Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 March, 2013 - 13:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
ढोमा माश्याची खवले काढून त्याच्या पोटाला चिर देऊन पोटातील घाण साफ करावी. डोक्याचा भाग काढला तरी चालतो. माश्याला वर खाली २-२ चिरा द्यायच्या. हे मासे ३ पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायचे. धुतलेल्या माश्यांना मिठ, मसाला, हळद, आल-लसुण पेस्ट लावायचे.
तवा चांगला गरम करून त्यावर तेल टाकून हे मासे शॅलो फ्राय करायचे. प्रत्येक बाजू साधारण ५-७ मिनिटे शिजवायची.
वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी १ मासा
अधिक टिपा:
ढोमा हा मासा दिसायला साधारण पिवळसर असतो. चवीला हा अगदी तसा पाणचटच असतो त्यामुळे ह्याला जास्त डिमांड नाही. चविष्ट बनवण्यासाठी आल-लसुण, मसाले व्यवस्थित लावावे. मोठ्या ढोमा माश्यांपेक्षा जरा छोट्या आकाराचे मासे त्यातल्या त्यात चविला ठिक असतात.
रश्यापेक्षा तळलेलेच चांगले लागतात.
बर्याच लहान मुलांना ढोम्या चिडवतात ते ह्याच माश्याचे नाव.
इतर मासे - http://www.maayboli.com/node/23836
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा मस्तच
अरे वा मस्तच
हो अगं....हे मासे मला तरी
हो अगं....हे मासे मला तरी आजीबात आवडत नाहित...तु बोल्ल्याप्रमाणे खरच पाण्चट असतात...त्या पेक्शा मांदेली छान असतात.......अर्थात आपली आपली आवड.....
पण फोटो मस्त आलेत .....
>>बर्याच लहान मुलांना ढोम्या
>>बर्याच लहान मुलांना ढोम्या चिडवतात ते ह्याच माश्याचे ना>> मी हेच बोलणार होते
हे संवदाळे सारखे दिसतायत.
जाई, अनिश्का, निलू
जाई, अनिश्का, निलू धन्स.
पाहील हल्ली माबोकरांना नुसते पाहून मासा चविचा के बेचव कळायला लागला. प्रतिक्रियाच नाहीत ह्यावरून नापसंत झाला आहे हा.
जे काही दोन चार मासे मी खात
जे काही दोन चार मासे मी खात नाही त्यातला हा एक मासा.
ढोम्या 'काय ढोम्या सारखा
ढोम्या

'काय ढोम्या सारखा बसुन राहीला आहेस' असच काही तरी.
मला खुप आवडतात हे मासे..
मला खुप आवडतात हे मासे..
बर्याच लहान मुलांना ढोम्या
बर्याच लहान मुलांना ढोम्या चिडवतात ते ह्याच माश्याचे नाव. >>> नाव वाचून माझ्या मनात तेच आलं
फार फॅटी दिसतोय.
फार फॅटी दिसतोय.
मला तर फार आवडतो हा मासा....
मला तर फार आवडतो हा मासा.... कालवण सुद्धा झकास लागतं...
ढोम्याची मोठी जात...कोतमासा सुद्धा चविष्ट लागतो.
आज ढोमा आणि बोई या दारावर
आज ढोमा आणि बोई या दारावर आलेल्या ऑप्शन्समधून मी बोई निवडले ते बरेच झाले. मस्त चविष्ट आहेत. ढोम्याचा एक सद्गुण म्हणजे त्याला जशी चव नसते तसाच वासही नसतो. माशांमधला नत्रवायू
माशामधला नत्रवायू जागू
माशामधला नत्रवायू
जागू तूझ्याकडून एकदा तूझ्या नजरेतून चवदार माशांची चवीनुसार यादी आली पाहिजे !
चला,आता मंगळवारी बाजारात ढोमा
चला,आता मंगळवारी बाजारात ढोमा शोधायचा!
हो बरोबर आहे.दोन दिवस उपवास
हो बरोबर आहे.दोन दिवस उपवास आहे ना.
मला पण आवडतो हा मासा. फोटो पण
मला पण आवडतो हा मासा. फोटो पण खुप मस्त आलेत.
खूप छान फोटो मला हे सगळे
खूप छान फोटो
मला हे सगळे प्रकार इथे जागू चे वाचूनच कळले. आमची धाव पापलेट, सुरमई पर्यंतच.
ढोम्या >>> दक्षी कशी नाही
ढोम्या >>>

दक्षी कशी नाही फिरकली अजुन
तोंपासु फोटो !
बोइटं नावाचा मासा खाला आहे का
बोइटं नावाचा मासा खाला आहे का कोणी?????????? अप्रतिम लागतो....
जागुले, माझी हजेरी फोटो
जागुले, माझी हजेरी

फोटो तोंपासु बरं का
अनिश्का मी वरती टिप मध्ये इतर
अनिश्का मी वरती टिप मध्ये इतर मासे म्हणून जी लिंक दिली आहे त्यात बोइट मासा आहे. छोटा बोईट चविष्ट असतो.
दक्षे
चवीला हा अगदी तसा पाणचटच असतो
चवीला हा अगदी तसा पाणचटच असतो >> हे १००% खर, मिटक्या मारत खाण्याचा मासाच नाही हा.. ह्याच माशाच्या डोक्यात ३ दगड असतात तोच ना हा. ह्या मोठ्या माशाना घोळ म्हणतात का?
राणे, ढोमी आणि घोळ ह्या ३ माशा बाबत पुरता घोळ आहे... समजवून सांगाल का?
मसाला लावलेले मासे भारी
मसाला लावलेले मासे भारी दिसताएत.
अजुन एकाची विकेट पडणार असं
अजुन एकाची विकेट पडणार असं दिसतयं

सत्यजीत ढोमा हा वेगळा मासा
सत्यजीत ढोमा हा वेगळा मासा आहे.
घोळ तशी चविष्ट असते. घोळ ढोम्याच्या आकारापासून ते छोट्या होडी एवढ्या आकाराची मी पाहीली आहे.

ह्या फोटोतील घोळीपेक्षा दुप्पटही असतो घोळ मासा.
राणी मासा रंगीत असतो. त्याला गुलाबी सोनेरी रंग असतो. तो आम्ही खात नाही म्हणून आणायचे धाडस होत नाही
सिंडरेला धन्स.
श्री कोणाचा नंबर आहे आता ?
राणी मासा दिसायला छान म्हणुन
राणी मासा दिसायला छान म्हणुन एकदा आणलेला....तळायला भरपुर तेल घालुन पॅन मधे टाकला तर सर्व मासे तव्याला चिटकुन बसु लागले.....चवीला पण खास नाही.....थोडक्यात काय तर दुरुन डोंगर साजरे....पैसे तर पैसे रवीवार चा मूड पण गेला.....
परत कानाला खडा लावलाय हा मासा पुन्हा आणणे नाही...