- दोन स्वीट कॉर्नस (प्याकबंद घेतलेत तर दीड पाकीट, कॅन्ड कॉर्न मला माहित नाहीत ) पण ताजे असतील तर उत्तम
- बटर
- मीठ
- एखादी हि.मी. हवी असेल तर
- ४/५ काळीमीरी ठेचून, पार पावडर नको. रेडीमेडही शक्यतो नको कारण ती अग्दीच पावडर असते आणि मग सगळं सूपच रंग बदलतं...
- पाणी
- लागेल तसं कॉर्नफ्लार
- हव्या असतील अन आवडत असतील तर भाज्या > अर्ध्या केशरी गाजराचे ज्यूलिअन्स, लाल, केशरी वा/व हिरव्या भोपळी मिरचीचे ज्यूलिअन्स, हिरव्या कोबीचे काही श्रेड्स वगैरे२..
- कॉर्न चे दाणे काढावेत. धूवून घ्यावेत. आता जवळ जवळ अर्ध्या ते पाऊण कणसाचे दाणे वेगळे काढावेत अन बाकी मिक्सरला फिरवावेत.
- जाड बुडाच्या पॅन मधे बटर मंद आचेवर गरम करावं. त्यात ठेच्लेली काळीमीरी घालावी; हवी असेल तर हिमी पण घालावी, पण फक्त एकाचे दोन तुकडे
- मग कॉर्न ची पेस्ट घालावी. अजिबात जळू न देता हलकीशी परतावी, यातच कॉर्न चे दाणे घालावेत; घेतल्या असतील तर भाज्या घालाव्यात, भो.मी. सोडून, ती नंतर घालावी. मी जनरली नाही वापरत.
- आता बेताने पण पुरेसं पाणी घालावे... मीठ घालावं.
- हे सगळं उकळू द्यावं. दणदणीत उकळंल की २ चमचे कॉर्नफ्लार पाण्यात मिसळून घालावं. कॉर्नफ्लार घातल्याबरोबर सूप मिळून येतं. कन्सिस्टन्सी पहावी, अॅडजस्ट करावी. सिझनिंग चेक करावं अन सर्व करावं, पायपिंग का काय म्हणतात तसं हॉट...
सजावटीकरता एखाद दुसरा लाल भो मि चा लहानसा तुकडा बारीक चिरून वर घालावा / बटर घालावं / एखादं कोथिंबीरीच पान ठेवावं... भरपूर काही करता येईल. लागेल तशी भरड ताजी मिरपूड घालावी.
सोबत गरम गार्लिक ब्रेड! मस्त व्हेज संध्याकाळ!
मेधा नी विचारंल अन मी बडवला की बोर्ड!
काही लोक दूध/ क्रीम वगैरे वापरून पण करतात. मी तसं कधी केलं नाहीये. कुणी श्युअरशॉट पक्की रेस्पी दिली तर नक्की करून पाहीन.
काही जण डायरेक्ट कुकरात पण करतात, कशी ते नाही माहिती.
मी एकदा करून बघितले होते पण
मी एकदा करून बघितले होते पण प्रयोग फसला होता, आता तुमच्या पद्धतीने करून बघेन.
पण कोबी न टाकता.
सोप्पी आहे की.. ट्राय करेन..
सोप्पी आहे की.. ट्राय करेन.. फोटो कुठाय?
तूझं लक्षण काही ठीक दिसत नाही
तूझं लक्षण काही ठीक दिसत नाही मला मित्रा.
योगेश ऐकत नाही हां. अगदी
योगेश ऐकत नाही हां. अगदी बारिकसारिक टिपांसगट पाकृ!
चांगली आहे.
काढलेल्या १४-१५ धाग्यांतले ११-१२ धागे रेस्प्यांचे आहेत. पुढलं ठाणे जीटीजी योगेशकडे?
वॉव, सही आहे! कॉर्नफ्लॉवरला
वॉव, सही आहे! कॉर्नफ्लॉवरला पर्याय म्हणून काही वापरू शकतो का?
फोटो द्या की पण! सुप आणि गार्लिक ब्रेड असा दोन्हींचा!
कणसाचं की मक्याचं?
कणसाचं की मक्याचं?
मराठीत गोड मक्याच्या कणिसांना
मराठीत गोड मक्याच्या कणिसांना 'मधुमका' हा शब्द ऐकला होता. आवडला होता.
सूप ची पाककृती छान वाटते आहे. करून बघेन.
आवो, फोटू टाका की... आमी
आवो, फोटू टाका की...
आमी तुमच्या घरला यीऊ तवा ह्योच बेत चालंल.
अरे वा योगेश! सुगरण आहेस
अरे वा योगेश! सुगरण आहेस
फोटो टाक.
अम्या योग्याची वाटचाल योग्य
अम्या

योग्याची वाटचाल योग्य दिशेने आहे
तूझं लक्षण काही ठीक दिसत नाही
तूझं लक्षण काही ठीक दिसत नाही मला मित्रा. >> तो परतंत्र होण्यासाठी अधिकाधिक क्वालिफाय बनवतोय स्वतःला.
वाढणी: २ माणसांसाठी>>>> इकडे
वाढणी: २ माणसांसाठी>>>> इकडे लक्ष द्या लोकहो

योग्या मस्तच रे
सध्या घरी स्विट कॉर्न आहेत.
सध्या घरी स्विट कॉर्न आहेत. आज संध्याकाळी हेच सुप पण विदाऊट कॉर्नफ्लॉवर मी करते.
छान सूप. पुर्वी क्रीम स्टाईल
छान सूप. पुर्वी क्रीम स्टाईल कॉर्नचा टिन मिळायचा ( पुर्वी म्हणजे स्वीट कॉर्न बाजारात येण्यापुर्वी ) ते वापरून हे
सूप करणे अगदी सोपे असायचे.
मी केला होता try एकदा कॉर्न
मी केला होता try एकदा कॉर्न सुप.. पन फसला , सगळा चोथा झाला कॉर्न चा । try करेन saturday ला । मस्त वाटतेय सोपी
दीपमाला, मी कॉर्न सूप केले
दीपमाला, मी कॉर्न सूप केले तेव्हा मका मिक्सरवर फिरवून गाळून घेतला. तस करून बघा.
योगेश , मस्तच ..येतेच आता
योगेश , मस्तच ..येतेच आता मुंबईला
छान आणि सोपी आहे रेसिपी.
छान आणि सोपी आहे रेसिपी.
अस्स्स व्हय....हि चान्गलि टीप
अस्स्स व्हय....हि चान्गलि टीप आहे..असच करेन आता...थन्क्यु अनघा.
दीपमाला, गाळून घेतल्यावर
दीपमाला, गाळून घेतल्यावर कॉर्न फ्लॉवर लावायची गरज पडणार नाही. दाटपणा आपोआप येतो.
कोणत्याही सूपसाठी ही कृती
कोणत्याही सूपसाठी ही कृती करून पाहा . (१)मक्याचे दाणे ,मशरुम/ कोबी /फ्लॉवर/गाजर /कांदा/टमेटो वगैरे चिरून भांड्यात घ्या (२)भिजेल एवढेपेक्षा थोडे अधिक पाणी आणि चमचाभर कॉनफ्लॉउर मिसळून उकळा (३)कॉफ्लॉचा रंग बदलला की मीठ घाला व त्यानंतर थोडे दुध घाला म्हणजे दुध फाटणार नाही . (४)भाज्या तशाच ठेवून सूप वेगळे काढा ,(५) आणखी थोडेसे पाणी घालून भाज्या पाच सात मिनीटे उकळून फक्त पाणी पहिल्या सूपात टाका .(६)आता भाज्या थोड्या मऊ होतील (७)आता लोणी किंवा अमूल आणि मिरपूड टाकून भाज्या परतून सर्वच सूपात टाका .या सूपाला प्रत्येक वस्तुचा वेगवेगळा छान स्वाद कायम राहातो .[सूप म्हणजे मिक्सरमधून काढलेले कांदा आणि कॉनफ्लॉउरचे गरम मसाला घातलेले पिठले अशी काही जणांची समजूत आहे .] सूपसाठी काही संयोग (*)पालक ,कांदा .*गाजर ,टमेटो *मका ,चीझ *कोबी ,कांदा *फ्लॉवर ,पातीचा कांदा .
इतक्या छान रेसिपीला "आमटी,
इतक्या छान रेसिपीला "आमटी, कढी, पिठले" गटात का टाकलंय!
म्हणजे आमटी वगैरेही छान असतात, पण सूप नि आमटी एकाच गटात नको वाटतात...
फोटो?
योग्या सहि रे नक्कि करुन
योग्या सहि रे
नक्कि करुन पहाणार उद्या!
कसचं कसचं! जागुतै, ते कॉफ्ला
कसचं कसचं! :p
जागुतै, ते कॉफ्ला नाही घातला तर चोथा पाणी होणार
मका मिक्सरवरून काढून गाळून घेतलात तर पौष्टिक सत्व वर गाळणीतच राहातील ना!
srd: करून पाहीन असही...
स्मितू: ये ना, नागपूर मुंबई फार नाही!
कवे!
थंडे: कर अन मग सांग मला... तुझ्यासारखीनं पौष्टिक सुपं भरपून प्यावीत, केवढी चिपाडेस!!!
करून बघायला पाहिजे!
करून बघायला पाहिजे!
करून बघायला हरकत नाही.
करून बघायला हरकत नाही.
आता जस्ट हे करुन पाहिलं.
आता जस्ट हे करुन पाहिलं. आतापर्यंत तीनदा कॉर्न सूपचे प्रयोग फसले होते. सूप 'खावं' लागायचं. पण न गाळतासुद्धा हा प्रकार एक नंबर जमला! फक्त मीठ, मिरपूड आणि बटर यांचा स्वाद अमेझिंग होता. धन्यवाद!
मी पण केलं होतं मागच्या
मी पण केलं होतं मागच्या आठवड्यात ह्या रेसेपीने कॉर्न सूप. आवडलं होतं. धन्यवाद.