दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे
कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे
अनासक्त मी! हे तिला मानवेना, कसे डाव लटकेच खेळायची ती
वृथा आळ घेणे, मनस्ताप देणे, रुजूवात करणे वगैरे वगैरे
कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा, मुळी थांग पत्ता मनाचा न येई
मला पेच हा की पुढे काय होणे! मनाशी कचरणे वगैरे वगैरे
मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा, किती चिंबलो ते कळालेच नाही
जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणें वगैरे वगैरे
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
"अभय" एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे
- गंगाधर मुटे "अभय"
-------------------------------------------------------------------------
व्वा! मस्त! वगैरे वगैरे अगदी
व्वा! मस्त! वगैरे वगैरे अगदी सहज आले आहे.
दोन ठिकाणी वृत्त बदलले आहे.
तुझा केशशृंगार न्याहाळित होतो
आणि
स्मरे त्या क्षणांचे उन्मत्त होणे - या दोन ठिकाणी!
इथरणे म्हणजे काय?
तसेच, उतावीळ होतो तुला ऐकण्याला - यातील 'तुला ऐकणे' हे हिंदीसारखे आले आहे. मराठीत आपण सहसा तुझे ऐकणे असे काही म्हणतो. तुम्हे सुनने के लिये बेताब था सारखे वाटत आहे तुला ऐकणे!
लहजा फार आवडला. अनेक ओळी आवडल्या.
धन्यवाद
मस्त!..
मस्त!..
मला पण आवडेश "इथरणे" च्या
मला पण आवडेश
"इथरणे" च्या ऐवजी "इतरणे" असं असावं बहुतेक
म्हणजे .......तुम्हारा इतराना.....वगैरे वगैरे
व्वा ! मस्त, आवडली "अभय" काय
व्वा ! मस्त, आवडली
"अभय" काय आहे ?
छान आहे! आवडली
छान आहे! आवडली
मस्त आहे. आवडली. एक छान ठेका
मस्त आहे.
आवडली.
एक छान ठेका आहे पूर्ण गझलेला.
इथरणे शब्द कळला नाही.
मला पण आवडली.
मला पण आवडली.
"इथरणे" म्हणजे - भाव
"इथरणे" म्हणजे - भाव खाणे....
वगरै.... वगरै..... आवडले.
क्या बात है मुटेजी....जबरी
क्या बात है मुटेजी....जबरी गझल.
मुद्यांच्या मानाने वृत्त फारच
मुद्यांच्या मानाने वृत्त फारच लांब झाले आहे. गझलेपेक्षा जरा प्रेमकविता अधिक वाटत आहे. कळावे
गं स
सुंदर रचना !! गंस शी सहमत !!
सुंदर रचना !!
गंस शी सहमत !!
सुंदर... '' अभय '' कोण ?
सुंदर...
'' अभय '' कोण ?
वा मुटे सर वा
वा मुटे सर वा
वाह व्वाह! क्या बात है मला
वाह व्वाह! क्या बात है
मला आवडली
पुन्हा वाचली! म स्त च!
पुन्हा वाचली!
म स्त च!
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.
----------------------------------------------------
बेफ़िजी, टायपो दुरुस्त केला आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद देणार नाही, कारण ते तुमचे कर्तव्यच आहे.
*
इतरणे हा शब्द आमच्याकडे चांगला प्रचलीत आहे. त्याचा अर्थही हिंदी "इतराना" पेक्षा थोडा वेगळा जातो.
इतरणे या शब्दाला आमच्याकडे पर्यायी शब्द आहेत जसे की, येलणे, येल पाडणे पण शुद्ध/प्रमाण/लिखीत पुस्तकी भाषेत या शब्दाला पर्यायी शब्द असेल असे वाटत नाही.
इतरणे = येलणे = येल पाडणे = स्वत:चे कौतुक दर्शविणार्या शरीर-अवयवाच्या नखरेल पण असंबद्ध हालचाली करणे, असा काहेसा अर्थ
*
"अभय" हा माझा मक्ता आहे. हा मक्ता मी सर्वच काव्यप्रकारातील रचनेत वापरत असतो. अगदी कवितेत सुद्धा.
*
गं स. आपाल्याशी अंशत: सहमत, अंशत: असहमत, उरलेले अंश रामभरोसे.
आपण या मुद्यावर सविस्तर बोलू; यथावकाश बोलू पण नक्की बोलू.
"अभय" हा माझा मक्ता आहे. >>>>
"अभय" हा माझा मक्ता आहे. >>>>
तुम्हाला "तखल्लुस" असे म्हणायचे आहे काय मुटे सर ???
.............की "तुमच्याकडे" तखल्लुसला मक्ता म्हणतात
प्रचंड सुंदर.
प्रचंड सुंदर.
वगैरे वगैरे मस्तच.. आवडली
वगैरे वगैरे मस्तच..
आवडली वगैरे वगैरे..
मस्त शुद्ध रोमँटिक वगैरे
मस्त शुद्ध रोमँटिक वगैरे वगैरे..
सर्व प्रतिसाद दात्यांचे
सर्व प्रतिसाद दात्यांचे मनपूर्वक आभार.
सुंदर, सुंदर आणि सुंदर
सुंदर, सुंदर आणि सुंदर .......
फार फार सुंदर प्रेमकाव्य!!!
फार फार सुंदर प्रेमकाव्य!!!
गझल आवडली !
गझल आवडली !
आवडली गझल.
आवडली गझल.
इतरणे = येलणे = येल पाडणे =
इतरणे = येलणे = येल पाडणे = स्वत:चे कौतुक दर्शविणार्या शरीर-अवयवाच्या नखरेल पण असंबद्ध हालचाली करणे, >>>>>>>>> यालाच 'विभ्रम' हा शब्द आहे. अर्थाच्या बर्याच जवळ जाणारा.
गझल आवडली>
सर्व प्रतिसाद दात्यांना
सर्व प्रतिसाद दात्यांना रामराम, नमस्कार, जयहिंद, जयभीम, सलाम वालेकूम, मनपूर्वक आभार, धन्यवाद ..... वगैरे वगैरे!
छान आहे गझल !
छान आहे गझल !
नमस्कार मित्रहो, "दुपट्टा
नमस्कार मित्रहो,
"दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे" ही प्रेम आणि शृगांर या विषयाला अनुसरून मी लिहिलेली पहिलीच कविता. आजवर माझ्या हातून वेगवेगळ्या काव्यप्रकारातील २०० पेक्षा जास्त कविता लिहिल्या गेल्या आहेत पण प्रेम आणि शृगांर हा विषय मी कधी हाताळलाच नव्हता कारण शृंगार हा माझ्या लेखनीचा ना तर विषय आहे नाही लेखणीचे उद्दीष्ट.
मात्र गझल लिहायची पण गझलेचा मुळ केंद्रबिंदू असलेला "प्रेम" हा विषय सोडूनच द्यायचा म्हटले तर माझ्यातल्या गझलकाराला ते पचणीही पडत नव्हतं. शृंगार हा विषय मला वर्ज्य असला तरी माझ्यातल्या गझलकारावर तसे बंधन लादणे, मला फारसे संयुक्तित वाटले नाही.
जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट मुडमध्ये जातो, तेव्हा आपल्याला नकोसं/न आवडणारं असलं तरीही बरंच काही सुचत राहतं; एखादवेळ चक्क काही शब्द लयबद्ध होऊन ओठावर रेंगाळायला लागतात. माझा एक अनुभव असाही आहे की, एकदा दादा कोंडकेंनी स्वतः लिहिलेलं एक व्दिअर्थी फिल्मी गीत गुणगुणतांना त्यासोबतच त्यापुढे माझ्या तोंडातून काही ओळी उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या होत्या. त्या ओळी माझ्यामते तरी दादा कोंडकेंच्या ओळीपेक्षा जास्त दर्जेदार, कसदार आणि श्रवणीय होत्या. मात्र त्या ओळी अर्थातच व्दिअर्थी व किंचितश्या अश्लिलतेकडे झुकणार्या होत्या... आणि मी.. स्वतःच स्वतःविषयी काही स्टेटस/मर्यादा/बंधने राखणारा असल्याने मला त्या माझ्याच ऑळी स्विकारता आल्या नाहीत. त्या ओळींच्या दफणविधीचा कार्यक्रम त्याच क्षणी तिथेच पार पडला.
मात्र मला त्याच क्षणी जाणीव झाली की आपण आपल्यातल्या कवीवर/गीतकारावर एक मोठा अत्याचार/अन्याय केलेला आहे. मी आणि माझ्यातल्या कवी या दोन वेगवेगळ्या आणि स्वतंत्र अभिव्यक्ती आहेत, याचीही जाणीव झाली.
त्या दिवशी अचानक काही शब्द सुचत गेले, स्वत:हून रांगेत उभे राहात गेले, ओळ तयार होत गेली आणि मतला बनत गेला. यावेळेस मी माझ्यातल्या गझलकाराला अजिबात अटकाव केला नाही. त्याला दिलोजानसे सहकार्य केले आणि त्यातूनच ही गझल साकारली.
ही गझल सफल झाली आहे. शृंगार हा विषय घेऊन चांगल्या रचना माझ्या हातून रचल्या जाऊ शकतील याचा अदमास आलेला आहे; मात्र तरीही यापुढे एकट-दुकट अपवाद वगळता या विषयावर कौशल्य दाखविण्याची स्वैर अनुमती मी माझ्या लेखणीला देणार नाही. माझ्यासोबत जगायचे तर माझ्या लेखणीला माझ्या आवडीचेच विषय हाताळावे लागतील. एका ध्येयपूर्ण उद्देशासाठीच जगावे लागेल आणि त्यात शृंगाररसाला फारसे स्थान नाही.
त्यामुळे मित्रहो, तुम्हाला सुद्धा यापुढे "एकदम रोमँटिक वगैरे वगैरे" रचना माझ्याकडून वाचायला मिळण्याची शक्यता धूसर आहे कारण शृंगार हा माझा विषय नाही.
आपले सर्व प्रतिसाद मी येथे संकलीत केलेले आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------
पुन्हा पुन्हा वाचली! नव्या
पुन्हा पुन्हा वाचली!
नव्या लोकांसाठी, ज्यांनी मिसलीये अशांसाठी पुन्हा!
Pages