेही तडा येईल असे काही प्रसंग येऊ नयेत अशीच इच्छा राहील माझी.
बाकी तुमच्यापैकी कित्येकांना जान्हवी पात्राविषयी वा तिच्या सादरीकरणाविषयी प्रतिकूल मत/मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहेच....अन् मी ती उत्सुकतेने वाचतो....शेवटी अशा मतभेदामुळे तर मालिकेविषयी जास्तच गोडी निर्माण होत आहे....मलातरी.
[मुग्धा.....पुण्याचे 'आम्ही कोल्हापुरी गटग' अगदी मस्त झाले....त्याचा सविस्तर वृत्तांत फोटोसह आम्ही कोल्हापुरी धाग्यावर दिला आहे....तो जरूर बघ.]
मुग्धा.....पुण्याचे 'आम्ही
मुग्धा.....पुण्याचे 'आम्ही कोल्हापुरी गटग' अगदी मस्त झाले....त्याचा सविस्तर वृत्तांत फोटोसह आम्ही कोल्हापुरी धाग्यावर दिला आहे....तो जरूर बघ.
>> मामा.. तो वाहुन गेला.. आता आमाला वृत्तांताचा लेखन + फटू असा सौतंत्र बीबी हवा.
भडक माथ्याची असती तर तिने
भडक माथ्याची असती तर तिने पहिल्याच दिवशी बेबीआत्यावर भडास काढली असती >> मामा स्वतःचा बचाव योग्य पद्धतीने करणारी व्यक्ती म्हणून तर दाखवायचं तिला. कुणितरी बोललं म्हणून लगेच मुळू मुळू रडणारी कशाला दाखवायची? तिकडे आईला सुनवणार आहे तिडकिने इथे सासू समोर मूग गिळून गप्प? शांत शब्दात 'ही चाळ नाही' हा टोमणा कुणासाठी होता? माझ्यासाठी का? असां विचारायचं ना.
मामा, मी वाचला कोल्हापुरी
मामा, मी वाचला कोल्हापुरी धाग्यावर वृतांत. मस्त एन्जॉय केले सगळ्यांनी, आता वाहून गेला तो वृतांत.
भडक माथ्याची असती तर तिने
भडक माथ्याची असती तर तिने पहिल्याच दिवशी बेबीआत्यावर भडास काढली असती
>>
बरं झालं असतं
एवढी पकाऊ तरी नसती वाटली ती आता
आणि दिग्दर्शक कशाला सांगेल सारखं सारखं हास म्हणून.. स्पेशली तेंव्हा जेंव्हा कळतय की ते नाटकी वाटतय तेंव्हा?
रिये पैसे मिळतात खोटं हसायचे
रिये पैसे मिळतात खोटं हसायचे
आम्हाला नाही आवडतेय तर आम्ही
आम्हाला नाही आवडतेय तर आम्ही हात पाय आपटणारच >> जिथे आवश्यक आहे तिथेच हातपाय आपटा. मालिका विनाकारण, मारूनमाटकून, ओढूनताणून न आवडून घेऊन हातपाय आपटलेत तर तुमचेच हातपाय दुखतील
ज्यांना मालिका बघण्याचा आनंद लुटायचाय त्यांना लुटू द्या. ज्या गोष्टी खटकतील त्याविषयीचा तक्रारीचा सूर ठीक आहे, पण विनाकारण, ओढूनताणून नावं ठेवू नका, इतकंच
तिकडे आईला सुनवणार आहे
तिकडे आईला सुनवणार आहे तिडकिने इथे सासू समोर मूग गिळून गप्प?>>> इतक्या वर्षांत आईला तरी कुठे सुनावलंय तिने? सावत्र आईचं विचित्र वागणं सहन केलं आहेच ना?
शांत शब्दात 'ही चाळ नाही' हा
शांत शब्दात 'ही चाळ नाही' हा टोमणा कुणासाठी होता? माझ्यासाठी का? असां विचारायचं ना.
>>>
प्रचंड अनुमोदन, हजार मोदक!
आई आज्जीचं मन जिंकायचंच असेल तर असं घाबरुन कसं चालेल....
मी तिच्या जागी असते तर तुम्ही मला चुकीचं ओळखलय.. तुम्ही ओळखलय तशी मी नसुन मीही अशी आहे हेच दाखवलं असतं...
आणि श्री एवढा खोटारडा का झालाय म्हणे आताशा?
पुन्हा या आया हिच्यावरच खापर फोडणार!
मंजु विनाकारण नावं नाही
मंजु विनाकारण नावं नाही ठेवतेय.

कालचा बसस्टॉपवरचा प्रसंग अगदीच बेक्क्क्काआआर होता..
काहीही अरे
कित्त्ती हसत होती ती
उगाचच!
आणि बोलत पण कित्ती नाटकी होती... पुर्वीचा सहजपणा (हसण्यातला पण आणि अभिनयातला पण) निघुन गेलाय असं वाटलं.... "मी भारी हसते.. हे बघा असं" हे दाखवण्याचा प्रयत्न वाटला
पुन्हा या आया हिच्यावरच खापर
पुन्हा या आया हिच्यावरच खापर फोडणार! >> सौ टका सच.
दक्षै.....अरे बाबा...रॉन्ग
दक्षै.....अरे बाबा...रॉन्ग लॉजिक तुम्हारा, कुछ कुछ ! पैशासाठी ती नेहमी हसतच बसेल होय ? आणि तेही खोटं खोटं ? लग्नानंतर नोकरीचा पहिला दिवस खूप एक्साईटमेन्टचा असतो, त्यामुळे पुरुष असो वा स्त्री....कार्यालयात पाऊल ठेवल्या ठेवल्या आनंद आशीर्वादाचा त्यांच्यावर वर्षाव होत असतो....सबब विशेषतः मुलगीला फार समाधान होत असते आणि केव्हा एकदा नवरा भेटतो आणि त्याला ही बातमी सांगून टाकते असे होत असते.
मी सरकारी नोकरीत होतो....तिथे असेच वातावरण असायचे....म्हणजेच स्त्री कर्मचारी लग्नासाठी महिनाभर सुट्टी घेते [तशी ती मिळतेच....] आणि नवीन पेहराव करून, दागिने वगैरे घालून ती जेव्हा कार्यालयात हजर होते त्यावेळी तिच्यावर स्तुतीसुमनांना वर्षाव होतो.....तिला खूप मजा वाटते. मी स्वतः पुढाकार घेऊन सायंकाळी ४ वाजता काम थांबवून खास चहापानाचा कार्यक्रम आयोजित करीत असे. अशा कर्मचार्यांच्या एरव्ही रुक्ष वाटणार्या जीवनात हे दोनचार तासांचे अतीव समाधानाचे सुख असतात.....त्यामुळे किमान त्यादिवशी तरी ती उल्हसीत वातावरणाचा भोग घेते.....तेव्हा अशा स्थितीत जर नवरा सायंकाळी भेटला तर काहीशी जादाची वाटू शकणारी हसरी मुद्रा ती करेलच ना.
जान्हवी तेच करते.
पण मला बँकतले परचुरे अॅंड
पण मला बँकतले परचुरे अॅंड स्टाफ चे विनोद आवडतात. मस्त जमवले आहेत. खरे खरे हसायला येते. फूबाईफू च्या दारूवाल्या भंकस स्किटपेक्षा कैक पटीने चांगले आहेत.
श्रीच्या खोटारडेपणावर मीपण
श्रीच्या खोटारडेपणावर मीपण लिहिले होते, खोटे बोलतो त्यापेक्षा तो दुसऱ्याचे नाव पुढे करतो हे खटकले आधी हारासाठी मावशी आणि मग सासूला पैसे दिले तिथे नंदनचे नाव घेतले म्हणजे त्या दोघांना नाहक तोफेच्या तोंडी दिल्यासारखे वाटले. आजीने नंदनला बोलावून विचारलेच ना? बिचाऱ्याची चूक नसताना त्याला पैसे घेतल्याचे कबूल करायला लागले. श्री सारख्या mature, उच्चशिक्षित व्यक्तीकडून ही अपेक्षा नाही. असे लेखक-दिग्दर्शक करत राहिले तर श्रीच्या charactorबद्दल चीड निर्माण होईलना?
कित्त्ती हसत होती
कित्त्ती हसत होती ती
उगाचच!
>>> लग्नानंतर पहिल्यांदाच ती घराबाहेर पडली होती. लग्नानंतरच्या पूर्णपणे अनोळखी जगातून तिच्या ओळखीच्या कम्फर्ट, मोकळ्या वातावरणात गेल्याचा आनंद तिच्या वागण्यात जाणवणं अगदी साहजिक होतं. त्यात ऑफिसात गेल्या गेल्या तिच्यासमोरील सद्य समस्येचा निकाल लागला होता. वडिलांच्या घराचं काम होणं तिच्या दृष्टीक्षेपात आलं होतं. त्यामुळे तिचं एक्साईट होणं कृत्रिम वाटलं नाही.
आणि श्री एवढा खोटारडा का झालाय म्हणे आताशा?
पुन्हा या आया हिच्यावरच खापर फोडणार!
>>> याला मात्र अनुमोदन!
लग्नानंतर नोकरीचा पहिला दिवस
लग्नानंतर नोकरीचा पहिला दिवस खूप एक्साईटमेन्टचा असतो, त्यामुळे पुरुष असो वा स्त्री....कार्यालयात पाऊल ठेवल्या ठेवल्या आनंद आशीर्वादाचा त्यांच्यावर वर्षाव होत असतो....सबब विशेषतः मुलगीला फार समाधान होत असते आणि केव्हा एकदा नवरा भेटतो आणि त्याला ही बातमी सांगून टाकते असे होत असते.
>>>>
माझं म्हणणं आहे ते त्या तेजश्रीला संयत अभिनयातुनही दाखवता आलं असतं.
उगाच खोटं फिदीफिदी हसायची गरज नव्हतीच!
मंजु तू पण वरचीच पोस्ट वाच
मंजु तू पण वरचीच पोस्ट वाच माझी.
हसणं कृत्रिमच वाटलं मला तरी.
अन्जू तुला फुल टू अनुमोदन
अन्जू तुला फुल टू अनुमोदन
Pages