केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...
आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.
पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..
त्याचा मला निश्चितच फायदा होईल..
.............................
मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर
थोडक्यात काय केसरी बरोबर
थोडक्यात काय केसरी बरोबर किव्वा विणाज वर्ल्ड बरोबर जायचा जर ती विचार करत असेल तर तिचे पैसे वाचवण्याकरता हा सगळा खटाटोप . बाकीच्या कंपन्या पण कमी पैशात खूप चांगली सर्विस देतात हे सांगायला
आम्ही स्वता ढीगभर प्रवासी कंपन्यांचे कट्लोग मागून घेतो आणि कुठली कंपनी काय काय दाखवते/ खर्च किती/ आणि आपल्या रजेशी मिळत्या जुळत्या तारखा बघून मगच बुक केलेलं आहे. वनराज ट्राव्हाल/ सिद्धार्थ ट्राव्हाल / भारत दर्शन /वनिता ट्राव्हाल इत्यादी इत्यादी मधून प्रवास केला आहे आणि सगळी कडे अनुभव अतिशय चांगला आहे अनुभव ट्राव्हल चा पण अनुभव चांगला आहे. पुण्यात राजगुरू/गिरिकंद ह्या जास्त लोकप्रिय आहेत 
बुकिंग रद्द केल्यास किती दिवस
बुकिंग रद्द केल्यास किती दिवस अगोदर किती रक्कम कापतात याचे तपशील कंपन्या देतात का ?नावाजलेल्या पहिल्या दहा सोडून दुसऱ्या स्तरांतील कंपन्यांचा कोणाला अनुभव आहे का ?टुरिझमचा धागा निघालाय म्हणून लिहितो की यासंबंधीची दोन महत्वाची मोठी प्रदर्शने लगेच मुंबईत होत आहेत .३० ऑगस्ट ते १ सप्टेंबरला "iitm" "चे आणि ६ते ८सप्टेंबरला "TTF"चे .जागा 'बॉम्बे एक्सिबिशन सेंटर ,गोरेगाव 'अथवा 'बांद्रा कुर्ला कॉमप्लेक्स ,बांद्रा पूर्व येथे .टाईम्स पेपर पाहावा .एसी हॉल ,उत्तम आयोजन आणि भरपूर माहिती मिळते .काशमिर ,हिमाचल चे जास्ती स्टॉल फेब्रुवारीतल्या प्रदर्शनात असतात .नेहरू सेंटर ,वरळीला प्रदर्शन ठेवल्यास(पावसामुळे) मात्र मजा येत नाही .
(काही महिन्यांपूर्वी केसरी
(काही महिन्यांपूर्वी केसरी कंपनी स्प्लिट झाल्याचे वाचले आहे. परंतु, त्याचा विपरीत परिणाम टूरिस्टवर होत नसावा अशी आशा आणि अपेक्षा.)
माझी आई परवा बँकॉक-पटाया ट्रिपला चालली आहे केसरी बरोबर. आल्यावर तिच्यकडून कळेलच अनुभव विपरीत परिणाम झाला आहे की नाही ते.
आम्ही मागच्या भारतवारीत साबा
आम्ही मागच्या भारतवारीत साबा साबुंबरोबर सचिन ट्रॅव्हल्सची शिमला-कुलु-मनाली ट्रीप केली होती. भयाण होती ट्रीप.
दिल्ली, शिमला आणि मनाली मधली होटेल्स उतरत्या श्रेणीने वाइट, जस्ती वाइट आणी भयानक वाइट होती.
मनालीतलं हॉटेल वरती कोणीतरी लिहिल्याप्रमणे खूप चढावर होतं त्यामुळे ज्ये. नां ना त्रास झाला.
हॉटेलमध्ये नळाला पिवळसर काळं पाणी होतं. ट्रीपमध्ले सर्व लोकं पोट बिघडल्याने त्रस्त झाली तर सचिन वाले म्हणतात की दर ट्रीपला असंच होतं आणि हा अल्टिट्यूड मुळे होणारा त्रास आहे. कैच्याकै... भयंकर वैताग आणि ट्रॉमा झाला मला आणि सर्वांनाच.
सचिन चा विचारही करू नका.
ती ट्रीप माझी पहिली आणि शेवटचे प्रवासी कंपनीबरोबरची ट्रीप !
मला विचाराल तर वृद्ध लोकांनीच
मला विचाराल तर वृद्ध लोकांनीच आयोजित सहली बरोबर जावे. म्हणजे बुकिंग वगैरेचा त्रास होत नाही. आणि दगदग होत नाही.
इतर लोक जसे
हनिमूनला लोकं : (माझे बहुतांश सर्व मित्र) अशा हनिमून स्पेशलनी गेले त्यांचे मला कौतूक वाटले. (उपरोध) अहो हनिमून ही प्रायव्हेट बाब आहे, जी दोघांनीच अनुभवयाची. तिथे च्यायला २० अनोळखी लोकांसोबत जाऊन त्याची 'सहल' करण्यात काय मजा येते ह्या लोकांना ते कळत नाही.
आणि उर्वरित
तुम्ही दोन एक ट्रॅव्हल कंपन्यांचे पॅकेज पाहा. मग इंटरनेटवर जाऊन शोधा आणि स्वतःची बुकींग करा. व्हेकेशन बांधून ठेवलेल्या मेंढरागत होत नाही. सुटा म्हणलं की निघाले तो पाँईट पाहायला.
आजच्या काळात इंटरनेट मुळे पिंपरी डुकरी खूर्द नावाच्या गावात देखील काय आहे ते घरबसल्या कळते. बुकिंग पण इंटरनेट द्वारे (वा फोन द्वारे होते) तर कशाला ह्या सहलींसोबत जायचे?
स्वतःचे व्हेकेशन स्वतः आखण्यात जास्त फायदे असतात.
ठिकेय - सचिन बाद च
ठिकेय - सचिन बाद च म्हणजे
केसरी आणि विव ठिकेय्त पण महागेत सो तेही बाद
गिरिकंदचा कोणाला अनुभव?
गुरुनाथ?
शिमला मनाली अथवा नैनिताल
शिमला मनाली अथवा नैनिताल परिसरांवर मुळात भूभाग ,पाणी ,वीज याबाबत प्रमाणाबाहेर ताण पडला आहे .केवळ मागणी आहे म्हणून सहली नेल्या जात आहेत .
#केदार ,सहमत .
#केदार ,सहमत .
सध्या च्या दोन्ही परदेशी
सध्या च्या दोन्ही परदेशी ट्रिप्स मात्र आम्ही प्रवासी कंपनी बरोबर न करता प्याकेज घेतलं. थोडक्यात आखणी करून घेतल्या आणि त्या पण सुपरहिट ठरल्या. तुमचा स्वताचा फमिली ग्रुप असेल किव्वा मित्र -मैत्रिणींचा ग्रुप असेल तर प्याकेज टुर्स बेस्ट ठरतात अस सध्या मला वाटतंय
मुंबईतल्या आकांक्षा
मुंबईतल्या आकांक्षा ट्रॅव्हल्सबरोबर मी अंदमान-निकोबारला गेलो होतो....कंपनी छोटीच आहे...पण एकूण व्यवस्था चांगली होती.
ये हुई ना बात बरं वाटलं
ये हुई ना बात
बरं वाटलं !
सुजा पॅकेज टूर म्हणजे कशा?
अग जस्ट डायल वर जा तिथे भरपूर
अग जस्ट डायल वर जा तिथे भरपूर ओप्शन्स मिळतील . अकबर ट्राव्हल/ मेक माय ट्रीप/ यात्रा डॉट कोम/ एसो टिसी / रिया ट्राव्हल/कॉक्स अंड किंग या सगळ्या वेल्नोन कंपन्याच्या बरोबरीने किती तरी छोट्या छोट्या कंपन्या पण चांगली पकेज आखून देतात. बर तुम्ही सांगू शकता आम्हाला हे पण बघायचं/ ते पण बघायचंय. तुमच्या च्योइस प्रमाणे /तुमच्या बजेट प्रमाणे / तुम्ही सांगाल तितक्या दिवसांची ट्रीप ते आखून देतात. विमानाचं बुकिंग /ट्रेनच बुकिंग/ हॉटेल च बुकिंग / इटीनरी तुमच्या हातातच ठेवतात . तुम्ही त्या एयरपोर्ट ला उतरलात किव्वा भारतात असलात आणि ट्रेन नि गेलास तर त्या त्या ठिकाणी त्यांचा माणूस तुम्हाला रिसीव्ह करायला येतो मस्त हॉटेल वर पोचवतो . मग सूचना देतो या या वेळी आपल्याला निघायचा आहे तयार राहा. लिमिटेड लोक असली तर तुमच्या करता स्पेशल कार/ मोठा ग्रुप असेल तर बस. मस्त फिरवतात. एखाद्या ठिकाणी आवडलं तर आपण जास्त वेळ थांबू शकतो. दुपारच्या /रात्रीच्या जेवणाला इंडिअन रेस्तौरेंट. आमच्या दोन्ही परदेशी ट्रिप्स आणि एक भारतीय ट्रीप आम्ही प्याकेज नीच केल्या खूप धमाल आली होती
वा सुजा! मस्तच! हा ऑप्शन
वा सुजा! मस्तच! हा ऑप्शन चांगला आहे गं! ट्राय करुन बघायलाच हवा
पियूपरी,सुजा आणि शूम्पी यांचे अनुभव बोलके आहेतच..
सचिन>> वायुदूत ट्रॅव्हल्स हे नविन नाव कळाले..
बाकी सगळ्यांचे वेगवेगळ्या कंपन्याबरोबरचे अनुभव कळाले..
रिया ५६ हजार म्हणजे जास्तच वाटताहेत गं..
मंगेश देशपांडे..>> प्रत्येकाकडनं वेगवेगळे चार्जेस घेतले?..शक्य तितके निगोशीऐट करा.>> ह्म्म्म..
संपदा लिंकसाठी धन्यवाद..
एस आरडी माहितीसाठी धन्यवाद..
केदार आणि प्रमोदजी
सगळ्यांना धन्यवाद
हनीमून ट्रिप ला
हनीमून ट्रिप ला प्राणीसंग्रहालय
माझ्या साबांनी गेल्या १
माझ्या साबांनी गेल्या १ वर्षात राजस्थान, केरळ, युरोप व मध्य प्रदेश अश्या ट्रीप्स केल्या. युरोप केसरी बरोबर, अतिशय चांगला अनुभव आला, केसरीवाले सतत खुशाली पण कळवत होते. राजस्थान व केरळ चा पण अनुभव खूपच चांगला आला, स्पेशली केरळ चा.
केरळच नीट दाखवतात वाट्ट्ं ते
केरळच नीट दाखवतात वाट्ट्ं ते
सुजा धन्स
पहाते
अंजली हो ना ग
मी अत्ता पर्यंत लग्न झाल्यास
मी अत्ता पर्यंत लग्न झाल्यास ( गेली१७ वर्ष). जवळ जवळ दर वर्षी एक तरी ट्रिप केलीच आहे. केसरी, सचिन, गिरिकंद, ट्युलिप, व स्व-नियोजन ह्या सगळ्या मार्गांनी- देशात व जास्त करुन परदेशात. माझे काही अनुभव
१. जर तुमचा कोणी ग्रूप नसेल तर फक्त पालक व मुलांनी( जिकडे एखादेच मुल आहे) जाण्य पेक्षा अशा कंपन्यां बरोबर जावे
२. परदेशात मुख्यत्वे जिथे इंग्लिश कळते अशा ठिकाणी ( यु.के., स्विस, अमेरिका, थाय्लंड, सिंगापोर, मलेशिया, हाँगकाँग) स्वतः जाणे योग्य. हे लोक फार धावडवतात.
३. युरप सारख्या ठिकाणी जिथे जेवण व भाषा फारच वेगळ्या आहेत तिकडे मात्र कंपनि टुर बेस्ट
४. तुम्ही पुर्णपणे व्हेज असाल तर परदेशात एखाद्या कंपनी बरोबर जावे नाही तर मग लंघन करायची तयारी ठेवावी.(अमेरिका , लंडन सोडुन). बाकी देशात व्हेज मिळते पण ते मिळवण्यात आपली एनर्जी जास्त वाया जाते.
५. देशात फिरताना आपले आपण फिरणे मस्त. हवे तसे हवे तिथे जाता येते. हॉटेल गाड्या बुक करुन मस्त फिरायचे. इंटर्नेट आहेच दिमतीला.
पहिला पर्देश प्रवास केसरी बरोबर केला. नंतर मात्र ५० च्या वर ग्रूप असेल अशा ठिकाणी जायचेच नाही असे ठरवले. सचिन हॉरिबल. गिरिकंद ठीक. सगळ्यात मस्त ट्युलिप हॉलिडेज. केसरी मधल्या सिनियर्स फुटुन ही कंपनी झाली आहे. त्यंच्या बरोबर ५ ट्रिप झाल्या मस्त अनुभव. युरोप तर फारच छान... ते पर्देशात २४ पेक्षा जास्त लोक घेत नाहित आणि देशात ४० ... स्वतः डायरेक्टर लोकच आपल्या बरोबर असतात त्या मुळे स्पॉट निर्णय घेवु शकतात. खायची प्यायची चंगळ करतात. वेळ पडल्यास रुम अपग्रेड पण करुन देतात... मस्त अनुभव... हॉटेल्स पण झकास.... रेट ही केसरी/वीणा/सचिन पेक्षा कमी.
'केदार ट्रॅव्हल्स'शी सहमत
'केदार ट्रॅव्हल्स'शी सहमत आहे.
३ महिन्यांपूर्वी माझे काही
३ महिन्यांपूर्वी माझे काही नातेवाईक पुण्यातून 'कॉक्स अँड किंग्ज' या कंपनीबरोबर अमेरिका बघायला आले. अतीशयच वाईट अनुभव आले. त्याच टूरमधले मेजॉरिटी लोक गप्प बसून बघत होते. या लोकांनी बोलायला सुरवात केल्यावर मिळणार्या सुविधा मात्र सगळ्यांनी उपभोगल्या. यावर खरंतर स्वतंत्र लेख लिहिणार होते. पण ते झालं नाही, म्हणून इथेच काही अनुभव लिहिते.
वेस्ट कोस्टवर सुरू होऊन ईस्टकोस्टवर संपणारा १२ रात्री १३ दिवस असा टूर होता कॉग्स अँड किंग्ज- कोस्ट टू कोस्ट). टूर गाइड भारतातून आलेला, 'फ्री लान्सिंग' करणारा, म्हणजे कंपनीचा एंप्लॉयी नसलेला माणूस होता. याचं टूर मॅनेजमेंट अगदीच बेकार होतं. लोकांना पुरेशी माहिती न देणं, स्वतःला जागांची, कंपनीनं केलेल्या व्यवस्थांची धड माहिती नसणं असे प्रकार होते.कंपनीनं याला का घेतला हे अनाकलनीय होतं.
पुण्यातल्या ऑफिसातून नातेवाइकांनी, त्यांना चॉइस दिल्या गेला म्हणून, ग्रँड कॅनियनला, ट्रिपच्या रेग्युलर पॅकेजमधे नसलेले, एक्स्ट्रा अट्रॅकशन्सचे पैसे भरले. टूर गाइडला याची माहिती होती, आणि त्यानुसार व्यवस्था करणं अपेक्षीत होतं. ते त्यानं केलं नाही. बरेच एक्स्ट्रा पैसे यासाठी भरले होते. त्याचा रीफंड मागितल्यावर टाळाटाळ सुरू झाली. त्याच क्षणी भारतात फोन करून कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याला फोन केल्यावर त्याच्याकडून उर्मट उत्तरं ऐकावी लागली.
सगळ्यात कठीण प्रसंग तर अमेरिकेतल्या विमानप्रवासाचा. कंपनी बल्कमधे तिकिटं बुक करते की कसं माहिती नाही. दुसर्या दिवशी पहाटे यांना विमानतळावर पोचायचं होतं. आदल्या रात्री टूर गाइड्/ऑरगनायझरनं सगळ्यांच्या हातात बोर्डिंग पासेस ठेवले. अर्ध्या लोकांना भलत्याच नावाचे पासेस मिळाले. त्याबद्दल तक्रार करताच, "ये देखो, मेरा भी बोर्डिंग पास किसी और के नाम से हैं, कल एअरपोर्टपर तुम्हारे नाम का बोर्डिंग पास मिलेगा." सांगितलं. दुसर्या दिवशी काहीच हालचाल नाही. हे लोक त्याला विचारायला गेले, तर स्वतःचा बरोबर नावाचा बोर्डिंग पास मिळवून माणूस सेक्युरिटीचेकच्या लायनीत! बाकी लटकलेले! याला तिथून बाहेर काढून दमदाटी सुरू केल्यावर, विमान सुटायच्या अक्षरशः २० मिनिटं आधी प्रकरण सुरळीत झालं.
योग्य वेळी जेवायला न थांबवणं, उध्द्दटपणा, "आम्ही स्वस्तात ट्रिप देतोय. आणखी कसली अपेक्षा करता" असे शब्दं.. आणि बरंच काही.
काही गोष्टी त्यांच्या वेबपेजवर स्पष्ट आहेत. तिथे फसवणूक नाही. पण नुस्तं वाचून लक्षात येत नाही. उदा: रोजचं रात्रीचं जेवण भारतीयच. दुसरं जेवायचं तर स्वतः खर्चं करा. काही भाग विमानातू प्रवास, पण खूप जास्तं वेळ बसमधे जातो. काही वेळा दिवसाचे ७-८ तास. बसेस धड बघून घेत नाहीत. एसी चालत नाही, बसड्रायव्हर या टूर गाइड्/ऑरगनायझरचं ऐकत नाही, आणि याला अशा सिच्युएशन्स रिझॉल्व करता येत नाहीत अशी स्थिती.
एकूणच ट्रिपमधे मजा आली नाही. कमी दिवसांत जास्तं बघायचं तर धावपळ होणार हे गृहीत धरलंच होतं. पण बाकी अनुभव इतका बंडल असेल असं त्यांना वाटलं नव्हतं.
केदारच्या आख्ख्या पोस्टला
केदारच्या आख्ख्या पोस्टला प्रचंड अनुमोदन!
अफ्रिका, चीन या देशांत पर्यटनासाठी कोणी गेलय का? काय अनुभव आहेत?
केसरीबरोबर सिक्कीम,
केसरीबरोबर सिक्कीम, दार्जिलींग ट्रीप केली. अतिशय वाईट अनुभव. एकतर ५० जणांचा ग्रुप आणि पैसे भरताना जी हॉटेल्स सांगितली होती ती न देता सिक्कीम, दार्जिलींगला भलतीच हॉटेल्स. भांडून त्याच दर्जाच्या दुसर्या हॉटेल्समध्ये सोय करायला लावली. केसरी बरोबरची ती पहिली आणि शेवटचीच ट्रीप.
केसरी ट्रॅव्हल्सची लबाडी अगदी ट्रीप बुकिंगच्या दिवसापासुन अनुभवली. काही ठराविक रक्कम भरुन ट्रीप बुक केली. काही दिवसांनी केसरीतुन फोन आला की तुमच्या सगळ्या मेंबर्सचे पैसे भराल आज तर तुम्हाला माणशी एवढे डिस्काउंट मिळेल. म्हणुन संध्याकाळी केसरीच्या ऑफिसमध्ये गेलो आणि चौकशी केली तर 'ही स्कीम आताच संपलीय' असं उत्तर मिळालं. तेव्हा उरलेले पैसे नियमाप्रमाणे ट्रीपच्या काही दिवसच आधी भरले. राजस्थानात गेल्यावर परत तिथेही केसरीने वरण-भात, पोळी-भाजी चं जेवण दिलं. मला तरी ज्या ठिकाणी जाणार तिथल्या डिशेस चाखायला निश्चितच आवडल्या असत्या.
तेव्हापासुन सगळ्या देश-परदेश वार्या नेटवरुन बुकिंग करुनच केल्यात. ट्रॅव्हलमस्ती, मेकमायट्रीप, व्हाया अशा सगळ्या ट्रॅव्हल पोर्टल्सची मदत घेउन केल्यात. गेल्या १० वर्षात कुठेही कसलाही प्रॉब्लेम आला नाहीय. लेक दीड वर्षाचा असल्यापासुन स्वतःच नेटवरुन शोधुन फिरतोय.सगळी हॉटेल्स व्यवस्थित होती. कुठेही रुम्स रेडी होईपर्यंत थांबावंही लागलं नाही. प्रत्येक ट्रीपला ईनोव्हा किंवा त्याच टाईपची गाडी मिळालीय. एकदम परफेक्ट स्थितीतली गाडी आणि आदबशीर ड्रायव्हर. त्यामुळे कुठेही अध्ये मध्ये थांबलो तरी कुरकुर नसायची. बहुतेक सगळेच ड्रायव्हर लोकल असायचे, त्यामुळे काही हटके ठिकाणं त्यांनी स्वतःहूनच नेलं.
टांझानिया ट्रीप पुण्यातल्या फोलिएजसोबत केली. अप्रतिम हा एकच शब्द लागु होईल. अतिशय नेटकं आयोजन.
. बसेस धड बघून घेत नाहीत. एसी
. बसेस धड बघून घेत नाहीत. एसी चालत नाही, बसड्रायव्हर या टूर गाइड्/ऑरगनायझरचं ऐकत नाही,
>>> या गोष्टी अमेरिकेतही आहेत हे पाहून मौज वाटली
लेक दीड वर्षाचा असल्यापासुन
लेक दीड वर्षाचा असल्यापासुन स्वतःच नेटवरुन शोधुन फिरतोय
>> आं? दीड वर्षाचा असल्यापासून नेट वापरतोय आणि फिरतोयही ?
सचिन चे वांदे बरेच आधीपासुन
सचिन चे वांदे बरेच आधीपासुन आहेत.
एका माबोकरणीच्या बहिणीने इकडे माबोवरच (बहुतेक) अनुभव लिहिला होता.
त्याला बरेच वर्षे झालीत.
<<कुठेही रुम्स रेडी होईपर्यंत
<<कुठेही रुम्स रेडी होईपर्यंत थांबावंही लागलं नाही. प्रत्येक ट्रीपला ईनोव्हा किंवा त्याच टाईपची गाडी मिळालीय. एकदम परफेक्ट स्थितीतली गाडी आणि आदबशीर ड्रायव्हर. त्यामुळे कुठेही अध्ये मध्ये थांबलो तरी कुरकुर नसायची. बहुतेक सगळेच ड्रायव्हर लोकल असायचे, त्यामुळे काही हटके ठिकाणं त्यांनी स्वतःहूनच नेलं.>> येस आशुतोष आम्हाला पण हाच अनुभव. इटीनरी मध्ये जे नव्हत तेही दाखवलं. मोकिमिने लिहीलेल्या टिप्स हि एकदम परफेक्ट
चीन करता आराधना ट्राव्हाल्स फ़ेमस आहेत. त्यांची टुर मस्त असते अस ऐकून आहे. केदार 
<<युरप सारख्या ठिकाणी जिथे जेवण व भाषा फारच वेगळ्या आहेत तिकडे मात्र कंपनि टुर बेस्ट>> हे मात्र योग्य
प्क्याकेज टुर वाले पण पूर्ण व्हेज ट्रीप देतात
जाहिरातबाजीवर प्रचंड खर्च
जाहिरातबाजीवर प्रचंड खर्च करणार्या मोठ्या प्रवासी कंपन्या टाळाव्यात असं माझं स्वच्छ मत आहे. वर्तमानपत्रातली छोट्या जाहिरातींची पानं चाळली, तर अनेक चांगल्या पॅकेज टूर्स मिळतात. पैश्यांचीही खूप बचत होते. (आम्ही आजवर केलेली एकमेव परदेशी टूर - केसरीवाल्यांनी तेव्हा प्रत्येकी ८५,००० सांगितले. छोट्या जाहिरातींमधून आम्ही शोधलेल्या प्रवासी कंपनीमार्फत ती प्रत्येकी ६०,०००त झाली आणि उत्कृष्ट झाली.)
पण खरं सांगू, स्वतः प्लॅन केलेल्या टूरसारखी मजा नाही आणि तेवढी बचतही अन्य पर्यायांमधून होत नाही.
ट्युलिप वाल्यांनी युरोप मधे
ट्युलिप वाल्यांनी युरोप मधे आम्हला मात्र आधीच विचारुन ज्या देशात जे मिळ्तं ते चाखायला घातलं.... इटली मधला पिझ्झा तर मी आज पर्यंत विसरु शकत नाही... इंटर्लेकन मधलं काँटिनेंटल जेव़ण, वेन्निस मधल्या एका गाडीवरचा आयस्क्रिम कोन..... अप्रतिम...... तसच युंगफ्राउ ला दिलेला वाईनचा ग्लास खुप उब देवुन गेला....
खुप लाड करुन घेतले त्या वेळेस.... रहायलाही अगदी मोक्याच्या जागा निवडल्या होत्या....
'कॉक्स अँड किंग्जच्या युरोप
'कॉक्स अँड किंग्जच्या युरोप टुरचे ही असेच अतीशय भयाण अनुभव ऐकले आहेत.
केदार ट्रॅव्हल्स, आशुतोष
केदार ट्रॅव्हल्स, आशुतोष ट्रॅव्हल्स आणि अन्य सर्व वैयक्तिक ट्रॅव्हल्सना जोरदार अनुमोदन. मी पण तुमच्यातलीच एक.
आम्ही त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक वाहनांची बुकिंग्ज पण निघण्यापूर्वी करून घेतो. शिवाय तो चालक वाहन चालवताना सिगारेट पिणारा नसावा, पान्/गुटखा खाऊन पचापच थुंकणारा नसावा अशा माझ्या अतिरिक्त अटीही असतात.
(त्या आजवर प्रत्येकवेळी पूर्ण झालेल्या आहेत.)
women on wonderlust हा ही एक
women on wonderlust हा ही एक चांगला गॄप आहे त्यांचे फेसबुक पेज आहे. जरूर बघा.
aqua terra teo is another facebook page. my friend takes people on Andaman holidays and diving coaching.
Blushing indian stones is run by Dr. indurkar who takes groups to Orissa and other indian heritage sites. he being indologist gives detailed information but i have no idea about arrangements.
Pages