७-८ लांबुळक्या पांढरट हिरव्या मिरच्या (चवीला माइल्ड ते मध्यम तिखट)
ऑलिव्ह ऑइल (ऑ ऑ)
१/३ वाटी हरभर्याचे दाणे
१ छोटा टोमॅटो
१५-२० पुदिन्याची पाने
पेराएवढे आले किसून
१ मोठी लसूण पाकळी
अर्धी वाटी पातळ पोहे
१ चमचा फ्लेक्ससीडस
१ चमचा भोपळ्याच्या बिया
२ लाल सुक्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ
२ चीझ स्लाइस
१. अर्धी वाटी पातळ पोहे, १ चमचा फ्लेक्ससीडस, १ चमचा भोपळ्याच्या बिया, २ लाल सुक्या मिरच्या हे सगळे तव्यावर कोरडे भाजून घ्या.
२. जरा गार झाले की मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
३. १/३ वाटी हरभर्याचे दाणे, १ छोटा टोमॅटो, १५-२० पुदिन्याची पाने, पेराएवढे आले किसून, १ मोठी लसूण पाकळी हे सगळे मिक्सरमधून भरड वाटून घ्या.
४. दोन्ही वाटणे चार थेंब ऑ ऑ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. याच वेळेला चवीनुसार मीठ घाला. पातळ पोहे असल्याने हे पटकन आळत जातं त्यामुळे मिरच्यांचे सिडींग आधी केल्यास बरे. नाहीतर थोडे पाणी घालून सारखे करायला हरकत नाही. सारणाची कन्सिस्टन्सी हवी. खूप पातळ नको.
५. मिरच्या मध्यभागी चिरून बिया आणि शिरा काढून घ्या.
६. चीझ स्लाइसच्या अर्ध्या सेमी जाडीच्या पट्ट्या कापून घ्या.
७. या पट्ट्या प्रत्येक अर्धमिरचीत एकेक अश्या भरा
८. चीझच्या पट्टीनंतर सारण ओतप्रोत भरा.
९. बेकिंग पॅन/ डिश ला ऑ ऑ चा हात पुसून घ्या.
१०. ओव्हन १७० डि से. ला २०-२५ मिनिटे चालवा.
११. खाण्याइतपत गार झाल्यावर हादडा
अनेक गोष्टींना अनेक सब्स्टिट्यूट करता येतील. करून बघा आणि कळवा
दह्याचा बेस असलेल्या कुठल्याही चटणीबरोबर अफलातून लागेल.
अरे वा .. एकदम वेगळंच आहे
अरे वा .. एकदम वेगळंच आहे काहितरी ..
(रेसिपीच्या नावात झटपट न लिहील्याबद्दल आभार .. ;))
मस्त झणझणीत लागतायत.
मस्त झणझणीत लागतायत.
एकदम वेगळाच प्रकार. असं सारण
एकदम वेगळाच प्रकार. असं सारण कधीच पाहिलं नव्हतं ह्यापूर्वी. मिरचीच्या तळाशी चीजस्लाईस घालण्याची आयडिया भारीच आवडली. नक्की करुन बघणार
सही दिसतायत! फोटो पण मस्त
सही दिसतायत! फोटो पण मस्त आलेत
(मी ज्या लिहल्या होत्या त्या याच मिरच्या वापरुन करता येतिल फक्त आमच्याकडच्या मिरच्या अजुन ला.न्ब आणी जाड्या असत्यात)
मस्त दिसत आहेत, इकडे कमी तिखट
मस्त दिसत आहेत, इकडे कमी तिखट थोड्या जाड मिरच्या मिळतात त्या वापरुन बघेन. सोबत थोडं चिंच गुळ छान लागेल.
अगं हरभर्याचे दाणे आज मिळाले
अगं हरभर्याचे दाणे आज मिळाले चक्क. मग सुचत गेलं. बेससाठी ब्रेडक्रम्स पेक्षा पातळ पोहे बारीक घेतले तर ते जास्त बरे... असं काय काय...
मस्तं !
मस्तं !
ऐ क्या रेसिपी है..वॉव.. एकदम
ऐ क्या रेसिपी है..वॉव.. एकदम हटके... मस्तच..
वा वा मस्त तोपासु.
वा वा मस्त तोपासु.
मिरच्या यम्मी दिसतायेत, लवकरच
मिरच्या यम्मी दिसतायेत, लवकरच करून बघण्यात येतील
haay haay mirchiii
haay haay mirchiii
येस संपे.. हाय हाय मिरची..
येस संपे.. हाय हाय मिरची.. उफ उफ मिरची!
दह्यात चिमूटभर हिंग, चिमूटभर मिरपूड, चिमूटभर सैंधव, चिमूटभर सॅण्डविझ्झाचा सॅण्डविच मसाला असे घालून मस्त घोटायचे. आणि या मिरच्यांबरोबर डिप म्हणून घ्यायचे
भारी आहे ही कृती. कमी तिखट
भारी आहे ही कृती. कमी तिखट मिरच्या मिळाल्या की करून बघता येईल.
Flax seeds च्या पुढे कंसात जवस लिहीशील का, सगळ्या साहित्याची नावे मराठीत आहेत तर याचे पण मराठी नाव असु दे.
रूनी, जवस की अळशी वगैरे वगैरे
रूनी, जवस की अळशी वगैरे वगैरे वाद टाळायला विंग्रजी लिहिलं गं
मस्त वेगळाच प्रकार. फोटोही
मस्त वेगळाच प्रकार. फोटोही छान.
यम्मी
यम्मी
मस्त !! फारच इनोव्हेटिव्ह आहे
मस्त !! फारच इनोव्हेटिव्ह आहे सारण. हल्ली ताजे हरभरे नाही मिळत. त्याला मटारच्या दाण्यांचा पर्याय वापरून करून बघणेत येईल.
एकदम तोंपासू फोटो आणि कृती
एकदम तोंपासू फोटो आणि कृती पण. केलीच पाहिजे आता लवकर.
वॉव, मस्त रेसिपी. हटके एकदम.
वॉव, मस्त रेसिपी. हटके एकदम.
वेगळी आहे एकदम रेसिपी. नक्की
वेगळी आहे एकदम रेसिपी. नक्की ट्राय करेन.
जबरदस्त! स्टेपवाईज टाकलेली
जबरदस्त!
स्टेपवाईज टाकलेली कृती मस्तच.
चवीला जोरदार असणार एकदम.
तोंपासु यार
तोपासु अप्रतिम डिश
तोपासु
अप्रतिम डिश
लई तोंपासु रेस्पी! करणेत
लई तोंपासु रेस्पी!
करणेत येइल!
(No subject)
रेसिपी मस्त लिहिली आहेस. अगदी
रेसिपी मस्त लिहिली आहेस.
अगदी पुस्तकं असतात ना बेसिक फॉर डमीज तशी.
अगदीच कुणी नवख्याने अजुन चुका करु नये म्हणुन फोटोत नावं दिली आहेत ते आवडलं.
हा प्रकार लयी भारी लागत असणारच.
धन्स लोकहो.. एकदम जमून
धन्स लोकहो.. एकदम जमून गेलेला प्रयोग होता हा..
अगदी पुस्तकं असतात ना बेसिक फॉर डमीज तशी <<<
कारण मला तश्या प्रकारे रेस्पी सांगितली असेल तरच जमते. फार फॅन्सी-श्मॅन्सी प्रकारे लिहिलेलं असेल किंवा मग अट्टल सुगरणीच्या भाषेत असेल तर झेपत नाही
नीधप, मस्त हटके टेस्टी रेसिपी
नीधप, मस्त हटके टेस्टी रेसिपी आहे.
वाँव हटके रेसिपी
वाँव हटके रेसिपी
मस्तच.. सकाळी सकाळी खमंग
मस्तच.. सकाळी सकाळी खमंग पदार्थ
व्वॉव जिभेचं पाणी पाणी
व्वॉव जिभेचं पाणी पाणी झालं
फोटो सेव्ह करुन ठेवण्यास परवानगी आहे का?
Pages