Submitted by प्रसाद लिमये on 15 February, 2013 - 06:25
दिलेल्या चित्रांशी मिळते जुळते शेर वाटले म्हणून ही पूर्वप्रकाशित गझल देत आहे. शेवटचे दोन्ही शेर चित्र. क्र. ५ शी जुळणारे वाटले.
या गझलेचे माबो वरच एक चांगले विडंबन झाल्याचे आठवते. मला ते आवडलेही होते
सुचता सुचताना ओळ निसटली आहे
या हवेत आता गझल पसरली आहे
मी स्वप्न पाहतो खोल खोल जाणारे
अन मनात कुठली डुलकी निजली आहे
मायेने इतक्या हात कुणी सोडवला
ही आपुलकीची रेघ उमटली आहे
मी लिहीन आता गोष्टी, किलबिल गाणी
चिमणीने माझी पाटी पुसली आहे
आठवे न कितवे क्षितीज मागे पडले
अन मी कोणाची जागा धरली आहे
शोधतो आतले नवे वेगळे रस्ते
बाहेर दिशांनी वाट अडवली आहे
( क्षितिज शब्दात थोडीशी सूट घेतली आहे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायेने इतक्या हात कुणी
मायेने इतक्या हात कुणी सोडवला
ही आपुलकीची रेघ उमटली आहे
मी लिहीन आता गोष्टी, किलबिल गाणी
चिमणीने माझी पाटी पुसली आहे
शेर फार आवडले.
सुंदर दुसर्या शेरात आड/पोहरा
सुंदर
दुसर्या शेरात आड/पोहरा न घेता राबवलेली कल्पना आवडली.
चिमणीने पाटी पुसली चा शेर मस्त
क्षितिज सुंदर, दिशांनी वाट अडवणेही सुंदर
गझल फार आवडली, पण तुम्हीच
गझल फार आवडली, पण तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे चित्रांचा संदर्भ किंचित कमी आला इतकेच. पण स्वतंत्ररीत्या गझलेतील प्रत्येक शेर फार सुंदर झालेला आहे. धन्यवाद या सहभागासाठी
गझल फार आवडली, पण तुम्हीच
गझल फार आवडली, पण तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे चित्रांचा संदर्भ किंचित कमी आला इतकेच. पण स्वतंत्ररीत्या गझलेतील प्रत्येक शेर फार सुंदर झालेला आहे.>>> बेफींच्या या विधानाशी सहमत
सर्व प्रतिसादकांचाव वाचकांचा
सर्व प्रतिसादकांचाव वाचकांचा आभारी आहे. धन्यवाद
लै भारी ! खूप आवडली .
लै भारी ! खूप आवडली .
सुंदर. आवडली.
सुंदर. आवडली.
खूप आवडली खूप वेगळी फ्रेश
खूप आवडली खूप वेगळी फ्रेश आहे

..नमस्ते मी वैभव वसंतराव कुलकर्णी ....प्रसादजी ऐल्पैलवर प्रतिसादातून आपण भेटलो आहोतच तुमच्या गझलेला भेटायचा योग प्रथमच आला बहुधा
भेटून् खूप छान वाटले धन्यवाद
मी स्वप्न पाहतो खोल खोल
मी स्वप्न पाहतो खोल खोल जाणारे
अन मनात कुठली डुलकी निजली आहे
मायेने इतक्या हात कुणी सोडवला
ही आपुलकीची रेघ उमटली आहे
>> सुरेख!!!
धन्यवाद वैभव - आभार, भेटत
धन्यवाद
वैभव - आभार, भेटत राहूच ( माझ्या नावापुढील जी काढून टाकल्यास उत्तम )
सुरेख.
सुरेख.
आपुलकीची रेघ......... सुरेख
आपुलकीची रेघ......... सुरेख !!
गझल खूप आवडली
धन्यवाद
धन्यवाद
व्वा, सुर्रेखच...
व्वा, सुर्रेखच...
चांगली आहे !
चांगली आहे !