Submitted by सुशांत खुरसाले on 5 February, 2013 - 10:36
ध्यास त्याचा लागतो का जे मुळी भाग्यात नाही ?
घास का मी शोधितो की जो मुळी ताटात नाही ?
माणसाचे मुखवटे की मुखवट्यांची माणसे ही
कालची ती आर्तता का आजच्या श्वासात नाही?
शेवटीला जाहले खांदेकरी शेजारचे का?
आग त्याला द्यावयाला पोरगा गावात नाही !
झेलतो आहे अजूनी शाप आणि आसवांना
झगडण्या आनंद देतो हात तो हातात नाही !
मी कधी जोडून गेलो हात मज कळलेच नाही
मानले होते जरी की देव या जगतात नाही !
घाव हा आहे गुलाबी ; घाव आहे मोरपंखी
आज पहिल्यासारखा अंदाज त्या घावात नाही !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झेलतो आहे अजूनी शाप आणि
झेलतो आहे अजूनी शाप आणि आसवांना.. णी करावा लागेल ना?
गझल छान ...शेवटचा शेर संदिग्ध वाटला.
पुलेशु!
Aaple barobar aahe shyamaji
Aaple barobar aahe shyamaji , te ' aanee ' karave lagel ...
Dhanyavaad !!
मस्त गजल आहे राव...
मस्त गजल आहे राव...
मस्त गझल आहे राव... >>> +
मस्त गझल आहे राव... >>> + १
फक्त सहजच सुचले म्हणून सांगतो आहे
<<<<आज पहिल्या सारखा आघात ह्या घावात नाही !
तसेच आजच्या श्वासात ऐवजी आज अस्तित्वात हा बदल सुचला
मी म्हणतोय ते चांगले आहे असे नाही पण मला तसे म्हटल्यावर छान वाटले आपणासही कसे वाटते ते पहावे ...फक्त बदलाची तीव्र गरज मला वाटली इतके खरे
बाकी गझल खूपच सुरेख आहे धन्यवाद
'andaaz ' mhanje najakat
'andaaz ' mhanje najakat ....ase mhanayche hote mala ...
aapan mhanta tehi surekh vatate aahe !!
मी कधी जोडून गेलो हात मज
मी कधी जोडून गेलो हात मज कळलेच नाही
मानले होते जरी की देव या जगतात नाही !.... मस्तच.
Dhanyavaad Prajuji !!
Dhanyavaad Prajuji !!
बहुत बडिया!!
बहुत बडिया!!
ध्यास त्याचा लागतो का जे मुळी
ध्यास त्याचा लागतो का जे मुळी भाग्यात नाही ?
घास का मी शोधितो की जो मुळी ताटात नाही ?
खयाल चांगला आहे..
सानी मिसऱ्यात थोडी सफाई हवी होती अजून असे वाटून गेले..( वै.मत )
मी कधी जोडून गेलो हात मज कळलेच नाही
मानले होते जरी की देव या जगतात नाही !
सुरेख शेर..
धन्यवाद..
Vaibhavji dhanyavaad !! sani
Vaibhavji dhanyavaad !!
sani misryat safai arthachya drushtine ki rachnechya drushtine ? Tarihi adhik changla suchlyas jarur badlen ....aaplya suchananche swagat ......aahe !!
Shivamji , maayboli var
Shivamji , maayboli var manapasun swagat !! pratikriyebaddal aabhar !!
सुशांतजी, आपली ही गझल आम्ही
सुशांतजी, आपली ही गझल आम्ही अशी करून पाहिली............
खयाली गझल
ध्यास त्याचा लागतो का? जे मुळी भाग्यात नाही!
घास ताटातील सुद्धा जायचा तोंडात नाही!!
ही धडे बिनचेह-यांची, निरनिराळ्या मुखवट्यांची!
प्रेम, माया वा दया, आस्था अशी कोणात नाही!!
चार शेजारीच आले द्यायला खांदा तयाला....
चूड लावायास देखिल पोरगा गावात नाही!
सोसतो चुपचाप सारे आसवांचे शाप आता....
हात मदतीचा तुझाही राहिला हातात नाही!
कोण जाणे हात आपोआप गेले जोडले का?
आजवर घोकीत आलो देव या जगतात नाही!
लागले वाटायला का, घाव हे सारे गुलाबी?
कालचे आघात कुठल्याही जणू घावात नाही!
................प्रा.सतीश देवपूरकर
he ji mhanane sodun
he ji mhanane sodun dyaa...
aapan tr sam vayaska...
आहो, कुणाचा पापड कुठे मोडेल
आहो, कुणाचा पापड कुठे मोडेल सांगता येत नाही, म्हणून काळजी घेतलेली बरी असते!
ना ज्ञानाचा, वडीलकीचा आदर उरला......
पोर शेंबडे म्हाता-याला शिकवत आहे!
अशी आहे परिस्थिती सध्याच्या पिढीची!
म्हणून आम्ही 'जी'चे शेपूट आपले लावून ठेवतो.......रिस्क नको!
Satish'ji' (tunhala ji
Satish'ji' (tunhala ji mhanane yogyach - aahe ase mala vatate --dnyan+anubhav )
mazya khayali pekshahi aapli khayali mala jast bhavali .............
to devacha sher tar .........
APRATIM !!
धन्यवाद सुशांत! (जी महणतनाही
धन्यवाद सुशांत! (जी महणतनाही रे बाबा! )
सुशांत ते तुझेच शेर आहेत!
सुशांत ते तुझेच शेर आहेत! आम्ही फक्त अभिव्यक्ती जराशी बदलली इतकेच! तुझ्या भावना व्यक्त होतात ना? तसा आमचा प्रयत्न होता. कितपत यशस्वी झालो हे तू ठरवायचे!
Abhivyakti adhik changli
Abhivyakti adhik changli zali !!
Aaplya khayalit shiknyasarakhehi khup aahe ..
.Asech margadarshan karat raha ,sir..
Dhanyavaad .
चला एकतरी शिष्यमासा ह्या
चला एकतरी शिष्यमासा ह्या देवमाश्याच्या गळाला लागला म्हणायचा
काय काय नाही केलंय यासाठी आजवर (याचसाठी केला होता अट्टाहास ;))
(No subject)
मतल्यातील दोन्ही मिसरे एकच
मतल्यातील दोन्ही मिसरे एकच भाव आळवीत आहेत. जे नाही त्याचा ध्यासच दोन्हींतून व्यक्त होतोय .
जे आहे त्याचं महत्वच नाही यावर एक मिसरा असावा असं वाटतं (खयालानुसार तरी) .
इतर शेर मस्त जमून आले आहेत.
राजीवजी , आपले म्हणणे मला
राजीवजी , आपले म्हणणे मला पट्ले. लिहिताना मलाही ते जाणवले होते..
'व्यापले आकाश तरीही ,बळ म्हणे पंखात नाही !
ध्यास त्याचा लागतो का ?जे मुळी भाग्यात नाही '
हा मतल्यातला बदल कसा वाटतो ?
वैभवजी फाटक यांनी अपेक्षीलेली मतल्यातली सफाई हीच असावी..
प्रतिसादाबद्द्ल सर्वांचे आभार !!
नाही खुरसाले नाही अजून विचार
नाही खुरसाले नाही अजून विचार करा
लागतो का अन् का लागतो यातला तो फरक असेल पहा विचार करून तुमचे तुम्हीच
एक नावाचे जे कुणी बुरखाधारी
एक नावाचे जे कुणी बुरखाधारी आहात,

एक शिष्य??????
अंधारात आहात आपण! अशाच भ्रमात सुखात रहा!