ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.
२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.
भाग २ - http://www.maayboli.com/node/44956
भाग ३ - http://www.maayboli.com/node/45054
भाग ४ - http://www.maayboli.com/node/45057
भाग ५ - http://www.maayboli.com/node/45139
भाग ६ - http://www.maayboli.com/node/45250
******************************************************************
वंदना खन्ना. सागरच्या दुसर्या सहकारी डॉक्टरची, त्वचा तज्ञाची पत्नी. स्वतः दिसायला अत्यंत सुंदर, व्यवसायाने सौंदर्यतज्ञ आणि ती अशा थोड्याच भारतीय स्त्रियांपैकी होती जी सौदीमध्ये अनऑफिशियली व्यवसाय करत होती, करू शकत होती. सागरला ती भाऊच मानत होती त्यामुळे तिने स्वतःच जबाबदारी घेतली मला तयार करायची.
मी तयार होऊन बाहेर आले. सागर तयार होऊन वाट पाहात बसला होता. मला पाहून सागरने डोळाच मारला. "वंदना, सबको बोल दो, पार्टी कॅन्सल. मेरी बीवी बहोत सुंदर दिख रही है| मैं इसे सबको नही दिखाऊंगा|" हे ऐकून सागरच्या पाठीत धपाटा घालून वंदना म्हणाली, "सागर मैने इसे बहोत मेहनतसे तय्यार किया हैं| प्लीज मेरी मेह्नत खराब मत करना| तुम दोनोको जोभी करना है पार्टीके बाद बहोत वक्त है तुम्हारे पास तब करना| अभी निची आजाओ, सब इंतजार कर रहे है|" आणि ती पार्टीमध्ये निघून गेली. "सरिता, तू लग्नात आणि रिसेप्शनलासुद्धा इतकी सुंदर दिसत नव्हतीस ग, आज कशी काय? तुला आत्ताच इथे खाऊन टाकावसं वाटतय. तुला खाऊन टाकलं की तू कायम माझ्यामध्ये राहशील आणि इतर कोणालाही दिसणार नाहीस. तू इतकी सुंदर दिसते आहेस ना की मला आता भीती वाटते आहे तुला कोणीतरी पळवून नेईल." इतकी स्तुती केल्यावर कोणीही लाजणारच. मीदेखील लाजले. "चहाटळपणा पुरे. मला तुझ्यापासून कोणीही पळवून नेऊ शकत नाही. मी तुझ्यापेक्षा वेगळी नाही, हे शरीर फक्त तुझ्यापासून वेगळं आहे. चल आता खाली." "तू लाजू नकोस ग, तू आणखी चान दिसतेस." "तू एवढी स्तुती केल्यानंतर लाजू नये मी, मी मुद्दाम करते आहे का?" "ठीक ठीक, आता ते गालावर फुललेले गुलाब लपवून ठेव. कारण तू ह्या जगातली सर्वात कुरुप बाई आहेस. चल आता." असं बोलत मस्करी करत हसत आम्ही पार्टीमध्ये प्रवेश केला.
बंगल्याच्या लॉनला खूप सुंदर सजवलं होतं. सगळीकडची प्रकाशयोजना खूप अप्रतिम होती. आम्ही पार्टीमध्ये शिरल्यापासून सागरने मला सगळ्यांची ओळख करून द्यायला सुरुवात केली. वंदनाला मी भेटलेच होते. तिचा डॉक्टर नवरा प्रवीण खन्ना. डॉक्टर राम अय्यर आणि त्यांची पत्नी सौम्या अय्यर. हे सागरचे जवळचे, बाकी हॉस्पिटलशी संबंधित परंतु डॉक्टर नसलेली आणखी चार भारतीय कुटुंब. आणि त्यांची अगदी लहान मुलं. आम्ही १६ जण फक्त भारतीय होतो. बाकी वीसेक जण आणि त्यांच्या पत्नी अरब होते. ही पार्टी घरगुती असल्याने स्त्रिया आणि पुरुष वेगळे अगदी लांब लांब अशी व्यवस्था नव्हती. जर कोणा स्त्रीला सगळ्यांमध्ये मिसळायचे नसल्यास स्त्रियांसाठी वेगळा भाग ठेवला होता. पण सगळे एकत्रच होते. पार्टी सुरु होऊन अर्धा तास झाला तरी पार्टीचे प्रमुख पाहुणे - ह्या सगळ्यांचा बॉस - रफिक आणि त्याची पत्नी अजून आले नव्हते. आम्ही केक कापण्यासाठी थांबलो होतो. तितक्यात सागरला रफिकचा फोन आला, त्याच्या बहिणीला बरे नसल्याने तो तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला होता आणि पार्टीला येऊ शकत नव्हता. तो येणार नसल्याने त्याची पत्नी देखील येणार नव्हती. आमची पार्टी रफिकच्या अनुपस्थितीत पार पडली. सागरला राहून राहून वाईट वाटत होते. एवढी मस्त पुरणपोळी जी खास रफिकसाठी मागवली होती ती रफिकला आमच्यासोबत खाताच नाही आली. आम्ही रफिकसाठी पुरणपोळ्या बाजूला काढून ठेवल्या होत्या. सागर दुसरे दिवशी रफिकच्या ऑफिसमध्ये त्याच्यासाठी पुरणपोळ्या पोहोचत्या करणार होता.
रिसेप्शनच्या दुसर्या दिवशीपासून माझा घरातला एकटेपणा सुरू होणार होता. सागर सकाळीच नाश्ता करून हॉस्पिटलला जाणार होता. हॉस्पिटल आणि घर जवळ जवळ असल्याने दुपारी वेळ मिळाल्यास जेवायला घरी येणार होता. सकाळी रोजच्यासारखा रामण्णा आला. आज त्याने नाश्त्याला एकदम हलके म्हणून भाताची खिचडी आणि दही एवढेच बनवले होते. रामण्णाच्या हाताला मस्त चव होती. सागर म्हणाला, "रफिकसाठी डब्यात भरून दे थोडी त्याला फार आवडते रामण्णाच्या हातची खिचडी. "
टिंग टाँग. दाराची बेल वाजली. "आज यावेळी कोण आलं इथे?" असं म्हणत सागर दार उघडायला गेला. मी स्वयंपाकघरात दुपारच्या जेवणाची तयारी करत होते.
"हाय साल्या कशी झाली कालची पार्टी? सॉरी मी काल येऊ नाहे शकलो" आत आवाज ऐकू आला. मी ओळखलं हा रफिक, इथे मराठीत दुसरं कोण बोलणार होतं आमच्यासोबत?
क्रमशः
पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45392
मस्त...!
मस्त...!
छानच! पण खुपच लहान भाग
छानच! पण खुपच लहान भाग वाटतात.
अविगा, अक्च्युअली, डोक्यात
अविगा,
अक्च्युअली, डोक्यात जिथे पूर्णविराम बसतो ना तितकच लिहिते एका वेळी, शिवाय वेळेचे रिस्ट्रिक्शन्स असतात. प्रयत्न करतेय मोठे भाग लिहायचा. पण तोवर प्लीज वाचत राहा. आणि प्रतिक्रिया देत राहा, लिहायला स्फूर्ती मिळते.
अगं, लहान तर लहान पण नियमित
अगं, लहान तर लहान पण नियमित लिहित रहा, मध्येच सोडु नकोस. मजा येतेय वाचायला.
लिखना जारी रक्खो वाचतीये. .
लिखना जारी रक्खो वाचतीये. .
मस्त...!
मस्त...!
वल्लरी वाचते तर आहेच ग! पण
वल्लरी वाचते तर आहेच ग! पण अजुन वाचावेसे वाटते
कथेच्या शेवटी क्रमशः पाहीले की वैताग येतो.
मस्त चालू आहे हां रफीक
मस्त चालू आहे
हां रफीक खलनायक दिसतोय
कथेतला
छान लिहीते आहेस वल्लरी...
छान लिहीते आहेस वल्लरी... पटापट पुढचे भाग टाक प्लीज..
जाई .. श्श्श.........
जाई .. श्श्श.........
मस्त चालू आहे. असाच रोज एक
मस्त चालू आहे. असाच रोज एक तरी भाग टाकत रहा.
<असाच रोज एक तरी भाग टाकत
<असाच रोज एक तरी भाग टाकत रहा.> +१
छान लिहिताय तुम्ही. असेच भाग
छान लिहिताय तुम्ही. असेच भाग टाकत रहा.
अनु ३ | 17 September, 2013 -
अनु ३ | 17 September, 2013 - 08:51 नवीन
मस्त चालू आहे. असाच रोज एक तरी भाग टाकत रहा.
>>
+१
असाच रोज एक तरी भाग टाकत रहा.
असाच रोज एक तरी भाग टाकत रहा. << +१
पुढचा भाग कधी?????????
पुढचा भाग कधी?????????
मस्त... पुढचे भाग पण पटापट
मस्त... पुढचे भाग पण पटापट येऊ देत... पुलेशु
वा, आत मस्त catch होत आहे...
वा, आत मस्त catch होत आहे...