Submitted by सतीश देवपूरकर on 5 November, 2012 - 06:44
गझल
फळे चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला फुलण्याचा!
घोट घोट मी अश्रू प्यालो, स्वाद समजला जगण्याचा!!
विरंगुळ्याला तुला नेमका हवाच होता कुणी तरी;
सोस तुलाही हसण्याचा अन् सोस मलाही फसण्याचा!
पंख मिळाले सोनेरी; पण...हाय, गगन मी गमावले!
वरदानाच्या वेषामध्ये शाप मिळाला झुरण्याचा!!
सांग पाखडू कसे सुखाला? सुखासारखे दु:ख दिसे;
पाखडताना पाठ वाकली, बेत बिनसला दळण्याचा!
वाचवणारा थिटाच पडला, बलाढ्य ठरला बुडणारा!
बुडणा-याने मनात होता चंग बांधला बुडण्याचा!!
एक चेहरा, रंग परंतू किती त-हेने पालटतो!
घोर लागला त्यास केवढा, असण्यापेक्षा दिसण्याचा!!
कोसळणा-या उंच कड्याची विरते जेथे किंकाळी.....
कुणी ऐकला असेल टाहो तिथे फुलांच्या कुढण्याचा?
.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बुडण्याचा!!>>> हा शेर व
बुडण्याचा!!>>> हा शेर व त्यावरून बरीच पूर्वी झालेली चर्चा(वादंग) स्मरते आहे .
मी सुचवलेला बदलही आठवतोय
अडात पडला वाचवणारा बुडात बुडला बुडणारा
बुडणा-याने मनात होता चंग बांधला बुडण्याचा!!
वैभवा, अडात पडला वाचवणारा
वैभवा,
अडात पडला वाचवणारा बुडात बुडला बुडणारा
बुडणा-याने मनात होता चंग बांधला बुडण्याचा!!<<<<<<
वाचवणारा अडात कसा पडेल? की, वाचवणारा अडात उडी मारेल?
बुडणारा बुडात कसा बुडेल? बुडल्यावर तो पाण्याच्या तळाशी जाईल, होय ना?
टीप:
आमच्या वरील शेरात वाचवणा-याचे थिटेपण व बुडणा-याचे बलाढ्यपण असा विरोधाभास दिसतो आहे. म्हणजे परमेश्वराने वाचविण्यासाठी कितीही हात द्यायचे म्हटले तरी जर बुडणा-या माणसाची स्वत:चीच तीव्र इच्छा बुडण्याचीच असेल, तर बलाढ्य परमेश्वरही थिटा पडू शकतो, अशा माणसाला वाचवताना!
इथे नकारात्मकतेचा सकारात्मकतेवर कसा विजय होवू शकतो हे बुडणारा व वाचवणारा या प्रतिकांमधून व्यक्त होते!
ही प्रतिमांची भाषा व हा शेराचा अर्थ आम्हास तू दिलेल्या शेरात दिसत नाही.
..........प्रा.सतीश देवपूरकर
थिटेपण, बलाढ्यपण ही विषेषणे
थिटेपण, बलाढ्यपण ही विषेषणे वाचवणारा व बुडणारा याना गैरलागू व अनावश्यक वाटली मला व्यक्तिशः
वाचवणारा अडात कसा पडेल?>>>> स्वतःहून !! जसा बुडणारा स्वतःहून बुडतो आहे
बुडणारा बुडात कसा बुडेल? बुडल्यावर तो पाण्याच्या तळाशी जाईल, होय ना?>>>>> हा प्रश्न आहे की उत्तर आहे की अजून काही ? या वाक्याचा पुन्हा एकदा शान्त बसून विचार करावा ही विनन्ती
प्रतिकांमधून व्यक्त होते आहेच तर विशेषणे का लावायची उगाच ?
ही प्रतिमांची भाषा व हा शेराचा अर्थ आम्हास तू दिलेल्या शेरात दिसत नाही.>>>>याचा अर्थ तुमचा हाच शेर तुम्हालाच याच ठि़कणी लागू होतो असा काहीजण काढू शकतात हे मी नम्र पण आधीच नमूद करू इच्छितो
असो
धन्यवाद !!
धन्यवाद वैभवा!
धन्यवाद वैभवा!
वैभवा! बुडणारा स्वत:ला बुडवू
वैभवा!
बुडणारा स्वत:ला बुडवू पहात आहे!
वाचवाणारा दुस-याला वाचवू पहात आहे!