(पुन्हा एकदा, यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही.)
अ - इचलकरंजीत असताना असे अनेक आलाप आमच्यासारख्यांनी अहमहमिकेने ऐकले आणि एकूणच इतर आलाप आवर्जून ऐकता-ऐकता आम्हाला आलापांच्या आयोजकांचे अशक्य इंगित उमगले.
क - कॅल्शियमची कमतरता कमी करण्यासाठी कृश कुसुमने कोल्हापुरात कुलकर्ण्यांकडे किती काबाडकष्ट काढले !
ख - खेडजवळच्या खेड्यात खुरप्याने खालचं खोरं खुरपून खमक्या खापरपणजीने खानदानासाठी खूप खस्ता खाल्ल्या.
ग - गुटगुटीत, गोऱ्या गोलूने गोड गाणे गायल्याने गोंधळलेल्या गोविंदाने गावातून गपगुमान गाशा गुंडाळला.
घ - घाणेरडं घासलेट घेऊन घाईघाईने घरंदाज घारपुऱ्यांच्या घरात घुसणाऱ्या घोसावळेकरांवर घैसासांची घसघशीत घार घिरट्या घालेलच !!
च - चुकार चंदूने चौथ्यांदा चरखा चालवता चालवता चेरी, चारोळीयुक्त चमचम चोरून चुटकीसरशी चाखली.
छ - छटाकभर छुंद्यासाठी छत्तीसगढच्या छत्र्यांनी छोटासा छत्रीचा छाप छतावर छत्तीसवेळा छानपैकी छापला.
ज - जर्मनीचा जाणकार ज्योतिबा जळगावच्या जोश्यांच्या जुन्या जनता-जत्रेत जोकरचे जीवन जगला.
झ - झांजांसाठी झुरणारी झोपडीतली झीनत झुंजुमुंजू झाल्यावर झाडाखालच्या झोक्यावर झटक्यात झोपली.
ट - टंखलेखनयंत्राच्या टंचाईने टकल्या टोणप्यांचे टीचभर टंकलेखन टळले.
ठ - ठोमण्यांना ठणकावून ठोसरांनी ठेल्यावर ठसक्यात ठेवलेला ठोकळा ठणठणीत ठकारांनी ठामपणे ठोकला.
ड - डांबरट डाकूच्या डोक्यावरच्या डबोल्यातला डिंक डुचमळला.
ढ - ढोरमेहनतीनंतर ढकलाढकलीने ढेपाळलेल्या ढमढेऱ्यांनी ढीगभर ढोकळे ढापले.
त - तऱ्हेवाईक तानाजीने तुपात तळलेल्या तुकतुकीत तोंडल्याचा तर्जनीने ताकदीनिशी तिसऱ्यांदा तुकडा तोडला.
थ - थुलथुलीत थत्तेमावशी थाळीत थाटामाटात थालीपिठे थापता-थापता थकून थोडीशी थबकली.
द - दस्तुरखुद्द दाजींनी दसऱ्यानिमित्त दूरवर दार्जिलिंगमध्ये दोन दांडगट दोस्तांसमक्ष दुकानातल्या दळलेल्या दळणाचे दीनवाण्या दिनूला दान दिले.
ध - धुळ्याच्या धीरूभाईने धंद्याच्या धांदलीत धन्याला धमकावणाऱ्या धनेशला धक्क्यावरच्या धुक्यात धिक्कारले.
न - नसरापूरची नेहेमीची नर्तकी नेमकी नसतानाही नोकरांसमोर नीट नाचणाऱ्या नेभळट नंदूला नकट्या निलिमाने नावाजले .
प - पेन्शनर पंतांच्या पोरकट पुतण्याचे पाकीट पटकन पळवणाऱ्या पटाईत प्रकाशला पोलिसांनी परवा पुण्याच्या पेशवे पार्कमध्ये पेरू पाडताना पाहिले.
फ - फडक्यातल्या फोलपटांच्या फर्लांगभर फाफटपसाऱ्यामुळे फुकट फटाके फोडणारा फुरसुंगीचा फास्टर फेणे फारच फाफलला.
ब - बासनात बांधलेल्या बेलफळांसकट बेलापूरच्या बसमध्ये बसलेल्या बदमाष बंटीबरोबरच्या बाचाबाचीत बिचाऱ्या बबनच्या बाराच बरगड्या बचावल्या.
भ - भाद्रपदातल्या भरमसाठ भरतीमुळे भलताच भांबावलेला भाईंदरचा भारदस्त भास्कर भोसले भेलकांडणाऱ्या भोयांबरोबर भितीपोटी भांड-भांड भांडला.
म - मात्र माश्या मारणाऱ्या मालोजी मानेंच्या मधल्या मुलाने मे महिन्यात मलकापूरला मात्र मस्त मैदान मारले.
य - योगायोगाने यावेळी युरोपातले यच्चयावत योगी यवतमाळच्या यमी येवलेकरबरोबर यानातून यात्रेला येणार.
र - रांजणगावच्या राजवाड्यावरची रोषणाई रंगांत रेखाटणाऱ्या रिक्षावाल्या रागीट राकेशसाठी रोमच्या रसिक राजाने रीतसर रोटी रांधली.
ल - लबाड लता लुकतुकेने लुकलुकणारा, लांबलचक, लाल लोलक लुबऱ्या लोकांपासून लीलया लपवला.
व - वाघापासून वाचण्यासाठी वैतरणाच्या वाकड्या वाटेवर वेगात वळणाऱ्या विजारीतल्या वजनदार विक्रम व वेताळला वीस वर्षीय वेंधळ्या वासंतीने विचित्र वागवले.
श - शर्वरी शेट्टी शिमग्यादिवशी शेतात शिकार शोधता-शोधता शेजारच्या शर्मिला शास्त्रीच्या शाकारलेल्या शामियान्यात शिरली.
स - समंजस साखरसम्राटाने सुस्तावलेल्या साळसूद सविताकडे संध्याकाळी सुकामेवा सोपवून स्वतः सकाळचे सपक सांबार संपवले.
ह - हैद्राबादच्या हैराण हर्षवर्धनचा हुशार, हरकाम्या हरी हल्ली हत्तीवरच्या हुजऱ्यांना हमखास हसवतो.
हे सुद्धा
हे सुद्धा छान

यात खूप मेहनत आहे
बापरे
बापरे मस्त...
लई भारी
लई भारी
(No subject)
लले लई डोक चालवल्य , भारी आहे
लले लई डोक चालवल्य , भारी आहे
नाद्खुळा.. ललिता, लैच लांबलचक
नाद्खुळा..
ललिता, लैच लांबलचक ललित लिहिलेस...
सहिच आहे.
सहिच आहे.
(No subject)
याला '२' असे का आहे शीर्षकात
याला '२' असे का आहे शीर्षकात ? म्हणजे '१' येऊन गेला आहे का ? असेल तर त्याचा दुवा पण दिलात तर बरं होईल.
छान जमलय
छान जमलय
मलाही पहिल्याचा दुवा हवाय.
मलाही पहिल्याचा दुवा हवाय. कसलं धमाल लिहीलय !
मिलींदा , कौतुक हे पहा
मिलींदा , कौतुक हे पहा
http://www.maayboli.com/node/4243
छान आहे
छान आहे