गेल्यावर्षी सायकलविषयी माहीती घेण्यासाठी माबोवर पोस्ट टाकली होती. त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तेव्हाच खूणगाठ बांधली होती की भावी सायकलपटूंसाठी एखादी पोस्ट टाकायचीच...
आता गेले वर्षभरभर मी नित्यनेमाने सायकल चालवत आहे...सर्वात आधी घेताना हर्क्युलीसची रायडर अॅक्ट ११० घेतली...साधारण १०००किमी अंतर झाल्यावर ती भावाला दिली आणि परदेशी बनावटीची स्कॉट एक्स ७० ही सायकल घेतली. या जानेवारीपासून साधारण ८५० किमी चालवून झाले आहे. त्यात एकदा साडेपाच तासात १००किमी, सिंहगड चढाई असे काही उपक्रमही केले. त्यामुळे आंतरजालावरुन गोळा केलेली माहीती, माझा व्यक्तिगत अनुभव असे करून नवोदितांना हा सल्ला...
(असाही जन्मजात पुणेकर असल्याने सल्ला देण्यासाठी पात्रतेची अट आम्ही पाळत नाही ही गोष्ट वेगळी)
१. सल्ला क्र १ सायकल घ्यायचा विचार करताय...जरुर घ्या...
अतिशय सुखकर, हलके, स्वस्त, विना कटकटीचे, विना प्रदुषणाचे, तब्येतीला चांगले असे वाहन. विशेषत ज्यांचे शाळा, कॉलेज, ऑफीस ५-१० किमीच्या परिघात आहे त्यांनी तर आवर्जून घ्यावे. हिच वेळ आहे सायकल संस्कृती पुनरज्जीवीत करण्याची. आपल्याकडे विनाकारण सायकल म्हणजे आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातील लोकांचे वाहन म्हणून पाहीले जाते. त्यामुळे कित्येकदा शक्य असूनही केवळ प्रतिष्ठेच्या कारणासाठी अनेकजण धूर काढत जाणे पसंत करतात.
पण आता हळूहळू परिस्थिती बदलू लागली आहे. मी गेले वर्षभर नेमाने ऑफीसला सायकलने जातो. सुरुवातीला काही जणांनी थोडी टिंगल केली पण मी चिकाटी सोडली नाही. आता माझ्या बॉससकट आणखीही काही जण सायकल घेण्याचा गांभिर्याने विचार करत आहेत. गेले काही आठवडे सगळ्यांना सायकलचे ब्रँड, किंमती याची माहीती देण्याचे कार्य सुरु आहे. त्यातूनच खरे तर या पोस्टचा जन्म झाला.
आणि पुण्यासारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बोंबललेली आहे तिथे तर सायकल पर्यायी वाहन म्हणून असणे अगदी आवश्यक. अगदी जरी रोजच्या रोज नाही वापरली तरी आठवड्यातून २-३ वेळेस, विकांताला एखादी लांबवरची रपेट इतक्यासाठी जरी वापर झाला तरी उत्तम. मुळात घेणे आणि चालवणे हीच पहिली पायरी.
आता सायकल घ्या म्हणल्यावर अनेकजण अडचणींचा पाढा वाचतात. त्यापैकी प्रामुख्याने सांगितल्या जाणार्या अडचणींचा परामर्ष घेऊ
१. घरापासून ऑफीस लांब आहे - मुंबई उपनगरात राहणारे सोडले तर बऱ्याच शहरात ऑफीस १० ते १५ किमीच्या परिघात असते. सुरुवातीला हे अंतर नक्कीच जास्त वाटेल पण एकदा हळूहळू सुरुवात केली तर हे अंतर फार नाही याची जाणीव होईल.
२. वेळ खूप जातो - माझे ऑफीस बरोबर १० किमी अंतरावर आहे आणि ट्रॅफिकमध्ये मला बाईकने जायला अर्धा तास तरी लागतोच..तितकाच वेळ मला सायकलवरूनही लागतो. अगदी रमत गमत गेलो तरी ट्रॅफिकच्या कोंडीतून सायकल सुळकन काढता येत असल्याने काहीच अडचण येत नाही. अनेकजण बसची वाट पाहत, एक दोन बस बदलून जाताना जेवढा वेळ घालवतात त्यापेक्षा नक्कीच कमी वेळ सायकलवरून लागतो.
३. सायकलवर जाताना सामान घेऊन जाता येत नाही - रोज घरी येताना किराणा माल, भाजी किंवा तत्सम सामान घेऊन येणार्या गृहीणी सोडल्यातर आपण असे सामान रोज काय आणतो. ऑफीसचे सामान म्हणले तर एका छोटेखानी सॅकमध्ये डबा, पाण्याची बाटली, मोबाईल, पाकिट, रुमाल, ऑफीसची कागदपत्रे असे सगळे काही छानपैकी बसते. माझ्या सॅकमध्ये तर कॅमेरा, लॅपटॉप, एक स्पेअर टीशर्ट, टर्किश नॅपकिन असेही असते.
४. कपडे खराब होतात - अनेकांना फॉर्मल कपडे घालून सायकलवर जाणे फारच चमत्कारीक वाटते. पण आजकाल अनेक आयटी कंपन्या आणि अन्य ऑफीसमध्ये शॉवरची सोय असते. त्यामुळे साध्या कपड्यात ऑफीसला जाऊन तिथे कपडे बदलणे शक्य असते. एका कपड्याचा जोड व्यवस्थित ठेवला तर इस्त्री न बिघडता नेणे अगदी सोपे आहे. शॉवरची सोय नसली तर पँट व्यवस्थित दुमडून किंवा त्याला क्लिप लाऊन आणि वरती टीशर्ट घालून जाता येते. ऑफीसच्या बाथरूममध्ये जाऊन टीशर्ट बदलून शर्ट घालता येतो.
५. सायकल चोरीला गेली तर, पंक्चर झाली तर - सायकल व्यवस्थित पार्क करून वेगळ्या लॉकने बांधून ठेवली तर काही अडचण येत नाही. शक्य असल्यास सिक्युरीटी गार्डच्या नजरेत राहील अशा ठिकाणी सायकल ठेवावी. पंक्चर झाली तर बाईक पंक्चर झाल्यावर करता तेच. उलट बाईक ढकलण्यापेक्षा सायकल ढकलणे कधीही सोपे.
या व्यतिरिक्तही काही शंका असतील तर जरुर विचारा मी माझ्या परीने शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करीन. माझ्या पाहण्यात सायकल चालवणार्या महिला नसल्याने त्यांच्या अडचणींचे निराकरण त्या कशा करतात हे सांगू शकत नाही. त्यामुळे त्याबद्दल क्षमस्व.
पुढच्या भागात सायकल घेण्यापूर्वी...
कुठली सायकल घ्यावी, सायकलचे प्रकार, सायकलींचे ब्रँड, किंमती इ.इ.
http://www.maayboli.com/node/42919
मी आत्ताच सायकल घेतली. ह्या
मी आत्ताच सायकल घेतली. ह्या ऊन्हाळ्यात वापरावी म्हणतेय. छान माहिती.
अभिनंदन.. भरपूर सायकल चालवा,
अभिनंदन..:)
भरपूर सायकल चालवा, निरोगी रहा, पेट्रोल वाचवा आणि आनंदी रहा
पुण्यातल्या रहदारीत सायकल
पुण्यातल्या रहदारीत सायकल चालवणे भितिदायक वाटते.
धाग्याची कल्पना आवडली. नवी
धाग्याची कल्पना आवडली.
नवी सायकल घेतल्यावर हेल्मेट घेतल्याशिवाय दुकानाच्या बाहेर पडु नये (फु स)
मी मेट्रो पर्यंत सयाकलने जावे
मी मेट्रो पर्यंत सयाकलने जावे म्हणुन घेतली आहे. विकन्तला सराव करत आहे, बघु.
सिंडरेला - ते सर्व पुढच्या
सिंडरेला - ते सर्व पुढच्या भागात...सुरक्षा आणि काळजी मध्ये
सुमंगल - सुरुवातीला थोडे बिचकायला होईल..पण बिनधास्त चालवायची...बाईकवाले, रिक्षावाले, वडाप सायकल आहे म्हणल्यावर खुशाल कट मारून जायला पाहतात...त्यांना अजिबात दाद द्यायची नाही...खुशाल त्यांच्यावर ओरडायचे...लक्षात घ्या रस्त्यावरून जाण्याचा पहिला हक्क सायकलचा आहे. सायकल ट्रॅकवर चालवण्याच्या अवास्तव अपेक्षा ठेऊ नका..त्यापेक्षा रस्त्यावर चालवणे कधीपण चांगले आणि सुरक्षित आहे. मी तीन चार वेळेला ट्रॅकवरच्या अडथळ्यांमध्ये कडमडल्यावर आणि दोनदा भाजीवाल्यांना धडकल्यावर सोडून दिले.
गॉट इट, आशुचॅप. ह्या
गॉट इट, आशुचॅप. ह्या प्रेरणेने आता रोज जाइन रोडवर आणि लवकरच कुठवर आले ते कळवेल.

न रहावून माझे दोन
न रहावून माझे दोन आणे...
नवर्याने मुद्दाम सायकलनेच ऑफिसला जायचं या निश्चयाने आणलेली सायकल त्याच्या छोट्या अपघातानंतर काही महिने तशीच पडून होती. मी १० दिवसांपूर्वीपासून केवळ व्यायाम म्हणून सायकलिंग चालू केलंय. ३ किमी फक्त. कारण मी ४.५ किमी चालायचा व्यायामही करते, जो मला आमच्या डॉकनी सायकलिंगपेक्षा अनिवार्य सांगितलाय. आणि चालायचा ट्रॅक संपूर्ण चढणीचा आहे. त्यामुळे चालून झालं की सायकल घेऊन बाजारातून भाजी, दूध आणायचं काम सायकलवरून. छान वाटतं. याहून अधिक सायकलिंग माझ्याकडून अवघड आहे, पण आहे तेही मला पुरेसं आहे. नवर्याचं सायकलिंग बंद झालं, पण मी सुरू केलं.
पोस्ट अवांतर झाली असेल कदाचित. तसं असेल तर उडवीन थोड्या वेळानी.
गेलि ३ वर्शे मुलुन्द पुर्व
गेलि ३ वर्शे मुलुन्द पुर्व मधेभसाय्कल्च चल्वते. स्वस्त..मस्त..हवेशिर वाहन. मुलुन्द मधे कुथेहि जाय्ला मि सहज तयार आस्ते.
प्रज्ञा - अजिबात अवांतर
प्रज्ञा - अजिबात अवांतर नाही..उलट छान अनुभव शेअर केलात...नक्कीच इतके जरी सायकलींग गेले तरी पुरेसे आहे...हळुहळु आवडीने एखादी लांबवर चक्कर मारलीत आठवड्यातून एखाद वेळी तरी मज्जा येईल...
सायकलने जाण्याचा हाच फायदा...कुठूनही कसेही जाता येते
मी चार महिने घर ते ऑफिस असे
मी चार महिने घर ते ऑफिस असे रोज २० किमी सायकल वरुन प्रवास करुन बघितला आणि मला खालील फायदे झाले:
- वेळेची बचत झाली. कारण बसची वाट पाहण्याची गरज उरली नाही.
- जिममध्ये जाण्याची गरज भासली नाही.
- ४ महिन्यांत सुटलेले पोट ४ इंचापे़क्षाही कमी झाले आणि तेही रोज बकासुरासारखे खाऊनही..
सध्या नविन सायकल घेण्याच्या विचारात आहे. तेव्हा नविन सायकल कुठली घ्यावी ते सुचवा.
- पिंगू
चॅम्पा.. क्रमशः न करता एकाच
चॅम्पा.. क्रमशः न करता एकाच धाग्यात टाक की सगळे मित्रा....
पिंगू मस्तच...सेम
पिंगू मस्तच...सेम माझेही...
नविन सायकलबद्दल माहीती लगेचच देतो...
डॉ. - एकाच धाग्यात सगळी माहीती दिली तर फार मोठा होईल धागा
ओक्के.. नो प्रॉब्स. हा धागा
ओक्के.. नो प्रॉब्स.
हा धागा आवडलाच.
माझ्याकडे जुनी अॅटलास
माझ्याकडे जुनी अॅटलास मॉडेलची सायकल आहे. ती साधी (सिंगल गीयर आहे. - सायकल मध्ये कमीतकमी एकतरी गीयर असतो. काही लोक विनागीयरची अन गीयरची सायकल असे वर्गीकरण करतात!)
आता मला नवीन सायकल घ्यावीशी वाटते आहे. ती कोणती घ्यावी? मल्टी गियरची सायकल घ्यावी काय?
काय फायदे असतात जास्त गीयरचे? अन जास्त गीयरच्या सायकलीला वेगात पॅडल्स मारावे लागतात हे मी नेहमीच इतरांचे पाहतो. लवकर सांगा ब्वॉ.
माझ्या बाइकला ०, १, २ आणि १,
माझ्या बाइकला ०, १, २ आणि १, २, ३ असे ऑपशन्स आहेत. एक कदाचित गेअर असावा. दुसरे कय ते नाही माहित. चढ आणि उतारासाठी कोणते गीयर्स योग्य?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/42919
पाषाणभेद आणि सुमंगल
तुमच्या दोघांच्या प्रश्नांना या धाग्यात उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. तरी अजूनही शंका असेल तर इथेच किंवा त्या धाग्यावर विचारू शकता...
माझ्यापरीने शक्य ती माहीती देण्याचा प्रयत्न करेन.
धन्यवाद आशुचॅप!!
धन्यवाद आशुचॅप!!
वा...........अगदी
वा...........अगदी जिव्हाळ्याचा विषय! छान मांडलाय.
हाही भाग मस्त आहे आधी वाचला
हाही भाग मस्त आहे
आधी वाचला पण लगेच दुसरा भाग वाचला 
इथे प्रत्येक वर्कप्लेस मधे, लोकल शॉप्स, शॉपिंग सेंटर्स मधे सायकल ठेवायचे स्टँड्स कंपल्सरी बसवावे लागतात. इनफॅक्ट नव्या अपार्टमेंट्स च्या प्लॅन्स मधे द्खिल सिक्युअर्ड सायकल पार्किंगची सोय ठेवावीच लागते. नाहीतर डिझाईन पास होत नाही.
इथे बसेस ना सुद्धा सायकल अडकवायची सोय असते. घरापासुन बस स्टॉप पर्यंत / अर्ध्या रस्त्या पर्यंत सायकल ने या आणि सायकल बस ला लटकवुन उरलले अंतर बसने जा. किंवा काही मेन बस थांब्यांजवळ सिक्युअर्ड सायकल पार्किंग एरियाज असतात. त्यात तुमची सायकल ठेवायला एक कंटेनर तुम्ही हायर करायचा आणि मग बस ने ट्रॅव्हल करायच.. बस भाड्यात सुट मिळते
सायकल ट्रॅक्स, रस्त्याच्या कडेने सेपरेट सायकल लेन्स अश्या बर्याच सोयी आहेत.
ऑफिसात माझा बॉस स्वतः रोज १५-१७ किमी राईड करुन येतो.
सायकल वाटेत कधी पंक्चर झालीच तर मेंडिंग चे एक किट मिळते ते कायम जवळ ठेवायचे
ग्रेट. छान उपक्रम.
ग्रेट. छान उपक्रम.
मी ही गेल्या आठवड्यात सायकल
मी ही गेल्या आठवड्यात सायकल घेतली, म्हणजे आहोनी वाढदिवसानिमित्य भेट दिली. ७ गीअर्स आहेत.. २१ combinations मध्ये वापरता येते. weekends ना आम्ही trails वर बाईक घेवुन जातो. portland मध्ये बरेच bike routes आहेत. बीच साईड्ला पण बाईक trails आहेत. weekdays मध्ये मी छोट्या छोट्या कामासाठी bike च वापरते. gym, bank, yoga class, लेकीच्या शाळेत volunteer काम इ.इ. ... खुप सोईचे आहे.
खरच बाईक सिलेक्ट करताना डोके चक्रावुन जाते. आणी शेवट पर्यन्त आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का चुकीचा हे कळत नाही...
अप्रतीम धागे. वाचतोय.
अप्रतीम धागे. वाचतोय.
सायकलविषयी माहिती दिलीस हे
सायकलविषयी माहिती दिलीस हे बेस्ट काम केलंयस आशुचँप.
मनापासून अभिनंदन, खरोखर
मनापासून अभिनंदन, खरोखर अप्रतिम माहिती.
अनेकांना नक्कीच प्रेरणा देणारी माहिती ...
छान माहिती.
छान माहिती.
दोन्ही भाग वाचले. खूप उपयुक्त
दोन्ही भाग वाचले. खूप उपयुक्त आहेत.
आजकाल सायकल रिपेअरींगची दुकाने फारशी उरली नाहीत. रिपेअरींग सोडा, साधे हवा भरणे पण जिकीरीचे झालय. माझा मोटरबाईकवाला एक वेगळे नॉझल लाऊन हवा भरून देतो. सगळेजण हे करत नाहीत. लेकीची BSA SLR एका टपरीवजा दुकानात सर्विसिंगला देतो. पण १५००० ची सायकल त्याच्याकडे देणे शक्य नाहीये. अशा सायकलींचे सर्विसिंग कुठे करायचे?
इतक्या वर्षांनी परत सायकलिंग सुरू करायचे. त्यात तू म्हटल्याप्रमाणे सांधे, स्नायू आधिच आखडलेले असतात, दुखत असतात. त्यांना अजून इजा होऊ नये म्हणून काय करावे?
आशुचँप, धागा आवडला. शाळेत
आशुचँप, धागा आवडला. शाळेत असताना भरपूर सायकलिंग केले आहे. आता जमेल की नाही माहित नाही.
उत्तम धागा. मला सायकलिंगचे
उत्तम धागा. मला सायकलिंगचे फायदे माहीत करून घ्यायचे आहेत. कृपया सांगावेत. धाग्यासाठी धन्यवाद.
छान अहे धागा. पुढच्या
छान अहे धागा. पुढच्या माहितीच्या प्रतिक्षेत,.
मी सायकल चालवायला १० वर्षांपुर्वी शिकले आणि त्यानंतर नियमीत बाजारहाट करत होते सायकलवर. सामान घेऊन फिरणे सुरवातीला थोडे जड वाटलेले पण नंतर व्यवस्थित सवय झाली होती.
पण गेल्या ६-७ वर्षात सायकल किंवा दुचाकी काही चालवलेलेच नाही, त्यामुळे गेल्या आठवड्यात सायकल बाहेर काढल्यावर खुप भिती वाटायला लागली. आता परत हळूहळू सुरू करायचीय. पावसाळा येतोय आणि तेव्हा चालण्यापेक्षा सायकलचा व्यायाम जास्त बरा वाटतो. ऑफिस १३ किमी दुर आहे, पण ठाणे बेलापुर रोडवर आहे आणि या रोडावर कायम हेवी व्हेहिकल्स आणि हेवी ट्रॅफिक असतो. तरिही बरेच सायकलस्वार दिसतात या रोडवर, त्यामुळे निदान एकदातरी सायकलवरुन ऑफिसला जायचा प्रयत्न करणार आहे. आधी चालवण्यात सफाई आणायला हवी.
रिपेरिंग दुकानाबद्दल माधवशी सहमत. मलाही सायकलला काही झाले तर सायकल उचलुन रेल्वे ट्रॅक पार करुन जावे लागते आणि त्याच्या कंटाळ्यामुळे सायकल पडुन राहते तशीच.
Pages